Shahajibapu Patil Majha Katta Full:गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 июл 2022
  • #ShahajibapuPatilMajhaKatta #MajhaKatta #ShivSenaRebelMLA #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews #shahajibapupatil
    Shahajibapu Patil Majha Katta : गुजरात,गुवाहाटी ते गव्हर्नमेंट,माझा कट्टावर शहाजीबापूंची फटकेबाजी
    Shahajibapu Patil, Majha Katta : शिवसेनेमधील अभूतपूर्व बंडाचे साक्षीदार आणि त्यांच्या एका डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेले सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बुधवारी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. जितकी चर्चा सत्तांतराची झाली, नव्या मुख्यमंत्र्यांची झाली, शिवसेनेतील नाराजीची झाली... त्यापेक्षा जास्त फेमस शहाजी बापूंचा डायलॉग फेमस झाला. डोंगर, झाडी आणि हॉटेलचा डायलॉग फेमस झाला. त्यावर गाणेही आले. सोशल मीडियावर या डायलॉगची चर्चा रंगली आहे.
    शहाजी बापूंच्या, 'काय झाडी.. काय डोंगार.. काय हॉटेल.. एकदम ओक्के' या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या डायलॉगमुळे शहाजी बापू सोशल मीडियावर एका रात्रीत स्टार झाले. सत्तांतर, नवे मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील नाराजीपेक्षा शहाजी बापूंच्या या डायलॉगची चर्चा जास्त झाली. अनेकांनी त्यांना पर्यटनमंत्री करा? अशी मागणीही केली. शहाजी बापू पाटील यांनी माझा कट्ट्यावर दिलखुलास गप्पा मारल्या...
    डाव्या विचारसरणीचे गणपतरावजी देशमुख यांनी 11 वेळा आमदाराकीची निवडणूक जिंकली. 11 वेळा निवडणूक जिंकल्यामुळे ते प्रसिद्ध झाले होते. मी सात वेळा निवडणूक लढलो... पाच वेळा पडले.. माझाही रेकॉर्ड सांगा.. त्यांच्याविरोधात निवडणूक लढणे सोपं नाही.. त्यामुळे माझीही दखल घ्या, असे मी म्हटलो होतो, असे शहाजीबापू म्हणाले.
    ABP Majha LIVE | Shahajibapu Patil Full Majha Katta | Shiv Sena Rebel MLA | Maharashtra Political Crisis
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Комментарии • 2,8 тыс.

  • @sachin....sk.b1754
    @sachin....sk.b1754 Год назад +301

    सर्वप्रथम एबीपी माझा चे मनापासून आभार मानतो. कारण आज आपल्या कट्यावर शहाजी बापू सारख्या कालपर्यंत या जगाला ओळख हि नसलेल्या व्यक्तिमत्वाला आमंत्रित करून , आम्हा प्रेक्षकांना त्यांना जवळून पाहण्याची आणि ऐकण्याची संधी दिली....आता येतो बापू कडे...
    बापू ....! खरतर तुम्हाला , तुमच्या अभ्यासू वृत्तीला ,तुमच्या प्रामाणिक स्वभावाला आणि तुमच्या मायबोली भाषेला सगळ्यात अगोदर माझा मनाचा मुजरा...... तुम्ही बोलत असताना अनेकदा आपल्या तालुक्याच्या प्रगती बद्दल बोललात , एवढं बोलून गेलात कि , तुमच्या तालुक्याची तुलना तुम्ही डायरेक्ट बारामतीशी केलात. आणि ये करणं तुमच्यासाठी काही अवघड आहे असं मला तरी वाटत नाही , त्याबद्दल तुम्हाला शुभेच्या ... आणि आपल्या तालुक्याची एवढी काळजी करणार एवढी दूरदृष्टी बाळगणारा आमदार जर प्रत्येक तालुक्याला लाभला तर नक्कीच तुमचं जे स्वप्न आहे कि ज्या गतीने या राज्याचा विकास करण्याचं ते स्वप्न पूर्ण व्हायला काहीच वेळ लागणार नाही. तुमच्या सारखीच बुद्धी या राज्यातल्या सर्व ( काही अपवाद वगळता ) राजकारणायांना लाभो एवढीच ईश्वर चरणी प्रार्थना......... आणि शेवटी तुमच्या तालुक्यातल्या जनतेला माझी एक नम्र विनंती आहे , कि एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कि , या माणसाने महाराष्ट्र च नव्हे तर उभ्या जगाला तुमच्या तालुक्याची दखल घ्यायला भाग पाडलय . आणि तुमच्या या व्यक्तीच्या पाठीशी उभं राहण्याने या राज्याला एक साधा , सरळ , अभ्यासू , आणि प्रामाणिक मंत्री भेटणार आहेत . ...... एवढं विसरू नका. ....... एबीपी माझा चे जवळपास अलीकडच्या काळातले सर्व कार्यक्रम मी पाहिलेत पण आजचा हा कार्यक्रम मला खूप आवडला ...... पुन्हा एकदा खूप आभार.
    ( हे माझं वयक्तिक मत आहे याच कुठल्याही राजकीय पक्षाशी काहीही देणं घेणं नाही. )

    • @sunilraut7870
      @sunilraut7870 Год назад +1

      ओके

    • @rameshchavan6298
      @rameshchavan6298 Год назад +3

      Sachin tumhi apratim lihilay bapu ani mana deshi lokanchya baddal.... dhanyawad

    • @sachin....sk.b1754
      @sachin....sk.b1754 Год назад +1

      @@rameshchavan6298 dhanyawad .... Sir 🙏🏻🙏🏻 Kay karnar Shahaji bapu ek as vyaktimatv aahe , Jyana aiklyanantar as kahi tari atomatic ch houn jat ...tyasathi jast vichar pan karava lagat nahi

    • @balkrishnatarhal5740
      @balkrishnatarhal5740 Год назад

      Very nice opinion.

    • @sachin....sk.b1754
      @sachin....sk.b1754 Год назад

      @@balkrishnatarhal5740 thanks sir.... 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ajinkyaswami2144
    @ajinkyaswami2144 Год назад +192

    असा ' माझा कट्टा ' पाहिले कधी झाला च नाही. बापू १ च नंबॅर!!!🔥⛳

  • @rushikeshsule6768
    @rushikeshsule6768 Год назад +97

    बापू अर्रर लय भारी 👌👌... तुमच्या भाषणात , बोलण्यात ,वागण्यात आणि वावरण्यात सत्यता , नम्रता ,आपुलकी ठळक पणे दिसून येते, आपल्या सारखे सच्चे नेते या महाराष्ट्राला लाभो हीच श्री विठ्ठला चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @pravinsuryavanshi2161
    @pravinsuryavanshi2161 Год назад +132

    शहाजी बापू भविष्यात सभा गाजवतील... त्यांच्या भाषेची, साधेपणाची, सच्चेपणाची महाराष्ट्राच्या जनतेला भुरळ पडली आहे...

