आर्थिक स्वातंत्र्य, सिनेमा, पालकत्व & Mindfulness! ft. Gashmeer Mahajani | भाग ९४ | Whyfal Podcast

Поделиться
HTML-код

Комментарии • 941

  • @jayshivray387
    @jayshivray387 2 месяца назад +180

    गश्मीर सारखा एक्टर दुसऱ्या इंडस्ट्री मध्ये असता तर खुप मोठा स्टार असता पण मराठी लोक आपल्याच लोकांना सपोर्ट करत नाही.. आणि या माणसाकडे खुप चांगले डान्स स्किल आहे पण आपली इंडस्ट्री त्याचा वापर करत नाही.. आणि गश्मीरने अॅक्शन मुव्ही कराव्यात बघायला आवडेल..

    • @saane204
      @saane204 2 месяца назад +1

      Sooo trueee

    • @govindkulkarni4108
      @govindkulkarni4108 2 месяца назад +1

      खरंय हृतिक रोशन त्यामुळेच प्रसिद्ध झाला. आणि त्यानं ईतिहास घडवला.

    • @shrijagdale6588
      @shrijagdale6588 2 месяца назад +6

      ​@@govindkulkarni4108 प्रसिद्ध असणे आणि उत्तम असणे यात फरक आहे.

    • @saritasawant8782
      @saritasawant8782 2 месяца назад

      Veru true

    • @meshweta12345
      @meshweta12345 2 месяца назад +2

      Exactly Farqch kami scope miltoy gashmeer la. Kiti sundar dance Ani action karto pan donhicha use karun gheta yet nahi producer director na.

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 2 месяца назад +75

    बाप रे.......गश्मीर......किती परिपक्व आहे हा ! असंच हवं, जे फारच छान आहे. वैचारिक परिपक्वता असेल तरच आयुष्य सुखी समाधानी होऊ शकतं. Hats off to Gashmeer... खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
    Whyfal वरची सर्वात जास्त आवडलेली मुलाखत चर्चा...Thank you प्रासु / सुप्रा....
    चांगल्या, दर्जेदार जगण्यासाठी वाचन ही अत्यावश्यक गोष्ट आहे......
    👍💐💐👏🏽👏🏽👏🏽

    • @sagardesai9151
      @sagardesai9151 Месяц назад

      Tai tumhi yevd कौतक kartay pn येणाऱ्या सुपर स्टार ला support nahi karat

  • @SunitaDeshpande-v1o
    @SunitaDeshpande-v1o 2 месяца назад +43

    सशक्त मुलाखत .प्रत्येक तरुण मुलांनी ऐकावी अशी मुलाखत.सगळ्या विषयांना स्पर्श करून झालंय.अर्थपूर्ण आणि अभ्यासपूर्ण मुलाखत.खरंच कमाल.

  • @vasudhamitragotri1459
    @vasudhamitragotri1459 2 месяца назад +27

    Vyom गश्मीरचे सगळेच इंटरव्ह्यूज बघण्याजोगे आणि त्याहूनही एकण्याजोगे असतात. किती गोष्टी शिकवून जातात. His positivity is infectious. He has come a long way fighting against all odds , should be an example for current youth .May God bless him and fulfill all his dreams. Suyog, You are such a great interviewer making all interviews so good and easy.

  • @rashmidivekar9129
    @rashmidivekar9129 2 месяца назад +33

    व्योम हे माझ्या नातवाच नाव आहे.एपिसोड पाहून जे भारावलेपण आहे त्यामुळे लगेचच प्रतिक्रिया देतेय.फार सुंदर एपिसोड. या .वायफळ गप्पा नव्हत्या फारच बुद्धिमान मित्रांच्या गप्पा आहेत.त्यामुळे सलग सर्व एपिसोड पहावासा ऐकावासा वाटला.पालकत्वा वरचे विचार फार आवडले.चांगल्या शब्दात मांडले आहेत .विचारपूर्वक पालकत्वाचा स्वीकार अप्रतिम

  • @sonal07
    @sonal07 2 месяца назад +16

    सकर्षण नंतरची सगळयात wow , whole & complete मुलाखत...खूपच भारी

    • @indiana....626
      @indiana....626 Месяц назад

      Same feelings.. संकर्षण एक खूप आवडला आणि आत्ता हा...

