रविवार सकाळ | RAVIWAR SAKAL | SATISH ALEKAR, AROHA WELANKAR, GAURI DESHPANDE | DIR. BANSIDHAR KINKAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 612

  • @kprafkaram6219
    @kprafkaram6219 9 месяцев назад +11

    कधी कधी शब्द अपुरे पडतात पण तरीही भावना मात्र ओथंबून वाहू लागतात तसा काही अनुभव तुमची ही कलाकृती पाहताना झाला. खास क्षण म्हणजे जेंव्हा आदित्य बोलतो की त्याची आजी त्याची बेस्ट फ्रेंड होती तिथे मी माझे अश्रू अवारू नाही शकलो कारण माझी आजी सुद्धा माझी बेस्ट फ्रेंड होती. अश्या कलाकृती पहिल्या की मन आणि विचार अगदी स्थिर आणि शांत होत. चांगला अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद. अश्याच उत्तम कलाकृती तुमच्या कडून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @Pradeepbharambe
    @Pradeepbharambe 8 месяцев назад +15

    काय बोलू. शंभरावं स्थळ जसं आवडलं तसंच हे पण खूप भावून गेलं. पुढेही असंच पहायला मिळेल हि आशा आहे. ❤🧡💛💚💙💜🤎

  • @Mrunalini...Hasabnis-wy4ru
    @Mrunalini...Hasabnis-wy4ru 9 месяцев назад +105

    कुठेही कंटाळवाणा नाही, कोणाचाही बटबटीत अभिनय नाही 🖒... अगदी सहज अभिनय 👌 .... कथानकही एकदम वेगळं पण औत्सुक्यपूर्ण .... सगळ्याच द्ष्टीने आटोपशीर ... खूप आवडला .... संपूर्ण समूहाचं अभिनंदन आणि हार्दीक शुभेच्छा 💐💐😊

  • @VidyaPhadke-c5c
    @VidyaPhadke-c5c Месяц назад +2

    खूप सुंदर मनाला भुरळ घालणारी आहे गोष्ट.

  • @shubhangiraj7154
    @shubhangiraj7154 9 месяцев назад +14

    खूपच सुंदर कथा....नात्याबद्दलची ओढ, मोठ्यांबद्दलचा मान......नम्रता ह्या गोष्टी कालबद्ध व्हायला लागल्यात ....पण ह्या कथेने खूप तरुण तरुणी काहीनाकाही चांगले संस्कार ह्यातून घेतील....मनाला शांती प्रसनता देणारी कथा..खूप खूप शुभेच्छा....👏👏👏👏😊

  • @promarathi01
    @promarathi01 10 месяцев назад +31

    अजून एक जबरदस्त विषय .. दिग्दर्शन, अभिनय, बॅकग्राऊंड म्युझिक, लिखाण सर्वच अप्रतिम ...
    आपण अजून अशांचं शॉर्ट फिल्म कराव्यात ... अनेक अनेक शुभेछया...
    शेवट तर एकदम गोड.... अंगावर आनंदित शहारे आले ...
    Best of Luck ... for upcoming Films for Aadi Nirmitee .... .
    👍👍👍👍👍👍

  • @Pramitप्रमिती
    @Pramitप्रमिती 9 месяцев назад +8

    शेवटचं जे गीत आहे... बंदिश...ती खूप सुंदर आहे.
    अतिशय आवडलं.
    ती कुणी गायिली आहे?पूर्ण ऐकता येईल का कुठे?
    प्लीज नक्की रिप्लाय द्या 🙏🏻
    खरोखर खूप भावली.

    • @aadinirmitee
      @aadinirmitee  9 месяцев назад +5

      या फिल्मसाठीच बनवलेली, नेहा देशपांडे यांनी गायली आहे.

  • @mayuramv.sankaran3030
    @mayuramv.sankaran3030 9 месяцев назад +5

    A wonderful cute film. I am a South indian but loved this film. Being born in Mumbai, fortunate to understand marathi.

