शे'ती'सध्या काय करते? - भाग 11 (रानभाज्यांची भटकंती) - (She'ti' Sadhya Kaay Karte? - Part 11)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 508

  • @hemakale172
    @hemakale172 Год назад +12

    संपदा आपण ठाणे येथील एका कवितेच्या कार्यक्रमा दरम्यान आपण भेटलेलो.तुझ्या सोबत मी फोटो सुद्धा काढलेला एक आठवण म्हणून ठेवलाय.. अनंताचे झाडं इतके भरगच्च फुलांनी बहरून आलेलं मी पहिल्यांदा पाहिलं आहे.. तुझं ते निरागस हास्य व बहरेलेला अनंत दोन्ही सदोदित राहो.. श्री स्वामी समर्थांच्या चरणी हीच सदिच्छा...🙏😍 तुझी एक मी श्रोती आहे...

    • @ArutaGawand
      @ArutaGawand 7 месяцев назад

      संपदा
      खूप खूप कौतुक!!
      भाज्या ंची नावे सांगितली स पण त्या ची रेसिपी सांगितली नाहीस
      मुद्दाम उल्लेख करावास
      शुभेच्छा

  • @vrishalikulkarni9531
    @vrishalikulkarni9531 Год назад +34

    संपदा तू खूप गोड आहेस अनंताच्या फुलासारखी अशीच रहा !!!

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +64

    काय बोलू 🤔 एकचं म्हणू शकेन निसर्गात राहून निसर्ग जगणारी आणि आनंदाचे शेत पिकवून आनंदात राहणारी रानमाणसं 👍रानभाज्यांची उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @vasantijoglekar8961
    @vasantijoglekar8961 Год назад +4

    संपदा, तुमची जोडी अतिशय कर्तृत्ववान, गुणी, आपुलकी वाटावी
    अशी मनमिळाऊ, साधी, खूप खूप
    हुशार, जमिनीची माया प्रेमाने खडतर कष्टाने मिळवणारी, जितकं
    लिहावं तितकं थोडं!
    ऐन्शी वयाच्या अधिकाराने, फक्त
    खूप अभिनंदन, खूप आशिर्वाद, खूप शुभेच्छा!
    वासंती जोगळेकर

  • @shwetashirodkar8121
    @shwetashirodkar8121 7 месяцев назад +3

    आनंदी सफर खूप छान संपदा आणि राहुल तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 8 месяцев назад +3

    आपलं अभिनंदन.
    आपण अल्टरनेटीव्ह लिव्हिंग/ वैकल्पिक जीवनशैली या जगभर चाललेल्या नवजीवन जगू इच्छिणाऱ्या क्रांतीकारी जीवन जगण्याची मोहीम चालवणाऱ्या नवपिढीचे आपण प्रतिक्रिया आणि मार्गदर्शक आहात. आपल्यासारखे लोक या मोहीमेचे अग्रध्वजधारक आहेत.. अभिनंदन आणि शुभेच्छा.. पाठिंबा आणि शुभास्ते पंथान् संतू

  • @santoshhake656
    @santoshhake656 Год назад +2

    संपदाजी आपण अनंताच्या फुलांची भाजी या बद्दल उल्लेख केलात त्याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.कृपया त्याची रेसिपी द्यावी ही विनंती. व्हिडिओ अप्रतिम आहे.

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 10 месяцев назад +5

    मला वाटतय तुम्ही दोघ खुप वेगळ जिवन जगताय सोनेरी झगमगाटा पासून लांब पण खरया सोनेरी दुनियेत यातून तुम्हाला आनंद तर मिळतोच पण दिर्घाआयुष्य ही लाभेल ग्रेट आहात दोघेपण 🎉

  • @pravinsathe7647
    @pravinsathe7647 Год назад +19

    खुप छान निसर्ग सौंदर्य हे सर्व पाहुन असं वाटतं शहरातील सर्व काही काम धंदा सोडुन गावी जाउन निसर्गाचा आनंद घ्यावा,,,!!!

