...म्हणून भारत महासत्ता होऊ शकत नाही? | Bhanu Kale | EP - 1/2 | Behind The Scenes

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 131

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Год назад +3

    भानू काळे यांचे विश्लेषण नेहमीच मर्मग्राही असते. त्यांनी उल्लेखिलेल्या अपयशांसह वाढती विषमता ही देखील चिंताजनक आहे.

  • @tusharkumbhar1215
    @tusharkumbhar1215 Год назад +36

    हिंदी भाषा येणे हे तुमच्या राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र नाही.
    मराठी भाषा सुद्धा तितकीच भारतीय आहे.
    #मराठीबोलाचळवळ
    #मराठी
    #मी_मराठी_भारतीय

    • @amolwagle1
      @amolwagle1 Год назад +4

      Hindi hi bimaru states chi bhasha aahe

    • @darkknight4313
      @darkknight4313 Год назад +1

      💯

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx Год назад

      Teknoloj,,viksit,,kelyasivsy,,bhasa,,viksit,,hot,,nahi,,nusticha,,bhartiy,,asu,,n,,chalt,,nahi

  • @amolpadale3308
    @amolpadale3308 Год назад +6

    महासत्ता बनण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा भविष्यातील आपल्या गरजा काय आणि त्या पुर्ण कशा करता येतील याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. लोकसंख्या नावाचा राक्षस कधीच सुख-समृद्धी घेऊन येऊ शकत नाही.

  • @santoshambre6994
    @santoshambre6994 Год назад +6

    सरांचे शब्द सामर्थ्य उत्कृष्ट आहे.

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 Год назад +18

    नाही झाला तरीही काही फरक पडत नाही पण खाऊन पीऊन सुखी सात्विक आहार पवित्र आचरण आणि समृद्ध जीवन जगता आलं म्हणजे झालं 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @vinodsahasrabudhe6570
    @vinodsahasrabudhe6570 Год назад

    तशी ज्ञान भाषा भारतात आहे. संस्कृत. ती भारतीयांची जरी असली तरी संस्कृत ग्रंथात खूप ज्ञान साठवले लं आहे.

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs Год назад

    देश महासत्ता बनण्याची गरज नेत्यांना असते जनतेला नाही. कारण नेत्यांना त्याचे थेट फायदे मिळतात. जनतेला एक चांगले आणि सुखकर आयुष्य हवं असतं. जे देण्याची नेत्यांची लायकी नाहीये.

  • @vinodshinde5452
    @vinodshinde5452 Год назад +8

    विविधतेत एकता आमची ताकत आहे आणि भारत महासत्ता होणारच

    • @sks1464
      @sks1464 Год назад

      भारतातून up, बिहार हे भारतातून वेगळे करा आपोआप भारताचा विकास होईल

    • @earth_1943
      @earth_1943 Год назад

      Practically impossible

  • @Connect-To-Ajit
    @Connect-To-Ajit Год назад +2

    काळेसरांनी अत्यंत योग्य विश्लेषण केलं आहे. भारत मागे राहण्यात सर्वात मोठं कारण हे भारतीयांची मानसिकता आहे. धर्म-जाती वाद, उच्च-निचता आणि त्यातून निर्माण झालेली मानापमानाची भावना. आपल्यापुरतं बघायची वृत्ती. दुसऱ्याच्या मताचा अनादर करण्याची वृत्ती. पैसे, शस्त्र आणि आक्रमकता म्हणजेच शक्ती मानण्याची वृत्ती. शिक्षणाबद्दलची अनास्था. आज जागतिक कंपन्या भारताकडून फक्त कामं करून घेतायत आणि हुशार, उच्च्शिक्षित भारतीय मेंदू आपल्या देशात पळवून नेतायत. आज शेतीचे, पाण्याचे, गरिबीचे प्रश्न सोडवायला ज्या तरुण पिढीची गरज आहे, त्यातले काही जण रस्त्यावर कोयते आणि तलवारी घेऊन फिरतात. आपल्याच जनतेत दहशत निर्माण करण्यात त्यांना मोठेपणा वाटतो. आज जगात तरुणांमुळे तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती होत आहे आणि त्यामुळे जीवनमान सुधारण्यासाठी खूप उपयोग होत आहे. आज हेच भरकटलेले तरुण गोग्य मार्गावर आले तर भारत देखील जास्त वेगाने प्रगती करू शकेल आणि ह्या तरुणांना एक छान आयुष्य लाभेल आणि समाजात मानाने वावरता येईल.
    आज इंग्रजी येत नाही म्हणून अनेक मुलं उच्च शिक्षण न घेता शिक्षण सोडून देतात. त्यासाठी हिंदीसारखी एक राष्ट्रीय भाषा व्यवहारात आणि शिक्षणात असेल, तर अधिक भारतीय उच्च शिक्षित होतील. आज आंतराष्ट्रीय व्यवहार करताना आपल्या लोकांना परकीयांच्या भाषा शिकाव्या लागतात. खरं म्हणजे त्यांना भारतीयांशी व्यवहार करताना हिंदी शिकायची गरज वाटेल, अशी परिस्थिती आपण निर्माण करायला हवी. पण आज दुर्दैवाने हिंदी, मराठी शाळा ओस पडतायत आणि इंग्रजी शाळा ओसंडून वाहत आहेत.
    काळेसरांचं वक्तव्य काही बाबतीत नकारात्मक वाटत असलं, तरी तेच वास्तव आहे, ते नाकारून चालणार नाही; उलट ते स्वीकारून भारतीयांनी त्यात सुधारणा करायला पाहिजे आणि त्यासाठी पुढारलेल्या देशांचा आदर्श समोर ठेवायला काहीच हरकत नाही.
    हे वाचा म्हणजे खरी परिस्थिती लक्षात येईल.
    twitter.com/SakalMediaNews/status/1692159346900144339?t=1OVZZxOdpEco5i_7Flq58g&s=19

