वारसा । सचिन बाळासाहेब सूर्यवंशी । filmfare award winner | chhatrapati shivaji maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेवर आधारित फिल्म -
    सचिन सूर्यवंशी मित्रमंडळ सादर करत आहे
    "वारसा"
    लेखक, निर्माता, दिग्दर्शक - सचिन बाळासाहेब सूर्यवंशी
    निर्मिती - लेझी लिओ फिल्म्स
    सह-निर्माते - संदीप बंडा पाटील, प्रसाद पाध्ये, सतीश सूर्यवंशी, सिद्धेश सांगावकर, चिन्मय जोशी, कविता ननवरे, कुणाल सूर्यवंशी
    नरेशन - डॉ. शरद भुताडीया
    संगीत - अमित पाध्ये
    साउंड डिझाईन - मंदार कमलापूरकर
    सिनेमॅटोग्राफी - मिनार देव, सचिन सूर्यवंशी
    एडीट - प्रशांत भिलवडे
    बीजीएम मिक्स - शुभम जोशी
    इलस्ट्रेशन्स - विनायक कुरणे
    अ‍ॅनिमेशन - किरण देशमुख
    कला - नितेश परुळेकर, सचिन सूर्यवंशी,
    व्हीएफएक्स - प्रदीपकुमार जाधव
    पब्लिसिटी - सचिन सुरेश गुरव
    सबटायटल्स - विवेक पाध्ये
    ©सचिन बाळासाहेब सुर्यवंशी
    Lazy Leo Films Pvt. Ltd. 2022
    mail@lazyleo.in

Комментарии • 569

  • @jaywantmahajan4566
    @jaywantmahajan4566 20 дней назад +9

    सचिन सूर्यवंशी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्या बद्दल मनपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @devendrakadam5867
    @devendrakadam5867 Год назад +22

    मर्दानी खेळ टिकावेत आणि त्यांची पुढे जोपासना व्हावी. या कार्यासाठी महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी एकत्र येऊन शिवकालीन मर्दानी खेळ टिकवले पाहिजेत

  • @vivekhadikar5023
    @vivekhadikar5023 15 дней назад +6

    आपला हा वारसा टिकावा या साठी राज्य सरकाने शालेय शिक्षणात असे शिक्षक भरती करायला हवे तसेच विविध मित्र मंडळानी मर्दानी खेळ पथके तयार करायला हवी. हृदय स्पर्शी चित्रीकरण अत्यंत आवश्यक अशी कला

  • @bageshreeponkshe4774
    @bageshreeponkshe4774 3 дня назад +1

    अप्रतिम! अभिमान वाटला. ही कला जपली पाहिजे.

  • @MahendraDeshmukh-m9d
    @MahendraDeshmukh-m9d 20 дней назад +14

    आज म. टा. वर्तमानपात्रात लेख आला या मुळे ' वारसा ' पाहायचे योग आला.. खरच मला जुने दिवस आठवले कोल्हापूर मध्ये लाठी काठी सराव करायचे शिवाजी पेठेत. ही युद्ध कला जपली पाहिजेत. शालेय पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट केले पाहिजेत. धन्यवाद सचिन 🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @vaibhavvaity2866
      @vaibhavvaity2866 18 дней назад

      मी पण पेपर मध्ये वाचून कळले. ह्या बद्दल..

  • @abeerkulkarni
    @abeerkulkarni Год назад +16

    एव्हडा चांगला वारसा असताना, महाराष्ट्राची ओळख लावणी ते ही अश्लील लावणी आपली "सांस्कृतीक ओळख" करून ठेवली आहे.
    जय महाराष्ट्र🙏

  • @milindpatil9886
    @milindpatil9886 Год назад +12

    सर्व कोल्हापुर वासी आपले रूणी आहेत.अशी कामगीरी केलीय तुम्ही .