  • @richakulkarni2022
    @richakulkarni2022 9 месяцев назад +14

    पुन्हा एक सुंदर हलकी फुलकी Short film...💚.. दोन्ही गाणी छान झालीत. ती नुस्ती बंदिश थोडी वाढवून, पुन्हा record करून separately टाकली तर खूप आवडेल लोकांना ऐकायला.. मराठी बंदिशचा प्रयोग आवडला. आळेकर सर भारी आहेत.. बाकी सर्वांचं कामही छान आहे.. शंभरावं स्थळ प्रमाणे या फिल्मचाही शेवट गंमत आणतो... बन्सी तुझं आणि टीमचं अभिनंदन! Producer Shah यांचंही अभिनंदन! 👏👏👏😊

    • @swatishATgmail
      @swatishATgmail 9 месяцев назад

      बंदिश once more !! थोडी वाढवून, पुन्हा record करून separately टाकली तर खूप आवडेल

  • @nehadeshpandekulkarni6002
    @nehadeshpandekulkarni6002 9 месяцев назад +19

    सहज सुंदर कलाकृती.. विशेषत: ठेहेराव पूर्ण कथेची मांडणी..नैसर्गिक, साधे सोपे संवाद लेखन,दिग्दर्शन आणि अभिनय..गाण्याचं structure समजून घेतानाची process , ते गातानाची process मी संपूर्ण enjoy केली ..माझ्यासाठी ह्या फिल्म ला संगीत देणे आणि गाणे ही एक अत्यंत सुखद संधी होती.❤
    माझ्या संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन🌹अशाच उत्कृष्ठं निखळ आनंद देणाऱ्या अनेकानेक कलाकृती बंन्सीधर किंकर यांच्याकडून होत राहोत हीच त्यांना दिलसे शुभेच्छा ! 🌹🌹🙏

    • @mrpramodshelar
      @mrpramodshelar 9 месяцев назад +3

      तुमचं गाण खूप सुरेख आणि मनमुग्ध करून गेलं ... अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत हि मनोकामना .... खूप शुभेच्छा आणि अभिनंदन ...

    • @nehadeshpandekulkarni6002
      @nehadeshpandekulkarni6002 9 месяцев назад +1

      @@mrpramodshelar Thank you ! 🙏

    • @navnathchavan4870
      @navnathchavan4870 9 месяцев назад

      Tai he song konta ahe an kuthe aaikayla melel

    • @meghadevidoshi2882
      @meghadevidoshi2882 9 месяцев назад +2

      Such a great artist you are! Both the songs in this shortfilm are just melodious!🙏

    • @nehadeshpandekulkarni6002
      @nehadeshpandekulkarni6002 9 месяцев назад

      ​@@meghadevidoshi2882 Dhanyawad 🙏

  • @damodardate7287
    @damodardate7287 Месяц назад

    खूप सुरेख...सगळ्यांचा अभिनय.. Kavya
    सुंदर आणि गायलंयही सुरेख.अश्या कथा बघायला नक्की आवडतील.

  • @hemantdeolekar11
    @hemantdeolekar11 10 месяцев назад +2

    अतिशय सुंदर फिल्म आहे। मर्म स्पर्शी कथा आणि संवाद। सर्वात अव्वल गोष्ट म्हणजे आलेकर सरांचा जीवंत अभिनय। एका विख्यात नाटककाराला अभिनय करता बघण रोमांचकारी आहे। किती हृदय स्पर्शी भावाभिनय, किती जीवंत संवाद पद्धति। सर्वांचाच अभिनय छान आहे। आदित्य, ईशा मनाला भिजवून गेले। लहान श्या भूमिकेत आजी नी कमालीची छाप सोडली।
    आजी आजोबा दोघानच्या मधल प्रेम पाहून भावुक च झालो।
    सिनेमा टीम ला अभिनंदन। बधाई।
    आलेकर स
    रांना खूब सादर सप्रेम अभिवादन