    • @amii1764
      @amii1764 Год назад

      1000% करेक्ट

  • @aditya76ambre
    @aditya76ambre Год назад +8

    पुणेरी लोकांना इतका का हिंदीचा पुळका आहे काय माहिती. मराठीभाषेचे सांस्कृतिक केंद्रच दुसऱ्या भाषेचे गोडवे गात असेल तर महाराष्ट्रात अजून काय अपेक्षित आहे. हिंदी नावाचा कर्करोग मुळापासून उपटून काढला तरच खरी प्रगती दिसणार. कुठे आणि किती शिव्या खाणार हिंदीभाषिक काय माहिती. आत्ता तर कर्नाटकात पण अतिरेक वाढलाय. आणि हो हिंदी आणि इंग्रजी दोन्हीपण परक्याच भाषा आहेत.

    • @sachinmainkar
      @sachinmainkar Год назад

      नमस्कार. अगदी बरोबर. मुंबईत तर हिंदी चा अतिरेक आहेच. पूण्यातली स्थिती मला नीट माहित नाही. महाराष्ट्रा नी त्रिभाषा सूत्री आता काढून टाकावी हे योग्य.

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Год назад +4

    हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करायला काही हरकत नव्हती. परंतु गैरहिंदी भाषिकांनी हिंदी शिकायची, पण मग हिंदी भाषिकांवर एक कुठली जरी दक्षिणात्य भाषा शिकण्याची सक्ती करायला हवी होती. तरच खरं नॅशनल इंटिग्रेशन होऊ शकलं असतं. उगाच हिंदी सगळीकडे लावली म्हणून भारताची प्रगती झाली असे टाॅम टाॅम करण्यात अर्थ नाही. तसं असेल तर मग तामिळ भाषा एकत्र सर्वत्र लावली असती तरी प्रगती झाली असती.

    • @prakashrewale9776
      @prakashrewale9776 Год назад

      तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. मी २ वर्ष दाक्षिणात्य राज्यात राहिलो आहे. त्यांचा मातृभाषेला प्राथमिकता देण्याचा आग्रह खरोखरच चांगला आहे . अनेकांना हा आडमुठेपणा वाटतो पण हिंदी येत नसतानाही ते जगभरात नांव कमवित आहेत. भारतात इथेही बॅंकांचे गव्हर्नर, इस्त्रो, तंत्रज्ञानाच्या कंपन्याचे मालक अथवा मोठ्या पदावर तेच आहेत. काहीजण उगाचच हिंदी च तुणतुणं वाजवीत बसलेत.

  • @santosh_979
    @santosh_979 Год назад +2

    आजोबा जुन्या पिढी चे आहेत त्यांना सांगा भारतात लोक इंग्रजी शिकतात आणि चित्रपट मराठीत बंग्ला कन्नड तामिळ आपल्या भाषेत पाहतात.

  • @कविताकाळवीट

    गृहीणीचं निरीक्षण: भाजीच्या भावाबद्दल जे सांगितलं ते औंधलाच.भाजीचा भाव विचारणार्यांकडे तुच्छतेने पहातात.पैशाच्या विपुलतेतून निर्माण झालेली पद्धत.

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 Год назад +2

    तुम्ही काहीही सांगितले तरी भारत आर्थिक दृष्टीने स्वयंपूर्ण होणारच.