  • @Ad_iana_nt
    @Ad_iana_nt 12 дней назад +2

    संस्कृती जपायला हवी आपण .. संस्कृती राहिली तर समाजाचं हीत आहे.. तरच देश राहील...प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना मर्दानी खेळ शिकवायला हवं..अप्रतिम व्हिडिओ...खूप खूप आभार या महिती साठी❤❤

  • @sanket7751
    @sanket7751 Год назад +17

    23:10 हि ती शेवटची समाधानी आणि प्रामाणिक पिढी आहे जी आता आपला वारसा मागे सोडून जाणार आहे... हे ते reality show च्या नावाखाली अश्रू ढाळणारे लोक नाहीत... आता आपली जबाबदारी आहे हे निरंतर चालू ठेवण्याची आम्ही कोल्हापूरकर आणि संपूर्ण मराठी जनता कटिबद्ध आहोत यासाठी ...

  • @SBG198
    @SBG198 Год назад +32

    आजपर्यंत अनेक पीढयाणा मर्दानी खेळापासून दूर ठेवून राजकीय व शिक्षण व्यवस्थेने शौर्य गुणांचा खून केला... स्वराज्यातील मावळा विचार अनाथ झाला... ते विचार व कार्य या फिल्म मधून पुनर्जीवित होणे ..हीच आजच्या तरुणांच्या इतिहासाची ओळख....अभिनंदन "सचिन आणि सर्व टीम"

  • @yogirajbodhe3233
    @yogirajbodhe3233 6 дней назад +1

    very well described....proud of you Sachin....proud to be a kolhapuri

  • @vinayakkanjar166
    @vinayakkanjar166 2 часа назад

    परत एकदा तो काळ येउदेत या साठी सर्वांनी प्रयत्न करूया 🙏

  • @Radhika_70
    @Radhika_70 17 дней назад

    नितांत सुंदर माहितीपट.हा वारसा जपलाच पाहिजे. सगळ्या शाळांमधून आपल्या मुलांना आणि मुलींना ही कला शिकवायला हवी. आताच्या काळात तर खूपच जास्त गरज आहे याची.शाळा शाळांमधून हे शिकवायला सुरुवात करायला हवी.🙏

  • @devidassarode4550
    @devidassarode4550 Год назад +113

    खूपच मौल्यवान आहे हा व्हिडिओ शक्य होईल तेवढा जास्त शेअर करेन, आम्ही नाही शिकू शकलो तर आता शिकता येईल, जय शिवराय 🚩🚩🚩

    • @drpinjari
      @drpinjari Год назад

      कृपया प्रशिक्षण केंद्राचे संपर्क नं पाठवा

    • @sureshshirose482
      @sureshshirose482 Год назад +1

      ज्यांनी हा विडीयो बनवलाय त्यांना कोटी कोटी प्रणाम, हा वारसा प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक मराठी कलाकार नेते साहित्यकार यांनी पुढे जिवंत राहावा यासाठी प्रयत्न केले पाहीजे, जय शिवराय जय शंभुराय, जय जगदंब,,,,

  • @kishoremandhare
    @kishoremandhare 20 дней назад +3

    महाराष्ट्र टाइम्स संवाद पुरवणी मधून "वारसा" बद्दल कळले. सचिन आणि टीम, आपले हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @kumarborade7502
    @kumarborade7502 Год назад +42

    अप्रतिम, अभिमान आहे मराठी असल्याचा, आणि ज्यांनी ही कला जोपासली त्यांना मानाचा मुजरा

    • @bittertruth27
      @bittertruth27 Год назад

      फक्त अभिमान करू नका, ह्याला पुढे वाहाढवायचा प्रयत्न करा।

    • @ankitmahajan8412
      @ankitmahajan8412 Год назад

      Abhiman aasava hindu asalyacha 💥🚩

  • @AB-vx4hk
    @AB-vx4hk Год назад +9

    I have lived in the USA for 25 years. My ancestors come from Guhagar taluka on the coast and some ancestor must have fought for Swarajya because i inherited 3 swords that have come down in the family; nobody knows how old they are
    Your film brought tears to my eyes. I do not aspire to anything more in this life now that i am over 60. I told my son, who is a doctor in New York that i would like to spend the rest of my life learning the lathi, banati, dandpatta, khadg, vita, jambiya and our other traditional weapons under the tutelage of someone like Shri Thombre. Jay Shivray!! Har har Mahadev!!

