जुगलबंदी - Alphabet आणि बाराखडीची!! | Incredible मराठी | भाग- ३३

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 дек 2024

Комментарии • 93

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 10 дней назад

    खूप छान आणि सुंदर. माहितीपूर्ण. अशाच आणखीन माहितीपूर्ण भागांची निर्मिती करावी ही विनंती. खूप छान.
    *#मराठी*

  • @viveknaralkar6007
    @viveknaralkar6007 27 дней назад +3

    शाळेत इतक्या सहज आणि सुंदर भाषेत कोणी सांगितले नव्हते.माझ्या वयाच्या या टप्यावर ते समजायला ही सोपे आहे. प्राथमिक शाळेत हे सर्व किती ' समजले ' असते .. ही शंका वाटते. दोघींचे सर्व व्हिडिओज मी नियमित बघतो. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा...❤

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 18 дней назад

    खूपच छान आणि माहितीपूर्ण सादरीकरण .... खूपच आवडला आजचा भाग🥰🥰🥰
    ज्ञ - ज् +ञ् + अ

  • @HiteshPatil-dg2ls
    @HiteshPatil-dg2ls 28 дней назад +4

    तुम्ही हे खूप interesting करून ठेवलंय. हा एक खूप खोल विषय आहे अभ्यासासाठी. त्यासाठी मी आता संस्कृत आणि मराठीचा अभ्यास करायचं ठरवलंय.

  • @jyotinaik3081
    @jyotinaik3081 28 дней назад +2

    ज्ञानात भर आणि वर्णमालेचे ज्ञान
    तुमचा प्रयत्न खूप खूप छान खूप आभार

  • @milindkarnik2104
    @milindkarnik2104 27 дней назад +1

    आपल्या समृध्द मराठी भाषेचे विविध पैलू असेच सांगत रहा. शालेय जीवनात शिकलेल्या बर्‍याच गोष्टी आता विस्मरणात गेल्या सारख्या वाटतात. त्यांना उजाळा देत रहा.

  • @shashikantlandge4909
    @shashikantlandge4909 27 дней назад +1

    Khup chaan mahiti ahe... Amhala shudhalekhanachya niyamanchi malikahi pahayala khup awadel...

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 27 дней назад +1

    भाषेविषयीचं आपले हे विचार, चिंतन फार मोलाचं आणि रंजकही आहे. ऐसेही लगे रहो मुन्नाभाय!

  • @abhishekjoshi4425
    @abhishekjoshi4425 28 дней назад +2

    तुमचा प्रत्येक भाग पाहून दरवेळेस आम्हाला खूप सुंदर माहिती मिळते धन्यवाद😊

  • @PravinAmbardekar
    @PravinAmbardekar 23 дня назад

    उत्तम माहिती. अजूनही काही बर्‍याच प्रमाणात अस्खलित मराठी बोलणारे (आणि काही प्रमाणात लिहीणारे) आहेत हे पाहून आणि ऐकून आनंद झाला. नाहीतर ह्या युट्यूब वर, जातायत, पोलखोल, लेखाजोखा, इत्यादि शब्द वाचावे आणि ऐकावे लागतात.

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 28 дней назад +2

    फारच छान वर्ण मालेची ओळख करून दिलीत असेच व्हिडिओ येत राहो. 🙏

  • @gurunathgawade6746
    @gurunathgawade6746 20 дней назад +1

    मराठी बाराखडी आज नवीन पद्धतीने समजली.❤❤

  • @akshay5823
    @akshay5823 28 дней назад +2

    माहितीपूर्ण विवेचन ❤

  • @ganeshshelar3079
    @ganeshshelar3079 18 дней назад

    Khup chaan 👌

  • @जयश्रीराम-ब2भ
    @जयश्रीराम-ब2भ 28 дней назад +1

    वाह किती सुंदर माहिती ताई आणि समीरा. ही वर्णमाला इतके सोप्या भाषेत समजावून सांगत खूप छान काम केले आहे. आपले प्रत्येक एपिसोड एका पेक्षा एक असतात. हा प्रवास निरंतर चालू राहू दे. मराठी भाषा माणसाला का समृद्ध करते हे या भागावरून कळते. खूप उशीर लावला आपल्या भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी. पण हे तुम्ही जोमाने पुढे नेत आहात. खूप अभिनंदन. ❤️🙏
    कार्यबाहुल्यामुळे 😅 खूप छान उदाहरण.