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 7 месяцев назад +1

    कोकण हा निसर्गाने नटलेला आहे दादा आणि ताई तुम्ही सुंदर माहिती दिली

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc Год назад +1

    खूपच छान 👌 कातळावर मच्छी पण मिळते का ?

  • @vaidehipurohit2932
    @vaidehipurohit2932 Год назад +7

    कर्जतला आल्यापासून मी दरवर्षी या सगळया भाज्यांचा आस्वाद घेते आहे. पण अनंताच्या फुलांची भाजी हे प्रथमच ऐकलं आणि एवढं फुलांनी डवरलेलं अनंताचं झाड पहिल्यांदीच पाहिलं

  • @revatikhot9219
    @revatikhot9219 7 месяцев назад +1

    सद्या पावसाळ्यात दादरला यातील बऱ्याचशा भाज्या मिळतात ❤❤❤

  • @smitadhuri2443
    @smitadhuri2443 7 месяцев назад +2

    आम्ही येणार आहोत तुमच्या आनंदाच्या शेतात नक्कीच ❤

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 8 месяцев назад +1

    खूपच छान उपयुक्त अशी रानभाज्यांची मेजवानीच. मीही कोकणातील आहे दापोलीतील . लहानपणापासून या सर्व भाज्या अजूनही खाते आहे. मुंबईत सर्व मिळतात पण माझी आई आणि आता दीदी सर्व न विसरता मला मुंबईत पाठवून देते पण एकदा नक्की आनंदाचे शेत बघायला आणि या अतुलनीय भाज्यांचा आस्वाद घ्यायला नक्की येईन.

  • @rahulchavan9324
    @rahulchavan9324 8 месяцев назад +1

    खरंच खूपच छान निसर्ग कीती भरभरून देतो आपलयाला यासाठी निसर्गाचे संवर्धन केले पहीजे तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा ❤

  • @shamaljagtap8399
    @shamaljagtap8399 7 месяцев назад +1

    ताई खुप छान रानभाज्या बघितल्या.मी आज रोह्याहुन येताना फोडशीची (अलिबागला त्याला कुलु म्हणतात)भाजी,भारंगीची भाजी,शेवळं आणली.तेच सर्व साफ करताना vlog बघतेय मी.अनंताच्या फुलांची भाजी आजच ऐकली मी.नक्की करून बघते.😊

  • @prathibhaJadhav-j1g
    @prathibhaJadhav-j1g 7 месяцев назад +1

    खूप सुंदर माहिती मी हा निसर्ग सौंदर्य बघत भारावून गेले

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 8 месяцев назад +1

    He sagal eklya var शहरी माणसं ज्याच कोकणात कोणी नाही अशांना ही खूप मोलाची माहिती मिळाली. खूप खूप आभार तुमचे. अशेच माहिती पूर्ण व्हिडिओ करा.

  • @SarjananandDham-jf1kj
    @SarjananandDham-jf1kj Год назад +1

    सुप्रभाती राम-राम राहलजी आणि संपदाजी, तम्ही तयार केलेला हा दृकश्राव्य संदेश अनुभवण्यातूनच खरं तर माझी आजची सकाळ शुभंकर झालीए .लवकरच भेटूयात, म्हणजे मी येईन आप्तस्वकीयांचा ताफा घेऊन तुमचं जीवनसमृध्द करणारं अनुभव जवळून पहायला तुमच्या सत्संगतीत अनुभवायला. सोबतच मी तेव्हा सामायिक करेन तुम्ही आत्ता दाखवलेल्या टाकळ्याच्या बियांपासून माझी नानीआजी सोबत अनुभवता आलेला काॅफीचा नुस्खा आणि एकदोन गोष्टी तिच्याकडूनच अनुभवास आलेल्या जसे की देशी बाभळीच्या शेंगांपासून घरगुती मस्त मंजन. *सर्जनानदधामातील सुधीर* शामराव सावदेकर सौ नीलिमासह ७०२१९१०१२१.