  • @sonalichavan5989
    @sonalichavan5989 Год назад +188

    किती छान साधा आणि सरळ तसच गोड माणूस आहात बापू❤️🥰

  • @deerdrivers
    @deerdrivers Год назад +227

    पहिल्यांदा *माझा कट्टा* without skip करता बघितला...... प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचा माणूस बघितला...... एकदम भारी.....मी कधी कंमेंट करत नाही पण ह्या माणसाने मन जिंकलं

  • @pandurangingle8242
    @pandurangingle8242 Год назад +31

    जिथे अन्याय होतो तिथे राहायचे नाही बापूंनी घेतलेला योग्य निर्णय बापू सरळ आणि साधा माणूस आहे एबीपी माझा ने मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद

  • @adityapawar3274
    @adityapawar3274 Год назад +53

    आम्हाला तुमच्यामुळ जुना महाराष्ट्र समजला बापू आणि जिंकलेल्या पेक्ष्या हरलेल्याला जास्त अनुभव great bapu fan jhalo rav apla 👌👌👌

  • @rajeshs.arolkar1222
    @rajeshs.arolkar1222 Год назад +121

    छान झाली मुलाखत राजकरणा व्यतिरिक्त बरेच काही शिकायला मिळाले बापुचे बोलणे मनाला भावले. माणूस साधा आहे पण बरेच काही सांगून गेला. बापुना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या. परत म बोलतो काय डोंगुर काय झाडी सगळं कसे ओके हाय. (खूप छान )सुंदर मुलाखत माझा कट्याला खूप खूप धन्यवाद.

  • @BaluV143
    @BaluV143 Год назад +155

    आज संपूर्ण भाषण ऐकलं खूपच सुंदर आणि शहाजी बापू सरांबद्दल अजून आस्था वाढली महाराष्ट्रमध्ये त्यांचा प्रयत्न आणि प्रवास सांगोला तालुक्याच्या विकासासाठी असलेलं तळमळ हे खरंच प्रेरणादायी वाटलं बापूजी .
    धन्यवाद

  • @prasadgosavi986
    @prasadgosavi986 Год назад +182

    आजपासून बापू माझे नम्रपणाबद्दलचे गुरु. कसं बोलावं समोरच्याला न दुखवता हे मी या १ तासात शिकलो.

    • @TheAudienceDemand
      @TheAudienceDemand Год назад

      ho pan konasobat gaddari karu naka mhanje zhala !

    • @prasadgosavi986
      @prasadgosavi986 Год назад +5

      @@TheAudienceDemand ho ka. Thanks for advice

    • @AK-pv5qb
      @AK-pv5qb Год назад +5

      @@TheAudienceDemand mg he udhav thakarena pn lagu hot.. Tyache pahunch bapu vagle

    • @vickybodake3387
      @vickybodake3387 Год назад +1

      Bhai me pn

    • @TheAudienceDemand
      @TheAudienceDemand Год назад

      @@vickybodake3387 gaddari tevdhi karu naka mhanje zhala xD

  • @vat0787
    @vat0787 Год назад +74

    काय जबरदस्त व्यक्तमत्व आहे 🙏
    अशी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत हे भाग्यच ..
    राग एकच वाटतो अशी चांगली माणसं/ नेते महाराष्ट्राच्या राजकारणात मागे ठेवली गेली..
    जय महाराष्ट्र
    मी एवढी मुलाखत आत्तापर्यंत कोणाचीच एकली नव्हती पूर्ण एकली.. पण ही मुलाखत कायमची लक्षात राहील खूप छान 🙏👌

    • @manojgawali8026
      @manojgawali8026 Год назад

      💯

    • @vanitawayal5558
      @vanitawayal5558 Год назад

      Chor kadhi dhoka detil

    • @vanitawayal5558
      @vanitawayal5558 Год назад

      Chalu manus

    • @vat0787
      @vat0787 Год назад

      @@vanitawayal5558 तुम्ही ही मुलाखत नीट ऐका.. त म्हणतात की त्यांना भेटायला पण परवानगी नव्हती

  • @shrikantrepal6977
    @shrikantrepal6977 Год назад +529

    भल्या भल्या नामचीन पत्रकारांना ही निशब्द करणारं एक छान व निखळ व्यक्तिमत्व आम्हाला सार्थ अभिमान आहे बापूंचा ए बी पी चे अभिनंदन

    • @yogeshjadhav696
      @yogeshjadhav696 Год назад +1

      ४०० like. Khar aahe

    • @pratapinamdar3337
      @pratapinamdar3337 Год назад +1

      खुप छान

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 Год назад +6

      खांडेकर साहेबांचं nervous पणा खूप जाणवला,शहाजी बाप्पूनी अगदी मुद्देसूद आणि मनापासून सडेतोड निखळ आपले विचार स्पष्ट मांडले,

    • @mohanmaske9689
      @mohanmaske9689 Год назад

      ..

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi4112 Год назад +175

    काय चिमटा काढलाय !!! - मला तुम्ही हितं त्या डायलॅाग मुळेच बोलवलंय. नाहीतर कशाला बोलवताय !!! वास्तवाची जाणीव आहे. स्वप्नात नाहीत.

  • @mukeshbhosle709
    @mukeshbhosle709 Год назад +29

    पहिल्यांदा माझा कट्टा बघायला आवडला न व्हिडिओ स्कीप करता संपूर्ण बघितला खरच शहाजी बापू असल रांगडा गडी ग्रामीण भागातील जनतेची नाडी ओळखणारा ग्रेट माणूस.....👌👌👌💐

  • @eknathrokade5607
    @eknathrokade5607 Год назад +23

    सर्वात चांगली मुलाखत घेतली एबीपी माझा ने
    धकाधकीच्या जीवनात सरळ 1 तास tv बगण दुर्मिळ झालेलं आहे किंव्हा तेवढा वेळ ही नाही लोकांकडे परंतु आजच्या शहाजी पाटील साहेबांच्या मुलाखतीचे संपूर्ण महाराष्ट्र एबीपी माझा पुढून उटला नाही थँक्स एबीपी माझा

  • @_SHUBHAMPATIL-ii8nf
    @_SHUBHAMPATIL-ii8nf Год назад +377

    शहाजी बापू पाटील- एक रांगड आणि दिलखुलास व्यक्तिमत्व आपणास उदंड आयुष्य लाभो ही देवाचरणी प्रार्थना

  • @premkankal9008
    @premkankal9008 Год назад +64

    संगोल्याची जनता नशीबवान आहे, एवढा भारी लोकप्रतिनिधी भेटलाय तुम्हाला, संपूर्ण महाराष्ट्रातील आमदार बापू सारखे असायला हवे.