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 26 дней назад +2

    अतिशय मनोरंजक आणि अभ्यासपुर्ण माहिती 👏

  • @Onkarkadale1248
    @Onkarkadale1248 14 дней назад

    आपुल्या मायमराठी बद्दल अशी अभ्यासपूर्ण माहिती ऐकायला नेहमी आवडेल.
    Thank you!

  • @sangeetarane4944
    @sangeetarane4944 28 дней назад +1

    खूप सुंदर👌 पुढील भागांची वाट पहात आहोत. ❤

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 28 дней назад +1

    खूपच सुंदर 👌👌

  • @mankhidki001
    @mankhidki001 24 дня назад

    छान वाटला हा भाग.

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 7 дней назад

    शाब्बास " समिरा" " मराठी भाषेला जागतीक भाषेचा दर्जा मिळायलाच हवा पण आधी ही " मराठी भाषा व्याकरणांसहीत बोलणं आणि समजुन घेणं आवश्यक आहे.तुझं अभिनंदन.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 28 дней назад +2

    मला इतर भाषांविषयी माहिती नाही पण मराठी भाषेची ( व कदाचित गुजराती) वर्णमाला ही जगातील सर्वश्रेष्ठ व परिपूर्ण वर्णमाला असावी. कारण जगातील कोणत्याही भाषेतील शब्दाचा उच्चार फक्त मराठी भाषेत लिहिता येऊ शकतो असे मला वाटते. आपण मोडी लिपी सोडून देवनागरी लिपीचा स्विकार का व कधी केला ह्याचा थोडक्यात इतिहास सांगितला असता तर व्हिडिओ अधिक माहितीपूर्ण झाला असता.

  • @Kiran.Jadhav
    @Kiran.Jadhav 28 дней назад

    खूप सुंदर ताई खूप छान खरच ज्ञानात भर पडली.... बालक पालक वरती अजून व्हिडिओ बनवा आणि मार्गदर्शन करत रहा

  • @Mm-t5i
    @Mm-t5i 25 дней назад

    Great work

  • @swaroopnashikkar5611
    @swaroopnashikkar5611 28 дней назад

    अप्रतिम 🎉 खूप छान माहिती आहे

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 28 дней назад

    खूप सुंदर माहिती दिली आहे

  • @hemantjoshi6435
    @hemantjoshi6435 26 дней назад

    सुंदर आणि मनोरंजक

  • @chitrapendse
    @chitrapendse 28 дней назад

    हा भाग नक्कीच आवडला, असेच पुढील भाग पहायला आवडेल. धन्यवाद समिरा. 🙏

  • @pragatiranade7002
    @pragatiranade7002 25 дней назад

    Khup chan 👏

  • @jayashripatil9861
    @jayashripatil9861 28 дней назад +2

    अत्यंत समर्पक माहिती. "ळ" वर्ण मराठी वर्णमालेत कोठून आला, याबद्दल माहिती मिळेल तर बरे होईल

  • @123Punekar
    @123Punekar 26 дней назад +1

    आपल्या भाषा या *मौखिक* आहेत आणि पाश्चात्य भाषा या *लिखित* विकसित केल्या गेल्या आहेत ऱ्हस्व मजला ऱ्ह आणि हृदया मधला हृ याचे उच्चार आणि लेखनातला फरक कळला की काय म्हणायचे ते कळेल

  • @Prasad21723
    @Prasad21723 28 дней назад

    खूप छान माहिती

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 28 дней назад

    खूपच छान माहिती 👌👌🚩

  • @MAP573
    @MAP573 27 дней назад

    खुप छान

  • @Anonymous3008
    @Anonymous3008 28 дней назад

    खूप छान माहिती 🎉❤

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 26 дней назад

    🎉 खूप छान

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 28 дней назад

    फारच छान!