  • @amodkulkarni1367
    @amodkulkarni1367 9 месяцев назад +9

    बन्सीधर, खुप छान झाली आहे फिल्म. मनापासुन आवडली. कथा, पटकथा, संगीत, अभिनय, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजु सर्वच उत्तम दर्जाचे आहे. शंभरावे स्थळ नंतर नकळत एक अपेक्षा सेट झाली होती ती 101% पुर्ण झाली. कारमधे बसले असताना दोन पिढ्यामध्ये झालेला छान संवाद आणि अनपेक्षित पण गोड शेवट, या दोन गोष्टी विशेष उल्लेखनिय. तु असेच छान काम करत राहावेस आणि या क्षेत्रात भरपुर यश मिळवावेस ही शुभेच्छा❣️

    • @medhakelkar0191
      @medhakelkar0191 9 месяцев назад

      खूप सुरेख कथा आणि शेवट

  • @manipanse3843
    @manipanse3843 9 месяцев назад +6

    बन्सी तुझे खूप खूप अभिनंदन भारतीय नीतिमूल्ये घट्ट करणरी ही short film आहे

  • @atulgawli4425
    @atulgawli4425 2 месяца назад +1

    सुरेख अभिनय सतीश आळेकर सर

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 3 месяца назад +1

    अगदी सुंदर सहज अभिनय. कथा मस्त सवाद लेखन खुप सुंदर. ❤

  • @chitramarathe7619
    @chitramarathe7619 9 месяцев назад +3

    वा........सहजसुंदर...... सुमधुर संगीत...... खरंच हरपले भान....बन्सीधर...... खूप उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!!!

  • @sachinwagh6474
    @sachinwagh6474 2 месяца назад

    Superb.... superb.....❤
    काय बोलावं दिग्दर्शन आणि लेखकाविषयी
    ज्यांनी बघितली नाही त्यांचीच दया करावी इतकच
    जेष्ठ कलाकारांचा अभिनय नथमस्तक करणारा

  • @nehadeshpande7555
    @nehadeshpande7555 9 месяцев назад +7

    खूपच छान बन्सी👍 पुन्हा एकदा वेगळा विषय ..सर्व कलाकारांचा सहज सुंदर अभिनय .... अप्रतिम आणि मधुर गाणं ...अनपेक्षित आणि गोड शेवट 👌 परत परत बघावी अशी झाली आहे फिल्म👍
    तुझं खूप खूप अभिनंदन बन्सी आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !💐💐

  • @pritiamonkar6421
    @pritiamonkar6421 9 месяцев назад +5

    खूप सुंदर विषय,सुंदर मांडणी,सुंदर मनाला भावेल असच कथानक ,कुठेही भापकेपणा नाही.खूप छान अभिनय.जाग्यावर खिळवून ठेवेल अशीच फिल्म आहे.दोन आजोबा नातू नात यांच्यातलं खूप हळूवार नातं .यात चित्रित केले आहे.धन्यवाद अशी फिल्म काढल्याबद्दल❤❤❤

  • @roopanagaonkar7445
    @roopanagaonkar7445 9 месяцев назад +3

    अतिशय सुंदर व उत्तम संकल्पना . प्रत्येक गोष्टीतला मनाला भावणारा साधेपणा बघणाऱ्याच्या मनाची पकड घेतो.बंदीश फारच छान ❤.
    तुला सांगावस वाटत की तुझ्या short films हटके व खूप छान आहेत.तू विषय फारच छान हाताळु शकतोस...
    तुझ्या पुढील project साठी खूप खूप शुभेच्छा 🥇🥇🥇🏆🏆🏆
    Proud of you 👏👏👍

  • @shraddhanivande8816
    @shraddhanivande8816 9 месяцев назад +5

    छोटीशी पण सुंदर कथा, सादरीकरण पण एकदम मस्त, कुठेही रटाळ झाले नाही, शेवट तर एकदमच गोड👌👌👏🏻

  • @SubhashNaikPune
    @SubhashNaikPune 9 месяцев назад +8

    क्या बात है! सतीश आळेकर... किती सहजसुंदर अभिनय!! ❤

  • @unmeshmore6524
    @unmeshmore6524 8 месяцев назад

    अप्रतिम लघुपट.... नात्यांमधील / दोन पिढ्यांमधील संस्कार दर्शविणारा साधा, सरळ कथाविषय . आळेकरजींचा सहज सुंदर अभिनय.... अभिनय वाटतच नाही...सर्व कलाकारांचा वावर एकदम उत्कृष्ट.... दिग्दर्शन , कॅमेरा , संगीत उत्तम... शेवट झक्कास.... Keep it up... शुभेच्छा....

