लहानपणीचे दिवस आठवले. या गाण्यांचा अर्थ आणि भाव ज्यांना कळतात. ती पीढी समृद्ध , श्रीमंत आहे. त्यामुळे जीवनातील चढ-उतारही सहज पेलू शकली. निखळ भाव , सुस्वर , संगीतही मंद .कुठेही वाद्यांच्या आवाजांचे आघात नाहीत. शब्द - स्वरांना लाभलेले मधाळ आवाज .....वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. वाद्यांची साथसंगत नसतानाही कोणीही सहजतेने गाऊ शकेल अशा चाली आहेत. खरचं जीवनाच्या संध्याकाळी ही गाणी ऐकत आयुष्याने विश्रांती घेत परमेश्वराशी एकरूप होऊन जावे. असे वाटते. शब्द सूर ताल लय भाव याचे एक सुंदर मिश्रणच होऊन ही गाणी जन्माला आली आहेत असे वाटते. अप्रतिम गाणी आहेत. ❤
65-70 ला पोहचलेली प्रत्येक व्यक्तीला ही गाणी अतिशय उत्तम टॉनिक आहे.कारण मनातील द्वंद्व हया गाण्यांनी विसरायला होतात.कारण ह्या वयातल्या माणसांचे मन कोणीही जाणवू शकत नाही.पैसा असूनही आणि नसूनही, त्याग नात्यासाठी केलेला असतो पण दिसत नाही. ही गाणी त्यांना समजून घेतात❤
नदीच्या काठी असलेल्या झाडाखाली बसून मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने वाऱ्याच्या हलक्या झुळकी बरोबर ही गाणी ऐकायला मिळणे, स्वर्गसुखं म्हणजे नेमकं काय हे कळतं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तिशय सुरेल गाणी,,सुरेल गायकांच्या सुरेल आवाज ,गेली २० वर्ष ही भावपूर्ण गीते आहेत रात्री,झोपताना ही गाणी ऐकत केव्हाच झोपी जातो.धन्यवाद गीतकार, संगीतकार आणि गायकांना.
ही पिढी खूप भाग्यवान आहे ज्यांनी ही सर्व गाणी रेडिओ वर ऐकली सुटीच्या दिवशी शेतात गुरे चालायला जावे लागत असे बस रेडिओ सोबत असला कि दिवस कसा निघून जायचा कळायचे नाही गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ते दिवस आठवले की मन अगदी भाऊक होते
मला रेडिओ चा लै नाद आमच्या घरी मोठा bush चा रेडिओ होता... आपली आवड मला फार आवडत होती... जुने दिवस परत कधीच येत नाहीत... आता वाटते कशाला आपण मोठे झालो... लहानपण देगा देवा... 🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 सर्व गाणी मनाला खुप खोलवर लागली 🙏🏻🙏🏻......😭 ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻एक गाण तर खुपच आवडत आहेसखी मंद झाल्या तारका खरच खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭
🌹👌स्वरगंगेच्या कांठावरती वचन दिले तू मला”गाण्याचा अर्थ कळण्याच वय नव्हत , पण रेडिओवर गाणे लागताच पावले थबकायची,कान टवकारले जायचे❤️जादूई गाण👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌❤️🙏
फक्त आणि फक्त ऐकतच रहावे, वाटते वर्णन करूच शकत नाही, आम्ही सगळे फारच नशीबवान की ही नितांतसुंदर अशी गाणी ऐकतोय, सगळी काळजी, चिंता विसरून जाते, खूप समाधान लाभते आहे,
नमस्कार मित्रांनो ही गाणी ऐकताना खूप अंगावर शहारे येयाचे कारण ते दिवस परत नाही येणार तेव्हा खूप गरिबी होती लोकांच्या घरात जाऊन ही गाणी आयकाचो खूप मराठी गाणी आवडतात आणि मी रोज रोज आयकतो आणि गातो गातोपण मला गायला खूप आवड आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
मी सुद्धा 80 च्या दशकातला ही गाणी म्हणजे ऐक उत्तम महिफलीची सुरेख सुरेल पर्वणी होती मला आठवतं रात्री 10 वा. आपली आवड ह्या रेडिओवरच्या कार्यक्रमात ही खास रसिकांना मेजवानी असे आजच्या मोबाईल युगात ही छान सुरांची सुरेल सुरावट आजही मी रात्री न चुकता ऐकतो. ही शांत सुरांची सुरावट माझ्यालेखी आनंदाची शिदोरी आहे. शेवटी म्हणतात ना जुनं ते सोनं 👌 Old is gold 👍🏼
