वास्तव ! | Short flim on Shetkari | Short flim on Farmer | Farmer | shetkari |Poshinda

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2021
  • बळीराजा तू घेऊ नको फाशी, जग राहील तुझविन उपाशी..................🥺🤞🏻🤞🏻देवाने पृथ्वी निर्माण केली मग त्याच्या मनात विचार आला की, माझ्याप्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल? म्हणून मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला ...🥺
    शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. कारण त्याचे जमिनीशी असलेलं नातं हे मुल आणि आईप्रमाणे असतं. आजही आपल्या देशात शेतकरी जमिनीला आईचा दर्जा देतो आणि मेहनत करून तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे जगाचा खरा पोशिंदा शेतकरीच आहे. मात्र असं असूनही आपल्या देशात शेतकऱ्यांची अवस्था दयनिय आहे. जगाला आपल्या कष्टाने पोसणाऱ्या शेतकऱ्यावरच आत्महत्या करण्याची वेळ येते तेव्हा मन गलबलून जाते. खरंच सांगायला गेलं तर - ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल.....✌🏻🥺आपल्याला वर्तमानपत्रे, दूरदर्शन आदी साधनांद्वारे शेतकरी आत्महत्ये संबंधी बातमी कळते.त्यांची जर अशीच आत्महत्या होत गेली तर आपण अन्नास त्रासून जाऊ. महागाई गगनाला जाऊन भिडेल यातून अनेक समस्यांना तोंड फुटतील याचा विचार आपण आपल्या मनी आणला पाहिजे.शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी🥺 करून उपाशी पोटी दिवस आणि रात्र आपल्या शेतात राबराब राबतात परंतु त्याच्या पदरी पडते काय तर आत्महत्या व कर्जबाजारी.🥺 देशातीलं सरकारने याच्यावर लवकरात लवकर काही पर्याय शोधला पाहिजे.😔 त्यांच्या करिता सरकारमार्फत कमी दारात उत्तम दर्जाच्या बियाण्याची सोय उपलब्ध करण्यात आली पाहिजे.😔 तसेच, त्यांना सरकारी बैंक मार्फत कमी व्याजदरावर कर्ज दिल पहिजे. 😔या प्रकारे शेती उपयोगी जितक्या जास्त सुविधा त्यांना देणे सरकारला शक्य होत असतील तितक्या सुविधा त्यांनी दिल्या पाहिजात.😔😔इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे.......

Комментарии •