    • @RestlessSkeptic
      @RestlessSkeptic Месяц назад

      @@sonal07जरा मराठी विशेषण पण वापरा

  • @prashantsurve1216
    @prashantsurve1216 2 месяца назад +10

    मी आजपर्यंत गाष्मिर चे जेवढ्या मुलाखती बघितल्या आहेत त्या कायम मनापासून एकल्या आहेत.गाशमिर खूप परिपक्व कलाकार आहे पण मराठी मध्ये त्याला चांगले रोल मिळत नाहीत खूप वर्षानंतर मराठी फिल्म इंडस्ट्री ला गशमिर सारखा गुणी कलाकार मिळाला आहे.❤

  • @seemamahabaleshwarkar4192
    @seemamahabaleshwarkar4192 23 дня назад +2

    किती प्रगल्भ आणि अभ्यासू आहे गश्मिर..खूप सारे अभिनेते आपल्याला आवडत असतात.पण मराठी film industry मध्ये मला आदर वाटावा असा अभिनेता म्हणजे गश्मिर महाजनी 😊जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन किती सकारात्मक आहे.त्याने जे काही लहानपणात सहन केलं आहे त्यात अडकून न पडता तो पुढे जात राहिला.बोलताना तो कायमच जवळचा आणि खरा वाटतो.पालक होताना याविषयावर बोलताना तो जे म्हणाला की ते एकत्र जगणं असतं.ते फार कमाल होत.
    तुला जे करायचं आहे ते सगळं करता यावं,तुला समाधानी,समृध्द आणि भरभराटीचे आयुष्य लाभो.
    All the Best 🎉🎉

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 2 месяца назад +21

    मस्त. एक अतिशय बुद्धिमान अभिनेता. It is not time pass by, it is you and me. Great. 👌

  • @yashmirashi2956
    @yashmirashi2956 Месяц назад +1

    व्योम!! Wow हा संपूर्ण episode बघितल्यानंतर एवढं समजलं कि episode(Podcast च्या अनुभवा ) च वर्णन करण्यासाठी मला बरीच पुस्तकं वाचावी लागणार आहेत. तूर्तास ही तारीख नमूद करण्यासाठी comment करतोय...keep up मराठी मध्ये अशा content खुप गरज आहे.

  • @yashdongre5040
    @yashdongre5040 2 месяца назад +8

    What a great personality...Gashmir! मी याआधीही एकलय Gashmir ला पण आज पुन्हा ऐकताना क्षणाचाही कंटाळा आला नाही इतकी वैचारिक परिपक्वता, समृद्धता, भाषेवरील प्रभुत्व...amazing !!!

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 2 месяца назад +11

    Gashmir che interview aiknyasarkhe astat !! Khup goshti shikyala miltat and he is literally exposes many thoughts in you, has different and unqiue perspective to look at things, and it is actually agreeable

  • @manalikhade6446
    @manalikhade6446 Месяц назад +5

    एक अतिशय प्रगल्भ व्यक्ती , प्रामाणिक आणि उत्तम अभिनेता. त्याचे सर्व सिनेमे पाहिलेत मी... त्याचे काही सिनेमे अगदीच सामान्य असले तरी गश्मीर चं काम अगदी वाखाणण्याजोगे आहे. Perfection हे त्याच्या प्रत्येक सिनेमातील अभिनयात दिसतंच.

  • @Earthkathaa
    @Earthkathaa 2 месяца назад +30

    गश्मीर, तुमच्या आईने आणि आजीने तुम्हाला चांगले घडवले आहे चांगले संस्कार दिले आहेत. तुमचे वाचन, भाषा, जबाबदारीने वागणे, कुटुंबाचे महत्व जाणणे लोभस आहे. तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला, मुलाला शुभ आशीर्वाद.
    सुयोग प्राची thanku thanku thanku तुम्हाला या podcast बद्दल.

  • @lookingsid
    @lookingsid 2 месяца назад +27

    वाह !! गश्मिर वाह ❤
    गट्स लागतात इतकं स्पष्ट बोलायला...लंडन फिल्ममेकिंग बाबत.
    जेव्हा त्यातील बरेचसे आपले मित्र असतात.
    अगदी रोखठोक... जबरदस्त 👍

  • @manjushadhavale9340
    @manjushadhavale9340 Месяц назад +2

    व्योम,अतिशय सळसळत व्यक्तिमत्व,चॉकलेट हिरो,समजूतदार सहचर,आनंदी मित्र, प्रगल्भ सखा असा परिपक्व ऍक्टर ला जवळून ऐकायला मिळत, खूप मज्जा आली,
    त्याचे पालकत्वाची समज तर अतिशय भावणारी होती. सदैव बघायला आवडेल त्याला वेगवेगळ्या भूमिकेत.

