नैसर्गिक गरम पाण्याचे कुंड - राजवाडी, सोमेश्वर मंदिर, Natural Hot water Springs Rajwadi sangameshwar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो.
    आज आपण भेट देणार आहोत एका नैसर्गिक गरम पाण्याचा कुंडला .हे कुंड संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी गावांमध्ये आहे.त्याचबरोबर श्री सोमेश्वर मंदिराला सुद्धा भेट देणार आहोत.
    मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्‍वर नजीकच्या गोळवली टप्पा या गावाजवळून राजवाडी येथे जाण्यासाठी मार्ग आहे. केवळ 1 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव प्रसिध्द आहे ते येथील गरम पाण्याच्या कुंडांसाठी. येथील पाण्याचे तापमान हे 80 डिग्रीच्या दरम्यान आहे. उकळत्या पाण्याचे हे झरे पाहण्यासाठी असंख्य पर्यटक राजवाडी गावाला भेट देतात.
    राजवाडी परिसरातील जमिनीखाली गंधकाचे प्रमाण जास्त असल्याने येथील पाण्याचे तापमान हे सर्वाधिक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या कुंडातील गरम उकळते पाणी हे बारमाही वाहत असल्याचे पाहायला मिळते. कुंडाच्या सभोवतालीही नैसर्गिक पाण्याचे उगमस्रोत आहेत मात्र ते थंड पाण्याचे असून यावर हिरवाई वाढली आहे. निसर्गाची ही लिलाच या कुंडांचे आकर्षण वाढवते. गंधक युक्‍त गरमपाण्याने स्नान केले तर त्वचेचे सर्व रोग नाहिसे होतात असा समज आहे. यामुळे येथे स्नानाला येणार्‍या पर्यटकांची संख्या अधिक आहे. पहिल्या कुंडातील पाणी लगतच असलेल्या दोन कुंडात जाते येथून हे उकळते पाणी बाहेर वाहते. या पाण्यातून एक छोटी नदी तयार झाली आहे. या नदीला बारमाही गरम पाणी असते म्हणून तिला गरम पाण्याची नदी असे ग्रामस्थ म्हणतात.
    कुंडांवर येणार्‍या महिलांची संख्या अधिक आहे या दृष्टीने स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत येथे पत्र्याचे आडोसे केले आहेत. यामुळे कुंडावर स्नानासाठी येणार्‍या महिलांची अडचण होत नाही. राजवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून मुख्य रस्त्यापासून कुंडावर जाण्यासाठी मोठी पाखाडी बांधली आहे, यामुळे येथे सहज पोहचणे शक्य होते. मात्र माहितगार पर्यटक या ठिकाणी येतात बाकीचे महामार्गावरूनच पुढे जातात.
    #rajwadi_hot_water_springs
    #someshwar_temple
    #rajwadi_sangameshwar
    #konkaniakvlogs

Комментарии • 27

  • @narayanshinde6444
    @narayanshinde6444 3 года назад +1

    मित्रा खूप सुंदर आभारी आहोत

  • @AB1993
    @AB1993 4 года назад +1

    Khupach chan

  • @siddheshphotography1913
    @siddheshphotography1913 4 года назад +1

    mast video aahe bhai 🙏🙏

  • @vinayak_shelake03
    @vinayak_shelake03 4 года назад +1

    Very Nic

  • @bhaskarmohite3417
    @bhaskarmohite3417 3 года назад +3

    Nice video akshay & bhavesh👌

  • @Akshay-zr7zu
    @Akshay-zr7zu 4 года назад +1

    Mst Bhava

  • @vinaygurav9346
    @vinaygurav9346 3 года назад +1

    मस्त भाई 👍

  • @sandeshsangale4447
    @sandeshsangale4447 4 года назад +1

    Mast bhai

  • @sanjaybhadvalkar241
    @sanjaybhadvalkar241 4 года назад +2

    सोमेश्वर मंदिराची माहिती खुपच छान सागितली (भुयाराविषयी) असेच व्हीडिओ लवकर लवकर येऊदेत म़दिरात पोहोचल्या चा फिल आला . Khup chan

  • @krushnatshinde9353
    @krushnatshinde9353 3 года назад

    Khup chan bhava🙏🙏🙏

  • @kokanikida8395
    @kokanikida8395 4 года назад +2

    ❤️❤️❤️

  • @dineshghadshi5471
    @dineshghadshi5471 4 года назад +1

    Mast .....,gavi kadhi gela

  • @vikas9073
    @vikas9073 3 года назад +1

    भावा तू कुठे राहतोस

  • @daulatbhadwalkar3136
    @daulatbhadwalkar3136 4 года назад +2

    Maza gav aahe

  • @VkPoultry
    @VkPoultry 2 года назад +1

    Bro video ka takat nahi ata

    • @kokaniakvlogs
      @kokaniakvlogs  2 года назад

      Job mule time nhi milat sadhya 🙂

    • @VkPoultry
      @VkPoultry 2 года назад

      @@kokaniakvlogs tuza number dena kam ahe