गीतकार संगीतकार आणि गायक यांना खूप खूप धन्यवाद अशी अवीट गाणी तिघांच्या माध्यमातून निर्माण झाली 50 वर्षांपासून ही गाणी ऐकत आहे पण आजही ही गाणी ऐकली कीं मूड फ्रेश होतो
❤ मी अजून सुद्धा यू ट्यूब मध्ये अशीच गाणी ऐकत असतो. तो काल रेडिओ 1986...होता. मन शांत करणारी आणि अर्थ असणारी.. भावगीते... पुन्हा.. पुन्हा एकावी वाटतात.❤खुप छान ❤
खूप शुभेच्छा, जुन्या आठवणी जाग्या होतात. प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा सरासरी काळ, वेळ, आवड, छंद, असतात.. खूप कष्टाने ही गाणी, संगीत, रचना अर्थपूर्ण आहेत. धन्य.. कलाकार, गीतकार संगीत कार, आणि दाद देणारे... रसिक जनता... जुने ते सोने.. 😊
अतिशय अर्थपूर्ण काव्यरचना, नशीबवान आहोत आपण दीदी आणि इतर मंगेशकर कुटुंबीय, बाबूजी, सुरेशजी, अजित कडकडे, जितेंद्र अभिषेकी आणि इतर कित्येक मराठी संगीतातील रत्न ज्यांना 80 च्या दशका पासून रेडिओ वर ऐकले आहे. आणि आजही तितक्याच आत्मीयतेने त्यांना ऐकतो हेच त्यांचा मोठेपणा सिद्ध करतो
आम्ही खूपच गरीब आसवे कदाचित कारण ही शब्दावली समुधर गीताची रस्तावर चालता चालता एकु यायची... पण मन लावून ऐकायचो... ते दिवस परत येऊ नये.. कारण आता सगळ आहे.. पण ते दिवस नाहीत...
यातील `दिवस तुझे हे फुलायचे` हे गाणं मी इयत्ता तिसरी व चौथी मध्ये म्हटलो होतो.तेव्हा माझा पहिला क्रमांक आला होता. आणि हे गाणं attapan aikat ahe आणि समोर पण ऐकणार.
गीतकार संगीतकार गायक यांनी हि अवीट गाणी अजरामर केलेली आहेत याला तोडच नाही अतिशय मेहनत घेऊन तयार केलेली गाणी लोकप्रिय केलेली आहेत आनंदाची डोही आनंद चे तरंग धन्यवाद शुभेच्छा यशवंत व्हा 🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳
ही गाणी किती मन मुग्ध करणारी होती. अर्थपूर्ण, कानाला कर्णमधूर वाटणारे संगीत किती सुंदर वाटायचे. आता ही गाणी काळाच्या पडद्याआड गेली तरी अशी ऐकायला मिळणे हा दुग्धशर्करायोग आहे. गेले ते रम्य दिवस राहिल्या फक्त आठवणी. धन्यवाद.
गाणी अशी होती की क्षणात मनात ठसत होती, एकाच वेळी आम्ही चित्रपट कृष्णधवल असे पाहत असे पण त्याचवेळी माझ्या मनात रंगीत चित्रपट चालत असे व असे कित्तेक दिवस चालत असे. आजही तीच गोडी आहे शब्द व संगीता मध्ये.
हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे.. रात्रीच्या निरव शांततेत तो घुमणारा रेडिओचा आवाज आणि उद्याच्या दिवसाची गणित मांडत झोपी जाणारी आमची पिढी... खरच समृध्द आणि नशीबवान
ही गीत ऐक ताना शब्दात च्या व सागित्याचा लहरीवर माणूस ऐन तारुण्याचंच्या काळात पोहचलो याचं भान राहतनाही. शब्दांनी मन भरू न य्येते व हलक वाटत.. संगीतकार. गीतकार यांना प्रणाम. व धन्यवाद 🌹🌹🌹🌹🎉
खरच 70 च्या दशकात जन्माला आलो. संगीताचा सुवर्णकाळ होता तेव्हा रेडियो साठी पण licence होते. एका वर चढ एक सुरेल अर्थाने भरलेले संगीत बनवले जाई. आजही ऐकताना त्या बालपणात सहज फिरून येता येते. दिवसभराचा कामाचा शीण लगेच पळतो. 😅
सर्वांच्या comments चा भाव व अनुभव तेच माझे सुद्धा आहेत. खरोखरच बालपणीच्या आठवणी जाग्या होतात आणि मुड कितीही खराब असला आणि उदासिन मन नदीच्या प्रवाहसारखे शांत आणि ऊमलत असलेल्या फुलासारखे प्रसन्न होते.
