आरेवाडी यात्रा उत्सव# biroba yatra # kashiling biroba # आरेवाडीच्या बिरोबा देवाची यात्रा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • आतुरता बिरुदेवाच्या यात्रेची
    आरेवाडी: मार्च महिना संपला की अनेक गावों गावच्या यात्रेची चाहूल लागते. हा यात्रेचा सन उत्सव म्हणजे आपल्या माणसांना एकत्र करण्याचा एक सोहळाच .असाच सोहळा रंगतो ,वाढतो आणी त्यातून एक समतेचा संदेश जातो तो म्हणजे आरेवाडीच्या बिरोबा देवाच्या यात्रेतून .
    गुडीपाडव्यची चाहूल लागली की महाराष्ट्र ,कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा ,अश्या राज्यातील मेंढपाळ आपल्या बिरोबा देवाच्या यात्रेच्या तयारीला लागतात .कारण या बांधवांना यात्रेसाठी येताना आपल्या बकऱ्या, घोडी यांची काहीतरी जोळणी करून यावी लागते .मग काहींजन पैरा करतात .यावर्षी एकाने जनावरे राखायचं व पुढील वर्षी यात्रेला एकाने राखायची .अश्या पद्धतीने यात्रेची तयारी करतात .
    अनेक इतर भाविक ,आपल्या पद्धतीने नियोजन करून यात्रेच्या दिवसाची वाट पाहतात .बिरोबा देवाची यात्रा गुडीपाडव्या पासून चैत्र शुद्ध सप्तमी परेंत असते .
    सर्वत्र भक्तिमय वातावरण असते. प्रत्येक माणूस या यात्रेच्या निमित्त आपल्या इष्ट मित्रास भेटतो ,सुख दुख वाटून घेतो .आपल्या गावची ख्याली खुशाली पाहतो आणी बिरोबा रायला आशीर्वाद मागून आपल्या घराकडे वाटचाल करतो.
    खरच यात्रा हा किती मोठा सोहळा आहे आणी आपल्या जीवनाचा एक घटक आहे .ही आपली संस्कृती आहे ती वाढवली जपली आणी टिकवली सुद्धा आपणच पाहिजे.
    काही माणस तर आपल्या गावाकडून आपल्या माणसांना भेटून आलं की जणू स्वर्ग पाहून आल्याचा आनंद त्यांना मिळतो..आणी ते खरच आहे आपल गाव आपली संस्कृती आपला स्वर्ग सोहळाचा आहे.
    आणी आता काही दिवसातच बिरोबा बनात स्वर्ग सोहळा अवतारणार आहे .कारण आरेवाडीच्या बिरोबा देवाची यात्रा दिमाखात लाखोंच्या संख्येने भरणार आहे .
    बोला बिरोबाच्या नावान चांगभल ....
    यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे बिरोबा देवस्थान ट्रस्ट व पुजारी मंडळी यांच्या तर्फे सहर्ष स्वागत

Комментарии •