  • @rahulghadage9337
    @rahulghadage9337 Год назад +126

    आम्ही निवडून दिलेला दमदार आमदार गर्व आहे आम्हाला आमच्या ढाण्या वाघाचा
    दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या माझ्या सांगोला तालुक्याचा दुष्काळी वनवास संपवून तालुक्याला जलमय करणारा एकमेव जनसेवक

    • @suniltambe1
      @suniltambe1 Год назад +9

      शाब्बास, साडे तीन जिल्हयातल्यांना कानफाटात जाळ काडुन शिकवलेत की कसा नेता निवडावा....शाब्बास.👌👌

    • @payalbankar1497
      @payalbankar1497 Год назад

    • @sonug9032
      @sonug9032 Год назад +2

      एक नंबर माणूस...

  • @mahendrarajput4808
    @mahendrarajput4808 Год назад +83

    शहाजी बापू सारखा एक अभ्यासु आणि स्पष्ट प्रवक्ता आणि खूप संयमी नेता बघायला मिळाला।नेता असावा शहाजी बापू सारखा।

  • @shaileshshewalkar
    @shaileshshewalkar Год назад +291

    काय तो साधा सरळ स्वभाव, काय ते प्रेमळ आणि निर्मळ अंतःकरण ,काय तो दमदार पना👍 खरंच सगळं ok बापू साहेब ,👌👌💐💐

  • @Vijaykumar_Mali0043
    @Vijaykumar_Mali0043 Год назад +53

    आत्ता पर्यंत जेवढ्या मुलाखती झाल्या त्यात ही सर्वात जास्त आवडलेली मुलाखत 👍🏻👍🏻👍🏻

  • @grkgroup1713
    @grkgroup1713 Год назад +111

    मी पहिल्यांदा बघितला संपूर्ण माझा कट्टा 🙏🙏🙏
    सच्चा माणूस 👍👍

  • @namdeoshinde7641
    @namdeoshinde7641 Год назад +179

    काय रांगडेपणा, काय तो मनमोकळेपणा, काय तो अभ्यास, सगळं कस ओके मध्ये आहे शहाजी बापू 💐💐💐🙏👍

  • @sitaramsalunkheanna1042
    @sitaramsalunkheanna1042 Год назад +640

    ABP माझा तुमचे मनापासून आभार आमचा साधा माणूस अक्ख्या महाराष्ट्राला दाखवला..... सगळ्या विरोधकांना एकाचा तराजूत मापू फ़क्त शहाजी बापू.... आपला आमदार आपला अभिमान

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 Год назад +6

      एवढ्या मोठ्या गाजत वाजत मुलीचं लग्न करायचं ते पण भीक मागून हा कुठला आदर्श महाराष्ट्रामध्ये

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 Год назад +1

      गुहाटी गोवा समोर बोलायचं ना महाराष्ट्रात राहायचं ना हेच खरं उत्तर आहे

    • @Allinone-hz6qr
      @Allinone-hz6qr Год назад +20

      @@maheshsanas2885 सोनियासेना जाळली का ??

    • @om-kp6qn
      @om-kp6qn Год назад

      @@maheshsanas2885 tu khup motha ahe ka re murkha sadha manus ahe ha

    • @mohanmundhe2322
      @mohanmundhe2322 Год назад +1

      अगदी शालीतुन ठोकला👍👍👌

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke Год назад +194

    बापू तुम्ही महाराष्ट्राला पहिलांदा कळलात. खरं बोललात शिवसेने मध्ये तुम्हांला-दीपक केसरकर ह्यांना बोलू दिलं नाही आणि तुम्ही दोघे किती हुशार आहात हे कळलं.मस्त निर्णय घेतला तुम्ही..सांगोला मतदार तुम्हांला परत परत निवडून देवो आणि तुम्ही भर भरून कामे करो..शिंदे साहेब जिंदाबाद.

  • @dailynewshub260
    @dailynewshub260 Год назад +59

    लबाडी नाही, धोखाधडी नाही, जे पोटात ते ओठात...
    नम्र, शांत, संयमी माणूस...🙏

  • @kiranbhatane9836
    @kiranbhatane9836 Год назад +26

    दादा, सर, ताई, साहेब...... व्वा ! महाराष्ट्राचं हरवलेलं सुसंस्कृत राजकारण दिसलं आज शहाजी बापूंच्या भाषेत.

  • @user-px2gc4mk6n
    @user-px2gc4mk6n Год назад +202

    आतापर्यंत सर्वांत चांगली झालेली मुलाखात असं माझं मत आहे....बापूंना खरोखर महाराष्ट्र राज्यची प्रगती करावयाची आहे

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Год назад +181

    अशी पहिली मुलाखत पहिली ज्यामध्ये 1 तास 25 मिनिटे कधी निघून गेले समजलंच नाही, मन लावून ऐकत बसावं वाटत असे बापूंचे साधे बोलणे वा आव डल आमदार साहेब 💯🙏👍👏

    • @kadam2864
      @kadam2864 Год назад +4

      Salute for Bapu's first teacher who gave them inspiration for ..

    • @suniltambe1
      @suniltambe1 Год назад +5

      खरंच, जिंकले बापुंनी,अशी गुणी लोके लाभावी असं करंटयाचे नाशिब आणि लायकी नाही.

    • @adisworld6881
      @adisworld6881 Год назад +3

      Mi pan ekali,khup chan boltat,samjel ashi bhasha

    • @anantpatil7999
      @anantpatil7999 Год назад +2

      Pramanik jansevak🙏

  • @dr.gajananshete8113
    @dr.gajananshete8113 Год назад +35

    अशी जमिनीवर पाय असलेली, साधी राहणी उच्च विचार असलेली माणसं महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, हे पाहून बरं वाटलं. तुमचं भवितव्य उज्ज्वल आहे बापू!

