मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू | महिन्याला 3000 रुपये मिळणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना सुरू | महिन्याला 3000 रुपये मिळणार
    =============================
    व्हाट्सऍप ग्रुप :
    chat.whatsapp....
    ================================
    कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    ===========================
    ★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
    माझी लाडकी बहीण योजना प्ले-लिस्ट 👇
    • मुख्यमंत्री माझी लाडकी...
    नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
    • नमो शेतकरी सन्मान निधी...
    घरकुल योजना चालू अपडेट :
    • घरकुल योजना अपडेट
    घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
    • सर्व घरकुल योजना
    प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
    • 50000 रु. प्रोत्साहनपर...
    शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
    • शेतकरी कर्जमाफी योजना
    PM किसान योजना विडिओ Playlist
    • Pm किसान निधी योजना सर...
    संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
    • संजय गांधी निराधार योजना
    रेशनकार्ड संबंधित विडिओ
    • रेशनकार्ड विडिओ लिस्ट
    शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
    • नवीन आलेले - GR सर्व व...
    ===============================
    Follow: जॉईन करा 👇
    वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    टेलिग्राम
    : t.me/kailas_te...
    ट्विटर :
    Ka...
    चॅनेल सब्सस्क्राईब करा :
    RUclips : / kailastechnical
    ===============================
    #kailastechnical
    मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
    जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
    धन्यवाद !

Комментарии • 424

  • @GaneshGhandge-m8v
    @GaneshGhandge-m8v 21 день назад +46

    एवढ सगळ करू नका कोणतेही योजना बंद करा शेतकरी GST बंद करा. मालाला योग्य भाव द्या,आडत, हमाली ची योग्य दर एक क्विंटल ला कीती कपात करावे याचे निर्बध करा व योग्य ति कटाई करा.

  • @rajanipatil2558
    @rajanipatil2558 21 день назад +310

    एवढं करण्या पेक्षा शेतकऱ्या च्या माला ला कायम भाव ठेवा तुम्हाला पैसे वाटायची गरज नाही येणार 😊 सहमत असाल तर लाईक करा..👍😊

  • @shankertekale1840
    @shankertekale1840 21 день назад +73

    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव दया बाकी कशाची गरज नाही शेतकऱ्यांला

  • @kavitarahulpatil2811
    @kavitarahulpatil2811 21 день назад +131

    माझी सरकार ला एक नम्र विनंती आहे. 🙏🙏 की हे सगळं करण्या पेक्षा आम्हाला महिलांना सौरक्षण द्या नको आम्हांला तुमचे 1,500 ₹
    आणि द्यायच असेल तर त्या नराधमा ला भर चौकात फाशी द्या
    सहमत असाल तर Liek करा

    • @SandipChate-fl6tf
      @SandipChate-fl6tf 21 день назад +1

      गप की बाई गरीब महिलाच भल होतय

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas 21 день назад

      👌हो ताई

    • @krishnanimgade3819
      @krishnanimgade3819 18 дней назад

      Yes 😂🤣🦣🦣💪💪

    • @kavitarahulpatil2811
      @kavitarahulpatil2811 18 дней назад +1

      @@SandipChate-fl6tf कसल भलं होतंय हे फक्त 2/3 महिना देणार पैसे तर लागले लाल टपकायला त्या पेक्षा महिलांना कायम सौरक्षण द्या मग बघा कशा मागे उभ्या राहतील सरकार च्या मागे पैसे न देता पण बहिणी उभ्या राहु आम्ही.
      माफ करा पण हेच जर तुमच्या किव्हा आमच्यात घडलं तरीपण हेच बोलणार का की आम्हाला न्याय नको पैसे द्या त्या नराधमांला सोडा असं बोलणार आहात का 😡😡

    • @SandipChate-fl6tf
      @SandipChate-fl6tf 18 дней назад

      @@kavitarahulpatil2811 इतून मागच्या सरकार मधे बलात्कार झाले नाही का कोणतच सरकार काहीही करणार नाही मला माफ पण तुमच्या मुलाने किंवा पतीने वडीलांनी हा गुणा केला असता तर खरच त्याला शिक्षा (किंवा) कायदा करा असे सरकारला पाठिंबा देणार ⚔️की🤫आहे की नाही बाई अशी घटना कोनी करू नये वाईट आहे . मला 1 गोष्ट सागा की त्या महिला मडल आदेक्ष मेकप कुरून स्टाईलचे कपडे मेचीग बागडी साईडेल घालून बलात्कार झालेली मुलींची newj चेणलवर जातात😤🙁😡🤬 . त्यना खरेच दुःख झाले असेल असे तुम्हाला वाटते🧐. किंवा बलात्कार झालेली मुलीच्य आईला दुःख होते . बलात्कार झालेली मुलींची आई मेकप करून .....
      .. बोलण सोप आहे (ज्यच जलत त्यालाच कळत)😭