  • @prittruless
    @prittruless 2 месяца назад +10

    Vyom.. हा खूपच धमाल एपिसोड होता.. अगदी पून्हा पाहवासा वाटत आहे.. मी येत्या शनिवारी गश्मीर ला भेटणार आहे पुण्या मध्ये, त्याची एक मुलाखत आहे. आणि आता त्याला भेटण्याचा अनुभव खूप वेगळा असणार आहे या एपिसोड मुळे.. कारण गश्मीर हा आज आणखीन नव्याने कळला आहे.. धमाल आहे.. खूप खूप धन्यवाद.. गॉड ब्लेस यू..❤❤❤

  • @-rekhadeshmukh4661
    @-rekhadeshmukh4661 2 месяца назад +6

    फार सुंदर, गश्मीर नव्याने कळला

  • @SuperPoonam143
    @SuperPoonam143 Месяц назад +3

    व्योम ❤❤खूपच सुंदर खूप माहिती मिळाली मला फार आवडतो गश्मीर.. खुप वाचन आणि माहिती यालाच कष्टची जोड अप्रतीम माणूस.. खूप खूप आभार

  • @nidhi_khavanekar
    @nidhi_khavanekar 10 дней назад +1

    Vyom ❤
    जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा आपण आपल्या मुलांना ती गोष्ट देऊन त्यांच्यात आपल बालपण जगतो. ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे गश्मिर.
    माझही थोड फार तसच आहे आयुष्य म्हणून मी खूप relate केलं तुझ प्रत्येक वाक्य. माझी आई खूप मेहनती आणि मायाळू आहे पण सतत लोकांच्या वाईट काळात मुलांना घरी सोडून धावून गेली. कोण वारल, हॉस्पिटल मध्ये असेल आणि अजून काही असेल. ती नेहमी म्हणते एकवेळ लग्नाला नाही गेलं तरी चालेल पण मयताला गेलं पाहिजे. त्यामुळे लोक तिला मानतात हे मान्य.
    पण कुठेतरी अस वाटत की तो लोकांना खूप जास्त दिलेला सगळा वेळ हा आमचा मुलांचा होता आणि म्हणून आता मला माझ्या मुलीला ही feeling नाही द्यायची. मला नको नावलौकिक पण माझी मुलगी मोठी झाल्यावर तिच्या मनात अशी काही प्रतिमा माझी होऊ नये एवढाच प्रयत्न चालू आहे सध्या आयुष्यात आणि तिला हवा तेवढा वेळ काढते मी 😂

  • @rekhajain5415
    @rekhajain5415 2 месяца назад +6

    मनाला खरे समाधान देणारी मुलाखत

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 Месяц назад +2

    अतिशय सुंदर मुलाखत,
    गश्मीर अत्यंत मनापासुन बोलले आहेत. त्यांचे वाचन, आयुष्याबद्दलची समज, प्रगल्भ विचार, आर्थिक नियोजन इत्यादि.
    Parenting बद्दल सुद्धा त्यांचे Views खूपच योग्य आणि अनुकरणीय आहेत, जे अनेक लोक धावपळीच्या आणि अती सोशल मीडिया च्या जगात विसरून जातात.
    फक्त मला एकच सुचवायचे आहे की अति काळजी, अति मार्गदर्शन, अति लक्ष्य हेही मुलांसाठी घातक आहे (हेलीकॉप्टर Parenting), ज्यामुळे ते एका कोशात वाढतात आणि बाहेरच्या जगात गेल्यावर लवकर Adjust होऊ शकत नाहीत.
    थोडक्यात काय "अति" कुठेही वर्ज्य असले पाहिजे.

  • @varshamangrulkar6708
    @varshamangrulkar6708 Месяц назад +3

    गश्मीर एक सुसंकारी ऍक्टर आहे. त्याने अनेक गोष्टी सहजच उलगडल्या आहेत आणि हे करताना कुठेही कसलाच आव आणलेला नाहीये.
    यात गश्मीरने सांगितलेला शेवटचा शब्द " व्योम " म्हणजेच आसमंत हा आहे. गश्मीर ला खूप शुभेच्छा 💐
    हा एपिसोड खूप आवडला. सुयोग, प्राची तुम्हाला खूप शुभेच्छा 💐

  • @Sulekha-bc2pe
    @Sulekha-bc2pe 2 месяца назад +9

    अप्रतिम...निशब्द...अतिशय
    ज्येन्युईन आहात दोघेही...❤❤
    अतिशय सुंदर मुलाखत.