याच्यापुढे कितीही गायक होऊद्या परंतु ही गाणी त्यांच्याच तोंडून ऐकणे म्हणजे स्वर्ग सुख .मी तर रेडीओ गळ्यात अडकवून गुरांच्या मागे ऐकायचो . ।। अप्रतिम ।। ❤❤❤❤❤
सर्व कमेंट्स अती सुंदर सर्वांची भावना एकच आहे.भेट तुझी माझी स्मरते ला तोड नाही.घरी रेडिओ नव्हता दुसऱ्याच्या घरी शुक्रवारी साडेपाच वाजता सांजधारा कार्यक्रम ऐकायचो ते आता ६९ व्या वर्षी देखील विसरलो नाही.गेले ते दिवस फक्त आठवणी राहिल्यात.रसिक लोकांचे खुप खुप आभार.❤❤❤❤❤❤❤ .
काळ बदलतो पण भाषेची मोहिनी ती अवीटच... मराठी जुनी गाणी असो वा नवी ( काही ) आपल्या भाषेची समृद्धी आणि मधुरता दाखवतात... शब्द आणि सुर... 🧡 #मराठी 💜 ~ विसव्या शतकातील मन ❤️
सुमधुर, कर्णप्रिय, हृदयप्रिय, मन हलके करणारी ही गीते लहानपणी रेडिओवर ऐकत मोठे झालो. उठता बसता खाता-पिता झोपताना सुद्धा रेडिओ सोबत असायचा. अशी सुरेल गाणी आताही मनात घर करून आहेत. किती सुखी आणि मजेचे दिवस होते ते! ओठावर आपसूक यायची,सध्या ही गाणी रेडियो वर यायची बंद झाली आहेत. खूप आभारी आहे अशी गाणी youtube वर ऐकवल्या बददल
लहानपणीचे दिवस आठवले. या गाण्यांचा अर्थ आणि भाव ज्यांना कळतात. ती पीढी समृद्ध , श्रीमंत आहे. त्यामुळे जीवनातील चढ-उतारही सहज पेलू शकली.
निखळ भाव , सुस्वर , संगीतही मंद .कुठेही वाद्यांच्या आवाजांचे आघात नाहीत. शब्द - स्वरांना लाभलेले मधाळ आवाज .....वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. वाद्यांची साथसंगत नसतानाही कोणीही सहजतेने गाऊ शकेल अशा चाली आहेत. खरचं जीवनाच्या संध्याकाळी ही गाणी ऐकत आयुष्याने विश्रांती घेत परमेश्वराशी एकरूप होऊन जावे. असे वाटते.
शब्द सूर ताल लय भाव याचे एक सुंदर मिश्रणच होऊन ही गाणी जन्माला आली आहेत असे वाटते. अप्रतिम गाणी आहेत. ❤
आमच लहानपण आणि तारूण्य या गाण्यांनी समृद्ध केल.आता ती शब्दरचना नाही,संगीतही नाही व गायकही कमी.
आणि होणारही नाही @@rohinimoghe833
अगदी बरोबर आत्ताची गाणी ऐकुशी वाटत नाही
खुप छान शब्दात वर्णन मांडले
मान गये! आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनो को ! 😂🙏
खूपच छान शब्दात वर्णन केलंय!