  • @DnyaneshwarAhire-qn6or
    @DnyaneshwarAhire-qn6or 18 дней назад +10

    ऐकनाथ शिदे साहेब खरा मुख्यमंत्री आहे गरीब शेकरीना करच भरपूर करत आहे

  • @KantaGojre
    @KantaGojre 21 день назад +77

    एकनाथ शिंदे साहेब शेतकराण सरसगट पिक विमा दया सर्व शेतकरीच विनती आहे

  • @user-qv3cd9yb2n
    @user-qv3cd9yb2n 21 день назад +21

    भारत स्वतंत्र झाल्यापासून शेतकऱ्यांना पैसे देण्याची ही पहिलीच पाळी आहे यशस्वी असा पहिलाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात लाभला आहे शिंदे साहेब तुमचे मनापासून धन्यवाद

  • @sunilmestri740
    @sunilmestri740 21 день назад +10

    आम्ही वयोवृद्ध रिक्षा ड्रायव्हर आहोत. सर्व वयोवृद्ध रिक्षा , टॅक्सी ड्रायव्हर साठी पेन्शन चालू करणे बाबत विचार करावा ही विनंती. वयाची 40 ते 50 वर्ष ज्यांनी रिक्षा चालवली त्यांचा विचार व्हावा

  • @anilshinde6850
    @anilshinde6850 21 день назад +26

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एवढं सगळं करण्यापेक्षा शेतकऱ्यांचा सरसकट सात बारा कोरा करा

    • @subashnalage1516
      @subashnalage1516 21 день назад +1

      काढले कशाला

    • @jaydavhale235
      @jaydavhale235 18 дней назад

      कर्ज काढणार तुम्ही आणि सरकारला म्हणता सरसकट माफ करा है कस होनार तुम्ही सांगा बर

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 21 день назад +7

    शिंदे साहेब आम्हा शेतकऱ्यांना लाडका शेतकरी नको ना लाडकी बहिण नको फक्त आमच्या शेती मालाला योग्य भाव दया आणि मग बघा शेतकरी काय आहे ते

  • @FulchandSawant
    @FulchandSawant 21 день назад +13

    शिंदे साहेब आपल्या योजना सगळ्या चांगल्या आहेत परंतु आम्हाला तीन वर्षाचा पिक विमा मिळाला नाही अनुदान मिळालेला नाही त्याचं काय आरक्षण कधी देणार

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u 21 день назад +7

    साहेब खुप चांगल निर्णय घैतला कर्ज़ माफी झाली धन्यवाद,

  • @devraopawar7910
    @devraopawar7910 21 день назад +34

    मुख्यमंत्री साहेब शेतकरी कर्जमाफी करा तरच विधानसभेला मतदान होते

  • @ramchandrachavan5902
    @ramchandrachavan5902 20 дней назад +14

    अगोदर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव द्या ह्या अशा योजना काढून शेतकऱ्यांना आळशी बनवू नका त्यापेक्षा पेक्षा कर्नाटक सरकार प्रमाणे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजना राबवा

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f 21 день назад +124

    एवढी शेतकऱ्याची काळजी आहे तर ज्या तारखेपासून शिंदे सरकार अस्तित्वात आलेले आहे तेव्हापासून या योजनेचे पैसे लागू करा

    • @GulabPatil-ip2uk
      @GulabPatil-ip2uk 21 день назад +12

      सर लाडक्या बहिणीच्या जा बँकेचे डॉक्युमेंट दिले असतील तिथेच पैसे पाठवा विनाकारण बहिणी सर्व बँका फिरत आहेत

    • @bharatraut7793
      @bharatraut7793 21 день назад +2

      Khar bolas dosta

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 21 день назад

      रसत्यावर बसुण भीक माग भिकारड्या 😂😂😂

    • @ratnakaruchadkar2465
      @ratnakaruchadkar2465 21 день назад +3

      ​अर्ज करतेवळेस बहिणींनी आधार लिंक असलेलेच खाते द्यायला हवे.... बहिणींना फिरत बसायची वेळ येणार नाही...🙏

