Narendra Dabholkar Murder Case : दाभोलकरांच्या हत्येचा कट कसा रचला गेला ? | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • Narendra Dabholkar Murder Case : दाभोलकरांच्या हत्येचा कट कसा रचला गेला ? | Vishaych Bhari
    मंडळी आजपासून बरोबर 11 वर्षांपूर्वी म्हणजेचं 20 ऑगस्ट 2013 ला पुण्यात देशाला हादरवून टाकणारी एक घटना घडली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते, महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्वाचे कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची याच दिवशी पुण्यातल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या झाली, यानंतर राज्यभरात आंदोलनं झाली. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली. ‘’आम्ही सारे दाभोलकर’’ म्हणत सामाजिक चळवळीतील हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यामुळे तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर दबाव वाढत गेला आणि पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यानंतर काही काळानंतर पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात आला आणि हायकोर्टाच्या देखरेखीखाली तब्बल आठ वर्ष तपास केल्यानंतर हत्येच्या अकरा वर्षानंतर म्हणजेच दहा मे 2024 रोजी न्यायालयाने या खटल्याचा निकाल दिला आणि यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळस्कर यांना दोषी ठरवण्यात येवून, त्यांना जन्मठेप आणि पाच लाख दंड सुनावण्यात आला. याप्रकरणी इतर आरोपी विरेंद्र तावडे, एडवोकेट संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सबळ पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आलं. यानंतर या निकालाबद्दल 'भारतीय न्यायव्यवस्थेवरील आमचा विश्वास प्रत्यक्षात उतरला आहे. वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची जी निर्दोष मुक्तता झाली, याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देवू', अशी प्रतिक्रिया दाभोलकर कुटूंबीयांनी व्यक्त केली. मंडळी या प्रकरणात सीबीआयने आरोपींचा शोध घेऊन, न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावूनही, काही लोकांचं मात्र आजही असं म्हणणं आहे की, या हत्येचे मुख्य सूत्रधार अजूनही कायद्याच्या आवाक्याबाहेरच आहेत, त्यातूनच काही लोक रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील नरेंद्र महाराज यांचही या हत्येमागे संशयित सूत्रधार म्हणून नाव घेतात, मंडळी अनेक लोक नरेंद्र महाराज यांचं या प्रकरणात संशयित म्हणून नाव का घेतात, तसेच या हत्या प्रकरणात महत्वाचे टप्पे कोणते होते, सीबीआयने या संदर्भात केलेला तपास शिवाय या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं, या सगळ्याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #narendradabholkar
    #narendradabholkar
    #विषयचभारी
    narendra dabholkar,
    narendra dabholkar case,
    narendra dabholkar murder case,
    narendra dabholkar speech,
    narendra dabholkar murder,
    narendra dabholkar books,
    narendra dabholkar death,
    pm narendra modi,
    news for narendra dabholkar,
    narendra dabholkar exposed,
    narendra dabholkar judgment,
    narendra achyut dabholkar,
    narendra dabholkar interview,
    narendra dabholkar speech on god,
    narendre dabholkar murder,
    mukta dabholkar,
    dabholkar murder case,
    dr narendra dabholkar

Комментарии • 119