  • @deepakpitale346
    @deepakpitale346 Год назад +18

    ऊर भरून आला, मराठी असल्याच सार्थ अभिमान वाटला. जय शिवराय, हर हर महादेव.

  • @akashnalbalwar7304
    @akashnalbalwar7304 11 дней назад +3

    ॐ श्रीगणेशाय नमः शिवायॐ जय राम शिव राम श्रीराम सिताराम ॐ हरिहरा हरे कृष्णा ॐ अद्भुत आहे आपली परंपरा कायम जपली पाहिजे, मुगलाचे मुस्लिम झाले नाव बदलून वागन बदलेला नाही, ब्रिटिश क्रिछन बनले।
    सर्वानी भारतीय परंपरा जपा ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव ॐ।

  • @anagh3223
    @anagh3223 17 дней назад +2

    हा वारसा जपलाच पाहिजे त्या बरोबर नवीन शस्त्रास्त्रे यांचं ही प्रशिक्षण चालू ठेवायला पाहिजे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. Dangalkhoranpasun संरक्षण करण्यासाठी सज्ज राहायला पाहिजे.

  • @amitpvasant5943
    @amitpvasant5943 Год назад +13

    सचिन आणि मित्रमंडळी , माहितीपट अतिशय सुरेख झालाय !
    शरद भूताडीयांच्या आवाजानं यावर वर्ख लावलेला आहे . माहितीपट बघताना कित्येक प्रसंगी माझ्या डोळ्यांतून खळकन पाणी ओघळलं ...
    मी खूप कमी वेळेला एखाद्या कलाकृतीशी असा तादात्म्य पावतो ... सलाम सर्वांना !

  • @suhaspawar2409
    @suhaspawar2409 Год назад +4

    मराठ्यांच्या युद्ध कलेचा वारसा जपणे ही काळाची गरज आहे... खूप सुंदर....🙏🙏🙏

  • @5D_is_Reality
    @5D_is_Reality 20 дней назад +3

    कोल्हापूर शिवशंभू भक्तांचे जाहीर अभिनंदन व मुजरा !

  • @vasantimk8487
    @vasantimk8487 Год назад +10

    सचिनजी अप्रतिम लघुपट बनवल्या बद्दल तुमचे व सर्व साथीदाराने मन:पूर्वक अभिनंदन! अमूल्य ठेवा समोर आणलात! शेवटची, छोट्या मुलीच्या हातात तिची आई लाठी देतांनाची कल्पना 'वारसा' लघुपटाची उंची वाढविणारी!! त्रिवार मुजरा !!
    लेझी लिओ नाव बदलून 'नरशार्दुल' नाव चैतन्य देईल!!
    शुभेच्छा!-- सौ वासंती खाडिलकर नासिक.

  • @sushildabholkar9130
    @sushildabholkar9130 11 дней назад

    मी आपल्याला भेटायला इच्छुक आहे साहेब 🙏 तुम्ही माझ्या मनात एक जागा निर्माण केली आहे 🫡😍

  • @shravanibachhav1982
    @shravanibachhav1982 10 дней назад +1

    अप्रतिम! ❤

  • @Techtips200
    @Techtips200 12 дней назад

    Khup sundar ....dolyat pani ala ....marathe garib ahet pan apla warsa kadhi sodla nahi ...har har mahadev...

  • @navnathpawar8311
    @navnathpawar8311 Год назад +7

    रोमांचक अनुभव.. त्यात स्त्री शक्तीला आवर्जून दिलेले स्थान.. एकदम अभिमानास्पद 🙏

  • @mohankondibakhot5825
    @mohankondibakhot5825 Год назад +5

    कोल्हापूरच्या लोकांचा नादच करायचा नाही ..ही कला तुम्ही जतन करुन पुढील पीढीला तो वारसा दिला.धन्यवाद

  • @archananikam911
    @archananikam911 Год назад +2

    दुर्मिळ कला आणि सुंदर प्रदर्शन ....... आजच्या कराटे पेक्षा ह्या युद्धकला शिकल्या पाहिजेत ..आणि जोपासल्या पाहिजेत ..खुप आभारी आहोत या व्हिडिओ साठी अप्रतिम आहे

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 2 дня назад

    सुंदर! वारसादर्शन

  • @surekhafarakate6915
    @surekhafarakate6915 Год назад +6

    खूप खूप मस्त.. खरंच आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे.. अप्रतिम कला आहे..

