Bamanghal Hedvi | हेदवीची बामनघळ | Shri Dashabhuja Laxmi Ganesh Mandir | Guhagar Beach Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 апр 2024
  • #Bamanghal #HedviBeach # ShriDashabhujaLaxmiGaneshMandir
    दाभोळची खाडी सोडली की रत्नागिरी जिल्हातला गुहागर तालुका सुरु होतो.
    दाभोळला तुमचे वाहन फेरीबोटीत टाकायचे आणि पलीकड़च्या वेलदुरच्या किनाऱ्यावर उतरायचे.
    वेळदुर जेट्टीला फेरीबोट लागली की गुहागरचा रम्य परिसर सुरु होतो.
    लाल माती आणि दोन्ही बाजूची झाडं तुम्हाला कोकणाची ओळख करुन देतात.
    आम्हाला जायचं होतं हेदवीला..... गुहागरपासून २५ किलोमीटर अंतरावर हेदवी हे गाव आहे. समुद्राला समांतर हा रस्ता जातो. समुद्र जाणवत राहतो पण दिसत मात्र नाही.
    हेदवीला आम्ही पोचलो तेव्हा सुर्यास्ताची कातरवेळ झाली होती. या कातरवेळी हेदवी समुद्रकिनारा विलक्षण दिसत होता. सुट्टीचा दिवस असून गर्दी फारच कमी होती.
    हेदवीच्या याच नितांत सुंदर स्थळी एक आश्रर्य दडलंय.
    किनाऱ्याच्या उजव्या बाजूला बामणघळ नावाची अदभूत जागा आहे. या घळीत लाटांचे ४० फूट उंचीचे फवारे उडतात. हे फवारे कसे उडतात ते कळेलच पण आत्ताची ही सुंदर शांत वेळ कायम लक्षात राहिल अशीच होती.
    तुम्हाला काही क्षण का होईना अंतर्मुख नक्कीच करते.
    हेदवीच्या किनाऱ्यावर डाव्या हाताला दुरवर जयगड बंदराचे दिवे लुकलुकत होते.
    पहिल्या दिवसाची संध्याकाळ ही सार्थकी लागली आणि त्यामुळे प्रवासाचा शिणवटा कुठल्या कुठे निघून गेला. आता लागले ते बामणघळीचे वेध
    बामणघळ आम्ही बघणारच होतो पण जातानाच वाटेवर लागलं ते हेदवीचे प्रसिध्द असलेले दशभुजा गणपतीचे मंदिर.
    किल्लेवजा तटबंदीने वेढलेले हे मंदिर बघण्यासाठी रस्त्यावर गाडी लावून काही पायऱ्या चढून जावं लागते जेष्ठ नागरिकांसाठी थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ताही आहे.
    उंचावर असलेले मंदिर, मंदिरातून दिसणारा नारळ पोफळीचा रम्य परिसर, आजूबाजूची मोहक शांतता यामुळे ही जागा पाहता क्षणीच आवडून जाते.
    खरं तर पुर्वी हेदवी हे गाव हे आडवाटेवरचे गाव होते पण या गणपती मंदिरामुळे गावाची ख्याती वाढू लागली. इथला बाप्पा हा नवसाला पावतो असं म्हणतात त्यामुळे आता हे देवस्थान अत्यंत जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
    साडेतीन फूट उंचीची ही गणेशमुर्ती अत्यंत रेखीव आहे. ही मूर्ती नेपाळमध्ये घडवल्याचे सांगितले जाते. शस्त्रसज्ज गणेश मूर्ती या महाराष्ट्रात सहसा आढळून येत नाहीत.
    श्री दशभुज लक्ष्मीगणेशाचे मंदिर बघून आम्ही निघालो ते पुढच्या ठिकाणाकडे...
    हेदवीच्या किनाऱ्यावर बामणघळीच्या अलीकडे आहे एक मंदिर. डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर उमा महेश्वराचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
    १७७० ते १७८० दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. मंदिरापर्यंत भरतीच्या वेळी पाणी येते. या मंदिराच्या
    गाभार्‍यात एक शिवलिंग असून मंदिराजवळच एक गोड्या पाण्याचे कुंडदेखील आहे.
    उमा महेशाच्या मंदिरापासून डोंगराला धरुन १५० मीटर मागे गेलं की लागतं ते हेदवी आश्चर्य...बामणघळ
    बामणघळ ही जागा म्हणज ३५ ४० फूट लांब आणि जेमतेम दीड दोन रुंद अशी एक खडकात तयार झालेली घळ आहे.
    भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी तुफान वेगाने हा घळीत आपटते आणि हे पाणी २० ते ३० फूट उंच उडते. पावसाळ्यात पाण्याचे हे कारंजे अजून उंच उडते.
    पण या फवाऱ्याजवळ जाणे हे धोकादायक आहे पाण्यामुळे निसरडा झालेला खडक, खोल असलेली घळई आणि पाण्य त्यामुळे सुरक्षित अंतर राखून थरकाप उडवणारा हा खेळ बघत राहयचा.
    पण बामणघळ बघायचे पण एक गणित आहे. भरतीच्या वेळा बघूनच इथे जावं लागतं.
    या जागेला बामणघळ असं का म्हणतात तर या नावामागे एक गोष्ट आहे.
    एकदा रात्री इथून एक ब्राह्मण प्रवासी एकटाच मार्गक्रमण करत होता. इथे असलेल्या घळीत तो पडला आणि जखमी झाला..पडलेला तो दुर्दैवी ब्राह्मण घळीतून बाहेर पडू शकला नाही दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. तेव्हापासून या जागेला बामणघळ असं नाव पडलं.