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Год назад +16

    ‘ आपण महासत्ता का होऊ शकत नाही’ हा मथळा योग्य वाटत नाही. स्वातंत्र्यानंतर भारताने आजवर केलेल्या प्रगतीचे मूल्यमापन हा भाषणाचा विषय आहे, असे वाटते. महासत्ता बनू ही अतिरेकी महत्त्वाकांक्षा झाली, त्याला वास्तवाचा आधार नाही. देशातील जनता पूर्वीपेक्षा अधिक सुखी-समाधानी कशी होईल हे उद्दीष्ट असले पाहिजे. उगीच अमेरिका, चीन इत्यादींशी तुलना करण्यात अर्थ नाही. ३.७५ लक्ष कोटी डाॅलर जीडीपी होऊन भारत पाचव्या क्रमांकावर पोचला ही आनंदाची गोष्ट असली तरी दरडोई जीडीपी किती आहे याचाही विचार करायला हवा. तो फक्त २००० ते २५०० डाॅलर इतकाच आहे. चीनचा दरडोई जीडीपी, लोकसंख्या सारखी असली तरी आपल्या पाचपट आहे, तरीही त्याची गणना श्रीमंत राष्ट्रांत होत नाही. वास्तव लक्षात घ्यावे, पोकळ आत्मगौरव व आत्मसंतुष्टता घातक आहे.

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 Год назад +4

      जोपर्यंत दर डोई उत्पन्न परमानसी वाढत नाही तोपर्यंत आपण विकसित होऊ शकत नाही

    • @uvuvwevwevweossaswithglasses
      @uvuvwevwevweossaswithglasses Год назад

      Perfect

    • @jaideepshinde7492
      @jaideepshinde7492 Год назад

      बरोबर बोललात आपण. आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे एकवेळ आकड्यांमधे अथवा आकड्यांद्वारे महासत्ता येईल पण ती महासत्ता मनात असणार आहे का? की त्यात आम्ही मागासच रहाणार आहोत आणि जो नेता फुकट काही देण्याचं वचन देईल त्याला निवडून देणार आहोत?
      कारण देशाने कितीही प्रगती केली तरीही ही मानसिकता कधी बदलेल असं वाटत नाही. तसेच गुलामगिरीबद्दल. आपल्याइकडील मुले अमेरिकेत नोकऱ्या मिळवतात, पटकावतात याचं कोण कौतुक. अमेरिकेत जरूर जा नोकरी करायला पण अमेरिकनांसारखी भांडवलशाही कधी येणार आहे, रुजणार आहे का आमच्या मनात?
      याचा अर्थ देशाने काहीच प्रगती केली नाही असा अजिबात नाही पण
      गुगल, बिंग, सफारी सगळे ब्राऊझर्स त्यांचे आहेत भारताचा एकही नाही. Adobe Photoshop सारख्या अनंत Tools त्यांनी निर्माण केल्यात आणि दरवर्षी त्यातून ते अब्जावधी डॉलर्स कमवतायत आणि त्या टूल्स आजही इतक्या प्रगत असूनही ते लोक अजिबात आळस न करता त्यात दरवर्षी काही ना काही नवीन गोष्टी अंतर्भूत करत असतात, सुधारणा करत असतात. जोपर्यंत ही अशी मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत महासत्ता वगैरे ही दिशाभूल ठरेल.
      स्वतः स्वतःची पाठ किती थोपटून घ्यायची यालाही काही मर्यादा हवी.
      सुंदर पिचाई गुगलचा CEO आहे ही नक्कीच आनंदाची व देशासाठी अभिमानाची बाब आहे पण त्याचबरोबर तो ज्या गुगलचं नेतृत्व करतोय ते गुगल आपलं नाही. आजवर आपण आपलं जगावर राज्य करणारं 'गुगल' बनवू शकलेलो नाही ही खंतही असायला हवी पण नेमकी तीच कुठे दिसत नाही. अर्थात इथे गुगल हे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. भारतातील सगळ्याच क्षेत्रांत हीच अवस्था आहे. केमिकल्स, फर्टिलायझर्स, बी - बियाणे यांचे कितीसे पेटंट्स आपल्याकडे आहेत? कारण रिसर्चची, पेटंटची मानसिकताच नाही आमची.
      आणि आमच्याकडे महासत्ता येऊ घातलीये.

    • @swapniljewale2521
      @swapniljewale2521 Год назад +1

      खरं स्वीकार करणं अवघड असतं😊

  • @rutagogo
    @rutagogo Год назад

    अनुदान संस्कृती खरंच खूपच सुंदर एपिसोड ❤

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 Год назад

    खूप चांगली माहिती

  • @someshwarmbhoyar4916
    @someshwarmbhoyar4916 Год назад

    खुप छान मुलाखत होती ‌‌।

  • @manojsagaonkar6576
    @manojsagaonkar6576 Год назад

    Bharat hech ek moth lajirvaan apayash aahe..

  • @yashwantkulkarni8943
    @yashwantkulkarni8943 Год назад

    Very true analysis,,,great

  • @chandra22able
    @chandra22able Год назад

    Pragalbh lokanchi mulakhat ghyavi.

  • @vivekkarve8707
    @vivekkarve8707 Год назад

    तुमच्या प्रत्येक कार्यक्रमात निरनिरळ्या विषया चे उत्तम विश्लेषण असते.