  • @harshavardhanbhurke4954
    @harshavardhanbhurke4954 Год назад +1

    खुप छान माहिती. सर्वांनी पहिला पाहिजे असा हा व्हिडिओ आहे.

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 Год назад +3

    लय भारी वाटलं दादा,, मोकळ्या मनानं पुर्ण व्हिडिओ पाहीला,,

  • @anuppowar9605
    @anuppowar9605 Год назад +5

    खूप मस्त होता व्हिडिओ, महाराष्ट्र शासनाने मराठी मातीचा हा वारसा जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  • @nikhilkoshti5390
    @nikhilkoshti5390 19 дней назад

    व्हिडिओ निर्माण करणाऱ्या लोकांचे मनःपूर्वक आभार की या वारस्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचवली.

  • @Viralvideo420_ap
    @Viralvideo420_ap Год назад +6

    शिवकालिन हा 'वारसा' जपलाचं गेला पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे , बाकी फिल्मबद्दल म्हणाल तर काळजात हात घातलात सचिनदादा& टीम मराठी मनातला 'आँस्कर' विनर फिल्म......

    • @uttamkolgaonkar7189
      @uttamkolgaonkar7189 Год назад +1

      अप्रतिम !

    • @sandipgaikwad1065
      @sandipgaikwad1065 Год назад

      हा अनमोल ठेवा सव्यासाची गुरुकुल मध्ये मिळतो हे आमचं भाग्य धन्यवाद लखन गुरुजी

    • @anuradhasatam329
      @anuradhasatam329 Год назад

      अत्यंत चित्तथरारक खेळ -ठोंबरे दादाची कळकळ मन हेलावणारी

  • @v4ji
    @v4ji Год назад +2

    ही खरी शिवरायांची भक्ती..!! निस्सीम भक्ती, निःस्वार्थ सेवा, प्रामाणिक तळमळ.. खूप खूप मोठी आहेत ही माणसं..!! त्यांचे पूर्वज आणि त्यांचा अमूल्य वारसा जपणाऱ्या सर्वांना साष्टांग नमस्कार..🙏🏻🙏🏻

  • @sagarbhandavale8706
    @sagarbhandavale8706 Год назад +8

    लेझी लिओ आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार.🙏🙏🙏 खरोखरच खूप अप्रतिम कलाकृती आहे. मर्दानी खेळाविषयी एवढी सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती आणि एवढे चांगले व्हिडिओज आतापर्यंत कधीही पाहण्यात आलेले नाही. शिवकाळ अक्षरशा तुम्ही पुन्हा जिवंत केला. खूप खूप धन्यवाद💐💐💐💐

  • @dixitsantosh2
    @dixitsantosh2 Год назад +5

    महाराष्ट्राचा हा अमूल्य ठेवा जपायलाच हवा.
    जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी!

  • @hemantyadav7240
    @hemantyadav7240 Год назад +3

    शेवटी ते लहान बाळ जेव्हा हातात काठी घेते तेव्हा अक्षरशः अंगावर सरसरून शहारा आला....अभिमान आहे ह्या कलेचा संस्कृतीचा मी एक छोटासा पाईक आहे...lazy Leo मनाचा मुजरा राव तुम्हाला...

  • @sudheerkulkarni1318
    @sudheerkulkarni1318 Год назад +2

    अप्रतिम. विशेषतः 24 मिनिटानंतर ज्या प्रकारे हा वारसा पुढच्या पिढीतील चिमुकलीला दिला जातोय.