Комментарии • 22

  • @rupa5650
    @rupa5650 3 месяца назад

    Nice place & nice video ❤

  • @nitinpisal1056
    @nitinpisal1056 2 месяца назад +1

    निवेदन दुर दर्शन ला लाजवेल असे आहे खुपच छान

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!

  • @avinashhadkar4696
    @avinashhadkar4696 3 месяца назад +1

    खुपच छान चित्रफीत! चित्रीकरण सुद्धा छान. निवेदन ऊत्तम. ताई आणि भाऊ, हेदवी गणेश देवळाच्या पायर्‍यांजवळ एका छोट्याशा टपरीत अत्यंत रुचकर चविष्ट लाडु मिळतात वैशिष्ट्य हे की ते दुकानदार मोजकेच लाडु तयार करून आणतात म्हणुन ताबडतोब संपतात. त्यांना देवळाच्या अनेक सुरस कथा ठाऊक आहेत.

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      अविनाश दादा तुम्ही दिलेली माहिती खूपच उपयुक्त ठरेल त्याबद्दल आभारी आहोत.
      तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल आभारी आहे.

  • @harshadaparab8471
    @harshadaparab8471 3 месяца назад

    खूप छान माहिती. खूप छान मांडणी.

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      धन्यवाद हर्षदा मॅडम...आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जुन सबस्क्राईब करा.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 3 месяца назад +1

    उत्कृष्ट व्हिडीओ

    • @Harifi_
      @Harifi_  3 месяца назад

      धन्यवाद सर!!!!

  • @kalpanadalvi2049
    @kalpanadalvi2049 2 месяца назад

    Khup sunder video kadla aahe 👌👌🌹😍 kokan athisay sunder aahe..I am from Chiplun ❤️❤🎉🎉

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      Thank you kalpana ji...
      Do not forget to subscribe to our channel.
      And pls share the link to your dear once.

  • @NiranjanaHarip
    @NiranjanaHarip 3 месяца назад

    अप्रतिम सौंदर्य आहे.... व्हिडिओ शूटिंग आणि निवेदन अतिशय उत्तम....❤

  • @mrinalinirokade7335
    @mrinalinirokade7335 3 месяца назад

    Khupach Maasta...❤

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      खूप खूप आभार!!!

  • @gaurijoshi8317
    @gaurijoshi8317 3 месяца назад

    खरंच खूप च सुंदर आहे हेदवी..आणि vblog पण खूप छान झालाय.. माहिती पूर्ण..निवेदन मस्त..

  • @user-mi2ls1yw5o
    @user-mi2ls1yw5o 2 месяца назад

    Aamch gav hedvi 🙏

    • @Harifi_
      @Harifi_  Месяц назад

      खुप सुंदर गाव आहे तुमचा !!!

  • @mayury85
    @mayury85 3 месяца назад

    Keep it up ❤

  • @vijayjoshi1805
    @vijayjoshi1805 3 месяца назад

    कोकण फेरफटका म्हणजे एक टाॅनिक आहे.कोकणचा व्हिडिओ पाहिला की मन ताजेतवाने होते

  • @chaitanyamungi5710
    @chaitanyamungi5710 3 месяца назад

    Sunset नंतर चा समुद्र किनारा सुंदर 👌🏻