  • @लतिकास्मिताशिवा

    खूप सुंदर 💞
    काकवि ला इथे पालघर जिल्हा आणि आदिवासी पढ्या मधे तेलपात असे म्हणतात 😊
    खूप खूप आभार ह्या व्हीडिओ करिता ताई आणि दादा 🙏🏻💞

  • @geetastimeandspace9410
    @geetastimeandspace9410 Год назад +2

    भारांगीच्या फुलांची भाजी खूप सुंदर लागते. संपदा खूप छान माहिती सांगितली. 👍🏻😊❤🙏🏻Thank you.

  • @vaishaliscookingpassion
    @vaishaliscookingpassion Год назад

    निसर्गरम्य परिसर मस्त ब्लाँग👌👍

  • @mahanandamukhade4985
    @mahanandamukhade4985 7 месяцев назад +3

    मलाही तुमच्यासारखं जीवन जगायला खूप आवडेल . तुमचा हेवा वाटतो मला. व तुम्ही एवढी सुंदर माहिती सांगता तो आनंदही वाटतो आहे. अनंताच्या फुलांची भाजी करतात हे ऐकूनच खूप नवल वाटले. आता खाण्याची उत्सूकता आहे . मला वाटतं आपल्या आनंदी शेतीवखायला यावे. आपणांस खूप धन्यवाद ! 😀🙏🏼

  • @kalpanagaikwad5110
    @kalpanagaikwad5110 Год назад +1

    ताई आणि सर तुम्ही परत जुन्या दिवसांचे आठवण करून दिली मी पण अशीच भाजी शोधायला रानामध्ये जायचे आमच्या डोंगरावर रानभाज्या येतात मी खूप खाल्ल्या आहेत आणि आता ते सगळं मिस करते❤❤

  • @madhurigharpure645
    @madhurigharpure645 Год назад +4

    नेहेमी प्रमाणेच अतिशय माहितपूर्ण,आणि तरीही रंजक असा एपिसोड👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
    मला वाटतं की मुलांनी शाळेत बाकावर बसून शिकण्यापेक्षा, पालकांनी दोन दिवस जरी तुमच्या इथे मुलांना आणले तरी किती गोष्टी साध्य होतील.
    फारच छान

    • @bhauchavhan7022
      @bhauchavhan7022 7 месяцев назад

      हा श्रीकृष्णाचा पावा याचा आवाज कमी करा

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 Год назад

    कोरल्याची आपट्याच्या पानासारखी दिसणारी भाजी असते पान फार नाजूक असतात. खूपच छान लागते भाजी. तुमचं हे फार्म खूप आवडलं.दोन ते तीन video मी बघितले आहेत.आताची सफर मी प्रत्यक्षात अनुभवली .खूपच मस्त वाटलं. अनंताला अंत नाही.चराचरातील सृष्टीवर भरभरून प्रेम केले तर तो आनंद निसर्ग आपल्याला दामदुप्पट मिळतो. धन्यवाद आपणा उभयतां
    भरभरून

  • @simitamahadik4703
    @simitamahadik4703 Год назад

    खूप खूप छान रान भाज्यांची आठवण करून दिली त्यात पहिला पाऊस पडल्यावर शेवळाची भाजी रानात येते ती भाजी पण छान लागते मी आधी कल्याण येथे राहत होते त्यामुळे मी ह्या रानभाज्याचा आश्वाद घेतला आहे मी तुमच्या आनंद शेतास भेट दिली आहे 😊

  • @mangeshshirke
    @mangeshshirke 7 месяцев назад +1

    १ जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या अपना उभयता लक्ष लक्ष शुभेच्छा 🎉

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 7 месяцев назад

    ❤संपदाताई आत्ताच व्हीडीओ खूपच छान रानभाज्या विशेष होताच परीसरही सुंदर सड्यावर कुठे आहे आम्ही काही वर्षा पुर्वी पाच वर्ष होतो म्हणून विचारते

  • @anjalilele9764
    @anjalilele9764 Год назад

    वा ! वा ! वा ! भरभरून फुललेला अनंत...करटुलीचे वेल...रसरशीत अननस... पांढऱ्या फुलांची कांदापाती सारखी दिसणारी भाजी.... अगदी स्वप्नवत सफर झाली....खूप छान , रानभाज्या प्रत्यक्षात पहायला मिळाल्या...निसर्ग प्रेमींना लगेच forward करणार