  • @amrutlangore9541
    @amrutlangore9541 Год назад +5

    खुप छान व्हिडिओ पहाताना आंगावर काटा आला खुप मना पासून बघितला, हि कला शालेय शिक्षण विभागाने चालु केली पाहिजे... 👍🙏

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 Год назад +2

    हा व्हिडिओ तुम्ही बनवलात त्या बद्दल आपले आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत
    ज्यांनी ही कला जिवंत ठेवली ती ही निस्वर्ती पणे अश्या मावळ्यांना मनाचा मुजरा

  • @avinashlambe7900
    @avinashlambe7900 Год назад +4

    सुरवातीपासून शेवटपर्यंत अंगावर शहारे आणणारा हा माहितीपट अप्रतिम असाच आहे.

  • @hanumanvhargule
    @hanumanvhargule Год назад +5

    खूप छान.. हा वारसा तुमच्यामुळे पुन्हा सगळ्या समोर आला...

  • @jaschowdhari3463
    @jaschowdhari3463 24 дня назад +1

    hya chitrapatala National film award mirala ahe ! Khup abhinandan 🤩 !

  • @amolgavade6392
    @amolgavade6392 Год назад +2

    खुप सुंदर , ही आपली कला आहे अन् हिला आपनच जपली पाहिजेल ........ जय महरास्ट्रा
    🚩🚩🚩🚩🚩

  • @jitendrawadhane
    @jitendrawadhane Год назад +1

    Khup Chaan! Proud to be Marathi! Jai Shivray

  • @virajkolhe1104
    @virajkolhe1104 Год назад +1

    धन्यवाद...एक विनंती..
    तुम्ही सर्व मोठ्या शहरात हे प्रशिक्षण वर्ग सुरू करा...
    हा वारसा एका शहरापुरता मर्यादित ठेऊ नका.🙏🙏🙏

  • @parvezshaikh7345
    @parvezshaikh7345 Год назад +3

    जय शिवराय 🙏
    खूप छान व्हिडिओ आहे
    सर्वांनी नक्की पाहावे

  • @Ganeshwaghmare1998
    @Ganeshwaghmare1998 Год назад +1

    खूप छान सुंदर अप्रतिम व्हिडिओ इतिहासिक वारसा जपण्याचा अद्भुत पूर्व कार्य आपण करत आहात.
    आणि हा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे याचं खूप अभिमान आहे तुम्हा सर्वांना मनापासून मानाचा मुजरा

  • @sagarmahajan363
    @sagarmahajan363 Год назад +5

    होय मर्दानी खेळाचा चालवू आम्ही वारसा ⚔️🔱🚩🕉️

  • @vishalshinde3710
    @vishalshinde3710 17 дней назад

    खुप छान जय शिवराय

  • @abhijeettivale661
    @abhijeettivale661 Год назад +1

    जय शिवराय
    खूपच छान व्हिडिओ... बघताना अंगावर काटा आल्याखेरीज व उर भरून आल्याखेरीज राहणार नाही...

  • @maheshphadke4214
    @maheshphadke4214 19 дней назад

    सुंदर माहिती..कला जपण्यासाठी प्रयत्न होतील अशी आशा

  • @vinaypadate7720
    @vinaypadate7720 6 дней назад +1

    The original blitzkreig without modern techniques ❤❤

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 10 дней назад

    किती हि दयनीय अवस्था आहे 😢 १९;४७ खरंच पाऊल उचलायची वेळ आली आहे

  • @neelesh8443
    @neelesh8443 18 дней назад

    खूपच छान झालाय हा लघुपट..

  • @atishkurane249
    @atishkurane249 Год назад +2

    जय महाराष्ट्र, अप्रतिम तुमच्या सारखे आहेत म्हणून इतिहास बघायला मिळाला अशी शिकवण प्रत्येक शाळेत घ्यायला हवेमलाही असे शिकायचे आहे माझ्या देवाला श्री छ.शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा. स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी बलिदान दिले त्यांना मानाचा मुजरा

  • @prathmeshpatil7184
    @prathmeshpatil7184 Год назад +7

    नादच खुळा... लई भारी.. खरंच आज मनाला भारी वाटलं कि कोणतरी स्वहीत बाजूला ठेऊन आपल्याबरोबरच या मर्दानी खेळांना अढळ आणि अतिमहत्वाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी धडपडतंय.... 🙏🙏🙏खरंच thank u dada... 🙏