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 2 месяца назад +4

    गश्मिर प्रथम तुझं अभिनंदन!❤💐 ज्या परिस्थितीतून तु उभा राहिलास खूप कौतुकास्पद आहे.आई बद्दल असणारं प्रेम आणि जाणीव खूप महत्वाची आहे, त्यामुळे प्रगती होणारचं . तुला भावी आयुष्यासाठी आणि कामासाठी खूप खूप शुभेच्छा!!👍

  • @Ninad_464
    @Ninad_464 2 месяца назад +5

    व्योम❤
    जबरदस्त एपिसोड, संकर्षण सोबतच्या एपिसोड नंतर हा टॉप झाला आहे,
    Eye-Opener एपिसोड होता, मनोरंजन ही होते,
    बरेच चित्रपट आणि पुस्तकांचे recommendation मिळाले,
    Appreciate❤🎉

  • @vaishalijoshi3467
    @vaishalijoshi3467 2 месяца назад +9

    ❤❤❤
    Well done!
    मराठी असल्याचा अभिमान आहे!
    व्हायफळचा दर्जा उत्तम प्रकारे उंचावतो आहे,याचाही सार्थ अभिमान आहे!
    सुयोग आणि प्राची खूप खूप आभार आणि अभिनंदन!
    🎉❤❤❤❤❤🎉

  • @rimatalawadekar3982
    @rimatalawadekar3982 Месяц назад +3

    किती छान वायफळ 😅😊
    मुलाखत घेणारा आणि देणारा दर्जेदार, मध्येच पाठिमागून येणारा प्रश्न किंवा पर्यायी शब्द देणारा प्राचीचा आवाज 🥰. खूपच छान आणि मनाला भिडणारा वायफळ कार्यक्रम😊 गश्मिरच्या विचारातील खोलपणा, मुल जन्माला आल्यानंतर पालकत्वाची महत्वाची जबाबदारी आणि शेवटचा शब्द वियोम बरं का 😂

  • @shilpamore2878
    @shilpamore2878 2 месяца назад +11

    Accountability... Kiti simple shabdat mandalay... It simply hit me

  • @aashishwad-t8k
    @aashishwad-t8k 25 дней назад +1

    मराठी चित्रपट सृष्टिला गश्मीर मधला अभ्यासु अभिनेता किती मिळाला हे अत्ताच सांगता येणार नाहि पण आज व्योम च्या अनुषंगाने गश्मीर मधला हळवा बाबा मात्र नक्कीच भावला.
    तुझ्या विचारांना सलाम

  • @gokhaleaparna776
    @gokhaleaparna776 2 месяца назад +6

    Vyom खुप कमाल , प्रत्येक
    गोष्टी विषायाचा अभ्यास, मुलाखत मनाला भिडणारी
    सुंदर विचार ,अनुभवी ,आणि एक पुणे कर म्हणून अभिमान ❤

  • @sheetaldesmukh6057
    @sheetaldesmukh6057 Месяц назад +2

    Strong man in all way.....! Mentally, emotionally, socially, Physically......Gashmeer! Thank you for this "fal" ..Vayfal Team!😊

  • @chhayapikale1848
    @chhayapikale1848 2 месяца назад +14

    व्योम
    मी छाया पिकळे (80)वर्षांची तरुण
    आजचा गश्मीरचा भाग ऐकला .त्याचे कष्ट त्यावर मिळवलेले यश हे ऐकून समाधान वाटले .त्याचे विचार ऐकून तर धक्क झाले.असेच यश मिळू दे

  • @poonamchachad2536
    @poonamchachad2536 24 дня назад +1

    I am a parent of twins 3 yrs old......Gashmir changed my whole perspective about parenting ❤

  • @vaidehiwadkar7372
    @vaidehiwadkar7372 2 месяца назад +31

    Massstt vel kadun akkha episode bghnar...khupda comment keli ahe me Gashmeer sathi hya channel vr...thanks for bringing him on your podcast..❤..super excited 🥳
    Ek tr he is Eid ka chaand...phaar kami interviews/podcast miltat gashmeer fans na tyache... So good job Whyfal❤🤭

    • @whyfal
      @whyfal  2 месяца назад +1

      🤗🤗

  • @chitraparadkar2170
    @chitraparadkar2170 Месяц назад +2

    केवळ अप्रतिम 🎉
    व्योम -अवकाश
    जीवन जगतानाच ❤गश्मीर. ,जीवन शिकला ,त्याच्या प्रत्येक अनुभवावरून, बोलण्यातून स्पष्ट कळतं पूर्ण भाग पहाताना,
    अगदी जवळच्या व्यक्तीची मुलाखत ऐकल्याचा आनंद मिळाला.
    खूप शुभेच्छा आणि अनेकोत्तम शुभाशीर्वाद , तुम्हां सर्वांना च🎉

