परफेक्ट प्रमाणासहित पहिल्यांदाच इतका डिटेल व्हिडिओ| कैरीचे गोड लोणचे | Sweet Mango Pickle| मीठा आचार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • परफेक्ट प्रमाणासहित पहिल्यांदाच इतका डिटेल व्हिडिओ| कैरीचे गोड लोणचे | Sweet Mango Pickle| मीठा आचार
    #anitasfoodbasket
    #कैरीचेगोडलोणचे
    #kairichegodlonche
    #आमकामीठाआचार
    #sweetmangopickle
    #aamkameethaachar
    कैरीचे आंबट गोड लोणचे,कैरीचे लोणचे,कैरीचे गोड लोणचे,गूळ कैरीचे गोड लोणचे,कैरीचे गोड लोणचे रेसिपी मराठी,कच्चा कैरीचे लोणचे,कैरीचं गोड लोणचं,गोड लोणचे रेसिपी,कैरीचे लोणचे रेसिपी मराठी,खानदेशी गोड लोणचे,गोड लोणचे,कैरीचे उपवासाचे गोड लोणचे,गोड कैरीचे लोणचे रसिपी,लोणचे,कैरीचे आंबट गोड लोणचं,कैरीचे लोणचे आंबट गोड तिखट,कैरीचे आंबट गोड आणि तिखट लोणचे,गोड कैरीचे लोणचे रेसिपी,कैरी गुळाचे गोड लोणचे,बाळ कैरीचे लोणचे,कैरीचे झटपट लोणचे,आंब्याचे गोड लोणचे
    mango pickle,sweet mango pickle,raw mango pickle,mango pickle recipe,sweet and spicy mango pickle,instant mango pickle,sweet mango pickle recipe,sweet mango pickle with jaggery,how to make mango pickle,mango,sweet and sour mango pickle,pickle recipe,mango pickle with jaggery,pickle,sun dried sweet mango pickle,how to make sweet mango pickle,sweet mango pickle preparation,instant mango pickle recipe,mango pickle andhra style,green mango pickle
    कैरीचे गोड लोणचे -
    राजापुरी कैरी - 1 kg
    गुळ -1kg
    धने डाळ - 60 gm किंवा 1/2 कप
    बडीशोप डाळ - 20 gm किंवा 3 tbsp
    मेथी डाळ - 30 gm किंवा 1/4 कप
    मोहरी डाळ - 50 gm 1/3 कप
    हिंग - 1 tsp
    लवंग -12
    मिरी -12
    तेल - 80 ml किंवा अर्धा कपाला थोडे कमी
    काश्मिरी मिरची पावडर 1/4 कप
    हळद आणि मीठ लावण्यासाठी आणि नंतर घालण्यासाठी दोन्ही एकत्र प्रमाण दिले आहे.
    हळद - 2 tsp
    मीठ -3 tbsp
    Note -
    1.फोडींना हळद मीठ लावून झाल्यावर फोडी 24 तास तशाच झाकून ठेवाव्यात त्याला जेवढे पाणी सुटेल तेवढे सुटू द्यावे.
    याच्यामुळे लोणचे खराब होण्याची शक्यता कमी होते.
    2.लोणच्याच्या फोडी कधीही सावलीत किंवा त्यांच्या वाऱ्या खाली सुकवायच्या नाहीत. नाहीतर लोणच्याच्या फोडी कडक होतात.
    3. फोडणी करून झाल्यानंतर हळद आणि काश्मिरी मिरची पावडर नंतर घालावी म्हणजे लोणच्याचा रंग छान राहतो गरम तेलामुळे हळद आणि मिरची पावडर करपत नाही.
    4. कैरीच्या फोडींना लावण्यासाठी एकूण प्रमाणापैकी दोन टेबलस्पून मीठ आणि एक टीस्पून हळद घालायची आहे.
    5. उरलेले मीठ आणि हळद शेवटी मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे.
    6. एक किलो कैरी साठी एक किलो गूळ परफेक्ट आहे याच्यामुळे लोणच्याला रस सुद्धा चांगला होतो आणि गूळ हे प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे लोणचं टिकायला मदत होते.
    7. फोडणी करताना प्रमाणापेक्षा जास्त तेल गरम करू नये नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते.
    8. पारंपरिक पद्धतीने सर हे लोणचे तयार करून उन्हात ठेवले जाते पण असे केल्यास मिरची पावडर काळी होऊन लोणच्याचा रंग काळा होतो म्हणून मसाला मिक्स झाल्यानंतर गुळ विरघळण्याकरता लोणचे कोरड्या आणि थंड जागीच ठेवावे.
    9. दिलेले प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे याच्यामुळे अतिशय अप्रतिम चवीचे लोणचे तयार होते खाणाऱ्याने तुमची तारीफ केलीच पाहिजे. बिझनेस साठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे.
    10. या लोणच्यामध्ये गूळ पिवळसर रंगाचा घातला तर लोणच्याला रंग जास्त छान येतो.
    11. कैरीच्या फोडीतले पूर्ण पाणी निघाले आणि सुकले की कैरीचे लोणचे जास्त दिवस चांगले राहते. रूम टेंपरेचरला लोणचे ठेवणार असाल तर कैरीच्या फोडी सावलीत 12 ते 15 तास सुकवावेत.
    12. गुळ हे प्रिझर्वेटिव्ह आहे.
    .