  • @SadhanaGaikwad-jk4mt
    @SadhanaGaikwad-jk4mt 8 месяцев назад +1

    तुमचे विचार खरच खूप सुंदर आहे

  • @pradnyakaravade3381
    @pradnyakaravade3381 Год назад

    व्वा.. खूपच सुंदर माहिती!!
    अनंताच्या फुलांची भाजी नव्यानेच कळली.
    रानभाज्यांमध्ये कुर्डू, कवला, आकूराचा मोहर, शेवळं, थरबरा ह्याही कोकणात सड्यावर आढळतात. चवीला अतिशय अप्रतिमच आहेत.

  • @tejashripatki4734
    @tejashripatki4734 Год назад +1

    खूप छान वाटले,हा व्हिडिओ पाहून निसर्गाच्या सानिध्यात गेल्यासारखे वाटले भारंगीची भाजी आई पूर्वी करत असे त्याची आठवण झाली, मला वाटते कुळू ची भाजीही ह्याच ऋतूत मिळत असावी.

  • @snehakale7345
    @snehakale7345 Год назад

    यातल्या बऱ्याचशा भाज्या मी खातो... खूप सुंदर माहिती दिलीत... सगळ्यात आवडलं म्हणजे पानोपानी बहरलेल्या अनंताच्या फुलांचे झाड... माझ्या कुंडीत एखाद अनंताच फुल आलं तरी...मन मोर होऊन जातं... तुमच्याकडे तर फॅक्टरीच वाटली मला ... बॅकग्राऊंड म्युझिक इतकी सुंदर आहे, अगदी मंजुळ त्यामुळे तुमच्यासोबत आख शेत फिरून आल्याचा फिल आला मला..❤

  • @pratimaoturkar515
    @pratimaoturkar515 Год назад +7

    दादा , ताई छान हिरवा निसर्ग आणि भाज्या
    अनंता ची फुले खुप छान त्यांचा सुगंध 😍

  • @pradnyagorkar2593
    @pradnyagorkar2593 7 месяцев назад +1

    Wah kiti nashibvan aahat tumhi dogh aajchya yugat Sheti kartat .Khup Punyacha Kam aahe

  • @vijaymuley5433
    @vijaymuley5433 Год назад

    रानभाज्या ह्या आरोग्याच्या दृष्टीने आणि चवीच्या दृष्टीने ने सुद्धा अप्रतिम असतात
    महाराष्ट्र हे फार मोठे राज्य आहे प्रत्येक विभागात खुप रानभाज्या येतात 😊❤

  • @unknownguy279
    @unknownguy279 Год назад

    कमाल
    ....अभिनंदन ......आम्हालाही आता असं जीवन हवं असं वाटायला लागलं आहे

  • @supriyamorajkar539
    @supriyamorajkar539 Год назад +5

    खूपच मस्त राहुल दादा आणि संपदा तााई..

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 8 месяцев назад +1

    ❤❤❤.. सुंदर

  • @truptimore1605
    @truptimore1605 Год назад

    खूप छान माहिती दिली.माझी आजी ने आम्हाला या सगळ्या रानभाज्या खाऊ घातल्या आहेत....

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Год назад

    खूप छान झालाय व्हिडीओ. .मी राजापूर तालुक्यातील माडबन या गावची आहे.तुम्ही दाखवलेल्या रानभाज्या आम्ही खातो.पावसाळ्यात गावचे सडे आणि मळे बघूनच. मन प्रसन्न होतं.मी ठाण्यात देवदया नगर (पोखरण रोड १)येथे रहाते.आमच्या इकडे येऊरच्या आदिवासी बायका या आणि इतर खूप साऱ्या रानभाज्या घेऊन येतात.जो पर्यंत मिळतात तोपर्यंत रोज एकतरी भाजी आणून खातो.तुमच्या आनंदाच्या शेतात खरंच फिरल्यासारखं वाटलं.संपदा या ठाण्यातल्याच म्हणन फार आवडतात.मी रांगोळीच्या कौतुक समारंभात आणि उघाटनाच्या वेळी भेटले आहे.त्या एक छान व्यक्तीमत्व आहेत.त्या बोलतिआत छान.त्यांचे टि.व्हि.वरचे निवेदन सुदधा ऐकले आहे.एक वर्षी वर्तक नगर येथे दहीकाल्या दिवशी राधेचा नाच ही केला होता.मी तुमची सही सुद्धा घेतली होती.राहुलजी सुद्धा छान आहेत.दोघंही एकमेकांना अनुरूप आहात .पुढील चांगल्या व्हिडीओ साठी आणि तुम्हा दोघांना खू खूप शुभेच्छा ❤