  • @vijaykakde1418
    @vijaykakde1418 Год назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏
    उर भरून आला... जगदंब जगदंब जगदंब 🙏🚩

  • @VineetaShirodkar-og9ip
    @VineetaShirodkar-og9ip 23 дня назад +2

    मस्त ही फिल्म पाहिल्यावर खरेच डोळे पाणावतात . मुलींनी ही कला शिकली पाहिजे ज्यामुळे त्यांच्यामध्ये लवचिकता येईल स्वतः चे रक्षण कराची ताकद येईल

  • @Banbanjaara
    @Banbanjaara 10 дней назад

    किती इंग्रज संस्कृती ची पाळली आहे आपण 😢😮

  • @nikhilkoshti5390
    @nikhilkoshti5390 19 дней назад

    गड-किल्ल्यांचे संवर्धन त्यासोबतच या कलेचं संवर्धन केलं पाहिजे.

  • @aajnavinkahi5213
    @aajnavinkahi5213 Год назад +1

    दादा... खरंच खुप छान फिल्म आहे...
    तुमच्या पुढील वाटचालीस कृष्णभावनाभावित शुभेच्छा🙏
    सचिन सुतार,नरतवडे, ता. राधानगरी

  • @macb88
    @macb88 Год назад +1

    खूपच छान झाली आहे डॉक्युमेंटरी. संवाद, संगीत आणि कॅमेरामन सगळ्यांचं काम खूप प्रभावी झालं आहे. विषय खूप छान पद्धतीने मांडला गेला आहे.

  • @aadibandh
    @aadibandh Год назад +6

    मर्दानी खेळ असताना स्व संरक्षणासाठी हिंसक चाकू आणि पिस्तूल कशाला हवं? खूपच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वारसा जपणारा व्हिडिओ. टीम चे कौतुक आणि अभिनंदन.

  • @chandrakantvasantraogaikwa5761
    @chandrakantvasantraogaikwa5761 Год назад +1

    डोळे भरून आले हे जे तुम्ही कार्य करत आहात ते पाहून.परकीय, जुलमी राजवटीतून ज्याप्रकारे महाराजांनी आपले आयुष्य पणाला लावून ज्या तंत्राचा उपयोग करून महाराजांनी अखंड हिंदुस्थानला स्वतंत्र मिळवून दिले, त्याच तंत्राला,त्या युढकलेला तुम्ही जपताय, खरंच पाहून खुप आनंद झालाच शिवाय डोळे भरून आले. तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...!
    🚩जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे 🙏🏻🧡

  • @satyajeetpatil9422
    @satyajeetpatil9422 Год назад +10

    9:37 movement is unbelievable 😳. Really really great 👌👏

  • @jayharimauli4764
    @jayharimauli4764 Год назад +3

    खरचं रडु आल राव👌😢 किती त्याग आहे या मर्दानी खेळासाठी

  • @chetaned1
    @chetaned1 Год назад +1

    खूप म्हणजे खूप मौल्यवान असे हे चित्रफीत. संपूर्ण चित्रपटात आवडलेलं वाक्य म्हंजी, गडकोट हे शरीर तर हा मर्दानी खेळ आत्मा आहे. इथेच भरून पावलो. अभिमान आहे, मी अश्या राष्ट्रात जन्मलो. मुंबईसारख्या काँक्रीटच्या जंगलात अश्या तालमी पाहायला मिळत नाही, पण अश्या तालमी तयार होतील आणि व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील असेल. 🙏🚩

  • @digambarwankhede8206
    @digambarwankhede8206 Год назад +1

    जय भवानी जय शिवाजी महाराजांचे म
    महान कार्य सुरू ठेवले आहेत धन्यवाद

  • @suniljagtap1514
    @suniljagtap1514 Год назад +5

    🙏🙏🙏 ही कला जिवंत ठेवली,
    तुम्हाला आमचा मानाचा मुजरा.

  • @sanketchavan1480
    @sanketchavan1480 Год назад +37

    Hope your video opens the eyes of state government of Maharashtra🙂.....Thanku for preserving this art,promoting it and making us aware about its efforts to keep it alive even today in this so called 'modern technological world!'