  • @taranathrege164
    @taranathrege164 28 дней назад

    वा छान उजळणी झाली.

  • @mindit3
    @mindit3 22 дня назад

    😊👌👌👌

  • @anjalimarathe8984
    @anjalimarathe8984 27 дней назад

    सुदंर माहिती आहे

  • @swatijmusicals...harmonica5479
    @swatijmusicals...harmonica5479 28 дней назад

    Khup chaan🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @vandanajoashi4296
    @vandanajoashi4296 13 дней назад

    Nakkich pudhache bhag Kara (Devnagrit type kelai)😀

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 28 дней назад +1

    मराठी भाषेच्या व्याकरणाची पूर्ण माहिती देणारी एक संपूर्ण मालिका करावी.

  • @latapethe8047
    @latapethe8047 28 дней назад +1

    Jya lokana marathi bhashe badal aavad ahe tyanchya sathi khupch chan pn Namskar yevji hi bro bolnarya lokana Avghad ahe ho na😂
    Dhanyavaad❤❤

  • @vanashrichimote1311
    @vanashrichimote1311 28 дней назад +1

    भाषे ची गंमत कळली. पुढील भाग लवकर येऊ द्या.

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 28 дней назад

    हो… मस्त

  • @rameshkamble2910
    @rameshkamble2910 26 дней назад

    मराठी.मर्हाठी .महारठठी. महाराष्ट्री.अभिजात आनंद .अभिनंदन

  • @nageshtendolkar4588
    @nageshtendolkar4588 28 дней назад

    छान समीरा ताई,चालू ठेवा महा यज्ञ ❤

  • @sujatalimaye6814
    @sujatalimaye6814 26 дней назад

    शुद्धलेखनाचे नियम नक्कीच आवडतील

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 28 дней назад

    नक्की आवडेल.

  • @vaishalipatil9440
    @vaishalipatil9440 28 дней назад

    Khup sundar samira ❤
    मी रोहा ची ..love you dear.... स्तुत्य उपक्रम घेतला आहे तुम्ही दोघींनी..❤

  • @OmkarDeole
    @OmkarDeole 27 дней назад

    वाह ❤

  • @PadmajaLimaye
    @PadmajaLimaye 27 дней назад

    👍

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 28 дней назад

    खुप छान माहिती तुमच्या दोघींकडून मिळत असते
    धन्यवाद ं

  • @geetakulkarni3670
    @geetakulkarni3670 21 день назад +2

    बाराखडी चे विवेचन छान केलं आहे ,पण संस्कृत मध्ये ळ व्यंजन आहे ना! ऋग्वेदातील प्रथम श्लोकाची सुरुवातच अग्निमिळे पुरो हितम् ने आहे ना! जय श्री कृष्ण