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 20 дней назад +2

      तुझ्या बापावर ने राजकारण करून कीती वेळा शेतकरीवर्गात कीती मदत केली

  • @vikaskade3510
    @vikaskade3510 14 дней назад +2

    काही शेतकऱ्यांची पियम व नमोचे हप्ते बंद झालेले चालू करावे हि विनंती मुख्यमंत्री शिंदे यांना करतो धन्यवाद

  • @user-im9gs4pz9e
    @user-im9gs4pz9e 21 день назад +29

    शेतकऱ्यांच्या धान्याला हमी भाव द्या. पीक विमा कंपनी चे नियम सुटसुटीत, सोपे, साधे करावेत.पात्र असुनही खरीप पीक विमा 2023चा अद्याप मिळाला नाही. मराठा आरक्षण लटकवत ठेवले.

    • @rajushinde3838
      @rajushinde3838 21 день назад

      🎉

    • @prakashkhavane906
      @prakashkhavane906 17 дней назад

      अरे बाबांनो शेतमालाला हमी भाव आणि मराठा समाजाला आरक्षण लागू करा पंचवीस वर्षे तुम्हाला कोणीही हटवू शकणार नाही

  • @vishaljaware-rb6si
    @vishaljaware-rb6si 21 день назад +20

    काही नको साहेब कर्ज माफ करा आधी शिंदे साहेब शेतकर्याच 🙏🙏🙏

  • @ramdaspanchal4101
    @ramdaspanchal4101 21 день назад +11

    साहेब असे मुख्यमंत्री पहिल्यांदाच महाराष्ट्राला लाभले

  • @ganeshyeole8175
    @ganeshyeole8175 21 день назад +12

    श्री शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री आपली कामगिरी उत्कृष्ट आहे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत आहेत अजून चांगली प्रगती होणार महाराष्ट्र हा प्रगतीपथावर नंबर एक राहील धन्यवाद

  • @pravinrupnarayan
    @pravinrupnarayan 21 день назад +10

    शेतकऱ्यांना मालाला भाव आणि शेती कर्ज माफी सरसकट हवी . ह्या पोकळ योजना दिल्या पेक्षा ठोकळ योजना लागू करा .

    • @jaydavhale235
      @jaydavhale235 18 дней назад

      कर्जाची परतफेड होत नाही तर कर्ज काढु नये

  • @anandsanjaybandmajalgaon4018
    @anandsanjaybandmajalgaon4018 21 день назад +6

    मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा

  • @DevendraBaviskar-g3i
    @DevendraBaviskar-g3i 21 день назад +9

    कांद्याचा भाव कमी करू नका बाकी आम्ही तुमची काळजी करू

  • @BabashebJangle
    @BabashebJangle 19 дней назад +10

    आम्हाला लाडक्या भाऊ नको तो लाडकी बहीण नको शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव दिला पाहिजे

  • @nareshkadam987
    @nareshkadam987 18 дней назад +1

    मुख्यमंत्री साहेब मनापासुन आभार तुमचे.टिकाकारांना करुदया टिका त्यांच कामच आहे हे.पुन्हा कष्टकरी शेतकरी यांच्या अपार प्रेमापोटी अत्यंत आभारी आहे.धंण्यवाद.

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 21 день назад +19

    सोयाबीन कापसला भाव दिला तरच खरं आहे नाहीतर तुम्ही कितीही लाडक्या योजना काढा काही फायदा नाही

  • @madhukarjoshi7490
    @madhukarjoshi7490 16 дней назад +1

    सर्वांसाठी सगळ्या योजना EPs 95 penshanaransathi काय करणार ते सांगा.विधान सभा निवडणुका जवळ आल्या आहेत.आमच्या साठी काय तरी करा.आमचे आशीर्वाद लागतील.