  • @aditioak2683
    @aditioak2683 9 месяцев назад +2

    अप्रतिम... खूपच बढीया...
    Casting perfect.. Performance superb..
    Direction मस्त..
    गायन नि तबला वादन खूप छान..
    छान, हळुवार, अलगद , हलके हलके उलगडून दाखवणारे नाट्य, खरा अभिनय..
    मातब्बर नट Satish ji , आरोह आणि गौरी ... अभिनय अप्रतिम
    खूप च आवडले..
    सर्वाना dhanyavaad..
    🙏🙏

  • @veenagokhale3041
    @veenagokhale3041 9 месяцев назад +1

    नितांतसुंदर. सर्वच अंगांनी उत्कृष्ठ. निखळ आनंददायी. सुरवातीपासूनच उत्सुकतेने खिळवुन ठेवणारी. शेवट तर.लाजवाब. खूप खूप शुभेच्छा तुम्हां सर्वांना . अगदी मनापासून

  • @meenakinkar7127
    @meenakinkar7127 9 месяцев назад +5

    अप्रतीम. खूप दिवसांनी छान शॉर्ट फिल्म पाहायला मिळाली. रे मना खूप छान

  • @swatiamalnerkar4039
    @swatiamalnerkar4039 9 месяцев назад

    सुरेख शांत सहज उलगडत जाणारे प्रसंग ! खूप दिवसांनी एक निर्मळ लघुपट बघायला मिळाला.

  • @kapiljoshi2793
    @kapiljoshi2793 10 месяцев назад +10

    खुप Natural acting Aaroh आणि सतीश जीं ची... end was a surprize... 😅

  • @swarmagna
    @swarmagna 6 месяцев назад +2

    Considering what we see in Short films this one is way above standard….Everyone has a potential to become a real genuine kalakar in this Business !Opening … two friends talking on terrace needs MORE work … to suggest Hero’s character… Satishji is absolutely excellent in this Role …. His “wife “ actress is also very good 👍 ! Bansidhar K has done an Excellent job of writing & Directing !

  • @surekhajamdade2627
    @surekhajamdade2627 9 месяцев назад +2

    अतिशय सुंदर ...मनाला भावेल असे कथानक , सुंदर अभिनय

  • @nandkumarkulkarni1789
    @nandkumarkulkarni1789 10 месяцев назад +2

    बन्सीधर... फिल्म पाहिली रे आत्ताच.. सुंदर केली आहे. व्वा.. मस्तच जमलंय सगळंच. तू लिहिलेली गाणी पण उत्तम झाली आहेत. फिल्म नक्कीच हिट होणार यात शंका नाही..
    हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. 💐

  • @rohitdeshpande8563
    @rohitdeshpande8563 9 месяцев назад +3

    खूपच छान. अतिशय सुंदर. तुमच्या सगळ्या टीम चे खूप खूप अभिनंदन. शंभराव स्थळ प्रमाणेच ही देखील एक उत्कृष्ट कलाकृती.
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 👍🙏

  • @jayshreemahesh6566
    @jayshreemahesh6566 8 месяцев назад +1

    खूपच सुंदर कलाकृती
    शेवट अनपेक्षित आणि गोड
    संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन

  • @rambhauneurgaonkar1283
    @rambhauneurgaonkar1283 9 месяцев назад +2

    सुंदर लेखन समाजातील दोन्ही पिढ्यांच्या प्रश्र्नांचे उत्कृष्ट मांडणी. श्री सतीश आळेकर यांचा सहज व सुंदर अभिनय तसेच नवीन पिढीतील आदित्य आणि इशाचा अभिनय खूप आवडला.आपल्या मराठीं भाषेत एक सुंदर "म्हण " आहे " दुधापेक्षा दुधावरील सायीवर जास्त प्रेम असते. " यामुळे आजोबा - नातवंडे यांची मने आणि प्रश्न एकमेकांना जास्ती लवकर समजतात. पडद्यावरील कलाकार व पडद्या मागील कलाकारांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