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya Год назад +6

    संस्कृतला सर्वसमावेशकत्व यावे ही प्रार्थना !

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 Год назад +2

    भारत देश हा विकसनशील देश म्हणुनच राहील तो विकसित देश कधीच होऊ शकत नाही. त्याचे दोन प्रमुख कारण म्हणजे
    १ - भारताची अतिशय वेगाने वाढत चाललेली लोकसंख्या
    २ - भारतातील अतिशय गलिच्छ राजकारण

    • @sankkham
      @sankkham Год назад +1

      Fakt up, bihar and MP che population vadhat ahe😂😂

    • @nileshugale4521
      @nileshugale4521 Год назад +1

      3. सामूहिक शहाणपणाचा अभाव
      4.व्यक्ति पूजक समाज
      5.सामूहिक शिस्तीचा अभाव

  • @swarmagna
    @swarmagna Год назад

    We couldn’t create common Language for Academics mainly because there was no need to do so ….. English was already there ,and that adaptation turned out to be the marvellous strength of our Higher Education in almost all the Fields!

  • @ganeshdivekar9
    @ganeshdivekar9 Год назад +1

    ट्रॅफिक किंवा वाहतुकीच्या दृष्टीने पुणे हे अतिशय दरिद्रीच आहे

  • @pratikdagu
    @pratikdagu Год назад

    उत्तम विश्लेषण!!🙌🏼

  • @kunaljoshi4163
    @kunaljoshi4163 Год назад +1

    संविधानाच्या ३४३ कलमानुसार आपल्या देशाला राष्ट्रभाषा नाही
    राष्ट्रभाषा ही केवळ भाषा नसून त्या राष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असते व भारतासारख्या सांस्कृतिक विविधता असलेल्या देशाच्या संस्कृतीची व्याख्या ही कोणत्याही एका भाषेत होऊच शकत नाही

  • @globalpublicschool3753
    @globalpublicschool3753 Год назад

    Thanku sir

  • @rajalakshmisundaresan9623
    @rajalakshmisundaresan9623 Год назад

    Good observation.

  • @RameshShinde-fx8mt
    @RameshShinde-fx8mt Год назад

    तर्कसंगत विश्लेषण.....

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 Год назад +1

    Good session

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar Год назад +5

    हिंदी न घेतल्याने भारताची प्रगती झाली नाही? अरे विद्वान् माणसा, हिंदी राज्यांची स्थिती बघ आणि अहिंदी राज्यांची स्थिती बघ.

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 Год назад +1

    Though our population growth rate is coming down gradually but more efforts are require on these count

  • @amii1764
    @amii1764 Год назад +1

    जोपर्यंत भारतात जातीयवाद विषमता आहे तोपर्यंत भारत महासत्ता होऊ शकत नाही, कारण संपत्तीचे समान वितरण आवश्यक आहे

  • @balasahebbhamare5279
    @balasahebbhamare5279 10 месяцев назад

    आपल्या चर्चेनुसार असे लक्षात येते कीभारत महासत्ता होणार नाही का होणार नाही? स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2014 पर्यंतकाही प्रमाणात विकासात भर झाली आहे.परंतु सन 2014 पासून ते 2023 जागतिक पातळीवर थोड्या प्रमाणात का होईना विकासाचे पावले दिसत आहे सरकार की इच्छा असेलतर का होणार नाही मोदी सरकार सारखं सरकार राहिले तर का होणार नाही ?

  • @jyeshthah1
    @jyeshthah1 Год назад +5

    केस पांडरी झाली की तो विचारवंत होतो भारतात

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 Год назад

    भारतात राहून जो भारताला जास्तीत जास्त शिव्या देतो तो विचारवंत असतो

  • @VijayPawar-sz6gq
    @VijayPawar-sz6gq Год назад

    👌 observations

  • @dnyaneshwarbangar6588
    @dnyaneshwarbangar6588 Год назад +2

    हिंदी नाही संस्कृत भाषा पुरातन आहे

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 Год назад +12

    कर्म दरिद्री विचारवंत

    • @mukundlk
      @mukundlk Год назад +1

      अगदी बरोबर

  • @ashutoshdeuskar65
    @ashutoshdeuskar65 Год назад +4

    मला हे कळत नाही की प्रत्येक व्हिडीओला negative caption का
    जरा positive व्हा

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif Год назад

      Khara ahe ...
      Modi saheb kadun he lok kahich shikat nahi.

  • @arunpingle7782
    @arunpingle7782 Год назад

    एकदम रटाळ मुलाखत झाली वेळ फुकट घालवला.

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Год назад

    होणार म्हणजे होणार च
    बघुया आतापासून च कशाला निराश वहायचे

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh Год назад

    आता 10 वर्षात हे सर्व सामाजिक प्रश्न फार जलदगतीने सुटणार आहेत.....कुठल्याही आंदोलन, सोल्यूशन चि वेळ नाही येणार.....

