Shaktipeeth Mahamarg: कोल्हापूरात मोर्चा, धाराशिवला उपोषण Shaktipeeth Expressway ला विरोध का होतोय ?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #BolBhidu #ShaktipeethMahamarg #maharashtranews
कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात मंगळवारी १८ तारखेला लोकांची गर्दी जमली होती, कारण होतं एक मोर्चा. कोल्हापूरमधले नेते, कार्यकर्ते आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरातले शेतकरी या मोर्चासाठी एकवटले होते. हा मोर्चा होता, शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात. नागपूरमधून वर्धा ते सिंधुदुर्ग आणि पुढे गोवा असा पल्ला पार पाडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची चर्चा जवळपास दोन वर्षांपासून सुरु आहे. याला येणारा ८६ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्चही चर्चेचा विषय आहे, पण मागच्या काही दिवसांमध्ये शक्तीपीठ महामार्गाचा विषय तापला तो त्याला होणाऱ्या विरोधामुळं.
१२ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या जवळपास ८०० किलोमीटर लांबीच्या या महामार्गाची संकल्पना नेमकी आहे काय ? आणि या महामार्गाला शेतकरी, नागरिक आणि राजकीय नेते सुद्धा विरोध का करत आहेत ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/