  • @madhurikulk
    @madhurikulk 10 месяцев назад +3

    खूपच अप्रतीम फिल्म...सगळ्यांची काम उत्तम.. मनाला भिडते अशी फिल्म..आपले संस्कार जपणारी फिल्म..श्री बंसिधर किंकर आणि तुमची टीम अशाच सुंदर फिल्मस बनवत जा आवडेल खूप बघायला..अभिनंदन

  • @ashwinikamat2616
    @ashwinikamat2616 9 месяцев назад +1

    Shevat anpekshit, ekdam aavdla.Sundar film.Sarvanche abhinandan.Love from Goa.

  • @sarangag
    @sarangag 10 месяцев назад +8

    While reaching the end I wondered why it was an incomplete proposal and story but at the end, it was wonderfully done. Subtitles I listened to it 3 times.😀🥰😇

  • @jayanthipai715
    @jayanthipai715 Месяц назад

    Faarach sundar
    Kitti haluvaar pane shabdanchi ani vishayaachi maandani 💖

  • @shilpaketkar8444
    @shilpaketkar8444 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर मांडणी... उत्कृष्ट अभिनय सगळ्यांचे, फार छान ❤

  • @jayatakle4421
    @jayatakle4421 10 месяцев назад +1

    खूपच मस्त short film, आजोबांनी शेवटी जेंव्हा ही माझी नात बरका, हे गुपित फोडल तेंव्हा नकळत चेहऱ्यावर समाधानाने हास्य येत ...खूप मस्त शांत सादरीकरण....सकाळ मस्त च

  • @madhavghalsasi6842
    @madhavghalsasi6842 9 месяцев назад +1

    सहज अभिनय, कुठेही कंटाळा न येणारे संवाद व कथानक. सुंदर दिग्दर्शन. ….. अभिनंदन व शुभेच्छा

  • @ShaddhaManerkar
    @ShaddhaManerkar 9 месяцев назад +1

    किती सुंदर सकाळ परत जगावस वाटल अश्याच सुंदर सकाळ देत रहा जेणे करून त्या पहात जगावस वाटेल खुप खुप आशिर्वाद

  • @alkatorsekar4997
    @alkatorsekar4997 8 месяцев назад +6

    फारच छान वाटली गोष्ट. सर्वांची कामे फार उत्तम! असे लघुपट बघायला आनंद वाटतो…आभारी 😊

  • @chitrasaralkar5679
    @chitrasaralkar5679 7 месяцев назад

    खूप छान .सरांच्या तोंडचे संवाद ऐकतांना खूप मजा आली .शेवट पण छान केलाय .

  • @avinashapte188
    @avinashapte188 9 месяцев назад

    वास्तव वाटणारी कथा.सुंदर अभिनय.
    सार्थ शीर्षक.छोटेसे अर्थपूर्ण,सुस्वर गीत. शेवट अनपेक्षित पण सुखद.
    टाळ्या थांबू नयेत अशी लघुफीत 💐💐💐💐👏👏👏👏
    .

  • @jayak3802
    @jayak3802 Месяц назад

    अतिशय सुंदर, हळुवार कलाकृती🎉❤

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan 2 месяца назад

    प्रांजळ सात्विक प्रगल्भतेचे सादरीकरण ❤❤❤❤❤

  • @sudhirdesai9936
    @sudhirdesai9936 9 месяцев назад +6

    सहजसुंदर अभिनय, सतीश अळेकरांसारखे दिग्गज नटवर्य पाहून मन तृप्त झाले❤❤

  • @ranjanaashok5610
    @ranjanaashok5610 8 месяцев назад +1

    खरेच छान वाटली ही फिल्म. साधी सरळ तरीही हृदयस्पर्शी

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 8 месяцев назад

    कथानक खुप आवडले.पुन्हां पुन्हा बघण्यासारखे फिल्म.अभिनंदन सर्वांचे.