माजी आई रोज रेडिओ वर ही गाणी लावायची मी शाळेतून आले की ही गाणी ऐकून खूप भारी वाटायचं असा वाटते पुन्हा ते दिवस आले तर ❤️❤️❤️
Lay bhari mastch
व्वा खरी खुरी भावना मनास भlवून गेली
कमेंट किती छान आहे असं वाटत वाचत राहावं 👌 प्रत्येकाचे अनुभव भाव सर्व दिसत लिहिण्यातून खरच गाणी होती मराठी शांत आणि अर्थपूर्ण
65-70 ला पोहचलेली प्रत्येक व्यक्तीला ही गाणी अतिशय उत्तम टॉनिक आहे.कारण मनातील द्वंद्व हया गाण्यांनी विसरायला होतात.कारण ह्या वयातल्या माणसांचे मन कोणीही जाणवू शकत नाही.पैसा असूनही आणि नसूनही, त्याग नात्यासाठी केलेला असतो पण दिसत नाही. ही गाणी त्यांना समजून घेतात❤
Nice
अगदी बरोबर
नाही हो आम्ही 25 तले सुद्धा फॅन आहोत
True sir
एकदम बरोबर आहे ते बालपण आणि तारुण्य जीवन वेगळेच होते ती उणीव भरून निघणे कठीण आहे 👍
नदीच्या काठी असलेल्या झाडाखाली बसून मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने वाऱ्याच्या हलक्या झुळकी बरोबर ही गाणी ऐकायला मिळणे, स्वर्गसुखं म्हणजे नेमकं काय हे कळतं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Oh ho ho... ❤
RSS jdododiiA
खरच अप्रतिम कल्पना
बरोबर
Bboyyb@@devendramandlik4568
शाळेत जाताना ही गाणी लागायची तेव्हा मर्फी चा रेडिओ होता ८८ लां असे दिवस नाही येणार परत❤
माझा जन्म ८८ साल चा सर ,,, मी पण हे गाणी खुप आवडीने ऐकतो,,,८० ९० काळ खुप सुंदर होता
प्ै
Her
@@maclimp
??@@AshaChaudhari-jo3dh
. फक्त त्या गोड़ आणि सुंदर आठवनी राहतात बाकी
अचानक नियतीने आमच्या दोघांची ताटातूट केली.... खूप आठवणं येते.... असचं रात्री निवांत ही गाणी ऐकत , गुणगुणत पडुन रहायचो आम्ही.... ❤
😢😢
Same here 😢😢
Kay zal
तुमचं आयुष्य खूपच सुंदर गेलं आहे तुमच्या यांच्यासोबत असं वाटते.❤
ण सह अ@@santoshdhuri652
तिशय सुरेल गाणी,,सुरेल गायकांच्या सुरेल आवाज ,गेली २० वर्ष ही भावपूर्ण गीते आहेत
रात्री,झोपताना ही गाणी ऐकत केव्हाच झोपी जातो.धन्यवाद गीतकार, संगीतकार आणि गायकांना.
या गीतांना ऐक च कॉमेंट,दुर्मिळ झाले की काय श्रोते,निवांत क्षणी ऐकावीत अशी गिते आहेत, अवीट गोडी आहे गीता मधे,ही गीते ऐकून कानाला नी मनाला तृप्ती लाभते
मस्त
ही ,गाणी नाहीत जगण्यासाठीची संजीवनी गुटी आहे.
नक्कीच 👍
ही पिढी खूप भाग्यवान आहे ज्यांनी ही सर्व गाणी रेडिओ वर ऐकली सुटीच्या दिवशी शेतात गुरे चालायला जावे लागत असे बस रेडिओ सोबत असला कि दिवस कसा निघून जायचा कळायचे नाही गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी ते दिवस आठवले की मन अगदी भाऊक होते
आताची पिढी म्हणतील सुटी आहे तर गुराणा पण सुट्टी द्या
काय करावं तेच कळत नाही..
गुरे चारताना मजा यायची रेडिओ सोबत असला की ! काय दिवस होते ते
ही जुनी मराठी शांत गाणी रात्री झोपताना ऐकता शांत झोप लागते व सगळी दुःख विसरल्या सारखे वाटते 💜👍
्
ज्या सर्वानी हे कमेन्ट केली आहे. त्यानाच माहीत काय सुंदर दिवस होते ते. सकाळ झाली की हे ऐकून मन प्रसन्न.
मला रेडिओ चा लै नाद आमच्या घरी मोठा bush चा रेडिओ होता... आपली आवड मला फार आवडत होती... जुने दिवस परत कधीच येत नाहीत... आता वाटते कशाला आपण मोठे झालो... लहानपण देगा देवा... 🙏🙏🙏🙏
I read all comments
🙏🏻🙏🏻खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻 सर्व गाणी मनाला खुप खोलवर लागली 🙏🏻🙏🏻......😭 ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻एक गाण तर खुपच आवडत आहेसखी मंद झाल्या तारका खरच खुपखुप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭
❤❤❤ही गाणी ऐकल्या वर आपल्या प्रेमाची आठवण झाली नाही अशी एक.ही व्यक्ती नसेल😢😢
Ho
खरे आहे शाळेत असताना ऐकलेली गाणी अजून ही अवीट गोडी ची .,🙏🙏
🌹👌स्वरगंगेच्या कांठावरती वचन दिले तू मला”गाण्याचा अर्थ कळण्याच वय नव्हत , पण रेडिओवर गाणे लागताच पावले थबकायची,कान टवकारले जायचे❤️जादूई गाण👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌👌❤️🙏
फक्त आणि फक्त ऐकतच रहावे, वाटते वर्णन करूच शकत नाही, आम्ही सगळे फारच नशीबवान की ही नितांतसुंदर अशी गाणी ऐकतोय, सगळी काळजी, चिंता विसरून जाते, खूप समाधान लाभते आहे,
Bolavlya vachun hi mrutu jari aala ithe thamble to hi pad bhari... Kai hi kalpana apratim
100%
समृद्ध मराठी भाषा, संगीत आणि कलावंत... अभिमान आहे मी मराठी असल्याचा.