Комментарии • 70

  • @deewar-mandirdialoguegavha7820
    @deewar-mandirdialoguegavha7820 5 месяцев назад

    ह्या गोड लोणच्याची यू टयूब वर सेम कॉपी केली आहे 10तासा पुर्वी

  • @AshwiniKurvinkop
    @AshwiniKurvinkop 5 месяцев назад +18

    ताई गोड लोणचे तुम्ही कधी दाखवतात त्याची वाट बघत होते.खुपच छान पध्दतीने तुम्ही सांगतात. तुमच्या रेशीपी म्हणजे सगळी कडुन कौतुकाचा वर्षाव होतो.पण त्याचे श्रेय मी तुम्हाला देते.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻😊
      🙏🏻 श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻

    • @ManikGhumare
      @ManikGhumare 5 месяцев назад

      ​@@anitasanghai2023🎉😢⁶😢😢😢😢 1:17

  • @shashijagdale7759
    @shashijagdale7759 2 месяца назад +1

    तुमच्या मेहनतीला सलाम ताई तुमचा चॅनेल खुप छान आहे खुप लवकर लाखो सब्स्करायबर होतील ... माझ्या शुभेच्छा 🙏

  • @manishashirote9039
    @manishashirote9039 4 месяца назад +2

    तुमच्या पद्धतीने आंब्याचे गोड लोणचे केले खूपच छान झाले घरात सर्वांनी खूप आवडले नंबर एक नाद खुळा लोणचं झाले आहे मसाल्याची सांगण्याची पद्धत खूप छान असल्याने करताना टेन्शन आले नाही छान सांगितल्यामुळे खूप खूप धन्यवाद धन्यवाद

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🏻
      Pl... Visit my another हमखास रेसिपीज.😊👍🏻

  • @manishashirote9039
    @manishashirote9039 5 месяцев назад +4

    गुजराती पद्धतीचे लोणचे खूपच छान पद्धतीने सांगितले आहे या लोणच्याची मी वाटच बघत होते धन्यवाद

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      धन्यवाद 😊🙏🏻
      Pl... Visit my another हमखास रेसिपी.😊👍🏻

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn 5 месяцев назад +5

    खूपच सुंदर लोणचे मस्तच 👌👌

  • @SudhirSamaya
    @SudhirSamaya 4 месяца назад +1

    आपण सांगितल्या प्रमाणे गोड लोणचे केले आहेआपण दिलेल्या टिप्स फॉलो केल्या. मस्त जमले लोणचे ❤ धन्यवाद ❤

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      रेसिपी वर विश्वास ठेवून करून पाहिल्याबद्दल आणि आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏🏻

  • @ranjanamogal8465
    @ranjanamogal8465 4 месяца назад +1

    आमच्या नणंद बाई जयश्री कांक्राळे ताई यांचेकडून तुमच्या बऱ्याच रेसिपीज एकल्या होत्या पण आज प्रत्यक्षात अनुभवले. कैरी चे लोणचे खूपच छान. धन्यवाद ताई......