  • @ashalatasontakke8028
    @ashalatasontakke8028 Год назад

    मुलाखतकार संपदा ते निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा.

  • @सौ.संध्यामळेकर

    खूप छान माहिती मिळाली व्हिडीओ द्वारे अभिनंदन दोघांचेही. माझें माहेरही त्याच भागात डावखोल येथे असल्याने थोडीफार रा णभाजांची माहिती होती पण आज खूप माहिती मिळाली. पुन्हा एकदा धन्यवाद. आम्ही सारे आपल्या कुटुंबाला ओळखतो 🙏

  • @manjiriinamdar85
    @manjiriinamdar85 Год назад

    खूपच छान व्हिडिओ आहे. खूप नवीन माहिती दिलीत. अनंताचं पानोपानी बहरलेलं झाड बघून पारणं फिटलं डोळ्यांचं.

  • @shubhangivaze2697
    @shubhangivaze2697 7 месяцев назад +1

    शेती मळे निसर्ग फुलवत आहात.निसर्गाच्या सानिध्यात रहातआहात किती छान.👌👌😊👍💐💐
    खूपखूप आनंदमयी यशमयी शुभेच्छा.💐💐

  • @mmbmrk
    @mmbmrk Год назад

    खूपच सुंदर आनंदाचं शेत बघून खरच खूप आनंद झाला

  • @dhairadharpatil9646
    @dhairadharpatil9646 8 месяцев назад

    खुप उपयुक्ततापूर्ण रानभाज्या ची माहिती दिली किती सुंदर आयुष्य जगता आहात एक दुस-यास पूरक....! संपदा मी धैर्यधर ज .पाटील एम.ए.मराठी पार्ट २ वर्ग स्नेही...! तंत्र यंत्र युगांपासून दूर आयुष्याच्या योग्य वळणावर आपण दोघं आनंदात आनंदाच्या शेतात विहरत आहात....!दोघांनाही मनस्वी खुप खुप शुभेच्छा लवकरच येण्याच्या वाटेवर....! 🚩🌹

  • @suhaskalvankar1513
    @suhaskalvankar1513 Год назад

    आधुनिक ऋषी मुनी ह्यांच्यासारखे आपले कार्य आहे! शुभेच्छा!

  • @maheshkulkarni8
    @maheshkulkarni8 Месяц назад

    खुप छान माहिती दिली आपण. धन्यवाद. तुम्ही प्रेरणादायी आहात.

  • @sangeetajoglekar3272
    @sangeetajoglekar3272 Год назад

    रानभाज्यांची माहिती मस्त . मी पण दरवर्षी पावसाळी भाज्या करते . आमच्याकडे वसईवाले घेऊन येतात . कोरला पण एक पावसाळी रावभाजी आहे .आपट्याच्या पानांसारखा पानांचा आकार असतो .

  • @manishasurve652
    @manishasurve652 Год назад +1

    खूपच छान. पाथरी च्या पानांची भाजी, आकुर/शेंडवळ/ गाबोळीची भाजी, असंख्य प्रकार ची अळंबी, असंख्य रान भाज्या. निसर्ग किती भरभरून देतोय आपल्याला.❤❤❤

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 7 месяцев назад

    असाच तुमचा पुढचा प्रवास ऊतकृष्ट होवो .