  • @mohanvasantparande3606
    @mohanvasantparande3606 Год назад +33

    आजची बाप्पुंची मुलाखत व काही दिवसांपूर्वीची प्रवीण तरडे यांची मुलाखत... या दोन मुलाखती छान झाल्या आहेत... धन्यवाद! माझा कट्टा व टीम

  • @mayurdeshmukh4086
    @mayurdeshmukh4086 Год назад +66

    आतापर्यंत कधीच मी १ तासाची मुलाखत पाहिलेली न्हवती... फक्त बापू मुळे पूर्ण मुलाखत न पळवता बघितली.... काय अस्सल दिलदार रांगडा सच्चा प्रामाणिक माणूस आहेत बापू.... मानला यार फॅन झालोय या माणसाचा 💚💚💚💚🙌🙌

  • @user-ph3vk3uc4j
    @user-ph3vk3uc4j Год назад +113

    बापू मन जिंकले , काय मानुस, काय, बोलनं काय व्यक्तिमत्त्व समधं झकास

  • @ahambrahmasmi1905
    @ahambrahmasmi1905 Год назад +44

    किती मस्त बोलतो हा माणूस,
    कधी बोलणं संपलं कळलंच नाही. 🙏🏼

  • @cos_mos_island
    @cos_mos_island Год назад +22

    काय नम्र माणूस आहे.. आजकाल काही न करता सुध्दा लोकांना इतका अहंकार येतो.. यांनी सर्व महाराष्ट्राला नम्रपणा आपल्याकडे कसा असावा हे दाखवून दिले. 🙏 Respect 🙏

  • @anitamundhe6784
    @anitamundhe6784 Год назад +211

    कायम रोज सकाळी एका माणसाला घेऊन न्युज लाइव्ह कॅमेरासमोर येत होते
    इतर आमदारांना कोणी न्युज लाइव्ह केले नाही पण आज ग्रामीण भागातील नेते पण खूप हुशार आहेत हे खरे आहे पण लक्ष दिले जात नाही येवढेच

    • @shailajakarande9309
      @shailajakarande9309 Год назад +2

      He is completed LLB.

    • @oldisgold9272
      @oldisgold9272 Год назад +1

      Aamdar zala ajun kiti laksha dyayacha....hya lokana asa vatata ayushyabhar hech aamdar vhavet ..bakichya lokani kay karaycha..

    • @abhijitmore4534
      @abhijitmore4534 Год назад +3

      Gramin madhilch hushar astatat

  • @anilban60
    @anilban60 Год назад +406

    शहाजी बापूंना खूप जवळून अनुभवलं आहे.. आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.. किती साधा सरळ माणूस आहे ते....

    • @vikrampatil6822
      @vikrampatil6822 Год назад +2

      Abhimman

    • @shailajakarande9309
      @shailajakarande9309 Год назад +2

      Really. Good person.👍

    • @iajxy
      @iajxy Год назад +2

      Fakt 50 koti gheyun, gaddar asa sadha manus

    • @Radhikach768
      @Radhikach768 Год назад +11

      तू तोच आहेस ना? चांडाळ चौकडी chya करामती chya जीवावर पैसे कमवू पहात होतास 😀

    • @anilban60
      @anilban60 Год назад +2

      @@Radhikach768 तुझ्या बापाचं काय गेलं..??

  • @chinmaytare6110
    @chinmaytare6110 Год назад +64

    News reporters are not giving proper respect to him. Laughing, giggling at him constantly. Proud of you Shahjibapu Patil sir! Wish you all the best 🙏🙂

    • @MamaMateshorts
      @MamaMateshorts Год назад +9

      Nalayak ahet hya video madhle bench warche repoter

    • @chinmaytare6110
      @chinmaytare6110 Год назад +2

      @@MamaMateshortsअगदी खरंय.

    • @dhanavarshathaker4127
      @dhanavarshathaker4127 Год назад +8

      The casual body language of the host himself is very disrespecting for the interviwee.

    • @chinmaytare6110
      @chinmaytare6110 Год назад +8

      @@dhanavarshathaker4127 Absolutely. His body language and way of interviewing with people like Sanjay Raut and many others is different from the way he interviewed Mr. Shahjibapu Patil which is very evident. The interview was focused only on his "kaay jhaadi kaay dongar" dialogue. But nobody listened to his life/political journey, the hardships and agonies faced by him. Mr. Patil said at the end of the video that he feels extremely honoured and grateful that he got invited to the show by the channel and also ends his sentence by saying "तुम्ही मोठी माणसं" to the host so humbly but absolutely nobody including the host reciprocated it by saying that the feeling is mutual, atleast for the sake of courtesy.

  • @rahulgaikwad6535
    @rahulgaikwad6535 Год назад +26

    Ek no saheb. असा सत्य बोलणारा , जमीनीवरचा नेता , नक्कीच सांगोला तालुक्याचा विकास होईल.

  • @sitarampatil3233
    @sitarampatil3233 Год назад +150

    नियती फार अनाकलनीय आहे. काल पर्यंत टिंगलीचा विषय झालेला माणूस आज कट्टा वर येऊन मने जिंकतो. त्यांची क्षमता, अनुभव, ज्ञान, जिद्द आणि बऱ्याच काही गोष्टी कट्ट्या मार्फत समजल्या. धन्यवाद कट्टा.

  • @aavinashbansode1332
    @aavinashbansode1332 Год назад +356

    खूप दिवसाने एक मस्त कट्टा बगायला भेटला....बापूचा स्वभाव आम्हांला माहीत आहे ..ते जस आहेत तस बोलतात ..आज ते सगळ्या जगाला समजलं...👌👌👌👍👍👍

  • @somnathgujare2627
    @somnathgujare2627 Год назад +18

    माझा कट्ट्यावर पहिल्यांदा असा राजकारणी बघितला की खरंच मनापासून आनंद झाला. आणि सव्वा तास कधी गेला, हे कळाले सुद्धा नाही. बस राजकारणी पाहिजे तर असा, धन्यवाद एबीपी माझा.

  • @grkgroup1713
    @grkgroup1713 Год назад +23

    पक्ष दोन नंबर चा शेवटी माझं गाव आहे 🙏🙏🙏🙏
    असेच आमदार संपूर्ण महाराष्ट्रातुन निवडून गेले पाहिजेत!
    दिलदार माणूस 🙏🙏👍

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq Год назад +401

    अतिशय योग्य निर्णय... निष्ठा जनतेबरोबर असावी.. कोण जहागीरदार नाही त्याच्या वर निष्ठा ठेवायला

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 Год назад +4

      फडणीस मुख्यमंत्री मत का सोडलं

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 Год назад +4

      मग फडणीस मी मुख्यमंत्रीपद का सोडलं

    • @Allinone-hz6qr
      @Allinone-hz6qr Год назад +9

      @@maheshsanas2885 घरकोंबडा मुख्यमंत्री 🤣🤣🤣🤣

    • @yuvrajpatil5027
      @yuvrajpatil5027 Год назад +2

      Wand ekdum😇😇

    • @vbh4315
      @vbh4315 Год назад +5

      @@maheshsanas2885 interview nit bag.
      Answer bhetun jail.