  • @vishnuMule-tv5nu
    @vishnuMule-tv5nu 21 день назад +4

    शिंदे साहेब संपूर्ण कर्जमाफि करा

  • @AtharvaMavale-rx1ve
    @AtharvaMavale-rx1ve 21 день назад +6

    फक्त नियमित कर्जफेड चे पन्नास हजार प्रोत्साहन दे
    व्याजाने पैसे काढून नियमित कर्जफेड केलेलीच आहे

  • @RajendraBhatkar-vg8wc
    @RajendraBhatkar-vg8wc 18 дней назад +2

    मी आपला वीरोधक नाही .पण खरे काम करायचे असेल सर्व शेती मालाला योग्य भाव द्या. सर्व शेतकर्यांना सोलर पंप द्या. ज्यांच्या वीहीर,बोअर , शेत तळे, नदी ,नाले सर्व जुने कनेक्शन इलेक्ट्रीकल पंप काढून सोलर पंप द्या .पिकाला योग्य भाव द्या म्हणजे शेतकरी खरा सुखी होईल .

  • @dattatrayborate4547
    @dattatrayborate4547 12 дней назад +1

    पी एम किसान सन्मान योजना । न मो शेतकरी सन्मान योजना या योजनेप्रमाणे लाडका शेतकरी योजना सुरू करण्यात यावी

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 21 день назад +4

    सोयाबीन ला ६०००रुपये भाव हरबरा ७००० रुपये भाव द्या खताची औषधी किमती कमी करा केंद्र सरकारने बाहेर देशातुन खाद्य तेल आयात केले सोयाबीन भाव वाढतील कोठून मुख्यमंत्री

  • @NavnathKapse-nc7kc
    @NavnathKapse-nc7kc 15 дней назад +1

    माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एकच निवेदन आहे की भारतातील स्त्री सुरक्षित करा आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या काही देऊ नका दुसरे

  • @gajananchore7979
    @gajananchore7979 18 дней назад +2

    मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा व संपुर्ण सातबारा कोरा करा

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u 21 день назад +11

    खुप, चांगला निर्णय घैतला साहेब, धन्यवाद,लाडकी, बहीन पैसे भटलै,, साहेब दुशकाळ,भैटला,पी, एम किसान,भैटला, नमो शैतकरी हफ्ता भैटला, साहेब,आता,डबल, तुम्हीं, मुख्यमंत्री साहेब

  • @YogeshWanode
    @YogeshWanode 17 дней назад +1

    अर्धाया शेतकर्याला नमोचा हफ्ता मिऴालेच नाही दयाचे असेल तर सर्वाना दया काही हासते व 6:52 काही रडते

  • @mangaldasbhoi3120
    @mangaldasbhoi3120 2 дня назад

    आपले पैसे आणि आणि आम्हाला देतोय, द्यायचं असेल मालाला भाव कायम द्या, आम्हाला बाकी काही नाही, आणि खत बियाणे ला योग्य दे ना😥

  • @anitakaludonkar2086
    @anitakaludonkar2086 21 день назад +3

    असे सरकार आजपर्यंत ना आले ना येईन सगळ्यांना खुश करणारे सरकार म्हणून लोकांनी माणसाची कर्तबगारी पाहुन निववडून दयायचे आहे

  • @abhayab5826
    @abhayab5826 21 день назад +11

    मला आले, नमो आणि लाडक्या बहिणीचे पण 🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊3000+2000=5000

  • @pravinbagul6628
    @pravinbagul6628 19 дней назад +2

    विज बील माफ केले आहे परंतु लाईट राहतं नाही

  • @manikraodoke1390
    @manikraodoke1390 11 дней назад

    जेष्ठ नागरिक वय55 करावी कारण माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे तरी जेष्ठ नागरिक 60च्या ऐवजी 55करावे असे मी मंत्री साहेबांना विनंती करत आहे
    राम कृष्ण हरी

  • @PrlhadBochare
    @PrlhadBochare 6 дней назад

    नमो शेतकरी योजना चे पैसे 2021 च्या नवीन सातबारा वाल्याला कधी पैसे भेटणार याचा जार काढा शिंदे साहेब

  • @subhashgade2592
    @subhashgade2592 21 день назад +17

    सोलर पंप द्या फटाफट

  • @hajimalangsutar1541
    @hajimalangsutar1541 8 дней назад +1

    Ok thunks

  • @purvahiware1807
    @purvahiware1807 21 день назад +2

    शिंदे साहेब शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या कारण आम्ही काही वंचित राहिलो आहे

  • @AtharvaMavale-rx1ve
    @AtharvaMavale-rx1ve 21 день назад +10

    नियमित कर्जफेड पन्नास हजार कधी देणार रे
    नुसत्याच घोषणाच
    काय पोरखेळ चाललाय
    आस कुठ सरकार आत्यंतिक काय
    नियमित कर्जफेड पन्नास हजार दे रे
    भाऊ तळतळाट नको घेऊ
    नाहीतर फुकट जाणार सगळ

