पंढरपुरात मठ बांधला त्यांनाच प्रवेश नाकारला पालखी महामार्गावर वारकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • ज्यांनी पंढरपुरात मठ बांधला त्यांनाच प्रवेश नाकारल्यामुळे संत ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखी महामार्गावर वारकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
    पंढरपूर शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भाविक येत असतात त्यानिमित्ताने पंढरपूर शहरात अनेक वारकरी मंडळानी आपल्या सोयीसाठी मंगल कार्यालयाच्या नावाने मोठ मोठी मठेही बांधण्यात आली आहे, त्या अनुषंगाने इसबावी येथील श्रीराम जोशी मठ गेल्या 20 वर्षपूर्वी बांधण्यात आले असून यामध्ये काही ठराविक लोकांची विश्वस्त नेमण्यात आले,आता काही कारणास्तवाने जुन्या वारकरी विश्वस्त यांना काढून टाकत नवीन विश्वस्त तयार करण्याचे आले,ज्या जुन्या वारकरी भाविकांनी हा मठ उभा केला आज मात्र त्या वारकरी भाविकांना दमबाजी करत बाहेर काढण्यात आले किंवा आतमध्ये प्रवेश दिला नाही, यामुळे संतप्त वारकरी भाविकांनी जवळपास दोन तासाहून अधिक संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग पंढरपूर वाखरी हा रस्ता बंद करत रस्ता रोको करण्यात आले,यावेळी प्रसाशनही आले असता मठाचे प्रमुख यांना भेटले असून त्यांचेही ऐकून घेतलं नाही.. शेवटी पोलीस प्रशासन यांना बाहेर काढण्यात आलेल्या वारकरी भाविकांना समजूत घालत हा वाद मिटवण्यात आला.. बाहेर काढलेल्या वारकरी भाविकांनी जगन्नाथ महादेव मेहरे,पेशाने शिक्षक असलेले अभय नारायण वैतीनिलेश अशोक जोशी, चंद्रकांत मोरेश्वर खरे, कृष्णा यशवंत राऊत, बाळकृष्ण पाटील, यांच्यावर आरोप करत विश्वस्त निलेश जोशी चोर है चोर है असा नारा देखील करण्यात आला... एकंदरीत पाहता हा जोशी मंगल कार्यालएकचा काही भाग हे अतिक्रमण असल्याचे देखील सिद्ध झाले, असे असताना देखील नगरपालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेतली असल्याचे दिसून येते...
    #ppr_news #pandharpur_news #solapur_news #marathi_news
    Website- pprnews.in/
    Facebook Page: / ppr-news-104094362133

Комментарии • 4

  • @user-xs9qp3bf5s
    @user-xs9qp3bf5s Месяц назад +13

    तुम्ही मठ सोडून जाऊ नका नाहीतर परत तुमला जागा मिळणार नाही याची आताच नोंद घ्यावी लागेल ❤❤

  • @RushiJadhav-uy6zg
    @RushiJadhav-uy6zg Месяц назад +5

    मट्टा पदी वर कारवाई करण्यात

  • @ganpatidecorationdineshvai6628
    @ganpatidecorationdineshvai6628 Месяц назад +1

    विस्वस्त वर कारवाई करा

  • @ganpatidecorationdineshvai6628
    @ganpatidecorationdineshvai6628 Месяц назад +3

    जास्तीत जास्त हा व्हिडीओ share करून महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे पर्यंत पोहचवा.. 🙏