अरुण दाते शतशः प्रणाम
नमस्कार मित्रांनो ही गाणी ऐकताना खूप अंगावर शहारे येयाचे कारण ते दिवस परत नाही येणार
तेव्हा खूप गरिबी होती लोकांच्या घरात
जाऊन ही गाणी आयकाचो
खूप मराठी गाणी आवडतात
आणि मी रोज रोज आयकतो आणि गातो गातोपण मला गायला खूप आवड आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
Agadi अप्रतिम ५० वय झाल्या नंतर गाणी ऐकली की अजून तरुण आहे असा भास होतात
एकदम मस्त. हे गीते ऐकून ८० च्या दशकात पुन्हा एकदा गेल्यासारखे वाटते. खरोखर खूप छान काळ होता तो. सर्व गीतकार संगीतकार गायक यांना खूप खूप धन्यवाद
मी सुद्धा 80 च्या दशकातला ही गाणी म्हणजे ऐक उत्तम महिफलीची सुरेख सुरेल पर्वणी होती मला आठवतं रात्री 10 वा. आपली आवड ह्या रेडिओवरच्या कार्यक्रमात ही खास रसिकांना मेजवानी असे आजच्या मोबाईल युगात ही छान सुरांची सुरेल सुरावट आजही मी रात्री न चुकता ऐकतो. ही शांत सुरांची सुरावट माझ्यालेखी आनंदाची शिदोरी आहे.
शेवटी म्हणतात ना जुनं ते सोनं 👌
Old is gold 👍🏼
🌹👌निराश मनाला नवचैतन्य देणारे कवी मंगेशकरांचे प्रभावी शब्द” या जन्मावर शतदा प्रेम करावे❤️👌जबरदस्त!!❤️👌❤️👌⭐️❤️👌❤️🙏
माझे बाबा सकाळी हे गाणे लावायचे आम्ही ह्या गाण्याच्या आवाजाने उठायचं शाळेत जायला
गाणी कुठे ऐकली की आपल्या घरात रेडिओ हवा असे वाटत असे पण संध्याकाळच्या दिव्याच्या कधी कधी रॉकेलची सुधा पंचाईत व्हायची
गीतकार संगीतकार आणि गायक यांना खूप खूप धन्यवाद अशी अवीट गाणी तिघांच्या माध्यमातून निर्माण झाली 50 वर्षांपासून ही गाणी ऐकत आहे पण आजही ही गाणी ऐकली कीं मूड फ्रेश होतो
माझ्या आयुष्यातील एक अनमोल ठेवा.... ज्याच मोल नाही मी करू शकत.... कसे आभार मानू तुमचे ❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
अतीशय सुरेख व गोड गानी ऐकुन बालपन आठवते वडील मर्फी रेडीओवर लावायचे. फारच छान अप्रतिम गीत. बालपन पुन्हा देगा देवा असे वाटते.
❤ मी अजून सुद्धा यू ट्यूब मध्ये अशीच गाणी ऐकत असतो.
तो काल रेडिओ 1986...होता.
मन शांत करणारी आणि अर्थ असणारी.. भावगीते... पुन्हा.. पुन्हा एकावी वाटतात.❤खुप छान ❤
खूप शुभेच्छा, जुन्या आठवणी जाग्या होतात. प्रत्येक व्यक्ती आणि त्याचा सरासरी काळ, वेळ, आवड, छंद, असतात..
खूप कष्टाने ही गाणी, संगीत, रचना अर्थपूर्ण आहेत.
धन्य.. कलाकार, गीतकार संगीत कार, आणि दाद देणारे... रसिक जनता...