  • @umeshdande
    @umeshdande 8 месяцев назад +1

    खूप छान, सहज सोप्या भाषा , सहज flow होत जाणारी स्टोरी , सहज केलेली acting.
    खूप छान

  • @medhaathavale2539
    @medhaathavale2539 8 месяцев назад

    अतिशय सुंदर..़ओघवते कथानक..मन प्रसन्न करणारा निर्झर जसा खळाळत पुढे ओघवत जातो व आजुबाजूचा परिसर संपन्न होतो .. तद्वत मन तरल झाले..अजूनही असे सुसंस्कार जिवंत आहेत..सुंदर कथा,सुंदर अभिनय,सुंदर संगीत, आटोपशीर सुंदर अनुभव, मन सुखावले..👌💐💖

  • @83manasi
    @83manasi 9 месяцев назад +1

    सुंदर मनमोहक शॉर्टफिल्म! सहज अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि सुश्राव्य संगीत. शेवटची बंदिश अप्रतिम! ❤🎉

  • @dattatrayakathare5815
    @dattatrayakathare5815 9 месяцев назад +5

    अगदी वास्तववादी, आणि मनाला हात घालणारी वास्तव फिल्म आहे .थोडक्यात मनाला भावणारी फिल्म आहे

  • @snehchaya4910
    @snehchaya4910 6 месяцев назад +1

    ❤️ मनाला सुगंधित केले या लघुचित्रपटाने. 👌🏼👌🏼🌹

  • @arvindbhatankar6050
    @arvindbhatankar6050 7 месяцев назад

    सुंदर! अन् शेवटही शॉर्ट फिल्मला साजेसा! सर्वांचे अभिनय खूपच छान! दिग्दर्शनही अप्रतिम.

  • @Viinodjojarey
    @Viinodjojarey 21 день назад

    Khup Chan... Kinkar Sir Kamal aahe tumchi

  • @nandadeshmukh1696
    @nandadeshmukh1696 2 месяца назад

    खरच सुंदर कलाकृती आळेकर सर तर प्रश्नच नाही पण आरोह किती सहज वाटला आणि क्लायमॅक्स च सरप्राईज अप्रतिम

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 9 месяцев назад

    सुंदर ,हलका फुलका विषय ,नाजुकपणे हाताळलाय.उत्तम अभिनय सर्वांचा.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 3 месяца назад

    खुप छान लघुपट पहायला मिळाला असेच छान संदेश देणारे लघुपट करत रहा

  • @nileshpatil821
    @nileshpatil821 5 месяцев назад

    निशब्द करून टाकल ह्या सुंदर कलाकृतींने.. Aadi Nirmittee ने बनवलेल्या दोन्ही short films अप्रतिम आहेत.. कधी एके काळी मी देखील college च्या नाटकात काम करायचो... college चा शाहरुख म्हणायचे मला तेव्हा ज्या rhythm च्या फिल्म्स बनवेल मी पुढे असे मला वाटायचं अगदी तेच Aadi Nirmitee बनवतात.. असाच सुंदर काम करत रहा.. God may bless you with lot of success.

  • @rimalanjekar4299
    @rimalanjekar4299 9 месяцев назад

    अतिशय नाविन्यपूर्ण कथानक ,सादरीकरण उत्तम ,सस्पेन्स छान ,दोन पिढ्यांचे हितगुज मस्तच ,असाच सर्वांशी सुसंवाद होणे अपेक्षित असते .💐👌💐👍💐❤😊🙏

  • @tejassutar.75
    @tejassutar.75 9 месяцев назад +5

    मी अजूनही विसरलो नाही श्यामची आई...❤❤ गौरी देशपांडे....🤍🤍अप्रतिम अभिनय...🤌👌.👀

  • @jayantsane986
    @jayantsane986 9 месяцев назад

    सुंदर चटपटीत. सतीश आळेकर बेस्टच. पण नवीन कलाकार पण अप्रतीम अभिनय.
    रे मना.. आणि हरपले भान बंदिशी उत्तम

  • @dhanashridaptardar3121
    @dhanashridaptardar3121 8 месяцев назад

    खूप सुरेख शॉर्ट फिल्म. सगळ्यांची कामं अप्रतिम झाली आहेत.

