८८ वर्षांची माझी आई म्हणते हे पीठ वापरले तर अळू वडी कधीच सुटणार नाही | अळू वडी | Alu Vadi Recipe |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2022
  • ८८ वर्षांची माझी आई म्हणते हे पीठ वापरले तर अळू वडी कधीच सुटणार नाही | अळू वडी | Alu Vadi Recipe |
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    #vaishalideshpande #aluvadi #अळूवडी #aluvadirecipe #aluvadirecipemarathi #breakfastrecipe #वैशाली #वैशालीदेशपांडे #अळूच्यापानांचीवडी #patra #patrarecipe
    Maharashtrat Alu Vadi ha paramparik padarth ahe.Aluchya pannancha wapar karun Alu Vadi keli jate. Aaj aapan hi Alu Vadi banwanar ahot. 88 vardhanchi mazi aai ya Alu Vadya sadhya sopya paddhatine kashya karayachya tr ya video madhr sanganar ahe.
    महाराष्ट्रात अळू वडी हा पारंपरिक पदार्थ आहे.
    अळूच्या पानांचा वापर करून अळू वडी केली जाते. अळू वडी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आज आपणही अळू वडी बनवणार आहोत. ८८ वर्षांची माझी आई या अळू वड्या साध्या सोप्या पद्धतीने कशा करायच्या ते या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे.
    अळू वडी साहित्य आणि प्रमाण :
    (मध्यम आकाराच्या २७ वड्या)
    १० अळू पाने काळ्या देठांची
    १/४ कप चिंच
    १ कप + २ टेबलस्पून पाणी
    १ टीस्पून तीळ
    १ टीस्पून ओवा
    १ टीस्पून धने पावडर
    १ टीस्पून जीरे पावडर
    २ टीस्पून दाण्यांचा कूट
    १/४ टीस्पून हिंग
    १ टीस्पून हळद
    ३ टीस्पून तिखट
    ४ टीस्पून काळा / गोडा मसाला
    १५ टेबलस्पून डाळीचे पीठ
    ४ टेबलस्पून तांदूळ पीठ
    २ टेबलस्पून गहू पीठ
    ४ टेबलस्पून गूळ पावडर
    ३ टेबलस्पून तेल
    मीठ चवीनुसार
    Alu Vadi is a traditional dish in Maharashtra. It is made from leaves of Alu. Today, we are going to make Alu Vadi. In the video, my 88-year-old mother is going to explain how to make this delicious dish in the simplest way.
    Alu Vadi Ingredients and Quantity: (27 Alu Vadis of medium size)
    10 Alu leaves with black stalk
    1/4 cup tamrind
    1 cup + 2 tablespoons water
    1 tea spoon sesame seeds
    1 tea spoon celery seeds
    1 tea spoon coriander powder
    1 tea spoon cumin powder
    2 teaspoons of crushed peanuts
    1/4 tea spoon asafoetida
    1 tea spoon turmeric
    3 tea spoon chili powder
    4 tea spoon black/sweet masala
    15 tablespoons of dal flour
    4 tablespoons of rice flour
    2 tablespoons wheat flour
    4 tablespoons jaggery powder
    3 tablespoons oil
    Salt as per taste requirement
    Topics Covered :
    alu vadi
    alu vadi recipe
    alu vadi recipe in marathi
    alu vadi recipe from leaves
    alu vadi recipe Vaishali
    marathi padartha
    traditional recipe
    अळू वडी
    अळू वडी रेसिपी
    अळू वडी रेसिपी मराठी
    अळूच्या पानांची वडी
    आळू वडी
    आळू वडी रेसिपी
    आळू वडी रेसिपी मराठी
  • ХоббиХобби

Комментарии • 661

  • @archanadahale7483
    @archanadahale7483 Месяц назад +13

    वैशाली ताई खूप छान आहे तुमची आई प्रमाने बोलतात.