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 20 дней назад

      वैदिक वर्णमाल्रा में मुख्यतः १७ अक्षर हैं | इन १७ में जितने अक्षर केवल प्रयत्न अर्थात्‌ मुख और जिह्वा के इधर उधर हिलाने, सिकोड़ने और फैलाने से बोले जाते हैं और किसी विशेष स्थान से सम्बन्ध नहीं रखते, उन्हें 'स्वर' कहते हैं और जिनके उच्चारण में स्थान और प्रयत्न दोनों की सहायता लेनी पड़ती है, उन्हें व्यञ्जन' कहते हैं | अ, इ, उ, ऋ और लृ स्वर हैं, क, ग, च, ज, ट, ड, त, द, प, ब व्यञ्जन हैं और अनुस्वार तथा विसर्ग मध्यस्थ हैं | यही १७ अक्षर परस्पर के मिश्रण और संयोग से ६४ प्रकार के हो गये हैं । अ, आ, से आ और आ, अ से आ३ प्लुत बना है | इसी तरह इ, उ, ऋ और लृ का भी विस्तार है । हस्व, दीर्घ और प्लुत भेद से इनके तीन तीन रूप हो जाते हैं | इसलिए अ से लृ तक इनकी संख्या १५ है और ए, ए३, ऐ, ऐ३, ओ, ओ३, औ, औ३ और अं, अः मिलकर सब स्वरों की संख्या २५ होती है | इनमें अ, इ, उ, ऋ और लृ स्वतन्त्र हैं | परन्तु ए, ऐ, ओ, औ, अं, अः मिश्रित हैं। अ और इ के मिश्रण से ए, आ और इ के मिश्रण से ऐ, अ और उ के मिश्रण से ओ तथा आ और ऊ के मिश्रण से औ बना है | इसी तरह अ और 'से अं तथा अ और : से आः बना है | ञ, ण, न, ङ, म, ᳬं और आदि समस्त सानुनासिक वर्ण अनुस्वार से और ह, स, श, ष आदि वर्ण विसर्गों से ही बने हैं | विसर्गों में 'अ' जोड़ने से 'ह” बन जाता है, ह अर्थात्‌ विसर्गों का ही 'स' हो जाता है और यही 'स' टवर्ग के साथ होने से 'ष' तथा चवर्ग के साथ होने से 'श' हो जाता है | क, ग, च, ज, ट, ड, त, द, प और ब में ह' जोड़ने से क्रम से ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ और भ हो जाते हैं |
      इ-अ मिलकर 'य', ऋ-अ मिलकर र', लृ - अ मिलकर 'ल' और उ-अ मिलकर व' बना है । इसी तरह क-ष से 'क्ष', त-र से 'त्र और ज-ञ से 'ज्ञ' भी बना है। इस प्रकार से २५ स्वर के, २५ वर्ग के और (य, व, र, ल, श, ष, स, ह, क्ष, त्र, ज्ञ, ᳬं और ळ आदि) १३ स्फुट के मिलाकर ६३ अक्षर होते हैं। इन्हीं में एक अर्धचन्द्र शामिल करने से ६४ हो जाते हैं | इसीलिए पाणिनीय शिक्षा में लिखा है कि त्रिषष्टि: चतुःरषष्टिर्वा वर्णा: शम्भुमते मताः । अर्थात्‌ शम्भु परमात्मा के वैदिक मत के वर्ण ६३ या ६४ हैं ” (वैदिकसम्पत्ति, अक्षरार्थ और लिपि - पृ० २०४) ।

  • @vidyapikle2011
    @vidyapikle2011 21 день назад

    ❤🎉

  • @akashkuldharan7593
    @akashkuldharan7593 28 дней назад +3

    कधीतरी न आणि ण विषयी ही सांगा

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 28 дней назад

    हो, अगदी नक्की पुढचे भाग करा.

  • @aditiphadke5034
    @aditiphadke5034 26 дней назад

    शुद्धलेखनाचे नियम यावर नक्की मालिका तयार करा

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 26 дней назад

    नमस्कार.ताई.खूपच मजा आली.शाळा सोडून 50 वर्ष झाली,पण मातृभाषेतून शिकल्यामुळे नियम लक्षातच घ्यावे लागले नाहीत.बालपण सहज सुंदर होते.आज मुलांना जागतिक स्तरावर स्पर्धांना तोंड द्यावे लागत आहे.म्हणून इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे अपरिहार्य आहे.पण मराठी काय किंवा इंग्लिश काय मातृभाषा नसताना शिकणे खूपच कठीण आहे.कारण बरोबर अर्थ समजून घेतला नाही तर , कर जोडून नमस्कार कर. म्हणजे काय ?धन्यवाद.चांगला उपक्रम आहे.

  • @alpeshnarendramalve1243
    @alpeshnarendramalve1243 28 дней назад

    Nice

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 28 дней назад

    मराठी भाषेविषयी माहित नसलेली माहिती ऐकायला आवडेल👍👍
    नक्की यावर व्हिडिओ बनवा.

  • @laxmikantdesai4702
    @laxmikantdesai4702 27 дней назад +1

    🇮🇳🙏 बाकी सर्व ठिक. पण संस्कृत मध्ये "ळ" आहे बर का! 🙏🇮🇳

  • @prabhakarkadam8752
    @prabhakarkadam8752 28 дней назад

    भेटला आणि मिळाला
    हे कधी बोलावे तसेच यातील फरक यावरही सांगा परत कधीतरी .