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      रेसिपी वर विश्वास ठेवून पदार्थ करून बघितलात आणि आठवणीने फीडबॅक दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻😊. Pl... Visit my another हमखास रेसिपीज.😊👍🏻

  • @subodhkulkarni7963
    @subodhkulkarni7963 5 месяцев назад +2

    खूप छान खूप छान लोणचे दाखवणे त्याबद्दल धन्यवाद

  • @subodhkulkarni7963
    @subodhkulkarni7963 5 месяцев назад +1

    तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी लोणचे करून बघितले चव एकदम अप्रतिम झाली ताई खूप छान प्रमाण समजून सांगितले त्याबद्दल धन्यवाद

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      धन्यवाद🙏🏻😊
      आठवणीने फीडबॅक दिल्याबद्दल. 🙏🏻😊. Pl... Visit my another हमखास रेसिपीज.

  • @smitavilaskshirsagar55
    @smitavilaskshirsagar55 5 месяцев назад +3

    मी नक्की बनवून बघेन 😋

  • @sureshbokil6502
    @sureshbokil6502 5 месяцев назад +1

    सुंदर रेसिपी दाखवली त्. खरंच उत्तम रेसिपी पहायला मिळाली pl keep it up as I was waiting for such a tasty item which I have had eaten in my little age in Gujarathi family.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DroxEditz45
    @DroxEditz45 5 месяцев назад +1

    ख़ूपच मस्त मी करुन बघते

  • @pradnya12
    @pradnya12 5 месяцев назад +1

    Khup chan savistar dakhvla ahe tumhi... nakki karun baghen 👍

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      धन्यवाद 🙏🏻😊
      Waiting for your feedback 🙏🏻😊

  • @shailapimple647
    @shailapimple647 5 месяцев назад +1

    छानच लोणचे

  • @hemlatalade4150
    @hemlatalade4150 4 месяца назад +1

    Kairi thodi piwli yellow padleli chalte ka hoil ka lonche

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      लगेच करून संपवणार असाल पंधरा तीन आठवड्यात महिनाभरात फ्रीजमध्ये ठेवून संपवणार असाल तर चालेल. पण वर्षभरासाठी असेल तर नका करू. असे लोणचे टिकण्याची गॅरंटी कमी असते कारण कैरीमध्ये रस तयार झालेला असतो.
      असे लोणचे खराब झाल्यास श्रम आणि पैसे दोन्हीही वेस्ट होतात

  • @ashapande4394
    @ashapande4394 4 месяца назад +1

    खूप छान❤❤

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 5 месяцев назад +2

    छान रेसिपी धन्यवाद
    गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा ता. भिवंडी जिल्हा ठाणे.

  • @aparnathorat8675
    @aparnathorat8675 5 месяцев назад +1

    Khupch chan...nakki karun baghnar 👍

  • @sheelamogal
    @sheelamogal 4 месяца назад +1

    Khupach chhan. ....ashich paneer recipes pn dakhva plz

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      नक्की लवकरच 😊🙏🏻

  • @sangeetapatil7403
    @sangeetapatil7403 5 месяцев назад +1

    Maam tumachya sarv recipes khup chan ahet.sadarikaran chan 👌👌

  • @kalpanabhosale680
    @kalpanabhosale680 5 месяцев назад +1

    Nice post 👍👍🎉

  • @ruchakarnik9917
    @ruchakarnik9917 5 месяцев назад +2

    ताई तुमच्या सर्व receipes खूप छान आहेत. Please ताई सोलापूर शेंगा चटणी दाखवा.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      नक्की दाखवेन. 😊👍🏻