  • @cutethings1710
    @cutethings1710 Год назад +165

    बापूंना मानाचा मुजरा .. भावी पर्यटन मंत्री पद भेटावे हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना जय जिजाऊ जय शिवराय

  • @rishikokate5151
    @rishikokate5151 Год назад +5

    आवडलेल्या मुलाखती पैकी एक शहाजी बापु अतिशय हुशार संयमी बुद्धीवंत आणि बोलण्यात अतिशय हजर जबाबी आणि चातुर्य मनमोकळेपणा आपलेपणातून माणुसकी असलेली व्यक्ती.
    👍👍

  • @user-ff4cd9tr5s
    @user-ff4cd9tr5s Год назад +13

    साधे सूद बोलणं,ना कोणत्या गोष्टीचा अहंकार जे आहे ते न घाबरता निडरपणे मांडणारे असे राजकारणात दुर्लभ मिळतील,
    बापू ❤️🙏🚩🚩🚩

  • @sumitchavan1037
    @sumitchavan1037 Год назад +165

    बापू ना मंत्रिपद मिळावे हिच विठ्ठलाचे चरणी प्रार्थना

  • @pnimbalkar6369
    @pnimbalkar6369 Год назад +33

    मी कधीच एवढा मोठा एपिसोड कधी कोणाचा बघितला नाही पण शहाजी बापू तुमचा पूर्ण व्हिडिओ बघितला खूप साधे आणि सरळ व्यक्तिमत्त्व सांगोला वाल्यांना असा आमदार भेटला त्यांचं भाग्य आहे एकदम साधा सरळ माणूस

    • @shriram_bidikar
      @shriram_bidikar Год назад

      खरंच म्हणता तुम्ही.. एक सांगोल्याचा नागरिक म्हणून आम्ही मतदार खरोखर भाग्यवान आहोत. आधी भाई गणपतरावजी देशमुख आणि आता शहाजीबापू.. आम्हाला खूपच down to earth नेतृत्व मिळाले.. .

  • @suvijayelectricals
    @suvijayelectricals Год назад +14

    राजीव खांडेकर जी ज्या पद्धतीने कट्ट्यावर आलेल्या लोकांसमोर बसतात किंवा बोलतात किंवा एकंदर बॉडी लँग्वेज असते ते थोडंसं बदलायला पाहिजे🙏

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Год назад

      Mulat tyachya kade laksh suddha nahi gela maja ...🤣 Mi yanach aikat hoto

  • @navatresirenglishgrammar1954
    @navatresirenglishgrammar1954 Год назад +14

    बापूंचे जीवण खरंच संघर्ष मय होते परंतु नियतीचा फेरा यालाच म्हणतात आज बापू अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत बनले आहेत बापू आपणास उदंड आयुष्य लाभो व सांगोला तालुक्याची सेवा करण्याची संधी मिळो

  • @KPKUBER
    @KPKUBER Год назад +125

    आमदार असावा तर असा... प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणाचा आयडॉल... बापु तुम्ही असणार आणि ABP माझा चे आभार नाही तर शाहजीबापूच समजले नसते...बापु खरंच तुम्ही ग्रेट आहात

    • @niyazbodale8950
      @niyazbodale8950 Год назад

      🔔🔔🔔🔔🔔आयडॉल फटकळ मिणुस जनतेला फाटयावर मारणारा

  • @pruthviraj6631
    @pruthviraj6631 Год назад +233

    बाप्पूच्या भाषणातून वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण यांचा जुना महाराष्ट्र डोळ्या पुढे उभा राहिला... सलाम बाप्पू

  • @user-xy3fi1un7w
    @user-xy3fi1un7w Месяц назад +2

    शिक्षिका न मुळे शहाजी बापू पाटील कसे घडले ते खूप सुंदर मुलाखत,एक सच्चा साधा मराठी माणूस

  • @vishalgodseOfficial
    @vishalgodseOfficial Год назад +15

    A very humble and honest person. Shahajibapu you are really the best. Watched the full episode of MAZA KATTA after a long time because of Bapu. Very simple and down-to-earth.

  • @rajendramane6227
    @rajendramane6227 Год назад +86

    बापू अप्रतिम बोललात आणि खरं बोललात .जेवढ्या लोकांनी कमेंट केलेत त्या सर्वांना विनंती की आपण सर्व लोकांनी बापुना मंत्रिपद मिळवा म्हणून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा...

  • @sankalpjadkar2272
    @sankalpjadkar2272 Год назад +167

    ...गर्व आहे मी सांगोल्याचा असलेल्याचा 🇮🇳🌍

    • @vj9678
      @vj9678 Год назад +4

      बर

    • @rajgaikwad4281
      @rajgaikwad4281 Год назад +4

      Gaddarachya matdar sangatla

    • @Allinone-hz6qr
      @Allinone-hz6qr Год назад +11

      @@rajgaikwad4281 घरकोंबडा मुख्यमंत्री 🤣🤣🤣🤣

    • @samdhanburungale2866
      @samdhanburungale2866 Год назад +8

      गणपतराव देशमुख साहेब

    • @vbh4315
      @vbh4315 Год назад +6

      @@rajgaikwad4281 kon gaddar shivsena vachavali bol.

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 Год назад +8

    आईयला मानलं राव बापू तुम्हांला महाराष्ट्र मध्ये इतके tilented माणस राजकारणात आहेत..सलाम बापू यार

  • @mangeshpawar8232
    @mangeshpawar8232 Год назад +6

    बापू तुम्ही खरंच वसंतदादा पाटील यांचे शिष्य शोभता. एकदम साधा, प्रामाणिक, खरा माणूस.

  • @ajitjoshi4415
    @ajitjoshi4415 Год назад +21

    व्वा. बापू. You are a great leader. बापूंच्या या मुलाखतीतून समजले की बापूंचे वकृत्व लहानपणापासूनच कसे प्रभावी होते....आपल्या तालुक्याच्या आणि लोकांच्या अडीअडचणींची त्यांना खरोखरच योग्य अशी जाणीव होती, किती मोठ्या लोकांसोबत आणि प्रतिस्पर्ध्याविरूद्ध काॅंग्रेस सोबत असतांना कशा खडतर निवडणुका लढविल्या, हरले, जिंकले... सांगोल्यात पाणी, रस्ते बाकी सुविंधांवर किती कसे काम केले. या मोठ्या बंडाबद्दलसुद्धा किती नीट, व्यवस्थित बोललेत. एकदम झकास मुलाखत बापू. तुम्हाला शुभेच्छा. 🙏👏💐

  • @Kingofgamig556
    @Kingofgamig556 Год назад +48

    बापू , तुम्ही एक निर्भीड , स्वच्छ मनाचे , अभ्यासू , दिलदार वक्तीमात्व आहात . तुमच्याकडन संपूर्ण महाराष्ट्राला फार अपेक्षा आहेत. आणि तुम्ही त्या नक्की पूर्ण कराल .ही अपेक्षा.