    • @mein3324
      @mein3324 Год назад

      This should be taught to Police and Army. That way we can preserve it.

  • @rahulmane7461
    @rahulmane7461 Год назад +1

    आज आम्हाला आमची स्वतःची लाज वाटते , कारण इतर राज्यांमधील खेळ पाहून वाटायचं की हे दक्षिणेकडील लोकं आपला इतिहास किती जपतात आणि आपण का नाही करत.. ते त्यांचा इतिहास जपण्यात यशस्वी ठरले कारण त्यांनी शालेय अभ्यासक्रमात त्याचा स्वीकार केला आणि महाराष्ट्र राजकारण करण्यातच व्यस्त होता आणि आहे...
    हे कुठंतरी बदललं पाहिजे असा अनुभव आला हा व्हिडिओ बघून...
    खूप धन्यवाद🙏
    भीमराव आंबेडकरांनी सांगितलं होतं की - जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही.....
    आम्ही नाही विसरणार आपला इतिहास..
    जय शिवराज 🙏

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 Год назад

    ग्रेट, अभिमान आहे तुम्हा सर्व मावळ्यांचा

  • @shrikantjogdand8095
    @shrikantjogdand8095 19 дней назад +1

    Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai 🚩🚩

  • @withraje5074
    @withraje5074 Год назад +1

    मला सर्व मर्दानी खेळांच्या गुरुवर्यांचा सार्थ अभिमान आहे. यासाठीच ही कला मी शिकतो आहेच तसंच ती माझ्या मुलीला ही शिकवतो आहे.
    ही कला तुमचे आयुष्य बदलून टाकते तुमच्यात आत्मविश्वास निर्माण करते म्हणूनच ती या तमाम राजकारण्यांना नको आहे 🚩

  • @lalitnikumbh3418
    @lalitnikumbh3418 Год назад +1

    नक्कीच हा वारसा पूढे घेऊन जाण्यास प्रयत्न करू...🥺🚩💯.

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 19 дней назад

    आग पडती पोटात,घाण शिक्षणाच्या मागे पळवला माणूस,गमावून बसलो सगळ्या कला
    राया परत ये रे,आता पुन्हा तुझी गरज आहे.आमच्या महाराष्ट्राला म्लेंच्छ विळखा घालू पाहताहेत.🚩 हर हर महादेव!🚩

  • @बारगीरशिवशंभुंचा

    खुप महत्त्वाचे आहेत शिवकालीन मर्दानी खेळ. जपले पाहीजे.

  • @ganeshmundkar6461
    @ganeshmundkar6461 Год назад

    खुप छान आम्हाला माहिती दिल्या बद्दल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 Год назад +2

    आपले युद्ध कौशल्य, देशी खेळाला प्राधान्य दिले पाहिजे! काय खासियत आहे परदेशी खेळात कोणास ठाऊक? या परदेशी खेळामुळे देशी खेळ लोप पावले . आपल्या खेळाविषयी आपल्यातच अस्मिता राहिलेली दिसत नाही.

  • @ushaingole5988
    @ushaingole5988 19 дней назад

    खूप च सुन्दर माहितीपट आहे।
    शालेत शिकवायलाच पाहिजे।ढोल ताशा सारखे यांचे क्लासेस घ्यायला पाहिजेत। व गणेशोत्सव, कृष्णाश्टमी,दुर्गा पुजा,अशा ऊत्सवात,याचे, प्रयोग व्हायला पाहिजेत।

  • @LokeshDhumal
    @LokeshDhumal День назад

    जय रुद्रमहारौद्रभद्रावतार जय शिवराय👑🚩

  • @sagar1691
    @sagar1691 Год назад +1

    हा व्हिडीओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे

  • @vickypawar3768
    @vickypawar3768 Год назад +22

    आम्हाला शिकवा आम्ही शिकू आणि जपू पण ,पण हितल्या गर्विष्ठ लोकांनी त्यांची ही कला फक्त स्वतः च्य मुलांनाच शिकवली मग ती लोप पावली ,नंतर काय जातपात मुळे तर कायच शिकता अल नाय..नक्कीच आम्ही हा वारसा अनंत कालपर्यंत चालू ठेवू 🙏🙏🙏

    • @bhagyashreepataskar
      @bhagyashreepataskar 19 дней назад +6

      कोण गर्विष्ठ लोक आणि कसल्या जातीपातीच्या गोष्टी करत आहात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि नंतरही अठरापगड जातींचे मराठी मुलखाचे लहान मोठे पराक्रमी योद्धे लढले. भेदभाव आपल्याच मनात असतो.