  • @shradhachavan3844
    @shradhachavan3844 Год назад +1

    या रानभाजीची सफर तुमच्यामुळे फार आनंद देऊन गेली

  • @narendrabhide8646
    @narendrabhide8646 Год назад +3

    राहुल, मजा आली, खूप वर्षं मागे गेलो माझे आजोबा पिकवत असत अशा रान आणि पालेभाज्या!!! संपदा, आपल्या शिबिरातल्या काही आठवणी जाग्या झाल्या..... मनापासून धन्यवाद आणि उदंड शुभेच्छा!!!! 🙏🌹🌹🌹

  • @priyadarshanekulkarni
    @priyadarshanekulkarni 7 месяцев назад +1

    मझ्या सासूबाई एक भाजी करत..तिचं नाव आहे चंदन बटवा... तूर डाळ घालून ... अप्रतिम होत असे... तुम्हीही एकदा करून बघा... आणि व्हिडिओ अप्रतिम... नक्की येऊ अनुभवायला

  • @amitaghonge
    @amitaghonge Год назад +2

    संपदाजी आणि राहुलजी आपण पावसाळी रानभाज्या ची छान माहिती दिलीत.ह्या सगळ्या ह्या सिझन साठी औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या आहेत असं म्हणतात.खूप सुंदर व्हिडिओ.

  • @vrishalichawathe3879
    @vrishalichawathe3879 Год назад +7

    खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण... राहुल आणि संपदा.. तुम्हाला खूप खूप धन्यवाद... अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही नेहमी आम्हाला देत असता.

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 8 месяцев назад +1

    Chan❤

  • @jyotigadgil8978
    @jyotigadgil8978 Год назад

    इतके बहरलेले अनंत पुष्पाचे झाड
    प्रथमच पाहिले.खूपच सुंदर.

  • @pratibhachavan4995
    @pratibhachavan4995 Год назад +4

    नमस्कार दादा आणि ताई, रानभाज्यांची खूपच सुंदर माहिती दिलीत तुम्ही .आजूबाजूच्या रानभाज्यांचा संकलन आपण करूयात .आणि माहितीची देवाण-घेवाण होईल ,सगळ्यांना त्या माहितीचा खूप उपयोग होऊ शकतो .तुमचे खूप खूप आभारी आहोत.🌻☘🍀🌱🌾🌿

  • @snehawadekar9524
    @snehawadekar9524 Год назад

    खरच खूपच भारी वाटलं असं आनंदाचे शेत पाहून निसर्ग पाहून खूप छानच वाटलं

  • @rekhapaunikar
    @rekhapaunikar Год назад +1

    व्हिडिओ पाहून खूप च आनंद झाला.अनंताच्या फुलांची भाजी होते हे ऐकून नवलच वाटले.आमच्या कडे ही पावसाळ्यात खूप रान भाज्या उगवतात .पण सगळ्याच ओळखता येत नाहीत.खूप खूप अभिनंदन.👌👌👍👍

  • @meeghate-khedkar7694
    @meeghate-khedkar7694 Год назад

    फारच सुंदर वाटलं सर्व बघून...मला एकदा यायचंच आहे...

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 Год назад +1

    मजा आली रान सफर करून. या सगळ्या भाज्या आमच्या कडे केल्या जातात. चाकवत नाही दिसला यात.. निसर्गाने आपल्याला भरपूर दिलंय. तुम्ही दोघे ते आनंदाने जोपासत आहात. छान वाटल.

  • @nandakalme8288
    @nandakalme8288 Год назад

    फारच छान रानभाज्या आणि कोकण.

