आकाशवाणीवरच्या काही हळव्या आणि काही हसऱ्या क्षणांचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम तुमच्यासाठी | भाग- ४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 49

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 19 часов назад +1

    छान आहे कार्यक्रम...... अर्थपूर्ण

  • @nehabhatkar3526
    @nehabhatkar3526 3 дня назад +2

    खूप छान. पुन्हा या असाच एखादा कार्यक्रम घेऊन

  • @LifeIsGreatGirishArunDikshit
    @LifeIsGreatGirishArunDikshit 3 дня назад +2

    फारच सुरेख कार्यक्रम... हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा👍✌👌

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 4 дня назад +3

    अभिजात मराठीला जगवण्यात आकाशवाणीचे मोलाचे योगदान आहे व यापुढेही असणार आहे . आकाशवाणी , जयोस्तुते !

  • @damodarsathe9240
    @damodarsathe9240 4 дня назад +4

    स्वर.....आले दुरुनी.... आकाशवाणी च आमच्या पिढीवर गारूड अजुनही आरूढ आहे...
    ... छान स्मृती चाळवल्या... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.....,🙏

  • @anjalikulkarni9924
    @anjalikulkarni9924 4 дня назад +3

    खुप छान झाला आठवणींचा संपूर्ण कार्यक्रम.आमचं आकाशवाणीशी असलेलं नातं अतूट आहे.

  • @Anuragadkari1995
    @Anuragadkari1995 5 дней назад +6

    मी फक्त एवढेच म्हणून जगतो की आमची मी खरंच खूप भाग्यशाली आहे की आम्हाला रेडिओ ऐकायला मिळाला आणि त्यातल्या त्यात तुमच्यासारखे लोक ऐकायला मिळाले तुमचा आवाज आणि ऐकले तुमची मराठी आम्ही ऐकली म्हणून आज आमची मराठी शुद्ध आणि सुस्पष्ट आहे भाषेचा अमूल्य खजिना दिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार❤❤❤❤

  • @sadanandbopardikar8515
    @sadanandbopardikar8515 4 дня назад +2

    खूप छान माहिती मिळते ह्या कार्यक्रमातून, तसेच विनोदी किस्से सुध्दा ऐकायला मिळतात खास किशोर सोमण व राजेंद्र पाटणकर यांच्या खुमासदार शैलीत, तसेच श्री अजय गोखले व सौ वीणा गोखले ह्यांनी केलेले शूटिंग, सेट, व सर्व तांत्रिक बाजू उलेखानिय🎉🎉🎉🎉

  • @swatijaywant9909
    @swatijaywant9909 4 дня назад +2

    खूपच छान कार्यक्रम. आजही दिवसाची सुरुवात आकाशवाणी वरील कार्यक्रमने होते. पुन्हा प्रपंच सारखे कार्यक्रम पुन्हा ऐकावेसे वाटतात.

  • @snehaltupe2978
    @snehaltupe2978 4 дня назад +2

    अप्रतिम कार्यक्रम , बालपणापासूनच्या आकाशवाणीच्या आठवणी जाग्या झाल्या. कधी हसू, तर कधी आसू ..... असे रंजक किस्से, आठवणी..... आपल्या खुमासदार निवेदनाद्वारे आम्हा श्रोत्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या श्री. किशोर सोमण, श्री. राजेंद्र पाटणकर आणि "स्मृतिगंध" चे मनःपूर्वक आभार

  • @gopinathsambare1810
    @gopinathsambare1810 3 дня назад +1

    सत्य आणि शांतता हे फक्त आकशवानी च करु शकते . नाहीतर नुसता आरड ओरडा 😂
    आपल्या कार्यक्रमा मुळे मागील आठवणी जागृत झाल्या
    धन्यवाद सर ❤

  • @geetapednekar8681
    @geetapednekar8681 4 дня назад +1

    ❤ खूप छान झाला जुन्या आठवणींना उजाळा मिळाला ❤ धन्यवाद 🙏🙏

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 5 дней назад +4

    विविध प्रस़गां ची सुंदर बांधणी आणि प्रस्तुती 👌सगळे प्रसंग मार्मिक 🙏

  • @smitaedake6521
    @smitaedake6521 4 дня назад +1

    खूप सुंदर कार्यक्रम आमच्या आयुष्यात आकाशवाणीचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे आकाशवाणीमुळे आमची भाषा आणि जाणिवा अधिक समृद्ध झाल्या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा🎉