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 Год назад

    हिंदी भाषेचे शिक्षण आवश्यक आहे परंतु यामध्ये मराठीचा बळी जाण्याचा धोका आहे. हा टाळण्यासाठी हिंदी ऐवजी उर्दूला प्राधान्य द्यावे. भाषेचा सामान्य वापर पाहिल्यास उर्दू आणि हिंदी मध्ये फारसा फरक नाही.. या योगे हिंदी मराठीवर कुरघोडी करण्याचा धोका कमी होईल

  • @mukundlk
    @mukundlk Год назад

    5000 10000 वर्षात 1000 वर्षे परकीय आक्रमण म्हणजे काय आपत्ती नाही.

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif Год назад +1

    Bharat kadhich mahasatta honar nahi
    - Sun Tzu

  • @vicj7223
    @vicj7223 Год назад +5

    मस्त मुलाखत पण इंग्रज आल्यानंतर आधुनिक विचार आले ,व शिक्षण आणि इतर जगात झालेले बदल , बदललेली मुल्ये यामुळे लोकशाही व्यवस्थेत आलो.मुस्लिम शासक कालात राजेशाही होती

  • @Home-m2y
    @Home-m2y 9 месяцев назад

    हिंदी भाषिक कोणतेही राज्य प्रगतीशील नाही. गुंडागर्दी, अंधश्रद्धा, दुर्बल घटकांवर , दलित वर्गावर अत्याचार, बुरसट व मागासलेली विचार सरणी असलेली बहुतांश हिंदी भाषिक राज्य आहेत.
    आणि देशात बहुसंख्य असलेल्या हिंदी भाषिकांची वर्चस्ववादी राजकारण, दुसऱ्या राज्यात नोकरी व्यवसायासाठी जाऊन त्या राज्यातील संस्कृती वर आक्रमण अशी अनेक कारणे आहेत. तसेच दुसऱ्या राज्यात कमवायचे परंतू तिथली भाषा मात्र शिकायची नाही ही वृत्ती त्यमुळे हिंदी भाषा ही जोड भाषा होण्यास विरोध आहे.
    महाराष्ट्रात मराठी भाषेचे नुकसान इंग्रजी नाही तर हिंदी भाषा करीत आहे.
    इंग्रजी माध्यमातील मुलं ही शाळेच्या बाहेर आल्यावर मातृभाषे ऐवजी हिंदी चा संवादासाठी करीत आहे. मराठी भाषिक मुंबईत च नव्हे तर पुणे नाशिक इ. शहरात नंतर शोधावा लागेल.

  • @chessmtl2010
    @chessmtl2010 Год назад +3

    चीन जर ही सध्याची दुसऱ्या क्रमांकाची महासत्ता असेल तर भारताने चीन व्हायचा प्रयत्न करावा कारण अमेरिका व्हायला अजुन २०० वर्ष लागतील.

  • @manojbhagwat84
    @manojbhagwat84 Год назад

    आपण महामार्गदर्षक होऊ...सत्ता नको

  • @TheInterviewer-nz1ns
    @TheInterviewer-nz1ns Год назад

    Kale saaheb, je powerful astaat na tyanna kuthle hi sanctions nahi adavu ka ncha thaambavu shakat.

  • @vinodsahasrabudhe6570
    @vinodsahasrabudhe6570 Год назад

    आपण जी जोड भाषा म्हणताहात,ती संस्कृत होऊ शकली असती. ती तशी व्हावी असं मतं प.पु. गुरूजी ( द्वितीय सरसंघचालक रा.स्व.सं) यांनी एका पत्रकाद्वारे पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना कळवलं होतं.

  • @dr.shreyas123
    @dr.shreyas123 Год назад

    Matanchya rajakaranasathi tax system ashi ahe ki 5%peksha Kami lok income tax bhartat. Te utpann purese hot nahi mhanun GST Ani road tax, toll he tar ahech an petrol var 50% govt la deto apan. Pan yacha udyoganvar parinam hoto Ani profitability bakichya deshanpeksha Kami rahte. Jase ki China ek vastu Rs 100 madhe viku shakte pan apalyala ti vastu banavaylach Rs 110 lagtat, kasa karnar apan manufacturing? He sarv taxation mule.