  • @Siddhi_Saraf
    @Siddhi_Saraf 2 месяца назад +8

    खूप छान मुलाखत..आणि खूप पॉइंट्स relate झाले..घरी पण आम्ही डिस्कस करतो की आत्ताचे खूप सिनेमे कंटाळवाणे वाटतात कारण कथे मध्ये दम नसतो आणि फिल्म्स खूप लांबवतात आणि तेच ते लंडन location ज्याची गरज नसते ..आपल्याकडे वेगळे विषय हाताळायची आणि घाई ना करता फिल्म्स करायची गरज आहे ..मगच फिल्म्स चालू शकतात..fulawanti सारखी films आवडायचा हेच कारण आहे..आणि एवढे विषय discuss केले या मुलाखतीत .hats off to entire team..
    बघितला आम्ही पूर्ण एपिसोड ..व्योम😀

  • @renukadevgharemore7183
    @renukadevgharemore7183 2 месяца назад +2

    Vyom..Amazing podcast. Gashmir is so mature and do clear about his thoughts. Hats off to interviewer as well. This is one of the best podcasts I have watched.

  • @shivanimuley3248
    @shivanimuley3248 2 месяца назад +3

    From Audience analysis to Konkani Ruskin Bond…. What a thought sharing episode it was !!!
    Dil ko chu gaye !!! Vyom 🤘🏻

  • @samarthharpale3061
    @samarthharpale3061 Месяц назад +1

    Wyfal che khup Abhinandan
    Gashamir cha interview sathi khup thx.
    Atishy unic person aahe,best luck both of you

  • @snehamohite1658
    @snehamohite1658 2 месяца назад +8

    @ suyog.....the way you just keep them talking and you dont interrupt. Their thinking ...fabulous ❤❤❤ love love ...keep going..

  • @sunitapaigaonkar5316
    @sunitapaigaonkar5316 2 месяца назад +2

    He is so thoughtful. I loved piece where he was speaking about his kid.

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar3474 Месяц назад +3

    Vyom... गाष्मिर मराठीतील अभिमान वाटावा असा अभिनेता आणि त्याहून ही माणूस म्हणून खूप संवेदनशील.

  • @nachiketpargaonkar8646
    @nachiketpargaonkar8646 Месяц назад +2

    व्योम!
    गश्मीरला स्क्रीनवर पाहताना नेहमीच एक वेगळी, पॉझिटिव्ह व्हाईब यायचीच, हा पॉडकास्ट बघून त्याच्या विचारांची खोली, प्रगल्भता अजून कळली, त्याच्या विचारांशी खूप विचार जुळतात त्यामुळे अजूनच मजा आली!
    व्हायफळ टीमचे आभार & तुम्हाला व गश्मीरला खूप शुभेच्छा!😃

  • @pushkargokhale9590
    @pushkargokhale9590 2 месяца назад +6

    VYOM - म्हणजे आसमंत . खूप सुंदर मुलाखत. वडील आणि मुलाच्या नात्याचे फारच सुंदर विश्लेषण. अदभुत दरवाजा मस्तच !❤❤❤

  • @vibhavarinayak1603
    @vibhavarinayak1603 2 месяца назад +2

    I loved the concept of Zig Zag travelling. Thanks Gashmir, loved ur looks, energy, positive vibe and the way u look at life in spite of such a traumatic childhood

  • @shilpakambli1928
    @shilpakambli1928 2 месяца назад +3

    Vyom ! Ek apratim mulakat. Gashmeer kharach he is a gem of person. Afaat knowledge ani tevdach diwn to earth. ❤❤❤

  • @dhavalebharati
    @dhavalebharati Месяц назад +1

    व्योम....सुदंर अप्रतिम...खुप खोलवर चे विचार आणि वेगळा perspective....

  • @vaidehiwadkar7372
    @vaidehiwadkar7372 2 месяца назад +4

    25:42 I loved that he mentioned Dombivli...boltana normally lok mumbai pune thane patkan boltat pn Dombivli nhi yet patkan tondat... being a dombivlikar, I am happy 🤗❤

  • @chaitalisarvate5524
    @chaitalisarvate5524 2 месяца назад +3

    व्योम......सुयोग आणि प्राची तुमचं दोघांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे..... किती निरनिराळ्या व्यक्तिमत्वांची तुम्ही आमच्याशी तुमच्या तरल गप्पांतून भेट घडवून आणता.... आम्हाला एक दिड तासाच्या गप्पारुपी मुलाखत सादर करण्यासाठी तुम्हाला किती तासांची मेहनत घ्यावी लागते ते आज समजलं......गश्मीर नुसता दिसायला देखणा (श्रीमंत) नाही तर तो विचारांनीही तितकाच देखणा आहे हे आजच्या तुमच्या गप्पांतून समजलं.....अशीच नवनवीन व्यक्तिमत्त्व तुला गप्पा मारायला लाभोत.... आणि आम्हाला त्या गप्पा ऐकायला मिळोत अशी सदिच्छा

  • @mrunalshevade3002
    @mrunalshevade3002 2 месяца назад +6

    Wow!!! Enjoyed the episode. Gashmeer is so true, honest and intelligent. Got so many new perspectives...