जुने ते सोने.. 😊
❤
❤
❤
लोकांच्या रेडिओवर लावलेली रस्त्यावरून जाताना ऐकलेली अवीट गोडीची गाणी लहानपण फिरून परत आले धन्यवाद 🚩🚩🌷🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩
Aaj hi mi tyakalat jat vnirmal aanad lutat 1:17:31 e a ase vtate ki tvdhecj aiknya sathi 92 varshachi 1:16:05
Mala khup aavdtat hi gaani, sakali shaalet jaatana lagaychi, baalpanichi aathvan yete,maazya aaila aavad hoti,tichya mulech aavad nirmaan zaali , te divas veglech hote, very thanks ❤❤❤❤❤ aai chi khup aathvan yete.😢
अतिशय अर्थपूर्ण काव्यरचना, नशीबवान आहोत आपण दीदी आणि इतर मंगेशकर कुटुंबीय, बाबूजी, सुरेशजी, अजित कडकडे, जितेंद्र अभिषेकी आणि इतर कित्येक मराठी संगीतातील रत्न ज्यांना 80 च्या दशका पासून रेडिओ वर ऐकले आहे. आणि आजही तितक्याच आत्मीयतेने त्यांना ऐकतो हेच त्यांचा मोठेपणा सिद्ध करतो
मना वरचं खुपओझ कमी झाल्यासारखं वाटलं ...यार खुप धन्यावाद 😢😢😢
सुश्राव्य गायन, वादन, अप्रतिम अर्थपूर्ण गीताला, अजरामर करणारे गायक कलाकार या सर्वांच्या मन हेलावून गेले हलकं झालं! धन्यवाद!🙏💐👍
श्राव्य गाण्याचं आनंद जो आहे मनमोकळेपणाने धन्य धन्यवाद
खरच लहानपणीची गाणी अवीट होती.आता ही गाणे ऐकली तर बालपण आठवते.रेडीओवर गाणी लावली की डोळे उघडायचे
ही गाणी म्हणजे एक आनंदाचा डोह या डोहात उडी मारत मनसोक्त डुंबावे व काही क्षण आपण आपल्यातच रमून जावे. असे वाटते.
कितीही वेळा ऐकली तरी कंटाळा येणार नाही अशी ही अवीट गोडीची गाणी पाठऊन मनाला समाधान दिल्याबद्दल धन्यवाद ❤
Nice song
हि गाणी सतत ऐकत रहाविसी वाटतात अप्रतिम
आम्ही खूपच गरीब आसवे कदाचित कारण ही शब्दावली समुधर गीताची रस्तावर चालता चालता एकु यायची... पण मन लावून ऐकायचो... ते दिवस परत येऊ नये.. कारण आता सगळ आहे.. पण ते दिवस नाहीत...
कधी स्वयंपाक घरात प्रवेश केला जातो तेव्हा आईच्या मुखातून हे गाणी ऐकू येतात
86 ला वयस्कर लोक ऐकायची गाणी पण ती आजही आपण ऐकतोय . सुंदर रचना आहेत...
मध्येच येणाऱ्या जाहिरातीमुळे गाणें यैकण्याची इच्छाच नाहीशी होते. खुप वाईट वाटते.
🌹👌शब्दांकीत गाण्यातस्वतःला शोधता ,शोधता मन हलकं फुलक❤️👌अप्रतिम प्रतिभेची उंच भरारी❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
खरंच मन हलकं झालं कारण ही जुनी आठवणी तिल सुगम संगीत आता रेडिओ वर पण लागत नाही धन्यवाद मराठी संगीत 👍
खरंच श्रवणीय गाणी आणि त्यातील प्रत्येक शब्द किती अर्थपूर्ण आहे.की कितीवेळा ऐकले तरी परत परत ऐकावेसे वाटते.
सुंदर collection
यातील `दिवस तुझे हे फुलायचे` हे गाणं मी इयत्ता तिसरी व चौथी मध्ये म्हटलो होतो.तेव्हा माझा पहिला क्रमांक आला होता. आणि हे गाणं attapan aikat ahe आणि समोर पण ऐकणार.
अतिशय सुंदर गाणी आहेत ही, कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावीच वाटतात! धन्य ते गायक आणि संगीतकार आणि गीतकार!
अशीच एका पेक्षा एक सुंदर गाणी ऐकताना च दिवस सुंदर जावा आसेच नेहमी वाटते
अशी गाणी ऐकत रहावं आणि कधीच संपू नयेत
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे तेव्हा हे अजरामर सुंदर संगीत चांगली साथ देतात 😂
खुप सुंदर गाणी आहेत. गेले ते दिवस, rahilya tya आठवणीं😅😅😅😅😅😅
जुनं ते सोनं, अप्रतिम
खरं च खूप सुमधुर आवाज, संगीत असं वाटतं की संपूच नयेत ही गाणी,या काळात ज्यानी या स्वर्ग सुखाचा आनंद घेतला ते खरोखर भाग्यवान आहेत
पुष्पा 2 ही आला आहे व 3 ची सुरुवात होत आहे मन मृक्त करणारे ही गाणी पुन्हा नाही बननार मला ह्या सर्व भावगीताचा व मराठी भाषाचा अभीमान❤❤🙏🙏👍
गीतकार संगीतकार गायक यांनी हि अवीट गाणी अजरामर केलेली आहेत याला तोडच नाही अतिशय मेहनत घेऊन तयार केलेली गाणी लोकप्रिय केलेली आहेत आनंदाची डोही आनंद चे तरंग धन्यवाद शुभेच्छा यशवंत व्हा 🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🌷🌷🌷🌷🚩🚩🙏🙏🇮🇳🇮🇳
ही गाणी किती मन मुग्ध करणारी होती. अर्थपूर्ण, कानाला कर्णमधूर वाटणारे संगीत किती सुंदर वाटायचे. आता ही गाणी काळाच्या पडद्याआड गेली तरी अशी ऐकायला मिळणे हा दुग्धशर्करायोग आहे. गेले ते रम्य दिवस राहिल्या फक्त आठवणी. धन्यवाद.