  • @parjanyashukla176
    @parjanyashukla176 26 дней назад +1

    बतौर हिंदी भाषी मेरा मराठी भाषियों से अनुरोध है कि अंग्रेज़ी के दो स्वर ae, o - जैसे bat, cat, ball, call - यदि संभव हो तो इन्हें मराठी से निकाल दें ।
    ये दो स्वर पिशाची हैं ।
    और दूसरा यह कि "फ" का उच्चारण सबसे अधिक त्रुटियुक्त महाराष्ट्र और गुजरात में होता है । यह "f" ध्वनि नहीं है, शुद्ध "p" + 'h' है - इसमें कोई घर्षण नहीं होगा ।

  • @shamikadivekar4587
    @shamikadivekar4587 28 дней назад +2

    टाळ्याला जीभ लावून म्हटलं पाहिजे, टाळू हा शब्द डोक्याशी संबंधित आहे

  • @swatijmusicals...harmonica5479
    @swatijmusicals...harmonica5479 28 дней назад

    Nakki awadtil shudhhalekhanache niyam

  • @MrGuneshp
    @MrGuneshp 27 дней назад

    Thoda ru ani lu baddal sanga na

  • @Sivaba861
    @Sivaba861 6 дней назад

    I dont feel any differnt .because all northen languages same alphabat.bases in sanskrit..

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 26 дней назад +1

    जपानी, फ्रेंच, स्पॅनिश हे कुठे इंग्रजी ला ज्ञान भाषा म्हणून वापरतात? आपणच का हि समजूत करून घेतली आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिली ते बारावी मराठी भाषा शिकवली पाहिजे.आणि इंग्रजीमुळे किती तरी मुलांचं वर्ष तरी वाया जाते किंवा टक्के तरी कमी होतात.
    भाषा संपली की संस्कृती संपणार 😢 विचार करवत नाही.इंग्रजी माध्यमाच्या शाळा झपाट्याने वाढत आहेत आणि मराठी माध्यमाच्या शाळा तसेच ग्रंथालयं बंद पडत आहेत.

  • @2009first
    @2009first 27 дней назад +2

    छान विवेचन. पण बोलण्याच्या ओघात “मराठी भाषेत लिहितो” असा उल्लेख झाला आहे. लिपीबद्दल बोलताना तरी किमान याची काळजी घ्यायला हवी.
    मराठीतला ज्ञ चा उच्चार द्+न्+य होत असला तरीही व्याकरणाच्या दृष्टीने तो ज्+ञ् असाच आहे. त्यामुळे ती चूकही सुधारावी.

  • @HiteshPatil-dg2ls
    @HiteshPatil-dg2ls 28 дней назад +1

    पण बाराखडीमध्ये तूम्ही ॏ म्हणजेच कै ह्या अक्षराचा समावेश केलेला नाही. ते जरा योग्य करून घ्या.

  • @rohantikekar170
    @rohantikekar170 28 дней назад

    Mo r

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 28 дней назад +7

    काहीही थापा मारताय का? संस्कृत मध्ये म्हणे ळ नाही!!! अहो ताई वेदांमध्ये अग्निमिळे हा शब्द अगदी सुरुवातीला येतो..अगदी स्पष्ट ळ !!!

    • @akanksharodage7046
      @akanksharodage7046 28 дней назад +7

      "अग्निमिळे" मधील ळ व्याकरणाच्या काही नियमामुळे झाला आहे...अग्निमिडे असा शब्द असून ड चा ळ झाला आहे.. वैदिक व्याकरणात हे अढळते...

    • @chitrapendse
      @chitrapendse 28 дней назад

      🙏​@@akanksharodage7046

    • @madhavisamant4517
      @madhavisamant4517 27 дней назад

      अगदी बरोबर...

    • @pankajgogte7618
      @pankajgogte7618 27 дней назад +3

      डॉ समीरा गुजर या भाषा तज्ज्ञ आहेत, लिहिताना तारतम्य बाळगा.

    • @kanchanrajadhysksha471
      @kanchanrajadhysksha471 27 дней назад +2

      खर आहे ! आपल्याला माहित नसेल तर हे असलं लिहिण्याआधी नीट माहिती काढा !