  • @jayashreeraval6255
    @jayashreeraval6255 Месяц назад +2

    Khup khup sundar interview. Khup khup avdala. Khup kahi shikayala milale❤

  • @bharatipatil1905
    @bharatipatil1905 Месяц назад +4

    खरच तु role model आहेस Gashmir ❤ खुप खुप छान झाल आज podcast...why फळ team che खरच मना पासून आभार.... Gashmir सारख्या खणखणीत नाण्याची परिपुर्ण बाजु समजुन घेता आली.....❤❤❤❤

    • @jayashripatil996
      @jayashripatil996 День назад

      Wow , kiti clear aani beautiful thoughts aahet about parenting. As an actor and as human being you are really great❤

  • @varshasant9136
    @varshasant9136 Месяц назад +2

    Atishay samadhaan denara conversation ❤

  • @ruchitasawant5639
    @ruchitasawant5639 2 месяца назад +9

    Vyom.....
    One of the finest actor in marathi❤❤ and down to earth and honest. Mast hota interview. Gashmir you are really talented and hardworking❤❤😊

  • @deepalipokle2422
    @deepalipokle2422 Месяц назад +2

    Loved this chat....❤ Gashmir is such an amazing human & thanks to Suyog for having such a beautiful conversation with him❤

  • @kalpanaraje3094
    @kalpanaraje3094 2 месяца назад +5

    Vyom.
    This will always be my most favourite episode. He has introduced us to so many new aspects of life. Thanks a million Gashmeer.
    Suyog and Prachi, You are a hit.

  • @shivaniwarik8869
    @shivaniwarik8869 2 месяца назад +1

    व्योम! सुंदर! अप्रतिम! किती depth आहेगश्मीरच्या विचारांमध्ये! नव्याने पालक होऊ घातलेल्या किंवा झालेल्या पालकांना पालकत्वाविषयी दिलेला सल्ला उत्तम!
    "अद्भुत दरवाजा " ह्या segment मधले विचारसुद्धा आतिशय सुंदर!
    सुयोग, प्रत्येक episode मध्ये येणाऱ्या तरुण, talented कलाकारांचे विचार ऐकतांना भारावून जायला होतं, नवीन दृष्टिकोन मिळतो.. At the same time आपल्याच मित्रमैत्रिणीशी गप्पा मारताना जो आनंद मिळतो, तो प्रत्येक episode गणिक वाढतो आहे.
    Thank you "प्रयोग "
    God bless you❤️❤️

  • @Anonymous3008
    @Anonymous3008 2 месяца назад +5

    खूपचं प्रतिभावान आहे गाष्मिर, मनापासून आवडली मुलाखत, worth watching ❤. विचार आवडले. व्योम

  • @makarandphadke7321
    @makarandphadke7321 Месяц назад +2

    व्योम.. खूप दिवसांनी मी एखादी पॉडकास्ट अजिबात न कंटाळता, न forward मारता पूर्ण पाहिली आणि मनापासून आवडली. गश्मीर हा मला तरी आजपर्यंत फक्त रविंद्र महाजनी यांचा मुलगा म्हणूनच माहीत होता. या एपिसोडमध्ये त्याच्या व्यक्तिमत्त्वातील वेगवेगळ्या छटा कळून आल्या. त्याचा वाचनाचा व्यासंग, नवीन पिढीतला एक उमदा तरुण कलाकार म्हणून भवतालच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन, इतर कलाकार आणि प्रेक्षकांकडून असणार्‍या (माफक) अपेक्षा, एक बाप म्हणुन नव्याने मिळालेली ओळख आणि त्याबद्दल असणारी त्याच्यातली जागरूकता, इ. इ. बर्‍याच गोष्टी समजल्या. त्याबद्दल वायफळ टीम चे खरोखर आभार. असेच छान छान एपिसोड करत रहा. शुभेच्छा!

