मी आणि माझे मित्र लहानपणी या किल्यावर बोरं किंवा ब्याटसाठी पाळे आणायला जायचो, किल्ल्याचा सखोल अभ्यास नसला तरी किल्ला आणि शिवाजी महाराज असे अतूट समिकरण आहे त्यामूळे वरिल किल्याची स्तिती पहाता किल्ल्याचा नव्हे तर स्वराज संस्थापक शिवरायांच्या अस्तित्वाची दुर्दशाच अशी खंत मला मनी व्यस्त करायची. मग तो भकास किल्ला काय म्हणत असेल ते किल्ल्याचे आत्मकथन माझ्या खालील 30 वर्षापुर्वीच्या रचने मधे कथन केले आहे. एक किल्ला एक किल्ला पच्छिम सागराच्या कुशित झुडपांच्या गर्दित पारंब्याच्या विळख्यात अधून मधून डोकावत चरफटत तिश्टत अधून मधून येतात नातवंडे -- पिक्निकला पाहुणे -- वेळ घालवायला प्रेमी -- गित गायला थुंकतात आणि जातात परदेशी येतात पार्टी सिलेब्रेशन करतात डिजे लावतात गदा गदा नाचतात स्तुति करतात माझी -- म्हणतात व्हाट ये मार्वलस स्ट्रक्चर निदान चौकशी करतात हु वाज शिवाजी....? ऐकतो मी बगतो मी मी नाही घालीत कुणाशी हुज्जत माझा मीच बरा नाही अपेक्षा कुणाकडून भंगलेले अवयव जोडायची ढासळलेले तट सावरायची नको तुमचे छत नको मायेची शाल नको कुणाची आश्वासन सवय झाली मला काळोखात एकटे रहायची झाली इतकी शतके आणखी काही दिवस बघेन वाट एखादा नवीन शिवाजी जन्मायची
mast
मी आणि माझे मित्र लहानपणी या किल्यावर बोरं किंवा ब्याटसाठी पाळे आणायला जायचो, किल्ल्याचा सखोल अभ्यास नसला तरी किल्ला आणि शिवाजी महाराज असे अतूट समिकरण आहे
त्यामूळे वरिल किल्याची स्तिती पहाता किल्ल्याचा नव्हे तर स्वराज संस्थापक शिवरायांच्या अस्तित्वाची दुर्दशाच अशी खंत मला मनी व्यस्त करायची. मग तो भकास किल्ला काय म्हणत असेल ते किल्ल्याचे आत्मकथन माझ्या खालील 30 वर्षापुर्वीच्या रचने मधे कथन केले आहे.
एक किल्ला
एक किल्ला
पच्छिम सागराच्या कुशित
झुडपांच्या गर्दित
पारंब्याच्या विळख्यात
अधून मधून डोकावत
चरफटत तिश्टत
अधून मधून येतात
नातवंडे -- पिक्निकला
पाहुणे -- वेळ घालवायला
प्रेमी -- गित गायला
थुंकतात आणि जातात
परदेशी येतात
पार्टी सिलेब्रेशन करतात
डिजे लावतात
गदा गदा नाचतात
स्तुति करतात माझी -- म्हणतात
व्हाट ये मार्वलस स्ट्रक्चर
निदान चौकशी करतात
हु वाज शिवाजी....?
ऐकतो मी
बगतो मी
मी नाही घालीत कुणाशी हुज्जत
माझा मीच बरा
नाही अपेक्षा कुणाकडून
भंगलेले अवयव जोडायची
ढासळलेले तट सावरायची
नको तुमचे छत
नको मायेची शाल
नको कुणाची आश्वासन
सवय झाली मला काळोखात
एकटे रहायची
झाली इतकी शतके
आणखी काही दिवस बघेन वाट
एखादा
नवीन शिवाजी
जन्मायची
मस्त👌👍
Kiti sundar lihile ahe tumhi...,🙏