  • @shubhamgamer2355
    @shubhamgamer2355 13 дней назад +1

    Dhanjay le vicharte mukhyamantri kashale banla😂😂😂

  • @ramchandrasonawane8090
    @ramchandrasonawane8090 8 дней назад

    सोयाबीन कापसाला साडेबारा हजार रुपये भाव आणि उसाला चार हजार रुपये भाव आणि दुधाला पन्नास रुपये भाव मिळाला पाहिजे तरच तुम्ही ह्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी होणार

  • @shridharsapkal1704
    @shridharsapkal1704 21 день назад +4

    मुख्यमंत्री साहेब भूमिहीन मजूर वर्गासाठी योजना सुरू करा शेतकऱ्यांना भरपूर योजना सुरू केलेले आहेत तुम्ही भूमिहीन मजूर वर्गाचा सर्वे करा आणि भूमिहीन लोकांना मदत करा मजूर वर्ग उपाशी उटी राहून आपलं जीवन जगत आहे या मजूर वर्गाची भूमी लोकांची काळजी घ्या त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न मिटवा भूमिहीन लोकांना मदत करा शेतकऱ्यांना भरपूर मदत चालू आहे ही मुख्यमंत्री साहेब विनंती तुम्हाला

    • @anantakale3231
      @anantakale3231 21 день назад

      बाईला 8ते2 वाजेपर्यंत 300रु.मानसाला 2 वाजेपर्यंत 400 रु.शेतकरी देतो म्हनज महिन्याला जोडप्याला 15000 रु.देतो.आमची 10एकर जमीन देतो आम्हाला फक्तं 10000रू.महिना द्या.

  • @KashinathWarkari-di5vg
    @KashinathWarkari-di5vg 10 дней назад

    शेतक😢रयांना 3000 रु महीना जाहीर केलं तर मग भुमीहीन व्यक्तीला काय त्यांनी काय केलं त्यांच्या साठी काय लवकरात लवकर कळवा

  • @MaheshChavhan143
    @MaheshChavhan143 18 дней назад

    शेतकऱ्याचा पीक कर्ज सर्सगत माफ करा..

  • @surajjamnik6883
    @surajjamnik6883 15 дней назад

    Khup changle vichar ahet sir

  • @pr_mote
    @pr_mote 12 дней назад

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा साहेब

  • @Gaikwad649
    @Gaikwad649 21 день назад

    Good work all team

  • @ramlingkurlekar3932
    @ramlingkurlekar3932 20 дней назад +1

    एवढं करण्यापेक्षा शेतकऱ्याला 3000 रुपये खताची गोणी ना म्हणजे शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि औषधी महागकरा 1:47

  • @UMESHVARMA-ne5dq
    @UMESHVARMA-ne5dq 11 дней назад

    शेतकरी आणि व्यापारी चा माल जीएसटी बद करा

  • @mahadevshipalkar832
    @mahadevshipalkar832 21 день назад +1

    साहेब कज माफी नको शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या आणि सत्तेची खुर्ची घ्या

  • @haribhaubonde7186
    @haribhaubonde7186 21 день назад +1

    सहा हजारात काय येते..... बाजार करणार्यांना विचारा बे....... 😢😢😢

  • @deelip8622
    @deelip8622 21 день назад +2

    लाडका मजुर हि योजना सुद्धा चालु झाली पाहिजे

  • @balasahebbedre7485
    @balasahebbedre7485 21 день назад +1

    महाराष्ट्र तील सुशिक्षीत बेकार मुलांचे प्रश्न असेच लवकर सोडवा .
    मुख्यमंत्री साहे

  • @shivajigaikwad1904
    @shivajigaikwad1904 18 дней назад

    मे मध्ये सर्व झाले अजून सोलर नाही बसवले धाराशिव जुना सोलार पॅनल नाही बसवले शिवाजी गायकवाड

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 20 дней назад +1

    नोकर भरती विषयी आजचा सुशिक्षित बेरोजगार काहीच बोलत नाही😢

  • @rahulbangar4098
    @rahulbangar4098 16 дней назад

    माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या योजना राबवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार नाही त्यांच्या मालाला भाव आणि कर्जमाफी द्या

  • @Raju.M.Gawande
    @Raju.M.Gawande 20 дней назад

    श्री शिंदे साहेब माननीय मुख्यमंत्री शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफ 15000लाखा पर्यंत माफ करा नाहीतर काही खरं नाही

  • @mahadevvirka5389
    @mahadevvirka5389 13 дней назад

    जी जमीन आज पावसामुळे पडीक पडली आहे त्याच्यावर जरा लक्ष द्या माझे मायबापा सरकार.

