#भीमा_कोरेगाव
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #भीमा_कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले? | #BalasahebAmbedkar
कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर काय म्हणाले?
मित्रांनो, एक जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईमध्ये महार सैनिकांनी पेशव्यांचा पराभव केला हा विजय आज रोजी सुद्धा स्वाभिमानाचे प्रतीक बनलेला आहे.
या विजयाच्या सन्मानार्थ दरवर्षी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी देशभरातून लाखो लोक येतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशातील विविध भागातून लोकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
यंदाच्या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा विजयस्तंभाला मानवंदना दिली.
विजयस्तंभाला मानवंदना दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलो आहे. शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेली लोकांची उपस्थिती, हा संघर्ष जिवंत असल्याचे निदर्शक आहे. शारीरिक संघर्ष संपला असला तरी मानसिक संघर्ष अद्याप सुरूच आहे.” ते पुढे म्हणाले की, “ही चळवळ कायम सुरू राहिली पाहिजे. समाजातील विषमता आणि अमानुष वागणुकीच्या विरोधात हा लढा आहे. शौर्य दिनानिमित्त सरकार आपल्या परीने सुविधा पुरवते, मात्र त्या अपुऱ्या पडत आहेत. पुढील वर्षी या सुविधा अधिक चांगल्या होतील ही अपेक्षा आहे. बार्टी सारख्या संस्थांनी यामध्ये लक्ष घालावे.”
समाजातील विषमता संपविण्यासाठी जनतेने पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. तसेच परभणी आणि बीड येथील घटनांवर बोलताना ते म्हणाले की, “मानसिक बदल होत नसल्यामुळे समाजात अनेक घटनांचा उदय होत आहे. मानवतावादी लढा उभा करणाऱ्यांनी पुन्हा पुढे यावे म्हणजे या गोष्टींचा अंत होईल.”
Unity
जय भीम 🙏
Nice
धन्यवाद 🙏
जय भीम 🙏
खूप खूप छान सर
धन्यवाद,
जय भीम 🙏
कृपया share करा...
@@joshaba44100 Malvadkar Chay Ateekraman Kada 🤠 Government La Humble Request Or Else Serious Law and Order Problem Vaad Nerman Houu Shaktoa 📢🤠😎😩🧐
😡🤔📢📢📢📢📢✍️💦
Bhima Koregaon che yuddha he don rajvati madhe zalele yuddha nasun te samajik nyay ani samajik anyay hyanchya madhe zalele yuddha ahe.
Ani hya yuddhat samajik nyayacha vijay zala.
Jevha kevha samajik anyay hoil tevha samajik nyayachya bajune ladhun shaurya dakhavanyachi garaj ahe ani he yuddha tya karita nehmich margdarshak rahil.
Mhanunch hya yuddhala (Bhima Koregaon) ananya sadharan ass aitihasik mahatva ahe.
Absolutely correct,
Jai Bhim 🙏
Manuvadi always create alternative like two birth anniversary of chchtrapati Shivaji Maharaj, 26/1,Satyanarayan Pooja,etc..
बरोबर आहे 🙏
Always say" Bhhima koregaon,"not Goregaon bhima
Ok