ऑक्टोबर छाटणी 10 दिवसाच्या पुढचे नियोजन गोळी घड , फेल फुट व डाऊनी रोगाचे नियंत्रण कसे करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • द्राक्षे पिकातील सर्वात महत्वाची छाटणी ऑकटोबर किंवा गोडी छाटणी या छाटणी मध्ये 10 दिवसानंतरचे नियोजन फायदेशीर उत्पादनासाठी सर्वात महत्वाचे असते कारण बागेचं एकसारखे फुटणे घडांचे जिरणे म्हणजे गोळी घड किंवा बाली घड त्याच बरोबर आंतरप्रवाही औषधाची फवारणी घेणेसाठीची सर्वात योग्य अवस्था कोणती का गरजेचे आहे 11 वा दिवसापासूनच आंतरप्रवाही औषधांची फवारणी तसेच फेल फुट काढण्या संदर्भात बागायतदारांच्या मनात असणाऱ्या अडचणी संदर्भात शेतकऱ्यांनी काय उपाययोजना करणे महत्वाचे आहे
    बऱ्याच वेळेला द्राक्षे बाग एकसारखी फुटत नाही बाग फुटायला मागे पुढे झाली का द्राक्षे पिकाच्या अवस्था एकावेळी येत नाहीत परिणामी स्टेजस मागे पुढे झाल्याने त्याचा परिणाम द्राक्षे पिकाच्या दर्जावर होतो व बाजारात द्राक्षेला चांगला दर मिळत नाही
    गोळी घड ही दुसरी समस्या यासाठी बाजारात खुप सारी औषध उपलब्ध आहेत मात्र वापसा व सूर्यप्रकाश या सारखे दुसरे कोणतेही चांगले औषध नाही
    फेल फुट चांगल्या वेळेत काढली तरच घड जिरत नाहीत फेल फुट काढण्यास लवकर किंवा उशीर झाला तर घड बळीवर जाणे किंवा जिरणे यासारखी समस्या येते
    आंतरप्रवाही औषधांच्या फवारणीमध्ये सुद्धा खुप समज व गैर समज आहेत यासाठीचे मार्गदर्शन डाऊनी रोगाच्या नियंत्रण करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे

Комментарии • 55