  • @vidyavaidya9928
    @vidyavaidya9928 10 месяцев назад +2

    खुपचं सुंदर फिल्म...
    मनाला भिडते...
    सर्वांचीच कामं अप्रतिम...
    आजोबा आणि नातवंड हे नातं छानच असतं...

  • @madhurakulkarni699
    @madhurakulkarni699 9 месяцев назад

    मस्त, छोटीशी गोष्ट, मांडणी सादरीकरण उत्तम, सगळ्यांनी आपापल्या परीने खुप छान काम केले आहे 🎉

  • @ashwinikalantre601
    @ashwinikalantre601 7 месяцев назад

    खूपच सुंदर,शेवट छान, आजोबा नातीचे नाते सुंदर

  • @sujatasheth
    @sujatasheth 2 месяца назад

    khooooooooop sunder. Saglyancha acting A one. Best was Aajoba.

  • @aadityagaming9886
    @aadityagaming9886 2 месяца назад

    अप्रतिम , गाणी सुंदर झालीत.

  • @rubypilmenraj8572
    @rubypilmenraj8572 10 месяцев назад +2

    खुप सुंदर आहे.. क्वचितच असे सुंदर काही तरी बघायला, मिळते, जे सत्य आहे, काही तरी विश्वास ठेवू शकत नाही असे नाहि.. धन्यवाद बर का....😊😊

  • @prajnyapathare1922
    @prajnyapathare1922 3 месяца назад

    शेवट आणि शेवटचे गाणे अथॅपुणॅ.❤

  • @anuyamodak6326
    @anuyamodak6326 9 месяцев назад +2

    सहज सुंदर अभिनय...रे मना..खूप छान

  • @kiransav3431
    @kiransav3431 5 месяцев назад

    खूप सुंदर , एक निर्मळ लाहुपट.. असेच पुढे पाहायला आवडेल .....
    Good job Team

  • @Behappy33318
    @Behappy33318 5 месяцев назад

    The great Satish Alekar!!! His playwright Mahapur is a Gem!!

  • @madhavidesai5420
    @madhavidesai5420 Месяц назад

    खूपच सुंदर... शेवट तर अती गोड❤

  • @vaishalimhetras6672
    @vaishalimhetras6672 10 месяцев назад +5

    अतिशय सुंदर फिल्म...सगळ्यांचा अभिनय खूपच छान झाला आहे...रे मना ...फार छान..
    अभिनंदन सगळ्या टीमचे 💐💐

  • @mangalgandhi3525
    @mangalgandhi3525 8 месяцев назад

    Khup sundar netaki mandani....
    Sundar vyaktata vyaktata...
    💐💐💐💐

  • @vibhakarpatil5806
    @vibhakarpatil5806 9 месяцев назад +1

    अतिशय सुंदर आणि भावना प्रधान .मनाला भिडणारी व डोळ्यांना सुखवणारी अभिनय संपन्न शॉर्टफिल्म बनवणा-या चमूचे मनापासून अभिनंदन. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .

  • @viptalkies9944
    @viptalkies9944 5 месяцев назад

    खूप खूप सुंदर. उत्तम कल्पना , सर्वोत्तम अभिनय आणि अत्यंत रियलिस्टिक कलाकृती बघितल्याचं प्रत्यय आला. अनेक शुभेच्छा.

  • @subramaniamsharma8060
    @subramaniamsharma8060 9 месяцев назад +1

    Absolutely splendid performances!!!

  • @dr.sailikhandekar3159
    @dr.sailikhandekar3159 9 месяцев назад

    खूप छान कलाकृती, शेवट तर फारच गोड...