❤
अप्रतिम अवीट अशी गाणी. कधीही ऐकावी केव्हाही ऐकावी अशी मन fresh करणारी...अ हा हा
अवीट गोडीची ही गाणी ऐकत होते मनाला फार छान वाटते आहे.
गाणी अशी होती की क्षणात मनात ठसत होती, एकाच वेळी आम्ही चित्रपट कृष्णधवल असे पाहत असे पण त्याचवेळी माझ्या मनात रंगीत चित्रपट चालत असे व असे कित्तेक दिवस चालत असे. आजही तीच गोडी आहे शब्द व संगीता मध्ये.
हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे.. रात्रीच्या निरव शांततेत तो घुमणारा रेडिओचा आवाज आणि उद्याच्या दिवसाची गणित मांडत झोपी जाणारी आमची पिढी... खरच समृध्द आणि नशीबवान
😅म्हाताऱ्या रसिकाला तरुणाईतली आठवण!!!!असं वाटत मी अजून ❤तिथं आहे.
❤❤❤❤❤❤00❤❤⁰❤⁰0
साहेब मस्त... तुमच्या शब्दांनी अंगावरती काटा उठवला❤❤
मन तरुण आहे..
खरंच किती छान वाटलं हि गाणी ऐकायला.. जुन्या गत काळाची आठवण येते आणि मग मन मोहरुन जातं.. मस्त..
Kup chan, old is gold,manala prasana karnari sagli gani, Thank you so much ❤
ऋषिकेश चा आवाज खूपच गोड सुमधुर आहे. छान गायले 👏👏👏👏👏🌹🌹🌹🌹🌹
जुनी गाणी मनमोहक होती आताच्या गाण्यांनी कानांना कर्कश आवाज, अर्थ नाही,भाव नाही,फक्त रिमिक्स आणि मोठे sound यांनी मराठी आणि हिंदी गाण्यांची वाट लावली
ही गीत ऐक ताना शब्दात च्या व सागित्याचा लहरीवर माणूस ऐन तारुण्याचंच्या काळात पोहचलो याचं भान राहतनाही. शब्दांनी मन भरू न
य्येते व हलक वाटत.. संगीतकार. गीतकार यांना प्रणाम. व धन्यवाद
🌹🌹🌹🌹🎉
खरंच सुरेख गाणी,पूर्वी चे दिवस आठवतात, वडिल असताना ही गाणी रेडीओवर संध्याकाळी लागायची
खूप छान गाणी होती आणि आज ही खूप छान आवडतात पुढच्या पिढीने सुद्धा हा छंद जोपासावा..
ही जुणी गाणी ऐकताना मन फार प्रसन्न होते सर्व दुख़ विसरायला होते
खूपच सुंदर गाणी आहेत. गायक याना धन्यवाद!
🌹👌उसवून श्वास माझा,फसवून रात गेली” स्रीसुलभ अव्यक्त भाव अप्रतिम गुंफन❤️👌❤️👌👌⭐️❤️👌❤️⭐️❤️👌❤️👌❤️🌼🌺🌼🙏
अतिशय सुंदर आणि मनमोहक गानी भावपूर्ण आणि गानी
Shri swami samarth ❤❤😊
खरच 70 च्या दशकात जन्माला आलो. संगीताचा सुवर्णकाळ होता तेव्हा रेडियो साठी पण licence होते. एका वर चढ एक सुरेल अर्थाने भरलेले संगीत बनवले जाई. आजही ऐकताना त्या बालपणात सहज फिरून येता येते. दिवसभराचा कामाचा शीण लगेच पळतो. 😅
🌹👌अबोल प्रितीला बोलके करणारे हळुवार धूंद शब्द❤️वा!वा!! वाकला फांदीपरी फुलांनी जीव हा”❤️क्या बात!!❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
सर्वांच्या comments चा भाव व अनुभव तेच माझे सुद्धा आहेत.