  • @ganpatiajitkar4465
    @ganpatiajitkar4465 Год назад

    भारत महासत्ता होऊ नये हीच यांची मनीषा,,, काँग्रेसचे पूटे

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 Год назад

    are mag tar kona na konacha rajya hotach na deshat? mag loka tar aadim काळात fakta aazad hote

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Год назад +2

    🐻मुसलमानानी इंग्रजानी किड्या प्रमाणे चिरडल तरी आपण सर्व एक होत नाही . तो त्या जातीचा मी ह्या जातीचा . मनु ला शिव्या मला पण रिझरेशन हवे इ.इ 😂😂😂😂😂

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 Год назад +1

      मनु शिव्या देण्याच्याच लायकीचा होता, वाचा एकदा सत्य समोर येईल

    • @Om-qy9mr
      @Om-qy9mr Год назад +1

      @@mayurdeshmukh2151 मनुला शिव्या देत बसण्या पेक्षा जाती कमी करण्या ऐवजी वाढवत चालले . शिव्या देऊन का य फायदा १

  • @sudinsawant649
    @sudinsawant649 Год назад +1

    हजारो वर्ष शोषितांना जो पर्यंत योग्य न्याय व संधी मिळत नाही तो पर्यंत भारत महासत्ता होऊ शकत नाही.

    • @amii1764
      @amii1764 Год назад

      1000%करेक्ट

  • @rahula4815
    @rahula4815 Год назад

    कसला abandance आलाय काय माहीत विनायक 🤔🤔🤔😀😀

  • @sanjaywalunjkar6625
    @sanjaywalunjkar6625 Год назад +1

    Why negative thinking?

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 Год назад

    1000 Varsha Paartantrya, Gulamgiri zelali -- aata Pudhachi 1000 Varsha Swatantrya ani Sab ka Saath Sab ka Vikas Achieve karnyacha Motha Challenge India pudhe aahe.....

  • @ganpatiajitkar4465
    @ganpatiajitkar4465 Год назад

    कशासाठी आशा निराश लोकांना बोलवून तुमची फजिती करून घेताय,,😠

  • @swarmagna
    @swarmagna Год назад

    Bharat ka sabse bada apayash ? Not able to have link Language? Absolute Nonsense….. little problem May be there in some Southern States! Otherwise Hindi & English are doing the job quite well! With internet everywhere No need for any specific Link Language….we function very well As We Are!

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx Год назад

    Evm,,hek,,karun,,loksabhe,kinva,,kuthlihi,,nivadnauk,,nivadun,,yene,,he,,tantradnyacha,,ajarn,,aahe

  • @swarmagna
    @swarmagna Год назад

    Out dated way of Thinking !

  • @Invincible2030_
    @Invincible2030_ Год назад +3

    Think Bank, please invite knowledgeable and optimistic people like Dr Devi Shetty or Dr Raghunath Mashelkar. It looks like all your guests are semi literate pessimists!

    • @ShrinivasBelsaray
      @ShrinivasBelsaray Год назад

      Your suggestion is good. But many of their videos make it very clear that their very agenda is to defame the patriotic parties and persons. They are however very clever not to appear to be the stereo-typed Congress and leftists' agents. Therefore, it is very natural that they invite only pessimists.

  • @vishvaskale-hz7sx
    @vishvaskale-hz7sx Год назад

    Tantradyan,,adani,,mansala,,pachat,,nahi,,ajirn,,hot

  • @np7389
    @np7389 Год назад +1

    व्यक्ती पूजा बंद करा मग जमेल

  • @tusharkumbhar1215
    @tusharkumbhar1215 Год назад +4

    आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त...
    मराठीत व्यक्त न होण्याची कारणे
    अ) मराठी भैय्यांची कारणे
    (मराठी असून हिंदीचा पुळका असणारी माणसे)
    कारण १ :-*
    आपण भारत देशात राहतो, सर्वांना जोडून ठेवणारी एक समान भाषा असावी, मग ती ब्रिटिशांच्या इंग्रजी पेक्षा भारतीय हिंदी काय वाईट ? आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढेल
    सत्य - जणू राष्ट्रीय पणाचा मक्ता फक्त महाराष्ट्रानेच घेतलाय , आणि फक्त एकाच भाषेमुळे राष्ट्रीय बाणा सिध्द होतो हे अजून हास्यास्पद.
    कारण२:-
    मराठी बोलताना हिंदी संवाद, उर्दू शायरी फेकणे स्टायलिश (भारी) वाटतं
    सत्य - मराठी मधीलचं वाक्प्रचार, म्हणी, अस्सल गावराण बोली वापरली तर अजून भारी वाटेल.
    कारण ३:-
    हिंदी राष्ट्रभाषा आहे, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बिचाऱ्या, पोटार्थी, कष्टकरी लोकांना मराठी येत नाही म्हणून आपण त्यांच्याशी हिंदीत बोललं पाहिजे.
    सत्य - हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा नव्हती, नाहीये आणि होणार पण नाही.
    मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा आहे, त्याचा पुरावा आहे.
    बाहेरून येणाऱ्या लोकांना मराठीची गरज कधी वाटेल, जर आपण मराठीची जाणीव करून दिली तरंच, मराठी शिवाय भागत असेल तर कोणाला मराठीची गरज वाटेल ?
    अस्सल भैय्यांची कारणे (परप्रांतीय लोक महाराष्ट्रात असलेले)
    - जर मराठी लोकंच मराठी बोलत नाहीत, मग आम्ही का बोलावी ?
    चार पिढया महाराष्ट्रात राहून, मराठी न बोलता आमचं भागतय तर का बोलायची मराठी ?
    - महाराष्ट्र सर्व भारतीयांचा आहे, फक्त मराठी लोकांचा नाही
    सत्य - संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी लोक हुतात्मा झाले, मराठी मातीने परप्रांतीयांना सामावून घेतले ते आमच्या मराठी लोकांच्या भोळ्याभाबड्या स्वभावामुळे, त्यामुळेच परप्रांतीय शिरजोर झाले.
    ज्या मराठी मातीने तुम्हाला नाव, पैसा मिळून दिला किमान तिच्याशी इमान राखण्यासाठी मराठी बोलावं इतकी किमान सद्बुद्धी लाभो.
    - अभिजित गंभीर
    #प्रकेअत्रे
    #मराठी
    #संयुक्तमहाराष्ट्र
    #मराठीबोलाचळवळ