  • @user-kl3hc1rf1o
    @user-kl3hc1rf1o Год назад +10

    शहाजिबापू मधील फक्त १ टक्का नम्रता खांडेकर यांच्यात यावी हीच इच्छा

  • @roshanrathod5404
    @roshanrathod5404 Год назад +6

    खरंच ABP MAJA CHA आभार आपण ऐक स्वातंत्र्य विचार करणारा आमदार दाखवून .
    मन जिंकून घेतल्य.
    पण सहाजि बापु खरंच..दिलदार व्यक्तिमत्त्व आहेत..

  • @rajendrakende5460
    @rajendrakende5460 Год назад +278

    पाटील साहेब आपण मॕरोडोनाचे ऊदाहरण देऊन आपण आपल्या बुद्धीचा स्तर खूपच वरचा आहे हे दाखवून दिले. अभिनंदन.

    • @atulsabale3478
      @atulsabale3478 Год назад +9

      Adv. Ahet Bapu

    • @kunallendwe3819
      @kunallendwe3819 Год назад

      खरचं

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Год назад +4

      Are shiklele ahet changle ...jya talmit tayar jhalet te nete pn visionary hote ...so ti chap ekdum correct utarley....ekdum junya maharastra madhla rajkarnacha kal athvto yanchyakde bghun

    • @9403781275
      @9403781275 Год назад +2

      त्याकाळचे bsc.LLb. आहेत ते बोलतात मानदेशी भाषेत त्यामुळे काही लोक त्यांना अडाणी समजतात,खुळ्यात काढतात. पण हुशार आहेत युवक काँग्रेस पासून इथपर्यंत चा प्रवास संघर्षमय आहे.

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 Год назад +1

      @@9403781275 nai are yana kon yedyat kadhel ....ajkalche te chu porach kadhtil yedyat jyana jagachi kai mahiti naste ...aple bollywood fan type .....yancha anubhav he evdha ...bolayla lagla ki kalun jata kiti knowladge ahe ...eka prakalpacha sadharan kharch tondavr sangitla tyani tyavrun kalatch te

  • @rajeshchavan6893
    @rajeshchavan6893 Год назад +149

    मनापासून खरं बोलणारा नेता आमचा सलाम आमदार शहाजी बापू पाटील यांना 🙏🙏🙏🙏

  • @pratikrasal6802
    @pratikrasal6802 Год назад +3

    मण शांत relax आनंदी होते, बापू यांची मुलाखत ऐकल्यावर. किती सरळ साधे मनमोकळा मनाच्या व्यक्तिमत्त्व खूप बर वाटत अशी मनमोकळा मनाचा माणूस आणि ते ही राजकीय व्यक्तिमत्त्व.

  • @pradeeppadate782
    @pradeeppadate782 Год назад +3

    मराठी माध्यमांच्या वरचा विश्वास जेंव्हा कमी कमी होत चाललेला आहे अश्यावेळी इतकी उत्तम मुलाखत आपल्या एबीपी वर दाखवल्याबद्दल एबीपी माझाचं अणि खासकरून खांडेकर सरांचं शतशः अभिनंदन. यातील शहाजी बापूंचा शब्द न शब्द मनाला भिडणारा आणि एका राजकीय व्यक्तीचा असूनही अत्यंत प्रामाणिक आहे.त्याबद्दल बापूंच करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. आजही असे नेते महाराष्ट्रात आहेत ही महाराष्ट्रासाठी भाग्याची गोष्ट आहे. बापूंना शतशः सलाम.

  • @GaneshPachankar
    @GaneshPachankar Год назад +379

    या माणसाला रेकॉर्डिंग मध्ये जेव्हा ऐकल तेव्हा त्या व्यक्तीच्या डोंगर झाडी वरच सर्वांनी भर दिला पण बाकीच्या संपूर्ण भागाकडे लक्ष दिल नाही असा आहे आपला महाराष्ट्र. सच्चा आणि रांगडा माणूस

  • @abhijeetmaratha7688
    @abhijeetmaratha7688 Год назад +124

    काय झाडी? काय डोंगार? काय हॉटेल ? च्या पलीकडला आपला माणूस
    माझा कट्टा वरील आजपर्यंत पाहिलेली सर्वात्कृष्ट मुलाखत
    सगळे भ्रम मोडले लोकांच्या मनातले स्वतःविषयीचे

  • @sunilkulgude9959
    @sunilkulgude9959 Год назад +2

    स्वतःच्या मतदारसंघाबरोबरचं अख्या महाराष्ट्राचे विचार करणारे, साधी बोली उच्च विचार, माझा कट्टा मी पहिल्यांदा व संपूर्ण 1.25 मिनिटांचा पाहिला व ऐकलापण बापूचं बोलणे आवडले व पटले पण ,इतकीवर्ष या माणसाची कुचंबणा झाली म्हणायची , त्या व्हिडीओमुळे बापूचं नाव महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचले.
    ABP च्या वार्ताहारांना सुद्धा त्यांची मुलाखत घेतांना छान वाटले त्यांच्या हावभाव वरुण दिसून आले.व प्रत्येक प्रश्नांचे चांगल्या पद्धतीने उत्तर दिले.

  • @shivajibiradar7766
    @shivajibiradar7766 Год назад +2

    खूप सुंदर.....भाषण. स्वच्छ आणि स्पष्ट सुरुवातीपासून शेवट पर्यंत बघितलं कधी अस वाटल नाही की पुरे करावे. राजकारण आणि समाज कारण याच योग्य मेळ....🚩🚩🚩

  • @Khavchat
    @Khavchat Год назад +411

    सच्चा माणूस!!🙏 मनापासून बोलणारा माणूस!! ग्रामीण भाषेचा गोडवा जगापर्यंत पोहोचवला!!💐💐💐
    -------------------
    1:05:33👈 लई वचावचा करत ढीगभर प्रश्न, प्रकरणे मांडली ह्याने!!😁 पण ह्याला प्रश्न पडलाय इतके दिवस आधीच्या सरकारची चाटली… आता नवीन सरकारमधे कसं व्हायचं?
    😁😁😁
    हे पत्रकार महोदय खोचक प्रश्न विचारताहेत तरी किती सरळपणे उत्तरे देताहेत शहाजीबापू! नमन बापू!🙏
    -------------------
    1:24:15 👈😡 खांड्याचा ॲटिट्यूड बघा.. बॉडी लॅंग्वेज बघा!! बापूंकडून चांगल्या कामांची अपेक्षा करताना बसलाय कसा बघा! म्हणजे तासभर शहाजीबापूंच्या सहवासात राहून, गप्पा मारून ‘नम्रता’ शिकलाच नाही!!