  • @vidugandhi1961
    @vidugandhi1961 5 дней назад +2

    फारंच सोप्या शब्दात आणि चांगल्या पध्दती ने आई ची अलूची वडी तयार. थोडा निराळी होती .पण खूपच छान. 🙏🙏🙏

  • @pallavitambulkar7512
    @pallavitambulkar7512 5 дней назад +2

    खरच या किती उत्साही आई आहेत तेही या वयात कौतुक आहे

  • @sheetaljadhav9513
    @sheetaljadhav9513 Год назад +22

    अतिशय सुंदर वैशाली ताई
    आईंकडे बघून फार कौतुक वाटले
    त्यांना परमेश्वर दिर्घायुष्य देओ 🙏

  • @shailavirkar9062
    @shailavirkar9062 7 месяцев назад +15

    तुम्हा दोघींचीही सांगण्याची आणि समजवण्याची पद्धत अतिशय श्रवणीय आणि सुंदर 👌👌👍👍🙏🙏धन्यवाद 🙏

  • @mangalavisave4406
    @mangalavisave4406 7 дней назад +2

    खरच आजींचा या वयातील उत्साह वाखाणण्याजोगा आहे 👌👌

  • @malatishinde9247
    @malatishinde9247 5 дней назад +1

    खूपच छान वड्या बनविण्याची आईची
    पद्धत
    शेवटी जुन ते सोन.👌👌👍👍🌹🌹🙏🙏

  • @shivalipatil4338
    @shivalipatil4338 Год назад +5

    आईना नमस्कार खूप छान दोघींचा बोलणे आवाज गोड

  • @snehankitabhosale3676
    @snehankitabhosale3676 Год назад +8

    आजीनां खूप खूप धन्यवाद 🙏🏻 खूप छान आणि अगदी सर्वांना करता येतील इतक्या सोप्या पद्धतीने अळुवडीची रेसिपी सविस्तरपणे सांगितली, आजींना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻👌🏻👌🏻👌🏻😊

  • @kamalkamble5355
    @kamalkamble5355 7 месяцев назад +4

    खूपच छान वड्यांची रेसिपी झाली ... वैशाली.. आई चा ह्या वयात एवढा उत्साह आहे , खूपच शिकण्या सारखे आहे..... आईचं खूप,खूप आभार आई... धन्यवाद ....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @user-qk4sh9ft8l
    @user-qk4sh9ft8l 3 дня назад

    खूप छान माहिती मिळाली डाळीच्या पीठामध्ये दुसरी पीठ घालतात हे माहीत नव्हते आता ते माहीत झाले खूप छान वडे करून पाहायला हरकत नाही

  • @manjushajoshi3169
    @manjushajoshi3169 11 часов назад

    कुठल्याही क्षेत्रात आपण भरारी मारली, तरीही आईचे मार्गदर्शन केव्हा ही मोलाचे असते. खूपच छान.

  • @sudhirtalegaonkar6627
    @sudhirtalegaonkar6627 29 дней назад +2

    आई ना नमस्कार।।।
    एकदम अप्रतिम रेसिपी दाखवली आहे ।
    धन्यवाद

  • @priyajoshi7723
    @priyajoshi7723 Год назад +7

    फारच छान पद्धधतीने सांगितली कृती वैशालिताई तुमच्या आईने फारच सुंदर

  • @anjaliscorner8223
    @anjaliscorner8223 Год назад +9

    Hat's of काकु तुमचा या वयात उत्साह बघून खूप छान वाटते वैशाली ताई काकु ना असेच निरोगी आयुष्य लाभो ही ईशवरचरणी प्रार्थना

  • @rajpawaskar4548
    @rajpawaskar4548 11 дней назад +1

    खरोखरच आई किती उत्साही आहेत या वयात ही... किती ते बारकाव्यां सहित सांगणं... वाह. वैशालीताई तुम्ही आईला खूपच छान प्रकारे व्यक्त होऊ दिलंय. मुलीचं आईवरचं निस्सीम प्रेमयुक्त आदरही ही दिसून येतोय🙏

  • @oldsongshindi5501
    @oldsongshindi5501 Месяц назад +1

    खूप छान आईला बघितल्यावर माझी आई आठवली.तुम्हाला आईचा सहवास भरपूर लाभो.❤सौ शुभांगी देसाई

  • @saritakulkarni8637
    @saritakulkarni8637 5 дней назад

    तुमची आई, खूप छान आहे!❤

  • @shilpajoshi793
    @shilpajoshi793 14 дней назад +1

    मला छान समजलं, मी या प्रमाणे नक्की करून बघेन. 🙏धन्यवाद आई 🙏

  • @rekhamanjrekar4348
    @rekhamanjrekar4348 3 дня назад

    खुपच छान पध्दत सांगितली आहे.👌👌

  • @vinitapatwardhan3219
    @vinitapatwardhan3219 Год назад +5

    खूप छान! वडीसाठी पानाचा रोल करण्याची पद्धत फार आवडली 👌👍

  • @atuldeshmukh1440
    @atuldeshmukh1440 Год назад +4

    वडी गुंडाळण्याची पद्धत खूप छान वाटली. त्यामुळे पीठ कडेने बाहेर आलं नाही. आजी खरंच great आहेत. उत्साहाने खूप बारकावे सांगितले...तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजींना नमस्कार कळवा🙏....मिसेस देशमुख