    • @pramodpatil5336
      @pramodpatil5336 Год назад

      इंग्रजीपेक्षा हिंदीकडून मराठी भाषेला जास्त धोका आहे. कारण हिंदी व मराठी मध्ये इतके साम्य आहे की हिंदी कधीही मराठीला पर्याय बनू शकेल. माय मरो व मावशी जगो या म्हणीत अर्थ आहे. इंग्रजीकडून हा धोका नाही. पण मराठी माणसाचे दुर्दैव हे की आपल्याला हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषा धड येत नाहीत. जीवनात प्रगती करायची असेल तर या दोन्ही भाषा नीट शिकायला हव्यात, पण मातृभाषेचे प्रेम व आग्रह कायम ठेवून.

  • @pranayparkar5877
    @pranayparkar5877 Год назад

    काळेसर बरोबर बोलत आहेत परकीय भाषा भारतात महान होत आहे भारताचे दुर्दैव आहे की भारत हिंदू देश असूनही भारताला भारतीय भाषा नाही याउलट प्रत्येक देशाची स्वतंत्र भाषा आहे

  • @PK-qe2py
    @PK-qe2py Год назад +1

    सरळ संस्कृत भाषा बोला, हिंदी चा का एवढं आग्रह?

    • @sks1464
      @sks1464 Год назад +5

      त्या पेक्षा मराठी आणि इंग्रजी बोला विकास होईल

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Год назад

      @@sks1464 काही बाहेरचे आडवे येतात त्यासाठी मी कॉमेंट केली,मी सुद्धा कट्टर मराठी आहे.

    • @Logan-l7n
      @Logan-l7n Год назад

      पण येते कोणाला संस्कृत ? ती अगोदर अख्या देशाला शिकवावी लागेल hibrew प्रमाणे . जर तसा प्रयत्न केला तर बाम्हण्य, हिंदुत्व लादल जातयं अशी बोब मारली जाईल😂 . सो मला असं वाटतं की हींदी हीच देशाची common language बनू शकेल

    • @PK-qe2py
      @PK-qe2py Год назад +2

      @@Logan-l7n अस नाही.
      तुम्हाला हिंदी प्रेम का एवढे?😅

    • @Logan-l7n
      @Logan-l7n Год назад

      @@PK-qe2py हिंदी प्रेमाचा विषय नाही मी स्पष्ट व्यवहारीक मत मांडतो आहे . आज रोजी हींदी भाषा ही सहजगत्या कॉमन लँग्वेज होऊ शकते. कारण ती त्या स्थितीत पोचली आहे की ती सगळ्यांनाच साधारण कळते. आणी जर कॉमन लॅग्वेज नको असेल तर काय प्रत्येकाने 8-10 भारतीय भाषा शिकत बसायचं का? काही लोक कामानिमित्त दर महीन्याला वेगळ्या राज्यात असतात . त्यांनी काय आयुष्यभर भाषाच शिकत बसाव्यात .

  • @viveksambar3193
    @viveksambar3193 Год назад +1

    किती boring माणुस बोलावले आहेत.. ऐवढे मुद्दे अहेत.. ह्यांना किती किरकोळ बोलून संपवलं आहे सगळं..एवढ्या challenging वेळेस .. चांगला व्यक्ती बोलावलं पाहीजे

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Год назад +1

    Kay title ahe video ch? Ekdam faltu..... Bharat mahasatta hoil ch..... Knowing English doesn't give you wisdom....1970s cha dashka mdhe jagtoy ha😂😂

  • @nawadkarraj
    @nawadkarraj Год назад

    Negative😢

  • @swarmagna
    @swarmagna Год назад

    Very disappointing Guest …..

