शिवसूर्यहृदय🌄 जधीं दाटतो पूर्णतः अंधकार|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • शिवसूर्यहृदय||
    जधीं दाटतो पूर्णतः अंधकार|
    दिसे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर||
    अश्या संकटी कोणी ना घाबरावे|
    शिवाजी चरित्रास भावें स्मरावे||१||
    असंख्यात गेले विरोधात लोक|
    तरी घालणे ना यमाला ही भिक||
    जरी सागरा एवढे म्लेंछ आले|
    शिवाजी आणि मावळे नाही भ्याले||२||
    करी घेऊ ते कार्य सिद्धिस नेऊ|
    असा सह्य निर्धार चितांत ठेऊ||
    शिवाजी आपत्ती पुढे नाही झुकले|
    जगी हिंदवी राज्य निर्माण केले||३||
    सुखाला आधी लाथ मारा धृतीने|
    उठा मार्ग चाला कड़या निश्चयाने||
    जगी गांडूळा सारखे ना जगावे|
    उरी बाजीतानाजीला संस्मरावे||४||
    नका भिक घालू कधी संकटाला|
    उठा ठोकरा येई ते ज्या क्षणाला||
    मनाला नसावा कधी भीती स्पर्श|
    जिजाऊसुतांचा जगया आदर्श||५||
    महामंत्र आहे न्हवे शब्द साधा|
    जयांच्या स्मृतीने जळे म्लेंछ बाधा||
    नुरे देश अवघा जयांचे अभावी|
    शिवाजी जपु राष्ट्र मंत्र प्रभावी||६||
    जिथे मोगरा तेथे राहे सुवास|
    जिथे कृष्ण तेथे जयश्री निवास||
    शिवाजी जपु मंत्र आर्त मतिनी|
    शिवाजी तिथे माय तुळजाभवानी||७||
    चहु बाजूने वादळे घेरतील|
    कुणीही सवे सोबतीला नसेल||
    दिशा वाट सर्वस्वी ही हारविता|
    शिवाजी असे मंत्र हा शक्तिदाता||८||
    करी खड्ग घ्या धर्म रक्षावयाला|
    यशस्वी करा दिव्य भगव्या ध्वजाला||
    उठा फड़कवा दिल्ली वरती निशान|
    स्मरा अंतरी नित्य शिवसूर्यआण||९||
    उरी ध्येयज्वाला असे पेटलेली|
    अश्यांना करी लागती ना मशाली||
    रवि नित्य तेवे विणा तेलवात|
    अशांची शिवाजी असे जन्मजात||१०||
    स्वभाषा स्वदेशा स्वधर्मास्तावे जे|
    स्वभाग्ये ईथे जन्मलो मानिती जे||
    असा जन्महेतु जयांच्या उरात|
    अश्या ची शिवाजी असे जन्मजात||११||
    घराच्यावरी ठेवुनी तुळशीपत्र|
    उरी धगधगे हिंदवीराज्य मंत्र||
    जरी प्राण गेला तरी नाही खंत|
    अश्यां ची शिवाजी असे जन्मजात||१२||
    जरी घेरती वादळे संकटांची|
    इतिश्री कराया पुरया जीवनाची||
    रणी पाड़ती जे यमाचे ही दात|
    अशांची शिवाजी असे जन्मजात||१३||
    कुठेही कधीही कुणाचीही कांता|
    तरीही तिला मानिती जन्ममाता||
    असे जान्हवीवत् सदा शुद्ध चित्त|
    अशांची शिवाजी असे जन्मजात||१४||
    स्वधर्मास्तावे जे करी खड्ग घेती|
    अरी जाळण्याला स्वये आग होती||
    पिते शस्त्र ज्यांचे रणी शत्रुरक्त|
    अशांची शिवाजी असे जन्मजात||१५||
    पथी दाट अंधार काटे सराटे|
    मनी संकटांची क्षिती शून्य वाटे||
    मरुताहुनी धावती जे नितांत|
    अशांची शिवाजी असे जन्मजात||१६||
    उरी राष्ट्रभक्ति रविवत ज्वलंत|
    न ये भीती चित्ती जरी ये कृतांत||
    सदा सिद्ध करण्या रणी म्लेंच्छअंत|
    अशांची शिवाजी असे जन्मजात||१७||
    अदित्यास ठावा नसे अंधकार|
    जयाना तसा स्पर्शतो ना विकार||
    असे वज्रनिर्धार ज्यांच्या उरांत|
    शिवजी असे आमुची जन्मजात||१८||
    जरी प्राण गेला तरी शब्द पाळू|
    अविश्रांत देशस्तवे घाम गाळू||
    हटू ना फिरू मागुती सत् पथात|
    अशांची शिवाजी असे जन्मजात||१९||
    नव्हे अन्नपाणी नव्हे स्वर्णखानी।
    आम्हां ना जगी रोखु शकतात कोणी।।
    नसें हिंदू राष्ट्राविणा सत्य अन्य।
    नसें हिन्दु राष्ट्राविना देव अन्य।
    तदर्थी आम्ही प्राशीले मातृस्तन्य।।२०।।

Комментарии • 2

  • @anilsabale5374
    @anilsabale5374 3 месяца назад +1

    जय राज माता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,जय महाराष्ट्र सर ❤❤ अतिशय सुंदर सुंदर

  • @AishwaryaMandlik-et8yj
    @AishwaryaMandlik-et8yj 3 месяца назад +1

    Jay Bhavani , Jay Jijau , Jay Shivaji 🎉🎉🎉