खरोखरच बालपणीच्या आठवणी जाग्या होतात आणि मुड कितीही खराब असला आणि उदासिन मन नदीच्या प्रवाहसारखे शांत आणि ऊमलत असलेल्या फुलासारखे प्रसन्न होते.
मनस्वी समाधान लाभाते ही गीते ऐकताना.... सोनेरी क्षण होते ते...
मोहून टाकणारे..❤😊
❤
खरच मनाला मोहुन टाकणारी जुन्या तरुणपणिच्या आठवणिंना परत ऊजाळा देणारी आपल्या संग्रहातिल गिते अप्रतिमच !
मित्रा धन्यवाद !
तसेच शतशा आभार .
एक संगित प्रेमी .
🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
याच्यापुढे कितीही गायक होऊद्या परंतु ही गाणी त्यांच्याच तोंडून ऐकणे म्हणजे स्वर्ग सुख .मी तर रेडीओ गळ्यात अडकवून गुरांच्या मागे ऐकायचो .
।। अप्रतिम ।।
❤❤❤❤❤
सर्व कमेंट्स अती सुंदर सर्वांची भावना एकच आहे.भेट तुझी माझी स्मरते ला तोड नाही.घरी रेडिओ नव्हता दुसऱ्याच्या घरी शुक्रवारी साडेपाच वाजता सांजधारा कार्यक्रम ऐकायचो ते आता ६९ व्या वर्षी देखील विसरलो नाही.गेले ते दिवस फक्त आठवणी राहिल्यात.रसिक लोकांचे खुप खुप आभार.❤❤❤❤❤❤❤
.
सन १९८० ल नोकरीस लागल्यावर प्रथम मर्फी कंपनीचा ६५०/_ रुपयाचा रेडिओ घेतला ते देखील स्मरणात आहे.
❤अजूनही जुने प्रेम आठवते व ती मिळवाची आस आहे 😊
Manatale bhv ganyàtun janavatat khupach chan
प्रेम वगैरे नाही आठवलं, तरी बालपण नक्कीच आठवतं . सकाळी सकाळी रेडिओ वर हे गाणे ऐकताना मन प्रसन्न होऊन जायचे
मनोरम अशी ही सुंदर आणि पून्हा पून्हा ऐकावीशी वाटणारी गाणी धन्य ते गायक आणि संगीतकार
काळ बदलतो पण भाषेची मोहिनी ती अवीटच... मराठी जुनी गाणी असो वा नवी ( काही ) आपल्या भाषेची समृद्धी आणि मधुरता दाखवतात... शब्द आणि सुर... 🧡 #मराठी 💜
~ विसव्या शतकातील मन ❤️
सायंकाळी शाळेतून आल्यावर बाबा रेडिओ लावायचे.. तेव्हा ची गाणी.. चिरतरुण ठेवणारी... अवर्णनीय..❤
स्वर्गीय ठेवा आहे हा....❤
ते दिवस खरेच रम्य होते.
कित्येक वर्षांपासून ही गाणी ऐकत आलोय तरी त्याची गोडी कमी झाली नाही.ऐकताना मन सुख: दूखाच्या पलीकडे जाते.
🌹👌सुखालाही भोवळ आली”या नंतरचे संगीत , क्या बात!!कड्डक!!👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏❤️
या गाण्यावर ते ऐकण्यावर शतदा प्रेम करावे.
खुपच छान मन खुश मदहोश करणारी आहे गीत 😊
गाणी कुठे ऐकली की आपल्या घरात रेडिओ हवा असे वाटत असे पण संध्याकाळच्या दिव्याच्या कधी कधी रॉकेलची सुधा पंचाईत व्हायची
Khara ahe mi tar shearing ekali ahet gaani bajucha radio eku yaycha
Kharch hi gani aikun direct lahanpaniche aaji ajobanchya gavachi athavan yete.
धन्यवाद हि गाणी अजरामर झाले आहेत सदाबहार आहेत मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
सुमधुर, कर्णप्रिय, हृदयप्रिय, मन हलके करणारी ही गीते लहानपणी रेडिओवर ऐकत मोठे झालो. उठता बसता खाता-पिता झोपताना सुद्धा रेडिओ सोबत असायचा. अशी सुरेल गाणी आताही मनात घर करून आहेत. किती सुखी आणि मजेचे दिवस होते ते! ओठावर आपसूक यायची,सध्या ही गाणी रेडियो वर यायची बंद झाली आहेत. खूप आभारी आहे अशी गाणी youtube वर ऐकवल्या बददल
छान, आनंदाचे डोही आनंद तरंग.