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Год назад

    retired malele contribution ky yanche pl young dont lession this😂

  • @vivekp2393
    @vivekp2393 Год назад

    Very flippant attitude

    • @pajtmvorvndeifneif
      @pajtmvorvndeifneif Год назад

      Mhanji ????

    • @vbrenavikar8438
      @vbrenavikar8438 Год назад

      ​@@pajtmvorvndeifneifम्हंजी अतिशय चपखल वृत्ती (पण ती कुणाची कुणास ठाऊक ? )

  • @shrikantdeshpande3167
    @shrikantdeshpande3167 Год назад

    काळे साहेब,फार जुनाट आणि नकारात्मक विचार वाटतात.

  • @JOSHII87
    @JOSHII87 Год назад

    Konala bolaval , bogus

  • @sankkham
    @sankkham Год назад +2

    😂up, bihar la vegle kara. Apoap india develop hoil 😂

  • @satishpatil1108
    @satishpatil1108 Год назад +1

    अतिशय बोर एपिसोड शुट केला आहे, मला अजिबात आवडला नाही

    • @hrushighadge
      @hrushighadge Год назад +1

      कुठला मुद्दा चुकला त्यांचा वास्तव मांडलाय .

    • @tusharkumbhar1215
      @tusharkumbhar1215 Год назад +2

      @@hrushighadge आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जन्मदिनानिमित्त...
      मराठीत व्यक्त न होण्याची कारणे
      अ) मराठी भैय्यांची कारणे
      (मराठी असून हिंदीचा पुळका असणारी माणसे)
      कारण १ :-*
      आपण भारत देशात राहतो, सर्वांना जोडून ठेवणारी एक समान भाषा असावी, मग ती ब्रिटिशांच्या इंग्रजी पेक्षा भारतीय हिंदी काय वाईट ? आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता वाढेल
      सत्य - जणू राष्ट्रीय पणाचा मक्ता फक्त महाराष्ट्रानेच घेतलाय , आणि फक्त एकाच भाषेमुळे राष्ट्रीय बाणा सिध्द होतो हे अजून हास्यास्पद.
      कारण२:-
      मराठी बोलताना हिंदी संवाद, उर्दू शायरी फेकणे स्टायलिश (भारी) वाटतं
      सत्य - मराठी मधीलचं वाक्प्रचार, म्हणी, अस्सल गावराण बोली वापरली तर अजून भारी वाटेल.
      कारण ३:-
      हिंदी राष्ट्रभाषा आहे, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या बिचाऱ्या, पोटार्थी, कष्टकरी लोकांना मराठी येत नाही म्हणून आपण त्यांच्याशी हिंदीत बोललं पाहिजे.
      सत्य - हिंदी आपल्या देशाची राष्ट्रभाषा नव्हती, नाहीये आणि होणार पण नाही.
      मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राज्यभाषा आहे, त्याचा पुरावा आहे.
      बाहेरून येणाऱ्या लोकांना मराठीची गरज कधी वाटेल, जर आपण मराठीची जाणीव करून दिली तरंच, मराठी शिवाय भागत असेल तर कोणाला मराठीची गरज वाटेल ?
      अस्सल भैय्यांची कारणे (परप्रांतीय लोक महाराष्ट्रात असलेले)
      - जर मराठी लोकंच मराठी बोलत नाहीत, मग आम्ही का बोलावी ?
      चार पिढया महाराष्ट्रात राहून, मराठी न बोलता आमचं भागतय तर का बोलायची मराठी ?
      - महाराष्ट्र सर्व भारतीयांचा आहे, फक्त मराठी लोकांचा नाही
      सत्य - संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी लोक हुतात्मा झाले, मराठी मातीने परप्रांतीयांना सामावून घेतले ते आमच्या मराठी लोकांच्या भोळ्याभाबड्या स्वभावामुळे, त्यामुळेच परप्रांतीय शिरजोर झाले.
      ज्या मराठी मातीने तुम्हाला नाव, पैसा मिळून दिला किमान तिच्याशी इमान राखण्यासाठी मराठी बोलावं इतकी किमान सद्बुद्धी लाभो.
      - अभिजित गंभीर
      #प्रकेअत्रे
      #मराठी
      #संयुक्तमहाराष्ट्र
      #मराठीबोलाचळवळ

  • @pajtmvorvndeifneif
    @pajtmvorvndeifneif Год назад

    Marathi bhashya lai boring ahe ...

    • @sks1464
      @sks1464 Год назад +1

      मग चिंधी प्रदेशात जा निगुन

  • @Bhaskar_karandikar
    @Bhaskar_karandikar Год назад

    कोपरानी आणि पायांनी शएकहॅंड करणं हे मागासले पण आहे. का हात जोडून नमस्कार म्हणणं? मागासलेला नसताना, मागासलेला म्हणवून घेणं हे आत्म घातकी आहे.