America-America, chapter 18 “ Sangopan “and a friend's clip narrating migration experience
HTML-код
- Опубликовано: 1 авг 2024
- १८ ) संगोपन
१८ ) करता करता सगळीच मित्रमंडळी settle झाली होती. बहुतेकांची लग्न पण झाली होती. आधी लग्न झालेल्यांची जबाबदारी वाढत होती. छोट्यांच्या आगमनाची चाहूल लागत होती. संसाराची वाढ होत होती. डॅनी - प्रिया च्या जोडीने पण good news दिली ! आणि आनंदाची वावटळ उठली
डॅनी प्रिया फारच आनंदात होते
येणाऱ्या बाळाची ते चाहूल घेत होते
Boy or girl ? आज कळणार होते
अमेरिकेत ही test सरसकट होते
हे हे !!! मला daughter होणार !!
डॅनीच्या आनंदाला नव्हता पारावार
मुलगी होणार ! daughter होणार !
भान विसरून तेच तेच म्हणत होता वारंवार !
दिल्लीहून विचारणा झाली
कुठे,कशी करायची डिलिव्हरी ?
कुठे काय? अमेरिकेतच होणार डिलिव्हरी
तुम्हीच करा आता इथे यायची तयारी
आमचं green card झालेलं नसलं जरी ,
पण citizenship मिळू दे बेबी ला तरी
सगळ्यांची झाली एक video मीटिंग
आई केंव्हा coming, सासू केंव्हा coming ?
दोन्हीकडे एकदमच गडबड सुरु झाली
दुपटी, टोपडी, झबली तयार झाली
झालंच तर डिंक लाडू, मेथी लाडू झाले
डाबर ची घुटी घेतली, gripe water घेतले
लेकीच्या सेवेला रजनी येऊन पोहचली
डोहाळेजेवणाची धमाल उडवून दिली
सांगितल्या वेळेत डिलिव्हरी झाली
गोड गोंडस रिया जन्माला आली
अगं ! बारसं झालं नाही ! मग नाव कसं ठेवलं ?
हो ना ! म्हणजेच मग आता नाव रजिस्टर झालं !
पासपोर्ट citizenship साठी ते आवश्यक असतं
काय बाई इथली पद्धत ! सगळं वेगळंच असतं
दोन दिवसात बाळंतीण घरी येते
पण तिला पूर्ण विश्रांती कुठे मिळते ?
आयांना ड्रायविंग बियविंग येत नसते !
मग बाळाला चेकिंगसाठी बाळंतीणच नेते
मम्मी ! अगं ही झबली इथे नाही घालत !
हे “ स्लीप अँड प्ले “ घालतात,
याने डोकं,तळपाय दोन्ही झकलेले राहतात
शिवाय यांची बटणं बघ ! पटापट लागतात
नखं बोचू नये म्हणून हातात मोजे घालतात
बाळाला वेगळ्या crib मध्ये झोपवतात
बाळाला घेताना दर वेळी हात धुवावे लागतात
या गोष्टी रजनीच्या डोक्यात काहूर माजवतात
मालीश,आंघोळ, जोरात सुरु असते बाळाचे
शेगडी नव्हे, तर hair dryer ने शेक द्यायचे
मनाचा हिय्या करून आजी बाळाची दृष्ट काढते
Smoke alarm वाजताच, घाबरी घुबरी होते
सहा महिने असेच निघून गेले
रजनीचे परतायचे दिवस आले
डॅनीच्या आईचे आगमन झाले
सहा महिन्यांनी रजनीने परत यायचे ठरले
आलटून पालटून रिया ला सांभाळायचे ठरले
आणि डॅनी-प्रियाचे, संगोपनाचे टेन्शन संपले
संगोपनाचे tension च संपले
संगोपनाचे tension च संपले