  • @VandanaDighe-qw4wd
    @VandanaDighe-qw4wd 9 дней назад

    खुपच सुंदर पध्दत आहे आळुवडी आजीचा उचाह खुपच आहे खुप सुंदर

  • @sunitabapat376
    @sunitabapat376 Год назад +1

    आजी वड्या खूपच छान झाल्या आहेत तुमचा उत्साह पाहून कौतुक वाटतं तुमचा रेसिपी फार छान असतात

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Год назад +7

    खुपच छान 👌 अळुवडी आणि आई खुप छान उत्साही आईला धन्यवाद आणि नमस्कार, नमस्कार, नमस्कार...🌹🙏🙏🙏शुभेच्छा आणि दंडवत.

  • @mukundphanasalkar3887
    @mukundphanasalkar3887 Год назад +2

    खूपच छान! आणि मायलेकींमधला संवादही खूप हृद्य आहे! मला मी माझ्या आईशी तिच्या शेवटच्या आजारपणात वगैरे बोलायचो त्याची आठवण झाली. तुमच्या आवाजात व्यक्त होणारी आत्मीयता आणि त्यांच्या वयोमानानुसार वाटणारी त्यांची काळजी जाणवते, तीही फार छान आहे...

  • @manishadeshpande4431
    @manishadeshpande4431 Год назад +12

    खूप छान पद्धतीने सांगितले ताई , व काकूंचे खूप कौतुक वाटले या वयात सुद्धा इतका उत्साह ...नमस्कार🙏

  • @neetagokhale7543
    @neetagokhale7543 6 месяцев назад +1

    खरच 88 व्या वर्षी एवढा उत्साह, एनर्जी ....नमस्कार

  • @rajanivader6191
    @rajanivader6191 Год назад

    Masth vadya.mouth watering.

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke Месяц назад +2

    The great... खरेच. Vashali Tai tumhi khup lucky ahat... Ashi आईं तुम्हाला दीर्घकाळ लाभली आहे... त्यांचा सहवास तुम्हाला असा च भरपूर लाभुदे.हीच प्रार्थना.

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 6 месяцев назад +1

    आई तुम्ही या वया मध्ये सुद्धा कीती उत्सुक आहेत कीती छान अळु वडी बनवली 😊 खुप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद आई ताई खुप छान आई सोबत शेअर करत आहे आभारी आहे

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 10 месяцев назад +1

    रेसिपी छानच समजून सांगितली
    धन्यवाद आजी आणि ताई

  • @sangeetakhale1937
    @sangeetakhale1937 Год назад +1

    वैशाली ताई व आईंचे खूप आभार ! अप्रतिम रेसिपी !

  • @neelimakale2569
    @neelimakale2569 10 дней назад

    खुप छान अळूची वडीची पद्धत. मायलेकींच्या मधील coordination खुपच सुंदर. ❤❤❤

  • @nishadalvi2507
    @nishadalvi2507 8 дней назад

    भाग्यवान माय लेक!....आईचे प्रेम,आणि सुगरणपणा असाच मुरवत जातो.खूप गोड वाटले सारे प्रेमळ नाते पाहुन.आईची साथ अशी लाभणं भाग्य थोर खरे.आम्ही हे छत्र तीन वर्षातच हरवुन बसलो....चविष्ठ खमंग आळुवडी.❤🎉😢

  • @manishaprabhudesai7077
    @manishaprabhudesai7077 День назад

    आई आणि मुलगी खूप गोड आणि समजुतीने बोलतात
    मी आपण सांगितल्याप्रमाणे अळू वडी करत आहे
    आम्ही कणिक घालत नव्हतो 🙏👍

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 Год назад +1

    वड्या करायची पद्धत तुमच्या आईने खूप छान करून दाखवले त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा ,

