#Knowrushi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Gorakhgad Fort History 2022...!
    गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव ‘गोरखगड’ पडले.
    गोरखगड किल्ला - [Gorakhgad Fort] २१३७ फूट उंची चा हा किल्ला गिरीदुर्गप्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील कर्जत डोंगररांगेतील हा किल्ला
    ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो . गोरखगड हा मुंबईकरां साठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. गोरखगड
    आणि मच्छिंद्रगडाला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे. गोरखगड आणि
    मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथी लघनदाट अभयारण्यामुळे. गोरखगडाच्या विस्तारही तसा मर्यादितच आहे. शहाजी
    राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते. मात्र येथे कोणत्या ही प्रकाराच्या लढाईचा उल्लेख नाही. शिवकालात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या
    प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे. पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जातांना गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. मर्यादित विस्तार असूनही
    मुबलक पाणी निवाऱ्याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे. गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणूनच याचे नाव ‘गो रखगड’ पडले.
    गोरखगड किल्ल्यावर पहाण्या सारखी ठिकाणे :
    दरवाज्यातून वर चढून गेल्यावर दोन तीन पाण्याची टाके लागतात. समोरची वाट पुन्हा थोड्या, चढणीवर घेऊन जाते. पुढे पायऱ्यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्या वर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो . समोरच प्रांगणाखाली भयाणदरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणार ‘मच्छिंद्रगड’ निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो. गुहेच्या आजुबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत.
    गोरखगडाच्या पठारावर एकूण चौदा पाण्याची टाके आहेत पण त्यापैकी गुहे जवळील पाण्याच्या टाक्यातील पाणी पिण्या योग्य आहे. गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्या शिवाय पूर्ण होतच नाही . गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे यावे. थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात ५० पायऱ्या खोदलेल्या आहेत. ५० पायऱ्यांच्या या मार्गावरून जरा जपूनच चालावे लागते. गडाचा माथा फारच लहान आहे. वर एक महादेवा चे मंदिर आहे. आणि समोरच एक नंदी आहे. माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटा जवळील जीवधन, आहुपेघात असा सर्व परिसर न्याहाळता येतो .
    गोरखगडगडावर जाण्याच्या वाटा -
    गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. मुरबाडहून ‘म्हसा ’ फाट्या मार्गे ‘धसई’ गावात यावे. येथून ‘दहेरी ’ पर्यंत खाजगी जीप अथवा एस.टी .ची सेवा उपलब्ध आहे. दहेरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टि क्षेपात येतात. लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो . मंदिराच्या मागच्या बाजूने जंगलात जाणारी पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्य दरवाज्या पाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात.
    मुरबाड-मिल्हे मार्गाने दहेरी गावी यावे. या गावातून अतिशय सोप्या वाटेने गडावर जाता येते. गोरखगडावर येण्यासाठी सिद्धगडा वरूनही एक वाट आहे. अनेक ट्रेकर्स सिद्धगड ते गोरखगड असा ट्रेक करतांना या वाटेचा उपयोग करतात. या वाटेवर एक घनदाट जंगल लागते. सिद्धगडावर जाण्यासाठी मुरबाड- नारिवली मार्गाने यावे. नारिवली हे पायथ्याचे गाव आहे. सिद्धगडावर एक रात्र मुक्काम करून पहाटेच सिद्धगड उतरावा . वाटेत असलेल्या ओढ्या बरोबर एक वाट जंगलात शिरते. या वाटेने थोडे उजवी कडे गेल्यावर आपण धबधब्या च्या वाटेला जाऊन मिळतो . या वाटेने वर आल्या वर आपण एका छोट्याश्या पठारावर येऊन पोहचतो . पठारावर महादेवाचं छोटे मंदिर आहे आणि दोन समाध्या देखील आहेत. येथून पुढे गेल्यावर लगणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. आपण कातळात खोदलेल्या दरवाज्या पाशी येऊन पोहचतो . या मार्गाने गाठण्यास तीन तास पुरतात.
    गडावर असलेल्या एका गुहेत २०-२५ जणांना आरामात राहता येते. जेवणाची सोय आपण स्वतः करावी . गडावर बारमाही पाण्याची टाके आहेत.
    गडावरजाण्यासाठी दहेरी मार्गे दोन तास लागतात. - Source - marathimati.com
    .
    .
    .
    .
    "Gorakhgad Fort is a fort located 24 km from Murbad, Thane district, of Maharashtra. This fort is an important fort in the Thane district. This fort was mainly used by sadhus or hermits for meditation. and also by local people of the surrounding village. It was also used to guard the ancient trade route passing through Naneghat."
    .
    Gorakhgad Unplanned Trek With Abhishek Badhe & Sarvesh More .
    - Follow Abhishek Badhe : ( / abhishek_badhe )
    - Follow Sarvesh More : ( / khiichiik )
    .
    ────Follow Knowrushi On Social Media─────
    ►Facebook : - / rushikesh.rokade21
    ►Twitter : - / knowrushi
    ►Instagram (Knowrushi) : - / knowrushi
    All business enquiries please email :
    ►rushikeshrokade1996@gmail.com
    ►www.chandrakorfilms.in
    ► teamchandrakor@gmail.com

Комментарии • 2