सुरगाणा तालुक्यातील आंबाेडे येथे दारुबंदीचा ठराव, महिलांची जनजागृती फेरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • आंबाेडे येथे दारुबंदीचा ठराव, महिलांची जनजागृती फेरी
    प्रतिनिधी |बोरगाव
    सुरगाणा तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायतीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत स्वय्यम सहाय्यता बचतगटाने दिलेल्या अर्जानुसार एकमताने दारुबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.
    ग्रामसभेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील महिलांनी एकत्र येऊन ग्रामसभेत दारुबंदीसाठी अर्ज सादर केला होता. यावेळी उपस्थित महिला व ग्रामस्थांनी याबाबत सविस्तर चर्चा करत एकमताने दारुबंदीचा प्रस्ताव मंजूर केला. याप्रसंगी महिलांनी गावात जात जनजागृती फेरी काढली. यात चारशे ते पाचशे महिला सहभागी झाल्या हाेत्या. यावेळी महिलांनी दारुबंदी झालीच पाहिजे, दारू सोडा संसार जोडा अशा घोषणा दिल्या. दारूमुळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अनेक गावातील तरुणांचे संसार उघड्यावर आल्याने महिलांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. ग्रामसभेप्रसंगी सरपंच राजेंद्र निकुळे, ग्रामसेवक गंणपत बागुल, आनंदी भोंडवे, मालती वाघमारे, प्रमिला दळवी, यशोदा गायकवाड, लताबाई हाडळ तसेच आंबोडे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सात गावातील व पाच पाड्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Комментарии • 3

  • @sanjayugale1548
    @sanjayugale1548 22 дня назад +1

    👍🌹

  • @Shivaji_21
    @Shivaji_21 22 дня назад

    चांगले पाऊल
    मटक्या सोबत,दारू पिनाऱ्यालापण फोडा.😁

  • @दिलीपभोये-झ2स

    दारू बंद करा बंद झाली पाहिजेल