  • @manjushakedari8696
    @manjushakedari8696 Месяц назад

    आजीनीं खुप छान आळु वडी करून दाखवली आहे या वयात खुपचं कमाल आहे. ❤❤

  • @mandakinikanawade9659
    @mandakinikanawade9659 9 дней назад +1

    सांगण्याची पद्धत फारच छान 👌🤘

  • @chetanpai8150
    @chetanpai8150 Месяц назад

    Apart from energy of Aai, her innocent character , (which is lost after this generation ) and so loving conversation by daughter to mother. Is amazing. माझा दोघानाही आदर्पुर्वक् नमस्कार् . चेतन् पै

  • @sangeetahanamshet1241
    @sangeetahanamshet1241 Год назад

    आईंनी खूप छान पद्धतीने अळू वडी बांधायला शिकवलं आहे आता करताना अशाप्रकारे करेन, छान घट्ट बांधली गेली, धन्यवाद ❤

  • @mitalibane8991
    @mitalibane8991 Год назад +5

    हा vedio बघताना खूप भरून आले. त्यांच्या कडून करवून घेतानाची पद्धत खूपच छान आहे. दोघांमधील संवाद ऐकताना माय लेकितील अतूट नात्याचा परिचय आला डोळ्यात पाणी आले. माझ्या आईची आठवण झाली. हा video मी फक्त माय लेकितील नात्याचा उत्तम नमुना म्हणून पाहते/ऐकते.रेसिपीकडेलक्ष कमी आणि संवादाकडे जास्त लक्ष. सद्यस्थितीत वृद्धांशी कसे वागावे त्यांना समजून घेणे व त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काय करावे याचा उत्तम नमुना म्हणजे हा vedio आहे. प्रत्येकाला पाहिलाच पाहिजे.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  Год назад

      🙏

    • @chitramalkhare716
      @chitramalkhare716 Год назад

      @@VaishaliDeshpande Chitra Malkhare. Vaishalitai alu vadi recipe khup chhan. tumha doghincha sanvad mastch.

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 Год назад +2

    रेसिपी सांगण्याची पद्धत खूप आवडली.

  • @mangalavisave4406
    @mangalavisave4406 7 дней назад

    आपले मायलेकीचा उत्साह, सहवास, प्रेम पाहून हेवा वाटला.सर्वांच्या नशीबात नसते. आम्ही आईच्या प्रेमाला 15 वर्षा पासुन मुकलो.

  • @snehalshaligram4107
    @snehalshaligram4107 10 дней назад

    आईंनी वडयांची रेसिपी खूप सुंदर समजवून सांगितली.आईंना खूप धन्यवाद व नमस्कार .❤

  • @SugandhaGujar-lz2hz
    @SugandhaGujar-lz2hz 21 день назад

    एकदम भारी आहेत वड्या आणि सोप्पी पद्धत

  • @fatgalfatty9802
    @fatgalfatty9802 4 дня назад

    Aajina khup khup dhanyavad..
    Khup chan aaluvadi.

  • @sangeetadalvi32
    @sangeetadalvi32 Год назад +4

    किती सुंदर केल्या आहेत वड्या. आईना नमस्कार.त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो.

    • @sangeetakarande7080
      @sangeetakarande7080 Год назад

      Sz, the first one was in s a day is in e eeeeeee indkujkm eeeee week weeeeeeeeeeee w a

  • @shyamalashetti7105
    @shyamalashetti7105 Год назад +1

    खुप छान पद्धतीने समजावून सांगितले.

  • @sanmanchavan7565
    @sanmanchavan7565 Год назад

    Aprateem recipie aaina thsnks

  • @arunaphatak880
    @arunaphatak880 11 месяцев назад +1

    अळूवडया अतिशय सुंदर झालेल्या दिसत आहेत. खूप खूप धन्यवाद मावशी..❤🎉🎉😂😊

  • @user-bg2me2pk7e
    @user-bg2me2pk7e 16 дней назад

    वैशाली ताई अतिशय उत्तम रित्या सांगितले स्टेप बाय स्टेप खूप छान

  • @chaskarmukund
    @chaskarmukund Месяц назад

    मी करून पाहिल्या ताई ,फारच छान झाल्या.आजिना खूप धन्यवाद! आणि तुम्हाला सुध्दा!

