देवरुख मधील सह्याद्रीच्या अत्युच्य शिखरावर वसलेलं “श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर” || माहितीसह प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • देवरुख मधील सह्याद्रीच्या अत्युच्य शिखरावर वसलेलं “श्री क्षेत्र टिकळेश्वर मंदिर” || संपूर्ण माहितीसह प्रवास || संगमेश्वर - रत्नागिरी || कोकण
    _________________________________________________
    Google Map Link:
    Tikleshwar Temple :
    maps.app.goo.g...
    _________________________________________________
    #श्री_क्षेत्र_टिकळेश्वर_मंदिर
    #देवरुख
    #तळवडे
    #हरपुडे
    #बेलारी
    #संगमेश्वर
    #रत्नागिरी
    #कोकण
    #सुंदर_माझं_कोकण
    _________________________________________________
    टिकळेश्वर मंदिर, देवरुख
    ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
    देवरुख जवळचं एक अप्रतिम देवस्थान म्हणजे टिकळेश्वर. तळवडे, हरपुडे, बेलारी या तीनही गावांच्या सीमेवर हे मंदिर असल्यामुळे त्याला टिकळेश्वर हे नाव देण्यात आलं. सह्याद्रीच्या माथ्यावर खूप उंचीवरील एका शिखरावर टिकळेश्वर उभा आहे. दूरवर पसरलेला गच्च जंगलाने वेढलेला परिसर, आसपासच्या छातीत धडकी भरवणाऱ्या खोल दऱ्या असे सहयाद्रीचे रौद्रभीषण सौंदर्य टिकळेश्वराच्या डोंगरावर उभे राहून दिसू शकते. श्रध्दाळूबरोबरच सह्याद्रीच्या अवघड दऱ्या- खोऱ्यांत भटकणाऱ्या ट्रेकर्स व गिर्यारोहकांना सुध्दा टिकळेश्वर परिसराचे खूप आकर्षण आहे.
    टिकळेश्वराच्या मंदिरासमोर निवाऱ्यासाठी काँक्रीटचे छप्पर असलेली जागा आहे. शिखराच्या थोडे खाली उतरून प्रदक्षिणा मार्ग आहे. त्या पायवाटेवर काही गुहा व दगडात कोरलेले स्वच्छ पाण्याचे टाके आहे. डोंगराच्या शिखरावरून पूर्वेस मैमतगड दिसतो आणि मार्लेश्वराकडे जाणारी वाट दिसते. टिकळेश्वरच्या पायथ्यापासून पदभ्रमण करत जाऊन येण्यास ५ ते ६ तासांचा अवधी लागतो. सकाळी ब्रेकफास्ट करून पायी फिरत फिरत गेल्यास टिकळेश्वर करून देवरुखला जेवायला परत येता येते.
    टिकळेश्वराच्या पायथ्याशी तळवडे हे गाव देवरूखपासून ४ कि.मी वर आहे. तिथून टिकळेश्वर डोंगर चढून जायला आता रस्ता केला आहे. गाडीनेही वरपर्यंत जाता येते. मात्र शेवटचा एक चतुर्थांश रस्ता हा पायवाटेचा असून अगदी उभ्या चढाचा दमछाक करणारा हा मार्ग आहे. पण असे दुर्गम रस्ते पदभ्रमणप्रेमींना कायमच आकर्षित करतात.
    _________________________________________________
    Tikaleshwar Temple, Devrukh
    h Sangameshwar Distt. Ratnagiri
    An amazing shrine near Devrukh is Tikaleshwar. The name Tikaleshwar was given to this temple as it is on the border of the three villages of Talwade, Harpude and Bellary. Tikaleshwar stands on a very high peak at the head of Sahyadri. Standing on the hill of Tikaleshwar, the dazzling beauty of Sahyadri, with its densely forested area spread out in the distance, and the deep valleys scaring the chest in the vicinity, can be seen. Along with Shraddhalu, trekkers and mountaineers wandering in the difficult valleys of Sahyadri are also very attracted to Tikaleshwar area.
    In front of the temple of Tikaleshwar is a concrete roofed area for shelter. A little below the summit is a circuitous route. On that trail there are some caves and a clear water tank carved into the rock. Maimatgad can be seen in the east from the top of the hill and the road leading to Marleshwar can be seen. It takes 5 to 6 hours to trek from the base of Tikaleshwar. After breakfast in the morning, if you walk around, you can reach Tikaleshwar and come back to Devrukh for dinner.
    At the foothills of Tikaleshwar, the village of Talwade is 4 km above Devrukh. From there, a road has been made to climb the Tikaleshwar hill. You can also go up by car. But the last one-fourth of the way is a footpath and it is a very tiring way of vertical ascent. But such remote roads always attract trekking enthusiasts.
    _________________________________________________
    Follow me on :
    My RUclips Channel :
    / @sundar_maze_kokan
    My Other RUclips Channel :
    / @mayur_patil07
    Instagram id :
    / sundar.maze.kokan
    Facebook Page :
    / sundar.maze.kokan
    Facebook Profile :
    / mayur.patil.1359
    _________________________________________________

Комментарии • 6