  • @sumitragholap2509
    @sumitragholap2509 Год назад +2

    Wa, khare aahe, hyache mahatva saglyana kaale ch pahije, rabhajya vishsh

  • @sanjayvedak8286
    @sanjayvedak8286 Год назад

    मस्त फेरफटका झाला. धन्यवाद

  • @SantoshiPatil-q6e
    @SantoshiPatil-q6e Год назад

    तुम्हा दोघांचे काम अतिशय आनंद दायी आहे. तुमच्या या आनंद मयी यात्रेस मनःपूर्वक अभाळभर शुभेच्छा ❤❤

  • @savitamore2976
    @savitamore2976 7 месяцев назад +1

    Beautiful video❤

  • @aarambhacreations4994
    @aarambhacreations4994 Год назад +1

    छान माहिती दिलीत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @sanjaysalvi3048
    @sanjaysalvi3048 8 месяцев назад +1

    Nice work🌹

  • @suvarnajadhav166
    @suvarnajadhav166 Год назад

    Kitti chhan, pavasat ya raanbhajyanchi mejawani mhanaje ek parvanich aahe. Raanbhajya baghun aamhihi aavandha gilala, bare ka! Chhan Aaband ghya Aanand dya aani Aanandi raha ❤😊

  • @umashejwalkar6427
    @umashejwalkar6427 Год назад

    फारच मस्त असतात तुमचे सगळे video .
    कोकणात न जाताही गेल्याचा भास होतो. इतके जीवंत असतात. रानभाज्या माहिती अप्रतिम. विहिर किंवा पाणवठ्याला जांभळी आंबट नाजूक फ़ुले पाने येतात ती सूधधा सुरेख असतात. तसेच मायाळू च्या पानांची भजी आत्ता पावसात खायला मजा येईल. आम्हाला नक्की यायचं आहे..❤अनंताच्या फुलानी वेड लागलंय 👌👌👌

  • @sulbhaparkar5043
    @sulbhaparkar5043 Год назад

    रानभाज्यांची माहीती सर्वांनाच नसते.व्हिडीओच्या माध्यमातून छान माहीती दिलीत.धन्यवाद ❤

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 Год назад

    काय बोलावे किती सुदंर छान बोलावे तेवढेच कमी .शरीराने नाही पण मनाने पोहचली मी 😊👌👌👌👌👌👌👌

  • @ashasawant8988
    @ashasawant8988 Год назад

    खूपच छान. व्हिडिओ 18:12 रानभाज्या ची ओळख झाली... आमच्या तळकोकणात कुरुडू नावाची एक रानभाजी मिळते या दिवसांत..आनंदाचे शेत बघायची खरंच इच्छा आहे..नक्की येऊ

  • @rekhabhave5143
    @rekhabhave5143 Год назад

    मन हिरवं झालं.
    खूप यावसं वाटतय.

  • @ananddonde9356
    @ananddonde9356 Год назад

    अतिशय उपयुक्त माहिती, सर्वांनी एकदा आवश्यक चव घेणे, ह्या फकत पावसाळ्यातच मिळतात, धन्यवाद दोघांचेही.💐💐💐

  • @sharvarisawant9789
    @sharvarisawant9789 Год назад

    खूप गोड शब्दात रानभाज्यांची माहिती दिलीत संपदा ताई. तुमच्या वाणीतला गोडवा त्या भाज्यांमध्ये आणखीनच उतरेल यात शंका नाही. आपला हा जीवन प्रवास आमच्यासारख्याना निश्चितच खूप प्रेरणादायी ठरेल. आम्ही पण कोकणातच सिंधुदुर्गात राहतो. ह्या सर्व रानभाज्या आमच्या आजूबाजूला आहेत. तुम्ही त्यांची आठवण करुन दिलात त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻तुमचे videoes पाहताना तुमच्या सह्याद्री वरच्या निवेदनाची आठवण राहून राहून होते. तुम्ही अशीच आनंदाची झाडे लावत रहा आणि आनंद घेत रहा आणि देत raha.

  • @shilpadhamanaskar4180
    @shilpadhamanaskar4180 Год назад

    कित्ती छान! मस्त माहिती मिळाली. कर्टुलं आणि टाकळा भाजी खाल्ली आहे.