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 Год назад

    खुप खुप खुप छान आजी धन्यवाद रेसिपी छान सांगितली

  • @yatinghatkar4198
    @yatinghatkar4198 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर रेसीपी आहे,ताई तुमच्या आई साक्षात अन्नपूर्णा देवी आहेत,अगदी सुरेख पदार्थ करण्याचा त्यांचा हातखंडा आहे, ह्याला तोड नाही शेवटी एवढ्या वर्षांचा त्याचा स्वयंपाक घरातला अनुभव दांडगा आहे,

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  5 месяцев назад

      धन्यवाद

    • @sudhalomate7870
      @sudhalomate7870 18 дней назад

      अळूवडी खूपच छान मस्तच आजीला नमस्कार

  • @mugdhamalvankar1763
    @mugdhamalvankar1763 Год назад

    खूप छान व उपयुक्त माहिती. अनुभवी व्यक्ती चे मार्गदर्शन व लहान बारकावे खूप उपयुक्त ठरतात मला पण अळूवडी छान बनवता येत नव्हती ।आता मी प्रयत्न करीन। दोघींचे आभार व आईला व आपल्याला उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना

  • @mrshantanu9751
    @mrshantanu9751 Год назад +1

    वैशाली ताई hats off आई च्या एवढ्या वयात खुप सूंदर आता अस्या रेसिपी पाहायला मिलत नाही

  • @bhagwanjoshi2112
    @bhagwanjoshi2112 Год назад

    वैशाली ताई तुमच्या रेसिपी खूप खूप छान असतात मी त्या डाऊन लोड करुन ठेवते

  • @sarojkasote2000
    @sarojkasote2000 Год назад

    खूप सुंदर आहे,घरी करणार, धन्यवाद,

  • @bhaiyyasalve1810
    @bhaiyyasalve1810 Год назад

    खुप छान वड्या झाल्यात फार चवीष्ट सांगीतल्या बदल धन्यवाद आजी

  • @deepalisohani9728
    @deepalisohani9728 Год назад

    वाह खूप छान रेसिपी समजाऊन सांगितली आहे आणि आजीना नंमस्कार

  • @swapnaliponkshe5266
    @swapnaliponkshe5266 Год назад +1

    आजी नमस्कार,तुमचा उत्साह आणि ऊर्जा बघूनच पदार्थ करून बघण्याची इच्छा निर्माण होते.तुम्ही ज्या काही छोट्या टिप्स देता त्या खरच खूप उपयोगी असतात.तुम्हाला बघून मला पण माझ्या आजीची आठवण येते ती पण अशीच उत्साही असायची.

  • @sangeetpremi55
    @sangeetpremi55 Год назад

    खूप छान zalya आहे आलू vadi एकदम मस्त

  • @meenalkandharkar3579
    @meenalkandharkar3579 Год назад +1

    आई ना नमस्कार खूपच छान सांगितले धन्यवाद .

  • @lilyhatiskar1246
    @lilyhatiskar1246 Год назад +1

    फार सुंदर अप्रतिम 👌👍

  • @praganashah8177
    @praganashah8177 Год назад +2

    खूप छान आणि अगदी व्यवस्थित माहिती पण सांगितली.खूप मधुर आवाजात शांत पणे आणि संयमाने..,धन्यवाद🙏

  • @smitajadhav5874
    @smitajadhav5874 5 месяцев назад

    खुपच छान अळुवडी आवडली रेसिपी छान समजावून सांगितले ट्राय करीन 👌👌

  • @arunasapkale7073
    @arunasapkale7073 Год назад +1

    आजीचा या वयातला उत्साह खरचं दांडगा आहे. खूपच सुगरण आहे.त्यांना साष्टांग दंडवत.

  • @manishavaze5782
    @manishavaze5782 7 дней назад

    Namaskar khup chan पद्धत अळू वडी करण्याची

  • @backdevil0709
    @backdevil0709 22 дня назад +2

    लोखंडाच्या तव्यावर खूप छान भाजतात ताई आजींनी खुप छान रेसिपी सांगितली

  • @arunasurve2256
    @arunasurve2256 14 дней назад

    तुम्ही इतकं प्रेमळ बोलता की ऐकतच रहाव अस छान बोलणे आणि सुंदर व्हिडीओ. फेव्हरेट झाला. 🙏🏻🌹

  • @shalinijogdeo6682
    @shalinijogdeo6682 Месяц назад

    आजी पाहूनच दिसते छान झाल्या आहेत. तुमच्या उत्साहाला नमस्कार🎉

  • @bhaiyyasalve1810
    @bhaiyyasalve1810 Год назад +2

    आई ला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत आहे

  • @vidyavatinair6327
    @vidyavatinair6327 Год назад +5

    God Bless your mother and you also for your excellence in preparation of delicious dishes 🙏