  • @nehanadkarni1001
    @nehanadkarni1001 2 месяца назад +5

    “व्योम “ सुंदर अंतरंग गप्पा मधून उलगडत गेलं
    खूप आभार सुयोग प्राची 🙏❤️😊

  • @mihirchonkar7627
    @mihirchonkar7627 2 месяца назад +1

    व्योम...खूपच अप्रतिम अनुभव...एक वेगळाच पैलू बघायला आणि समजायला मिळाला गश्मिर च्या व्यक्तिम्त्वातला, तुझ्याबद्दल चा आदर चौपटीने वाढला..सुयोग आणि प्राची तुमचे खूप आभार हे घडवून आणल्या बद्दल..तुम्हा सर्वांच्या पुढील वा भविष्यातील सर्व उपक्रमांसाठी शुभेच्छा..,👌🙏

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 2 месяца назад +5

    Very genuine, very mature.. god bless him , him mother, & his family always

  • @anjalithombare7000
    @anjalithombare7000 Месяц назад +1

    Kiti defined vichar,clear cut understanding, kiti chaan vattay aaikayla ani baghayla pan,Wow ha mulga kahitari nakki vegale karun dakhavnyachi dhamak balagato Bravo Gashmeer 👏🏻👏🏻

  • @rutujaa10
    @rutujaa10 2 месяца назад +7

    तेंडुलकरांच्या निवडक कथा खूपच भारी निवड आहे पुस्तकांची ❤कमाल पॉडकास्ट❤

  • @sheelalotlikar424
    @sheelalotlikar424 Месяц назад +1

    Vyom! मुलाखत बघणे हा एक छान अनुभव होता.

  • @sharvaree7
    @sharvaree7 2 месяца назад +10

    व्योम ❕
    Finally the wait is over 👻👻
    कित्ती कित्ती वाट पाहिली होती..whyfal वर गश्मीर कधी येणार म्हणुन... पॉडकास्ट न पाहताच लाईक करतेय आत्ता...आरामात वेळ काढून पुरवून पुरवून हा भाग पाहणार...
    वैभव तत्ववादी सोबत एक भाग होऊन जाऊदे☺️

  • @suparnalokare8866
    @suparnalokare8866 Месяц назад +2

    Vyom!! What an amazing conversation!! An absolutely important guest on your show because of his thoughts and perspectives. I enjoyed the whole show immensely! Thank you ❤

  • @poornimap9290
    @poornimap9290 2 месяца назад +4

    Gashmeer is most Charismatic and under rated actor !! Waiting for his Hindi breakout

  • @ravindrapawar9450
    @ravindrapawar9450 2 месяца назад +2

    गशमीर सारखा ऍक्टर कुठेही होण नाही. इतका बुद्धिमान वैचारिक माणूस मी आज पर्यंत बघितला नाही👏. सशस्त Interview आहे आणि आणि प्रत्येक तरूण मुलांनी ऐकावी अशी मुलाखत आहे . खुप सुंदर 🤩 आणि कुणालाही शिकवुन जाणारी अशी ही मुलाखत होती💯👏 आणि या Podcast मुळे आम्हाला गशमीर खरया अर्थाने कळला.आणि Thank you so much. सुयोग आणि प्राची👏😊 हा Podcast घडवुन आणल्या बद्दल.आणि✌️ वियोम✅

  • @preranamardhekar9056
    @preranamardhekar9056 2 месяца назад +4

    खूप खूप छान मुलाखत झाली... गश्मिर हा गोड मुलगा व अतिशय हुशार आहे...🎉🎉❤

  • @rachanakosumbkar9349
    @rachanakosumbkar9349 Месяц назад +1

    Vyom... Khup chaan tuning.... Gashmir cha koutuk... Ani tyala evadha chaan bolata karnarya Suyog cha suddha❤🎉

  • @drnehakk
    @drnehakk 2 месяца назад +5

    व्योम!
    Amazing episode!
    GASHMEER... Phulwanti avadla...you were not yourself in it. You had become that Pandit. Hatsoff

  • @shilpanashikkar4631
    @shilpanashikkar4631 Месяц назад

    Vyom ...आसमंत .. अप्रतिम मुलाखत झाली .गाशमिर हा अभिनेता माझा खूपच आवडता अभिनेता आहे. तो अप्रतिमच काम करतो .

  • @pallavidalvi5208
    @pallavidalvi5208 2 месяца назад +5

    खूपच छान गश्मीर सलाम आहे तुला आणि सुयोग, प्राची तुमचे पण खूप आभार या सगळ्यासाठीच

  • @rsbbpt
    @rsbbpt 2 месяца назад +2

    Interesting conversation! Not the typical self obsessed star talk! Chan watle! Ani yes...zigzag rocks!👍🏻 There needs to b an explorer inside your heart to love this kind of touring! It adds tremendously in one's personality!
    Tx fr this engaging conversation!

