SALASHI DASARA 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • देवगड साळशी , लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संस्थान देवस्थान श्री सिद्धेश्वर पावणाई देवी ( श्री देव चौऱ्याऐंशी संत साळशी ) मंदिरात यावर्षी सुद्धा मोठ्या शाही थाटामाटात आणि दिमाखात नवरात्र उत्सव तसेच दसरा उत्सव साजरा करण्यात आला.
    शेकडो वर्षापासून चालत आलेल्या शिवकालीन परंपरेनुसार श्रीदेव सिद्धेश्वर आणी देवी पावणाई मंदिरात पालखी उत्सव हा नयनरम्य आणि देखना पाहण्याजोगा असतो, या नऊ दिवसात अनेक धार्मिक चालीरीती आणि अनेक कार्यक्रम या मंदिरामध्ये पार पडले जातात, संपूर्ण मंदिर परिसरामध्ये 21 वेळा पालखी थांबून त्या ठिकाणी घडशी गोंधळी सनई वादक असतात.हा उत्सव साधारण तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई आणि अष्टविनायक गणपती देवस्थानांसारखाच पारंपारिक असतो.हजारो वर्षाचा देवस्थानाचा विजयादशमी उत्सव इतिहासकालीन राज वैभवाच्या थाटात पार पडतो. घडशी गोंधळी सनई वादन ढोल ताशा असे अनेक वाद्यांची साथ असते, वाद्यांच्या गजरात निशाने, पटेवाले, मशाली पालखी चौरवी तरंग भालदार चोपदारांसह भाविकांचा प्रचंड लवाजमा सोन लुटण्यासाठी जातात. भाविकांसाठी ही एक आनंदाची आणि ऐतिहासिक परंपरांच्या चालीरीती पाहण्याची पर्वणीच असते.

Комментарии • 25

  • @navinvaradkar9306
    @navinvaradkar9306 9 месяцев назад

    साळशी देवंस्थान आमच्या देवाच्या राहटीने उभे केले आहे 🙏

  • @bhagyashrilad0409
    @bhagyashrilad0409 10 месяцев назад

    दरवर्षी दसऱ्याला पावणाई देवीचा आणि सिद्धेश्वराचा हार आमच्या घरातून असतो याचा खूप आनंद आहे आम्हाला.
    श्री सिद्धेश्वर पावणाई प्रसन्न🙏
    हर हर महादेव 🙏

    • @konkancha_photowala
      @konkancha_photowala  10 месяцев назад

      धन्यवाद❤आणि तुमचे आभार ❤️

  • @saiindap421
    @saiindap421 10 месяцев назад +2

    साळशी आणि कोळोशी च देवाचं नातं निभावल्याचा आनंद झाला.!

  • @Sawantsmita153
    @Sawantsmita153 10 месяцев назад +1

    धन्यवाद 🙏

  • @ruchitabait7041
    @ruchitabait7041 10 месяцев назад +2

    धन्यवाद, माहेरच्या देवतांचे दर्शन घडले

  • @sunillad8325
    @sunillad8325 10 месяцев назад +1

    खूप छान मस्त

  • @11_bhagyashrighadi94
    @11_bhagyashrighadi94 10 месяцев назад +1

    🙏❤️🥰🙏

  • @rajparab5408
    @rajparab5408 10 месяцев назад +3

    मस्त दादा बघून आम्ही त्या सोहळ्यात असल्याचा भास झाला ...धन्यवाद 🙏

  • @archanaparab2815
    @archanaparab2815 10 месяцев назад +1

    🙏🌹🙏

  • @prakashpardhi5052
    @prakashpardhi5052 10 месяцев назад +1

    धन्यवाद खूप छान दसर्ऱ्याला गावी आल्यासारखे वाटले. 🎉

  • @Prathmesh.84
    @Prathmesh.84 10 месяцев назад +1

    🎉

  • @pratikshatirlotkar5635
    @pratikshatirlotkar5635 10 месяцев назад +1

    बायाच वार मोकळ करून देतात का?

  • @amolghadi7744
    @amolghadi7744 10 месяцев назад +1

    धन्यवाद भावा🙏🙏 तुझ्यामुळे आम्हाला गावी गेल्यासारखे वाटले ❤❤

  • @kavitaparadhi8956
    @kavitaparadhi8956 10 месяцев назад +1

    Nice