  • @annapat5638
    @annapat5638 Год назад

    गव्हाचे पीठ अळूवडी वापरल्याने ती तुटत नाही.
    हे पहिल्यांदाच मी ऐकले.
    अप्रतिम अळूवडी रेसिपी 👌👌🙏🌹

  • @ashwinidiwekar2227
    @ashwinidiwekar2227 Месяц назад

    आपली अळू वडी करायची पद्धत मला आवडली,,, मी नक्की करून बघेन

  • @mrunaliniwalawalkar5142
    @mrunaliniwalawalkar5142 Год назад +2

    Ekman masta 👌👌

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 Год назад

    खूप छान माहिती आहे

  • @dadasahebnalawade4914
    @dadasahebnalawade4914 Год назад

    आजीने फारच छान पध्द्तीने आळु वडी करावयास शिकवली आहे आजीचे मनापासून आभार.

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Год назад

    Yummy crispy.. heldhy vadhya 🙏🙏

  • @user-yb3of4mv2y
    @user-yb3of4mv2y День назад

    🙏 आईसाहेब, तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार!!🙏

  • @user-vs9qc8rw3y
    @user-vs9qc8rw3y 11 месяцев назад

    अगदी आम्ही करतो तशाच आईने बनवल्या खूप खूप धन्यवाद ही पध्दत आजवर कोणीच दाखवली नव्हती कसेही दाखवत होते तेव्हा अक्षरशः हसू येत होते मस्तच पण मी केळीचे पान किवा हळदीचे पान ठेवते मी आताच बनवल्या जन्माष्टमीच्या निमित्ताने 😊😊😊

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 11 месяцев назад +1

    Mam aaji has shown us this rec very nicely.we need lot of patience to do all this.aaji is very great.may god bless her.we must kearn from her.thanku aaji

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 Год назад +4

    Apratim aluvadi👌👌👌👌
    Aaina 🙏

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 Год назад

    फारच स्वादिष्ट वाटते।

  • @saloninevagi5601
    @saloninevagi5601 Год назад

    वैशाली ताई मी ही रेसिपी डाऊन लोड. करून ठेवली आहे. धन्यावाद कारण मीही माझ्या आईकडून शिकून घेतली नव्हती. आता माझी आई नाही आहे. पण सेम तिच्यासारखी टेस्ट मला या रेसिपी मध्ये मिळाली.

  • @chitrabhagwat4554
    @chitrabhagwat4554 Год назад +1

    आईंना नमस्कार.या वयात वड्या दाखवल्या कौतुकास्पद आहे.तुम्हाला. खूप वर्ष त्यांचा सहवास लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @aryangupte
    @aryangupte Год назад

    आजींनी वड्या न सुट्याण्यासाठी छान टीप दिली आहे
    धन्यवाद आजींना 🙏

  • @colourful12300
    @colourful12300 Год назад +5

    अगदी निगुतीने केली अळु वडी भारी🙏😍

  • @neetagawade4461
    @neetagawade4461 Год назад

    धन्यवाद आजी

  • @hrk3212
    @hrk3212 Год назад

    खूप छान आणि तुम्ही तिघी खूप छान recipes दाखवतात.

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Год назад

    Mastcha Thank you so much।agdi nitas।

  • @meeraitraj1848
    @meeraitraj1848 Год назад

    खूप छान दिसतायत वड्या
    खमंग पण असतील नक्की करून बघेन

  • @sujataaukirkar4608
    @sujataaukirkar4608 Год назад

    छान टीप्स सांगितल्या काकी मस्तच 👌👍

  • @sumitrakambli8873
    @sumitrakambli8873 16 дней назад

    Khup chan

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 9 дней назад

    फारच सुंदर माहिती मिळाली. छान रेसिपी. ❤ आई नमस्कार 😊

  • @balkrushnaraut9898
    @balkrushnaraut9898 Год назад

    फारच सुंदर आळू वड्या वआई,मुलीचा संवाद.👌

  • @umashingvi1770
    @umashingvi1770 7 дней назад

    Khup sunder

  • @gauripimputkar7977
    @gauripimputkar7977 Год назад +3

    तुमच्या आईच्या या वयात ला उत्साह बघून आनंद झाला आई ला निरोगी आरोग्य लाभो

  • @bharatibhide9281
    @bharatibhide9281 Год назад +2

    Khupch chhan 👌🙏 kaku