  • @Swami-gz3vn
    @Swami-gz3vn 2 месяца назад +3

    कुटुंब म्हणजे जबाबदारी नाही तर एकत्र राहण...खूप भारी विचार

  • @Sherry_2805
    @Sherry_2805 Месяц назад +1

    Gashmeer is a phenomenal actor with exemplary passion towards his craft(Acting& dancing)..👏He plays a character with such a conviction that makes the viewer believe in that particular role.Wishing him all the success and prosperity❤️🧿😍

  • @NIKUU99022
    @NIKUU99022 2 месяца назад +3

    Khup chaan vatla Dada ki tumhi Gashmeer Sir Yana bolavla ....Khup changle actor and vyakti ahet te .... Really a Decent Guy ✨
    Thank you so much for this Episode Dada... Dhanyawad ✨

  • @gourishgurav1340
    @gourishgurav1340 Месяц назад +1

    व्योम…
    Zigzac episode
    खूप सुंदर…विचारांचे दरवाजे खुलले
    अप्रतिम with Zigzac Gashmir
    Lots of learning
    Thanks n love for such a great podcast❤@whyphal

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 2 месяца назад +3

    उत्तम व्यक्तिमत्व.... Grt.... कलाकार 🌹

  • @sailiachrekar7382
    @sailiachrekar7382 Месяц назад +1

    Extremely superb personality and hats off to you both for such great questions to pull out max from Gashmir.

  • @diptimandhare4181
    @diptimandhare4181 2 месяца назад +3

    फारच सुंदर झालाय एपिसोड खूप दिवस वाट पाहत होतो

  • @shwetaghodekar4549
    @shwetaghodekar4549 Месяц назад +1

    Vyom
    Wow poorna eksath pahile
    Wonderful khas karun parants tip, I'm going to take care thanks Gashmir
    Me and and my 5 year old daughter cheered you high in khatronke khiladi...

  • @nandanpawarvinay
    @nandanpawarvinay 2 месяца назад +4

    1:26:00 what a fact and reality check....so thoughtful

  • @Jffbcbnjfd
    @Jffbcbnjfd 2 месяца назад +2

    Vyom.....❤Aaj prent ch sarvat masttt podcast.. His knowledge is next level yarr & pratek gosti kde pahnyach perspective is superb... Just lv it❤❤ kitti positive thinging ahe ani

  • @kaushikpatil9696
    @kaushikpatil9696 2 месяца назад +3

    व्योम..कमाल एपिसोड होता..!❤

  • @arundhati09
    @arundhati09 2 месяца назад +2

    Vyom! What a beautiful podcast ! Such a wonderful and insightful and deep conversation with Gashmir ! Loads of luv to you all ❤❤

  • @gaurichalak3578
    @gaurichalak3578 2 месяца назад +5

    Thank You So Much Whyfal for bringing him on Podcast 🤩Such an amazing personality💯

  • @milindjoshi1912
    @milindjoshi1912 Месяц назад

    व्योम म्हणजे आसमंत - अप्रतिम पॉडकास्ट. Thank You आणि पुढील भागांसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @ShonaaBanerjee
    @ShonaaBanerjee 2 месяца назад +4

    Gashmeer Mahajani ❤❤

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 Месяц назад +1

    व्योम. खूप श्रवणीय , वैचारिक, superb 😊

  • @r.gjoshi5518
    @r.gjoshi5518 2 месяца назад +3

    अप्रतिम मुलाखत.

  • @shivanilabhe4372
    @shivanilabhe4372 Месяц назад +2

    He is really very hardworking

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 2 месяца назад +3

    Sahi, khup mast enjoyed the episode 👌👌👌

  • @ameygharat7028
    @ameygharat7028 Месяц назад +1

    व्योम म्हणजे आसमंत!
    Bhai tumhi dogheho class hotat! ❤

  • @Sal0123
    @Sal0123 2 месяца назад +5

    If given a proper chance, Gashmeer being a multitalented Actor has the capacity of taking Marathi cinema to newer heights with his extreme talent, Good looks and progressive mindset!! #GashmeerMahajani

  • @pa05
    @pa05 Месяц назад

    Vyom! केवळ अप्रतिम!सलग एपिसोड पाहिला..खूप छान,प्रगल्भ व्यक्तिमत्त्व! बर्‍याच दिवसांनी खूप सुंदर episode झाला..with minimum interruption...

  • @sunayanasumbrey5937
    @sunayanasumbrey5937 2 месяца назад +3

    Mi ter n baghtach like kelai

  • @rupalimungase8972
    @rupalimungase8972 2 месяца назад +2

    Vyom.... खरच खूप छान वाटत तुमचे हे episodes बघुन म्हणजे मी वाट बघत असते कधी नवीन episode येतो म्हणून न इतकं mind relax hot podcast chya end la आल्यानंतर .... superb