  • @RatiAthavale
    @RatiAthavale 6 месяцев назад

    खूप छान माहिती। कुरूडुची भाजीदेखील छान लागते आमच्या गावच्या रानात मिळते

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 Год назад

    खूप छान वाटल तुला बघून
    निसर्ग बघून

  • @meghabhosale6519
    @meghabhosale6519 Год назад

    Bharagi chya fulanchi bhaji pn khupch chan lagte 😋👌👌

  • @prmodrane7228
    @prmodrane7228 Год назад +1

    कुड्याची शेंग ची bhaजी छान असते

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Год назад +2

    💐🎉🎊 संपदाताई - तुम्हां दोघांचेही हार्दिक अभिनंदन.! एव्हढे उच्चविद्याविभूषित शिक्षण घेतले असूनही आपण प्रवाहाविरूध्द पोहत जाण्याचा यशस्वी मार्ग पत्करला आहे ;त्याबद्दल खूप कौतुक वाटते मला..आजकाल शेती ;जमीन ;पाणी हे शब्द मला सोन्यासारखेच वाटतात..आपण ह्या निसर्गसौंदर्याला आणिआपल्या राष्ट्रीय संपत्तीला वंचित झालो आहोंत.. खरोखर तुम्ही कोंकणच्या लाल मातीशी नांते घट्ट जोडून ठेवले आहे.. एक चांगली अभिनेत्री आणि एक चांगले माणूस म्हणून तुम्ही श्रेष्ठच.!

    • @Prajakta742
      @Prajakta742 Год назад

      Kupach chhan lihile aahe❤

    • @suchitaraje4710
      @suchitaraje4710 Год назад

      खरेच संपदा तुम्हा दोघांना खूप दिवसांनी एकत्र बघून खूप छान वाटले, तुम्ही दोघे खूप खूप श्रेष्ट आहात, तुमचे कौतुक करायला शब्धच नाहीत माझ्याकडे, सॅल्यूट तुम्हा दोघांना,.. तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छां!

  • @yogitaoak7222
    @yogitaoak7222 Год назад

    व्वा, राहुल आणि संपदा, तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन 🎉😊

  • @madhuribhogale2539
    @madhuribhogale2539 Год назад

    खूपच छान , खूपच छान, खूपच छान ❤ ❤

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 Год назад

    🌅🙏🌹 रानभाज्या निसर्गात कुठे आणि कशा मिळतात, याची उपयुक्त माहिती आणि फेरफटकाही मारून झाला....तुम्हां दोघांचे मनापासून आभार. टाकळा,कुरडई माहित होती ,नवीन रानभाज्या कळल्या....

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 Год назад

    संपदा मला ना तुझं बोलणं आणि आवाज खूपच गोड आहे
    वा शेती सद्या काय करते 👌👌👍👍आणि तू हसताना खूप सुंदर दिसतेस👌👌

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 8 месяцев назад

    Tu mala purvi pasun khup आवडतेस. Tuzi मुलाखत घेण्याची कला खूप खूप छान आहे.

  • @archanaparande1171
    @archanaparande1171 7 месяцев назад +1

    दोडीची फुल म्हणून एक रणभाजीचा प्रकार जळगाव खानदेशात केला जातो. छान चव असते.

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 8 месяцев назад

    Khoopach chan

  • @ashwinikulkarni2497
    @ashwinikulkarni2497 Год назад

    खूप छान वाटलं घरात बसून थोडी हिरवाई अनुभवली

  • @alkabirewar7025
    @alkabirewar7025 7 месяцев назад

    खूप सुंदर व वेगळं जीवन

  • @suhasnavare7879
    @suhasnavare7879 Год назад

    खूप छान वाटले.निसर्गातून फेरफटका मारून रानभाज्याची माहिती दिली.तुमच्या दोघांचे खूप खूप अधिनंदन.नक्की पुढच्या महिन्यात येण्याचा विचार करू

  • @jayashreedeshpande4509
    @jayashreedeshpande4509 Год назад +1

    सम्पदा ताई, तुम्ही दाखवलेल्या भाज्या तर छान होत्याच, पण तिथलं निसर्ग सौंदर्य अप्रतिम होतं! व्हीडिओ बघताना देखील डोळे सुखावत होते.

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Год назад +7

    Khupch sunder kalpna ❤❤pure natural environment ❤️

  • @sukanyamone5039
    @sukanyamone5039 Год назад +1

    अप्रतिम.... खूपच छान माहिती दिलीत