  • @babandhanawde7770
    @babandhanawde7770 3 дня назад +1

    मी हे कार्यक्रम ऐकले आहेत.धन्यवाद

  • @krishnadixit2245
    @krishnadixit2245 5 дней назад +3

    पाटणकर यांनी सांगितलेली आठवण ऐकून मन हेलावले

  • @smitawalawalkar7419
    @smitawalawalkar7419 4 дня назад +1

    खूप छान सोमण व राजेंद्र.

  • @krishnadixit2245
    @krishnadixit2245 5 дней назад +1

    खरोखर,असा कार्यक्रम तुम्ही सुरु केलात हे खूप छान झाले. आमच्यासाठी मेजवानी आहे ती. मीने, मीने म्हणणारे सोमण होते हे आत्ता समजले, परंतु त्या वेळचे ते म्हटलेले अजूनी आठवणीत आहे.

  • @prasannkumarkulkarni3464
    @prasannkumarkulkarni3464 4 дня назад

    अद्भुत अनुभव, purani यादें सर आपने हमें हमारे बचपन ki.

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 5 дней назад +2

    इतर अनेक माध्यमे असताना आकाशवाणीचे स्थान नेहमी आदराचेच राहिले आहे 👍👍

  • @sheelab1009
    @sheelab1009 2 дня назад

    मुलाखत वाचून मन तृप्त झाले. पूर्वीचे दिवस आठवले. शेवटची signature tune ऐकल्यानंतर tar kay वाटले te शब्दात mandane कठीण. खूप छान. माझ्या काळातल्या सर्वाना forward kele .

  • @arvindtikekar9154
    @arvindtikekar9154 4 дня назад +1

    खूप छान 🌹🙏

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 4 дня назад +1

    आकाशवाणी ने आपल्या कार्यक्रमाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे.

  • @udayagnihotri2702
    @udayagnihotri2702 4 дня назад +1

    ह्रदयस्पर्शी!

  • @anupamauzgare6904
    @anupamauzgare6904 4 дня назад +1

    बिंदुमाधव ह्यांच्या रेकॉर्डिंगचा किस्सा... कल्पकता कामी आली! व्वा!
    आकाशवाणीवरचा आपला कार्यक्रम ऐकल्यानंतर त्या मुलाचा मृत्यू व्हावा....मनात फार कालवाकालव झाली...

    • @anupamauzgare6904
      @anupamauzgare6904 4 дня назад

      दारव्हेकर, देव, विंदा, ह्यांचे किस्से अप्रतिम! ३४वर्षं कौटुंबिक श्रुतिकांचा अविभाज्य भाग व्हायला मिळणं, भाग्यच!

  • @nitudada1
    @nitudada1 4 дня назад +1

    शब्दांच्या पलीकडले..!

  • @ushasaraf4847
    @ushasaraf4847 5 дней назад +1

    Khup chhan karyakram sagale bhag pahile ikale forvard kele arthat aakashavanihi ikat hote aahe

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 2 дня назад

    आकाशवाणीचा नंदादीप असाच तेवत राहो. तुमचा हा कार्यक्रम देखील असाच ऐकायला नक्कीच आवडेल.

  • @urmilabhalerao6228
    @urmilabhalerao6228 4 дня назад +1

    I remember my uncle Mr.Sadashiv Dixit I am so happy.

  • @poojakargutkar3042
    @poojakargutkar3042 4 дня назад +1

    मराठी भाषेवर प्रेम करणारे आणि त्यापोटी ती मनापासून शिकणारे आणि आत्मसात करणारे दामले,साठे, आपटे,गोखले,लेले च पाहिजेत अस नाही ते उत्तमच करतील पण असेही काही आहेत,ते सुद्धा आपल्या या आईवर जीवापाड प्रेम करतात हो,तिची अवहेलना होणार नाही याची काळजी घेतात,इतकच मला सांगायचं आहे