  • @atisakha699
    @atisakha699 5 месяцев назад

    Khup chan film ahe , ❤ ajoba mla khup awadle , mast💖💖

  • @vijaysabnis9155
    @vijaysabnis9155 10 месяцев назад

    दोन पिढ्या, एक आजी आजोबांची आणि एक त्यांच्या तरूण नातवंडांची. त्या त्या पिढीची जीवनमुल्ये आणि जुन्या पिढीच्या खांद्यावर बसून नव्या पिढीने सोडवायचे तिचे प्रश्न.
    सूक्ष्म बारकाव्यांच्या जागा प्रसन्नशैलीत भरून काढत हे कथानक अलगद आनंदी शेवटापासून येते. संपूर्ण टीमचे काम उत्कृष्ट झाले आहे.

  • @swatichoughule-zh2br
    @swatichoughule-zh2br 9 месяцев назад

    अप्रतिम, सर्वच बाबतीत, सतीश आळेकर साहेबाना साक्षात दंडवत काय काम केलय!!! वाह!!!! ग्रेट, आणि रोहन पण मस्त, सॉलिड एक्स्प्रेशन्स . आजी, ईशा सर्व छान च मस्त टीम.❤

  • @Lila-ke8ux
    @Lila-ke8ux 10 месяцев назад +2

    Such a sweet, soft movie. Fills the heart, with so much love, care, kindness. The elderly man acted so well. The couple looked, as if made for each other.the song Re Mana is so meaningful and melodious.

  • @dr.mucktakarmarkar4451
    @dr.mucktakarmarkar4451 9 месяцев назад +1

    Congratulations Bansidhar! Such a wonderful presentation. Story best! Direction best! Acting best! Emotions flow so subtly either through dialogues or gestures. You have also shown the reality of Jeevan Gaurav Puraskars between the lines, Kudos to you and the entire team!

  • @rameshkothale9284
    @rameshkothale9284 9 месяцев назад

    एकाच शब्दांत सांगायचं झालं तर सुपर.ह्लदयात कुठेतरी काहीतरी वेगळं कोरुन गेलय एवढं मात्र नक्की.धन्यवाद सर्वाचे,अशी कलाकृती पाहायला पुन्हा पुन्हाआ्वडेल.
    परत एकदा सर्वानचे कलाकार निर्माते व दिग्दर्शक इ.अभीनंदन व शुभेच्छा 👍👍👌👌❤️❤️❤️❤️❤️🌹🙏

  • @vishakhajoshi1457
    @vishakhajoshi1457 9 месяцев назад

    खूप खूप खूप सुंदर .पुन्हा पुन्हा पहावसं वाटतं.खूप सुंदर

  • @geetasolanke9264
    @geetasolanke9264 9 месяцев назад +1

    खूपच natural watl..bilkul boar nahi .. सुंदर.. 👌🏻

  • @amitlimaye5207
    @amitlimaye5207 9 месяцев назад

    अतिशय सुंदर पूर्ण टिम च मनापासुन अभिनंदन....

  • @dhanrajahire5159
    @dhanrajahire5159 9 месяцев назад +1

    Excellent. Khup sunder, also song is very nice.

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 2 месяца назад

    खूप सुंदर आणि भावस्पर्शी. ❤

  • @sgodbolejoshi
    @sgodbolejoshi 9 месяцев назад +1

    फार सुंदर ..गाणी संगीत आभिनय ..कथा ..सर्व उत्तम

  • @vikramkore9060
    @vikramkore9060 5 месяцев назад

    Speechless. In one Short film one can see variety of emotions. Relationship, Respect, Affection, Love, Communication between 2/3 generation is most important to listen and apply elder / older generation experience. All the best for your next work. Excellent presentation and acting as well.
    Thank you.

  • @supriyapatil7913
    @supriyapatil7913 9 месяцев назад +1

    Lovely movie. The end is so unexpected. Great piece

  • @dipakdattatraydeshpande553
    @dipakdattatraydeshpande553 3 месяца назад

    फारच छान सादरीकरण..ऊत्तम.

  • @vidullylatamahendru1632
    @vidullylatamahendru1632 7 месяцев назад

    खूप अप्रतिम कथा, सुंदर सहज acting …. धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @aratigupte4411
    @aratigupte4411 10 месяцев назад +1

    खूपच सुरेख 👌👌👌👌 उत्तम अभिनय, संगीत आणि चित्रीकरण!