पासाेडीपाडा येथे चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • पासाेडीपाडा येथे चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
    प्रतिनिधी | बोरगाव
    वणी सापुतारा महामार्गावरील पासोडीपाडा येथे उदय पेट्रोल पंपासमोर रविवारी (दि. २८) रात्री पावणेनऊ वाजता चारचाकी (जीजे २१ सीसी ६१६८) व दुचाकी (एमएच १५ जेटी ९७७३) यात अपघात झाला असून दुचाकीस्वार पंकज गुलाब पवार (२६, रा. बोरगाव, ता. सुरगाणा) हा ठार झाला.
    वणी येथून सापुताराकडे जाणारे चारचाकी वाहन व हतगडकडून बोरगावकडे येणाऱ्या दुचाकीत धडक झाली. यात अपघातात दुचाकीस्वार गंभीर झाला असता त्यास बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पंकज पवार प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी वणी येथे हलवण्यासाठी बोरगाव येथील आराेग्य केंद्रातील १०८ रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने जवळपास अर्धा ते पाऊण तास उशीर झाला. यानंतर १०२ रुग्णवाहिकेमधून वणी येथे नेण्यात आले. परंतु, वणी आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बोरगाव हे महामार्गावरील माेठे गाव असूनही याठिकाणी १०८ रुग्णवाहिका कायमस्वरुपी राहत नाही. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत सुरगाणा पोलिस ठाण्यात मोटार अपघाताचा दाखल करण्यात आला अाहे. पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन बागुल, मांगू भोये तपास करत आहे. मृत युवकाच्या पश्चात आईवडील, पत्नी, लहान सात महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.
    -
    रुग्णवाहिका, डॉक्टर उपलब्ध करावा
    बोरगाव येथील १०८ रुग्णवाहिका २० ते २५ दिवसांपासून दुरूस्तीसाठी नेण्यात आली आहे. परंतु व्यवस्था न केल्याने रुग्णांना नाशिक येथे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात नाही. तीन महिन्यांपासून १०८ रुग्णवाहिकेवर डॉक्टर उपलब्ध नाही. बाेरगाव येथे त्वरीत १०८ रुग्णवाहिका, डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावा.
    - सचिन राऊत, अध्यक्ष, आसरा फाउंडेशन, बोरगाव
    -

Комментарии •