    • @mahadevvirka5389
      @mahadevvirka5389 13 дней назад

      शेतात जाऊन पंचनामे करा.

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 19 дней назад +1

    इ.पिक.पाज्ञणी.शिवाय.7.12.वर.नोद.कशी.होणार

  • @nileshadkine1153
    @nileshadkine1153 21 день назад +1

    बाहेर देशातून खाद्य तेल विकत घेऊन आम्हा शेतकऱ्यांना कसा चांगला भाव मिळणार

  • @shivajiwayal7626
    @shivajiwayal7626 13 дней назад

    योग्य मालाला भाव द्याच बाकी द्यायची गरज नाही

  • @bhagvaandarade3141
    @bhagvaandarade3141 7 дней назад

    अहो साहेब लाडका भाऊ झाला लाडकी‌बहिण ‌झालि पचवि ते दाहृवि च काय

  • @appasahebgadikar9319
    @appasahebgadikar9319 18 дней назад

    शेती आहे त्यांचे सातबारा कोरा करता पण गरिबांना काय ??

  • @umamehar
    @umamehar 19 дней назад

    धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote9152 21 день назад +7

    शेतकरयाला पिकाच ऊत्पादन काढायला खर्च खूप आहेत तुम्ही निर्यात बंद आयत करून शेतीमाल चे भाव कमी करतात डिझेल. रासाानीक खत. गॅस. शेतीला लागणार इतर सामग्री GST .खूप वाढवले. शेतकरयाचा खर्च वाढलाय

  • @VaishaliTopale-sc5bt
    @VaishaliTopale-sc5bt 16 дней назад

    GST बंद करा ते नाही जमत असेल तर 18% 27% घेण्यापेक्षा 2% ते 3% घ्या ते भरपूर होईल सर्व जणते साठी

  • @kachrulate69
    @kachrulate69 19 дней назад

    आम्हाला नमो शेतकरी सन्मान योजना तुमची मिळत नाही साहेब

  • @bhushanpatil2775
    @bhushanpatil2775 8 дней назад

    बाकीचं सरकारने किती हमी भाव दिला ते माहिती आहे लोकांना

  • @nanasahebkhairnar4600
    @nanasahebkhairnar4600 18 дней назад

    आमचेच लुटले दाहा रूपये देतो एक रूपया जी एस टी खुप वाढवला शेती मालाला भाव नाही कुत्र्या सारखी परिस्थितीत केली शेतकऱ्याची बोबील टाकून शेतकऱ्याला कुत्र्या वाणी शेफुट हालवयला लावतात जे बावळट शेतकरी आसतील तेच बळी पडतील जय किसान

  • @DipikaMude-cg2nk
    @DipikaMude-cg2nk 21 день назад

    Chan sir sagata tumi

  • @dattraoyadav4222
    @dattraoyadav4222 13 дней назад

    शिंदे साहेब कुसुम सोलार योजना साठी लवकरात लवकर तयारी करा.

  • @sagarghodke9238
    @sagarghodke9238 13 дней назад

    कर्ज माफी करा फक्त

  • @ytyogita7013
    @ytyogita7013 21 день назад

    Good eknath shinde ji changla nirnay ghetla tumhi 👍👍👍🥰🥰🥰

  • @satishbhagat958
    @satishbhagat958 13 дней назад

    शिंदेसाहेब तुम्ही शेकर्यना खुप मदत् करता🎉🎉

  • @user-kj8nm1gn6t
    @user-kj8nm1gn6t 19 дней назад

    सिंदे.साहेब.आम्हाला.ऐकरुया.सुध्दा.मिळाला.नहि.

