मलय्या शिवयोगी सिद्धरामेश्वर... सोलापूर
HTML-код
- Опубликовано: 25 ноя 2024
- सोलापुरातील कलाकारांची निर्मिती..
“श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर”
सन २०१५ साली सोलापूरातील ईरण्णा कचेरी या हरहुन्नरी कलावंताने तब्बल ७० पेक्षाही जास्त कलावंताना घेऊन
“श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर” हा चित्रपट प्रदर्शित केला होता..
निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता अशा भूमिका साकारीत ईरण्णा कचेरी याने हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊन समस्त शिवभक्तांना सिद्धरामेश्वरांची महती समजावी यासाठी अनेक कष्ट घेऊन या चित्रपटाची निर्मिती केली..
या चित्रपटात सिद्धरामेश्वरांची बाल शिवयोगी ते योग समाधी पर्यंतचा प्रवास यात चित्रित केला होता
या अशा आम्ही केलेल्या इतिहास कालीन यात बरेचसे संदर्भ असल्याने हा चित्रपट साकारणे हे एक जिकरीचे काम होते परंतु सोलापुरातील युवा कलावंत चित्रपट संकलक सचिन जगताप यांनी अनेक स्पेशल Effect देत हा चित्रपट बोलका केला होता..
सोलापूर, उस्मानाबाद, आचेगाव, वळसंग, हत्तरसंग आदी ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते जवळपास दहा लाखांचा खर्च करीत केवळ अडीच महिन्यात हा चित्रपट पूर्ण केला होता.
या चित्रपटात सोलापूरच्या ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री सुशीलाताई वनसाळे यांनी साकारलेली आईची भूमिका उल्लेखनीय आहे तसेच निर्माता ईरण्णा कचेरी यांनी या चित्रपटात तीन वेगळ्या भूमिका सादर केल्या होत्या हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल...
चित्रपटात एकूण दर्जेदार पाच गीते असून ती सोलापुरातील युवा गीतकार मनोज टोणपे यांनी लिहिलेले आहेत,
सह दिग्दर्शन राहुल चवरे यांनी केले तर छायांकन शाहिद हरकारे यांचे आहे..
पटकथा व संवाद श्रीनिवास लिंबोळी यांनी लिहिले असून, पार्श्वसंगीत सुरेश सांभाळ यांचे आहे...
संपूर्ण चित्रपटाचे संकलन सचिन जगताप या हरहुन्नरी कलावंताने केले आहे...
सोलापूरच्या मातीत तयार झालेला हा चित्रपट समस्त शिव भक्तांसाठी आनंद निर्माण करेल यात वाद नाही..
लवकरच हा चित्रपट आम्ही OTT Platform किंवा आमच्या RUclips Channel यावर प्रदर्शित करीत आहोत...
या चित्रपटातील काही दर्जेदार गाणी आपल्या सर्वांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत..
नक्कीच आपणास ही गाणी आवडतील आणि आपण पुढे नक्कीच Share कराल..
धन्यवाद..
सचिन जगताप (Director, Film Editor)
मोशन फिल्म स्टुडिओ
मंगल कॉम्प्लेक्स, आसरा चौक, होटगी रोड, सोलापूर.
मो. 9822092303
“श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर”
➟निर्माता / दिग्दर्शक
ईरण्णा कचेरी
➟सह दिग्दर्शक
राहुल चवरे
➟गीतकार
मनोज टोणपे
➟संगीत दिग्दर्शक
सुरेश संभाळ
➟छायांकन
शाहिद हरकारे
➟संकलन आणि ग्राफिक्स
सचिन जगताप
#solapurkar #mh13बे
#solapur siddheshwaryatra #shivyogi #siddheshwar #solapurkar #solapuri_brand13
#solapuri siddheshwartemple