भडभुंजा पत्रकारांची भडवेगिरी आणि बरंच काही ! सत्यवेध माध्यम समूह | Satyavedh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • ‘ सध्याच्या पत्रकारितेविषयी न बोललेलेच बरं..! सगळेच विकाऊ आणि टाकाऊ. अगदी अग्रलेखसुध्दा सेंटिमीटरच्या भावात विकले जातायात.
    आज बोटावर मोजण्याइतकेच पत्रकार व संपादक निष्ठेने काम करताना दिसतात. बाकी सगळे एक तर शेठजींचे गुलाम आणि शेठजींचे संबंध हे त्यांच्या काळ्या धंद्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणून राजकारण्यांशी असतात.’ हा विचार दै. सामनाचे संपादक हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी २८ ऑक्टोबर २०१० रोजी मांडला. त्यांचे विचार आजही अगदी तंतोतंत लागू होतात. आज देशाच्या भावी आधारस्तंभांना वृत्तपत्रामध्ये अग्रलेख असतो हे तरी माहिती असते का? काय माहित ? हल्ली न्यूजपेपर विकत घेऊन किती तरुण पिढी वाचते हाच नेमका संशोधनाचा विषय.
    कोणतंही वृत्तपत्र हातात घेतंल की हल्ली विविध बातम्यांवर नजर जाते. पण वृत्तपत्राचा आत्मा असलेले अग्रलेख वाचणाऱ्यांची संख्या किती ? याचा अभ्यास करायला पाहिजे. अर्थात ही संख्या तशी कमीच आहे. कारण दुर्देवाने आजकाल आवर्जून अग्रलेख वाचावेत असे अग्रलेख लिहितात तरी किती जण ? असा प्रश्न चौफेर वाचकांना पडतो. आपल्याला फार काही वैचारिक सांगायचे आहे असा उदात्त हेतू ठेवून कपाळावर आठ्या पडतील असे अग्रलेखाचे शीर्षक द्यायचे आणि मग पांडित्यपूर्ण लेखन करायचे हा प्रकार हल्ली पहावयास मिळतो.
    अर्थात त्याचा देखील वाचक आहे परंतु सामान्यांना अग्रलेख वाचनाची गोडी लागेल या दृष्टीने विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत.
    #satyavedh #balasahebthackerayspeech #balasahebthackrey #patrakarita

Комментарии • 5

  • @archanamulay5379
    @archanamulay5379 10 дней назад +1

    हे ऐकून सध्याचे अग्रलेख वाचनीय नसले तरी तरुण पिढी वाचायला लागेल. 🎉

  • @anantjoshi9347
    @anantjoshi9347 10 дней назад +1

    सामना अग्रलेखात शब्द वापरताना ठाकरी भाषेत कोणतीही काटकसर केली जात नाही, अगदी मित्राचा सुद्धा उल्लेख आमची कमळाबाई असा केला जातो.

  • @AplaAwaj-sz2kx
    @AplaAwaj-sz2kx 8 дней назад

    सध्याचा सामना आणि संपादक उध्दव ठाकरे यांच्यावर एक व्हिडिओ करा.....

  • @santoshdesai-v2n
    @santoshdesai-v2n 8 дней назад

    Good

  • @yogeshkharade7173
    @yogeshkharade7173 9 дней назад

    आत्ताचा सामना काय सांगतो 😂