  • @dilipdeshpande3313
    @dilipdeshpande3313 4 дня назад +1

    प्रपंच पुन्हा ऐकण्याची इच्छा आहे

  • @swatithite08
    @swatithite08 5 дней назад +1

    राजेंद्र खूपच छान आणि मन हेलावून गेले आठवण iektana...मीसुद्धा yuvavani,बालोद्यान, श्रुतिका madhun khup काम केले..आकाशवाणी maze आदरणीय स्थान...माझ्याही खूप recording च्या आठवणी जाग्या झाल्या..अजूनही mi contracts जपून ठेवली आहेत

    • @swatithite08
      @swatithite08 5 дней назад

      तुमचे बाबा laxman पाटणकर यांच्याबरोबर मी ramanbagechya नाटकात काम केले. ..ते आमचे जवळचे relative होते..रेणुका शाळेच्या गल्लीतील घरी कायम यायची

  • @kumarpawaskar303
    @kumarpawaskar303 3 дня назад +1

    हल्ली मिळाले या शब्दा बद्दल भेटले म्हणणे फार प्रचलित झाला आहे. हे ऐकायला कसेतरी वाटते. पैसे मिळाले ठीक आहे. पैसे भेटले काय?

  • @amodjp
    @amodjp День назад

    आजच्या काळात सुद्धा सकाळी संध्याकाळी पुणे आकाशवाणी वरील गाणी ऐकाविशी वाटतात पण जाहिराती खुप त्रासदायक ठरत आहेत

  • @kumarpawaskar303
    @kumarpawaskar303 3 дня назад

    👌👌👍👍👏👏

  • @prajaktajoshi8744
    @prajaktajoshi8744 4 дня назад

    खूप छान कार्यक्रम

  • @neelaselvan6540
    @neelaselvan6540 4 дня назад +1

    अप्रतिम कार्यक्रम ....
    पण रत्नागिरी आकाशवाणी केंद्रावर आता पहिले वैभव राहिले नाही
    काप गेले, भोके उरली

  • @yeoleyogesh
    @yeoleyogesh 4 дня назад

    सर्वच मार्मिक आहे हो!
    नवीन पिढीला आपले मत मांडता येत नाही! अगदी बरोबर बोललात.... वाचन नाही कारण मोबाइलला नावाच्या हत्याराने वाचन संस्कृतीला विळखा घातला आहे ....
    कुठलीच शाळा आता भाषेसाठी आग्रही नाही......

  • @tusharredkar8171
    @tusharredkar8171 4 дня назад

    After a long time I saw patankar and soman together.

  • @kunalmulay508
    @kunalmulay508 4 дня назад +2

    पण तुम्हाला हा अधिकार कोणी दिला कार्यक्रमाची अखेर करण्याचा. तो तुम्ही प्रारंभीच्या कार्यक्रमातच आम्हा श्रोत्यांच्या हाती देऊन टाकलात नं!
    अहो, आजच्या आकाशवाणीचा दर्जा काय आहे हे तुम्हीच सांगितलंत नं. मग ह्याच तुमच्या कार्यक्रमात श्रुती-स्मृती शुद्ध होत होत्या. विचार करा! तुमच्या बरोबर इतरही तुमच्या सहकाऱ्यांना सहभागी करून प्रवास चालू ठेवा ही विनंती!!!!!!...... 🙏

  • @milindpathak6951
    @milindpathak6951 4 дня назад

    आकाशवाणीची बरोबरी इतर कोणत्याही वाहिन्या करू शकत नाहीत.

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 4 дня назад

    पुन्हा प्रपंच सुरू करा ना पून्हा

  • @pradeepdeshpande1008
    @pradeepdeshpande1008 4 дня назад

    आठवणीतील गाणी आठवणीने ऐकणार्या सर्व रसिक श्रोत्यांना श्रीराम केळकर चा नमस्कार. मुंबई आकाशवाणी ची उदघोषणा......

  • @rameshjoshi1975
    @rameshjoshi1975 4 дня назад

    कार्यक्रम उत्तम होता, आवाज जरा मोठा ठेवता आला तर बरे झाले असते

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 4 дня назад

    आकाशवाणी ला पर्याय नाही, दंडवत आहे.चॅनल खूप आले तरी आकाशवाणी ती आकाशवाणी च...!

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 2 дня назад

    तुमच्या आठवणीत असलेले किस्से अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने जतन केले जातील. तरी आठवणीना उजाळा देत राहावे.