Ugandan Mother | Pravin Mankar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • ४९।युगांडन आई, माउली
    मला वेदनेला स्पर्श करायचा होता. युगांडन आई होणं ही एक वेदना आहे असं मला वाटत होतं अन वाटत आहे. सत्य कदाचित माझ्या विचारापेक्षा वेगळं असेल. तसं असेल तर मला आनंद आहे.
    गर्भ धारणा झाल्यावर आणि प्रसूती झाल्यावर - बाई आई होते अन माऊलीची कुतरओढ होते असा माझा समज आहे. या समाजात पुरुष जबाबदारी घेत नाही असं दिसतं. विवाहबाह्य संबंध या देशात खूप आहे - त्यामुळे कुमारी माता हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. तसेच ' विभक्त ' होणे हे ही मोठ्या प्रमाणात.
    The objectives of the Mothers' union is -To uphold Christ's teaching on the nature of marriage and to promote its wider understanding.मदर्स युनिअन या संस्थेला शंभर वर्षे झाली - यातच सर्व काही आले. या विषयाला धार्मिक रंग आहे.
    १९९९ मध्ये HIV एड्स चा प्रादुर्भाव होता युगांडात. सगळीकडे जाहिराती - safe sex , use contraceptive - २०२४ मध्ये ह्या रोगाचं निर्मूलन झालेलं दिसतं.
    का कुणास ठाऊक - मी अशा आयांचे फोटो व्हिडीओ घेतले. वेदनेशी बोललो.

Комментарии •