    • @girishbhoge4212
      @girishbhoge4212 7 дней назад

      कारण देऊन काही नाही होत...आणि जातीचा विषय कोणी काढला आत्ता..ते सांग पाहिलं..😂

    • @girishbhoge4212
      @girishbhoge4212 7 дней назад

      सगळे पवार सारखेच

    • @girishbhoge4212
      @girishbhoge4212 7 дней назад

      Video पूर्ण बघ मग कळेल..अर्धवट

    • @pankajpawar2658
      @pankajpawar2658 6 дней назад

      ​@@girishbhoge4212मी नाही त्यासारखा

  • @yogeshkaulage11
    @yogeshkaulage11 6 дней назад

    Jay shivaray❤❤❤❤

  • @sandeshkamble3200
    @sandeshkamble3200 Год назад +1

    गेली वीस वर्ष मोबाईल वापरतो आहे.पहिल्यांदा असा दर्जेदार व्हिडिओ पहिला.
    विशेष शेवटचा सीन मन भारावून टाकणारा वाटला.राजमाता जिजाऊसाहेब यांची आठवण झाली.
    जय भवानी - जय शिवराय - जय शंभु राजे -जय भीम.🙏⚔️🗡️

  • @malharjoshi6737
    @malharjoshi6737 Год назад +11

    सुंदर, अप्रतिम ♥️ Goosebumps @ 24.41 🔥 जय शिवराय 🚩

  • @akshaykulkarni2573
    @akshaykulkarni2573 Год назад +6

    भन्नाट चित्रकृती... मित्रा खूपच सुंदर ... प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे आणि प्रत्येकाला आलीच पाहिजे अशी ही कला आहे. जय शिवराय 🚩

  • @rameshkhandare5775
    @rameshkhandare5775 Год назад +1

    आपण हा वारसा जपुन पुढच्या पिढीला दिला नक्कीच भविष्यात मर्दानी खेळ लोकांची गरज असेल दुसरा पर्याय नसेल

  • @vinayakghagare3139
    @vinayakghagare3139 19 дней назад +2

    मर्दानी खेळ शालेय अभ्यास क्रमात समाविष्ट झालाच पाहिजे

  • @ashokpandugaikwad116
    @ashokpandugaikwad116 Год назад +1

    खूपच छान माहितीपट.... ठोंबरे दादांनी डोळ्यात पाणी आणले....शेवटी चिमुकली ने तर डॉकयुमेंटरीच्या शिरपेचात तुरा खोवला..... ग्रेट सचिनराव.. भावी चांगल्या कामासाठी शुभेच्छl....

  • @satyajeetpatil4229
    @satyajeetpatil4229 Год назад

    खूप सुंदर 🙏🏻🎉🎊🎊👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dhanashreejagdale1023
    @dhanashreejagdale1023 Год назад +1

    खूप सुंदर . नव्या पिढीला प्रेरणादायी असा व्हिडिओ आहे. धन्यवाद सर .

  • @priyalhitty839
    @priyalhitty839 19 дней назад

    निर्मात्याला शतशः प्रणाम

  • @chandrashekarsarkale6725
    @chandrashekarsarkale6725 Год назад +1

    खरंच निशब्द करुण गेला व्हिडिओ काळजात गलबल होत राहिली.....हि कला जिवंत राहिलीच पाहिजे

  • @shahirshrikantshirke9096
    @shahirshrikantshirke9096 Год назад +1

    आपुल्या घरीच हाल सोसते मराठी....
    शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.....
    लवकरच हे ही करूया माऊली.....
    जय महाराष्ट्र जय शिवराय