  • @prataptechtalk9812
    @prataptechtalk9812 19 дней назад +2

    आम्हाला ह्या पैकी काहीच नाही पाहीजे फक्त भारताला लवकरात लवकर हिंदूराष्ट्र घोषित करा सर्व शेतकरी आजन्म नरेंद्र मोदीं आणि तुमच्या पाठिशी राहतील जय सनातन जय हिंदूराष्ट्र

  • @1208AVUOY
    @1208AVUOY 21 день назад

    मी रामनाथ पांडुरंग शिंदे संगमनेर जि. अहमदनगर 3हाप्ते पेंडींग आहे जमा नाही झाले असे अचानक का बंद झालेत संगमनेर कृषी अधिकारी यांचेकडे केवायसी करून 1महिना झाला अजून ते काही दखल घेत नाही असे चालू हाप्ते बंद करून शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी

  • @babantekane6277
    @babantekane6277 16 дней назад

    2000.../आले आहेत सर ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santosh999yt
    @santosh999yt 21 день назад +1

    सोयाबीन ला भाव पन दाय

  • @VishnuRaut-b8v
    @VishnuRaut-b8v 8 дней назад

    ज्या च्या नावानं सातबारा नाही त्याला योजना द्यान

  • @rushikeshmasne5685
    @rushikeshmasne5685 19 дней назад

    लाडका‌ बेवडा पण योजना चालू करा

  • @GyanbaIchake
    @GyanbaIchake 13 дней назад

    भूमीहीन शेत मजुरांसाठी काहीतरी द्या

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 19 дней назад

    कशाला खोटे बोलतात एक रुपया सुधा आला नाही अजून शेतकर्‍यांच्या account मध्ये 😅

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 17 дней назад

    शेतकऱ्याने दोन वर्ष झाले ठिबक सिंचन साठी पैसे बाहेरून काढून ठिबक बसवलेले आहेत ,परंतु त्यांना अजून अनुदान मिळत नाही. पहिले ते अनुदान चालू करा ,मग शेतकऱ्यांच्या विषयी किती प्रेम आहे ते कळेल

  • @RajendraBhatkar-vg8wc
    @RajendraBhatkar-vg8wc 18 дней назад

    या वर्षी पाऊस खुप होत आहे पिकांची परिस्थिती फार बीकट आहे ओला दुष्काळ आहे . परिस्थिती पाहुनी पिकांना योग्य भाव द्या., कर्ज माफकरा, जुन्या नव्या सर्वांना सोलर पंप द्या .

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 18 дней назад

    साहेब शेतकऱ्यांना सर्व काही योजना द्या पण नाही नाही त्या मार्गाने वसुली करु नका बरं!!!! नाही तर ह्या हाताने द्यायचे व दुसऱ्या हाताने परत जमा करु नका!!!!!

  • @nikhilsontakke1732
    @nikhilsontakke1732 19 дней назад

    काय फायदा एवढ्या योजना काढून ती वेब साईट च चालू नाही राहत.

  • @nawazrazashaikh2593
    @nawazrazashaikh2593 18 дней назад

    शेतकऱ्यांचे सोयाबीन काढायला आलेत तुम्ही बाहेरून सोयाबीन आयात करतात आम्ही पिकविलेला सोयाबीन शेतकरी दळून खायाचे का महाराष्ट्राचा दुर्दैव आम्हाला असले राज्यकर्ते मिळाले

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 21 день назад +1

    Election जवळ आले कीच अनेक योजना का चालू केल्या का,? जेंव्हा cm झालात तेंव्हाच का नाही लागू केल्या कारण दयाल का,?आता जनता खूप हुशार झाली आहे हे प्रत्येक नेत्याने लक्षात घावे

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 21 день назад +7

    शेतकर्यांचे चार महिन्यांत दोन हजार थकवले आता महिन्याला तिन हजार देनार कसं देनार

  • @pandharinathsurawar
    @pandharinathsurawar 18 дней назад

    शेतकऱ्यांना मालाला भाव मिळाला पाहिजे नुसतं लाडका लाडकी सोडुन द्या आणि विहीरचे हप्ते आतापर्यंत मिळाले नाहीत बांध कामाचे पैसे आतापर्यंत मिळाले नाहीत तरी यांचे कडे लक्ष द्यावे ही विनंती करतो

  • @user-zl1rr3wk1o
    @user-zl1rr3wk1o 21 день назад

    1 नंबर

  • @rajurandive9976
    @rajurandive9976 21 день назад +1

    शिंदे.साहेब.बरोबर.आहे.आशा.योजन.राबवलया.तर.देश. श्री मत..होईल