  • @vandananakhate-qy7wq
    @vandananakhate-qy7wq 5 месяцев назад +1

    खुप छान

  • @nihoor8471
    @nihoor8471 4 месяца назад +1

    Limbache tikhat lonche? Ahe

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      लवकरच शेअर करेन. 😊🙏🏻

  • @jyotioak8162
    @jyotioak8162 4 месяца назад +1

    मॅम बडिशोप नाही वापरली तर चालेल का प्लिज सांगा कारण बडिशेप चा वास आवडत नाही

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      या लोणच्याला बडीशेप घातली जाते.
      तुम्ही बडीशोप न घालता करून बघा आणि वाटीभर लोणच्यामध्ये बाजूला काढून बडीशेप घालून बघा आवडली तर सगळ्यात मिक्स करा नाही आवडली तर तसंच ठेवा.

  • @kshamakhandwekar1786
    @kshamakhandwekar1786 2 месяца назад +1

    सर्वांचे प्रमाण सांगावे😊

  • @pratibhathorat7006
    @pratibhathorat7006 5 месяцев назад +1

    खूप छान मसाला करणं जरा कठीण वाटत आहे

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      एकदम सोपा आहे.
      सगळा मसाला अर्धा ते पाऊण तासात तयार होतो. तुम्ही नवीन असाल तर पंधरा-वीस मिनिटं अजून जास्त लागतील.
      व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त आपल्याला सर्व मसाल्यांचा रवा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही करायला सुरुवात करा काही अडचण आल्यास नक्की विचारा.

  • @mangalagajare5207
    @mangalagajare5207 5 месяцев назад +2

    ताई मी लोणचे घातलेली काही महीन्यात
    लोनचयाचा कलर व चव ही बदलते काय कारण असेल

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      लोणच्याबद्दल तुम्ही डिटेल नाही सांगितलं.
      Pl...Check discription box.

  • @sandhyaraut1871
    @sandhyaraut1871 5 месяцев назад +1

    गूळ किती घ्याचा आहे

  • @SangitaAgarwal-bz9fr
    @SangitaAgarwal-bz9fr 5 месяцев назад +1

    मेथी मोहरी हींग बडिशेप तेल माप सागितले नाही कैरी किती1किलो

  • @zhingaru518
    @zhingaru518 4 месяца назад +2

    ऊनात ठेवावे का कळले नाही.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      हे लोणचे उन्हात ठेवायची गरज नाही.
      ज्या पद्धतीने हे लोणचं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने केल्यास लोणचे तयार झाल्यावर दोन ते तीन दिवसा नंतर लगेच लोणचे खाऊ शकता.

  • @SangeetaKale-lm7gs
    @SangeetaKale-lm7gs 4 месяца назад +1

    मेथीचे प्रमाण कळलं नाही

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 5 месяцев назад +1

    लोणच चमच्यावरंन टाकताना तार आलेली दिसत आहे.म्हणजे लोणच लवकर खराब होणार,गुळ घातला की तार येते

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  5 месяцев назад

      कैरीच्या फोडीतले आपण पूर्ण पाणी काढलेलं आहे. म्हणून त्या त्या गुळाला तार आली आहे . जर तार आली नसती तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते. गुळाला तार येणे म्हणजेच या लोणच्यात पाणी नाही ही खूण आहे.
      गुळ हे प्रिझर्वेटिव्ह चे काम करते.

  • @vandananakhate-qy7wq
    @vandananakhate-qy7wq 4 месяца назад

    FRach sunder .tikhat lonche pan dakhva,video sapdat nhiy

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  4 месяца назад

      धन्यवाद 🙏🏻😊. कैरीचे वर्षभर टिकणारे तिखट लोणचे -
      ruclips.net/video/7EalXMsN3sA/видео.htmlsi=jCH63pvr7YIGEV8i