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +20

      1:24:15 👈😡 खांड्याचा ॲटिट्यूड बघा.. बॉडी लॅंग्वेज बघा!! बापूंकडून चांगल्या कामांची अपेक्षा करताना बसलाय कसा बघा! म्हणजे तासभर शहाजीबापूंच्या सहवासात राहून, गप्पा मारून ‘नम्रता’ शिकलाच नाही!!

    • @prasadsarmalkar34
      @prasadsarmalkar34 Год назад +8

      सहमत..एकदम बरोबर बोललात..

    • @ginyandevnagargoje8511
      @ginyandevnagargoje8511 Год назад +1

      शं

    • @user-wq3tv1bo5d
      @user-wq3tv1bo5d Год назад

      ोव

    • @Khavchat
      @Khavchat Год назад +1

      @@prasadsarmalkar34 🙏🙏🙏

  • @abc39722
    @abc39722 Год назад +429

    अस्सल मराठमोळा, रांगडा माणूस म्हणजे शहाजीबापू पाटील. देव त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य व राजकीय यश देवो. 👌👌👌👌👌

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 Год назад +2

      अरे गद्दारी का केली

    • @male.3437
      @male.3437 Год назад +16

      @@maheshsanas2885 hindutwa sathu

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 Год назад +1

      म सुरत त्यानंतर गुहाटी पळून कशाला जायचं

    • @satishborade6890
      @satishborade6890 Год назад +1

      Shard chya hatani jara jastachvdudh pil ki ,nivremote bahul zhal ki favda ni favdi hot aste sadhivghilosht ji public ni jantela mahiti tivtula nahi mahit

    • @maheshsanas2885
      @maheshsanas2885 Год назад +3

      @@satishborade6890 आम्ही भगतसिंग यांचे हिंदुत्व मानतो आम्ही सुभाष चंद्र बोस यांचा हिंदुत्व मानतो आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांचे हिंदुत्व मानतो इंग्रजांना आया बहिणी देणाऱ्या घोलवडकर हिंदुत्व आम्हाला मान्य नाही सावरकर हिंदुत्व आम्हाला मान्य नाही रोज सकाळी फार मोठा बातमी देणारा आसाराम बापू असं वाटायचं की स्वर्गाचा रस्ता हात दाखवणार कधी आणि करणी मध्ये अंतर बोलताना बळी पडू नका

  • @aniketzendekar5354
    @aniketzendekar5354 Год назад +9

    आमच्या तालुक्याचा माणूस आहे ❤️🙌👑

  • @tukaramthakur8991
    @tukaramthakur8991 Год назад +2

    कितीही वेळेस पाहिल्यावर सुद्धा मन भरतच नाही अशी ही मुलाखत...पून्हा पुन्हा ऐकतच राहवीशी वाटते..अत्यंत निर्मळ मनाचे राजकारणी ...आदरणीय शहाजी बापु साहेब ....आपणास उदंड आयुष्य लाभो....व सामाजिक कार्य आपणाकडून घडावे हीच सदिच्छा...!!

  • @abhiishek02
    @abhiishek02 Год назад +108

    Dialog वर हसायला खुप सोपं असतं
    पण अभ्यास खुप आहे उत्तरं देण्यावरून समजतंय 🙏🙏

  • @mangesh_shingote
    @mangesh_shingote Год назад +900

    सगळ्या महाराष्ट्राच्या हृदयात जागा केली...एक सच्चा माणूस🚩🚩

    • @bhaskarpawar2708
      @bhaskarpawar2708 Год назад +8

      Ed chor

    • @kiranpawar9407
      @kiranpawar9407 Год назад +32

      @@bhaskarpawar2708 गप रे गुलाम, सतरंजी उचल गप

    • @mohanmundhe2322
      @mohanmundhe2322 Год назад +4

      जमल याला

    • @viratfc18312
      @viratfc18312 Год назад +8

      @@bhaskarpawar2708 आबे पागल आहेस का काय आईखत आहेस ते काय मंत्री आहेत का ? आणि ते म्हणाले की स्वतः कबूल केलं ३-४ जणा ला नोटीस आली होती....फक्त

    • @DhundMat
      @DhundMat Год назад +7

      @@viratfc18312 Pawar aahe te.
      Radu dya bicharyalaa, chaanakyachi khurchi algad khechliy, traas hot asnaar. 😂😂😂😂

  • @9228876781
    @9228876781 Год назад +10

    चला हवा येऊ द्या सारख्या पाणचट शो पेक्षा असं निखळ वक्तव्य पाहणं कधीही छान

  • @rafikshaikh8192
    @rafikshaikh8192 Год назад +5

    1 तास 25 mnt कधी गेले समजलंच नाहि..अप्रतिम intervievw ,,,,सच्चा रंगडा गडी, खूप छान वाटलं ,खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ......

  • @ramakant5080
    @ramakant5080 Год назад +125

    या व्यक्तीचे मतदारसंघ आणि मतदारावर खरोखर प्रेम आहे.

  • @sumiran05
    @sumiran05 Год назад +120

    आम्ही साधा माणूस शिंदे साहेबा बरोबर
    महाराष्ट्र चा मराठी मुख्यमंत्री
    मराठी माणसाचा शाहू ,फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा...
    रक्तात शिवछत्रपती...
    जय शिवराय
    आवाज एका मराठ्याचा

    • @deepakjadhav2402
      @deepakjadhav2402 Год назад

      मुख्यमंत्री मराठा जातीचा आहे का मराठी माणसाचा ?

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 Год назад

      @@deepakjadhav2402 महाराष्ट्राचा

    • @sumiran05
      @sumiran05 Год назад

      @@deepakjadhav2402 संपूर्ण जनतेचा आहे मुख्यमंत्री पण मराठा असल्याचा अभिमान वाटतो आम्हा मराठ्यांना

    • @vickybodake3387
      @vickybodake3387 Год назад

      @@sumiran05 ky boltoy bhava shahu phule ambedkaranche v4 gheun te mothe zaleyt uchal jaras tyanch ka aai bapachya sanskaracha uddhar krtoys

    • @sumiran05
      @sumiran05 Год назад

      @@vickybodake3387 नक्कीच मित्रा शाहू, फुले ,आंबेडकर...यांच्या मार्गावर चालणारे, त्यांचे विचारांनी मोठे झाले आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या प्रत्येक जनमानसाचा मुख्यमंत्री ....जय शिवराय .माझ्या रक्तात शिव छत्रपती. आणि राहिली गोष्ट आई बापाच्या उद्धराची तर माझ्या आई बापाने मला शिवछत्रपती शिकवले लहानपणापासून त्याव्हा उधार तर होणारच आई बापाचा स्वंसकाराचा

  • @sameertule1994
    @sameertule1994 Год назад +6

    नेमका खांडेकर ल कसला एवढं माज आहे ????

