महाराष्ट्र केसरी २०१८ फायनल थरार,बाला रफिक शेख Vs अभिजित कटके | Maharashtra Kesari Final 2018 LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • जालना- अभिजितच्या वेगवान चालीने लढतीच्या सुरवातीलाच मैदानाबाहेर गेलेल्या बालारफिक शेखने नंतर प्रतिहल्ला चढवून सर्वोत्तम आक्रमक कुस्तीचे प्रदर्शन करीत प्रतिष्ठेच्या "महाराष्ट्र केसरी' किताबावर आपली मोहोर उमटविली.
    प्रचंड उत्साहात रविवारी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या अंतिम लढतीत बाला रफिक शेखने आपल्या आक्रमकतेच्या जोरावर गतवेळेचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटकेला 11-3 च्या फरकाने पराभूत केले.
    पहिल्या मिनिटात अभिजितने एकेरी पट काढताना बालाला सुरक्षित झोनच्या बाहेर नेत एक गुण मिळविला होता. या प्रयत्नात तो आखाड्याच्या बाहेरही गेला. पण या धक्‍क्‍यातून सावरून जात बालारफिकने जोरदार आक्रमण करत अभिजितला निष्प्रभ केले. अभिजितवर पकड मिळवीत बालाने दोन गुण मिळवीत आघाडी घेतली आणि मागे वळून बघितलेच नाही. आपल्या एकेरी पट काढण्याच्या हुकमी अस्त्राचा पुरेपूर वापर करताना बालाने अभिजितलाही आक्रमक होण्याचे आव्हान दिले. मात्र संपूर्ण स्पर्धेत आपल्या सावधपणावर विसंबून राहिलेला अभिजित मुसंडी मारू शकला नाही. वजनात काहिसा अधिक असलेला बाला पुण्याच्या अभिजितला पेलला नाही. वजनाने अधिक असूनही बालाने दाखविलेली चपळता निर्णायक ठरली.
    विश्रांतीच्या 3-0 अशा आघाडीनंतर बाला दुसऱ्या फेरीत अधिक आक्रमक झाला. अभिजितच्या हप्ताबंद डावातून चपळाईतून सुटका करून घेत, त्याने त्याच्यावर स्वार होत गुणांची कमाई करत आघाडी फुगविली. पिछाडी वाढत चालल्यावर अभिजितवर दडपण आले आणि याचाच फायदा घेत बालाने 62व्या महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरले.
    लढत संपण्यास काही सेकंद असतानाच अभिजितची देहबोली तो हरल्याची कबुली देत होती आणि शेजारी बाला आनंदाने उडी मारून आपला विजय साजरा करीत होता. मातीतून अंतिम फेरीत धडक मारलेल्या बालाने अभिजितवर निर्विवाद वर्चस्व राखले. विजयानंतर तोच काय, अंतिम लढतीसाठी उपस्थित असलेल्या त्याच्या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते. आई- वडिलांकडे आनंद व्यक्त करण्यास शब्दच नव्हते. घरच्या चौथ्या पिढीने कुस्तीत मिळविलेल्या नावलौकिकामुळे सारे शेख कुटुंबीय भावनाविवश झाले होते. कुस्तीसाठी बुलडाणा सोडून पुण्यात हनुमान आखाड्यात आलेल्या बालाच्या विजयात सर्वांत मोठा गुरू स्व. गणपतराव आंदळकरांचा असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.
    जालना : बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या विजयानंतर मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला पराभूत केल्याची भावना कुस्ती विश्वामध्ये व्यक्त करण्यात येत होती.
    अभिजीत कटकेने सामन्याच्या पहिल्या मिनिटात जोरदार आक्रमण केले होते. पण त्यानंतर बाला रफिक शेखने जोरदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण केले आणि दोन गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बाला रफिक शेखने एक गुण मिळवत ३-१ अशी आघाडी मिळवली.
    पुण्याच्या अभिजीत कटकेने २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने जबरदस्त आक्रमक खेळताना येथे सुरु असलेल्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. गत वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले. प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके हा बुलढाणा येथील बाला रफिक शेख याच्याशी दोन केले.
    'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोण बनवते?
    पेशव्यांनी 'पानगरी' नावाचे गृहस्थ खास नक्षीकाम आणि कोरीवकाम करण्यासाठी आपल्या चित्रशाळेत आणून ठेवले होते. पेशव्यांचे आकर्षक दागिने, विविध बांधकामं आणि भांडी यावर पानगरी नक्षीकाम करत असत. त्याच पानगरी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानगरी 'महाराष्ट्र केसरी'साठीची देखणी गदा दरवर्षी बनवतात.लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही.
    बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते. बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे ६५ वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला.
    पुण्यातील नव्या दमाच्या २१ वर्षीय अभिजितसमोर बलाढ्य आणि अनुभवी बाला रफिक शेखचे आव्हान होते. त्यामुळे त्याची विजयासाठी कसरत होण्याची शक्यता होती. परंतु, ही लढत एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. गुणांवर बाला रफिकने अभिजितला पराभूत केले. माती विभागात आतापर्यंत बाला रफिकने तीन वेळा फायनलपर्यंतचा पल्ला गाठला होता. त्यामुळे तो कसलेला मल्ला मानला जातो

Комментарии • 29