  • @doctork5417
    @doctork5417 Год назад +6

    साहेब जेवढे मनमोकळे आहेत तेवढेच सत्यवादी वाटले पूर्ण मुलाखत ऐकल्यावर!! अप्रतिम उत्तरे आणि काही गंभीर गोष्टीदेखील मनोरंजक करून सांगणे ही कला आपल्याकडून घेण्यासारखी 🙏👍🔥

  • @rahuljagtap8039
    @rahuljagtap8039 Год назад +372

    One of the best katta i have ever seen recently. Shahji Bapu Patil is very humble and down to earth leader. He candidly shared his opinion on politics. I was very shy of my gavran marathi bhasha ,but now no more. Hats off Bapu

    • @govindadamdhar7283
      @govindadamdhar7283 Год назад +1

      m

    • @nilkanthbhole24
      @nilkanthbhole24 Год назад

      Great bapu

    • @tomriddle4110
      @tomriddle4110 Год назад +1

      As someone from the city, please don’t be shy of garvan marathi, be proud that you can speak it. Our language is something we must not ever be shy of

    • @sawantsameer
      @sawantsameer Год назад

      perfectly said !!!!

  • @rajeshpawar9781
    @rajeshpawar9781 Год назад +156

    असा असावा मावळा आणि लोकनेता ,😍 साधी राहणी उच्च विचारसरणी💐 बापमाणुस

  • @windowcareservicespune2890
    @windowcareservicespune2890 Год назад +2

    खूप निर्मळ व्यक्तिमत्त्व फॅन झालो मी तर साहेबांचा मातीशी नाळ जोडलेलं सच्चा नेता

  • @rajarnavi
    @rajarnavi Год назад +4

    अभिमान वाटला आज बापू तुमचाही आणि पर्यायाने तुमचा मतदार म्हणून आमचाही, तुम्हाला लवकरच मंत्रिपद मिळावे व आपल्या भागाचा समृद्ध विकास व्हावा हीच बा विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना 💐💐

  • @pintukamble5803
    @pintukamble5803 Год назад +57

    राजकारणातील खरी तळमळ आणि खरा अभ्यास वा गरीब जनतेची खरी काळजी घेता येईल, त्याची खरी धडपड. तुम्हाला आमचा सलाम साहेब. साहेब तुम्ही खरे आमचं शहाजीबापू आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो. 🙏🙏🙏🙏🙏

    • @kapiilchaware1590
      @kapiilchaware1590 Год назад

      🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂

  • @vishalkadam7236
    @vishalkadam7236 Год назад +75

    साधा,सच्चा,सरळ,दिलखुलास माणूस, असे राजकारणी खूप दुर्मिळ आहेत

    • @amritraj794
      @amritraj794 Год назад

      दुर्मिळच आहेत की सुरत , guhati,गोवा अशी पल कडून सरकार बनणार पण

  • @sunilkumarpatil1467
    @sunilkumarpatil1467 Год назад +1

    आतिशय सुंदर मुलाखत. पहिल्यांदा माझा कट्टा मुलाखत या मानसामुळे संपुर्ण पाहिलि.

  • @sumedh.
    @sumedh. Год назад +9

    निक्खल मोकळा माणूस.इतका स्वच्छ स्वभाचा माणूस महाराष्टातील राजकारणात कधीचं बघितला नाही. 🎉🎉

  • @sanjay.pednekar
    @sanjay.pednekar Год назад +240

    आजकालच्या स्वार्थी राजकारणात एवढी चांगली माणसं आहेत हे बघून बर वाटलं.
    बापू तुम्हाला देव भरपूर आउष्य देवो🙏🚩🚩💐

  • @chiragpatil7491
    @chiragpatil7491 Год назад +44

    खरंच एवढा भला माणूस मी पहिला नव्हता... जबरदस्त माणूस आहे... 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @user-dp2pb8lv9j
    @user-dp2pb8lv9j Год назад +7

    हा आहे आमच्या सांगोला तालुक्याचा ढाण्या वाघ ✨

  • @vedantupadhye9238
    @vedantupadhye9238 Год назад +2

    छान मनमोकळे प्रामाणिक आणी आदर करावा असे आहेत आमदार साहेब.असेच लोकप्रतिनिधी संपुर्ण महाराष्ट्राला लाभोत ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना.जय महाराष्ट्र !जय हिंद !💐💐💐

  • @vishaldeshmukh2746
    @vishaldeshmukh2746 Год назад +178

    संजय रौत पेक्षा भारी,
    प्रवक्ता शिवसेना मध्ये होते..👍
    बापूज फॅन्स बुलडाणा

    • @shriram_bidikar
      @shriram_bidikar Год назад

      बापुसारखे वाघ लपवून ठेवले आणि संजय राऊत सारखा भुंकणाऱ्या कुत्र्याला प्रवक्ता केला उधोजीरावांनी...

    • @ganeshsalunkhe52
      @ganeshsalunkhe52 Год назад +3

      ✌️✌️😂

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Год назад +2

      😊🙏🚩🚩🚩

    • @shrikantpatil5646
      @shrikantpatil5646 Год назад +3

      ✌🏻✌🏻🙏🏻

    • @yogeshpanmand2440
      @yogeshpanmand2440 Год назад +2

  • @atulsabale3478
    @atulsabale3478 Год назад +52

    माणुस मोकळा ढाकळा आहे, माणसातला आहे, मनाचा राजा आहे .....बापू फ्यान झालो राव तुमचा 🙏🙏🚩

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 Год назад +9

    बापू तुम्ही नेहमी असच आनंदी राहा.... 🚩🚩🙏🙏

  • @ShubhamBROADCASTING
    @ShubhamBROADCASTING Год назад +2

    तुमची कॉल रेकॉर्ड व्हायरल झाली, आणि तुम्ही फेमस झाले.
    पण ही मुलाखत पाहून एक सच्चा नेता, सर्वांगीण विचार करणारा, महत्त्वाचे म्हणजे न लपवता खरं बोलणारा दडलेला व्यक्ती अनुभवला.. keep it up. Congratulations.