"संतुर्की "|संपूर्ण मराठी वेब चित्रपट |“Santurki” |Full Marathi Web Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2019
  • गावाकडच्या गोष्टीच्या आधीची गोष्ट
    मराठीतला पहिला वेब सिनेमा...!
    अखेर संतुर्की रिलीज झाला
    संत्या आणि सुरकीची हि गोष्ट आवर्जून बघा आवडली तर इतरांना बघायला सांगा...कृपया डाउनलोड करू नका...
  • ПриколыПриколы

Комментарии • 5 тыс.

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  5 лет назад +772

    तुम्ही जो उत्तम प्रतिसाद देेताय त्याबद्दल मनापासून आभार.. फक्त एकच करा पाठवत रहा...पोहचला पाहिजे राव...मेहनत सफल झाली पाहिजे..!

    • @harshadkesarkar5272
      @harshadkesarkar5272 5 лет назад +18

      ho pan tumi shabdh dya ki gavakadchya goshti part 2 kahnar mhnun khp athvan yet ahe tumchya team chi

    • @kishortalpe9478
      @kishortalpe9478 5 лет назад +13

      फक्त एक विनंती आहे.. गावाकडच्या गोष्टी परत चालु करा..
      तेच आपले जुने कलाकार सोबत घेऊन..

    • @vishwajeetnikam5320
      @vishwajeetnikam5320 5 лет назад +1

      😍

    • @anjalijadhav9286
      @anjalijadhav9286 5 лет назад +2

      Nakkich ☺️

    • @SkPublicityPandharpur
      @SkPublicityPandharpur 5 лет назад +4

      माझ्या RUclips चॅनेलवर Community Tab मध्ये ऍड केले आहे Full Support👍👌👌👌 @Sk Publicity Pandharpur

  • @premkendre2339
    @premkendre2339 5 лет назад +92

    खरं सांगा राव "संतुर्की" पाहताना कोण कोण रडले .(रडले असाल तर like करा)

    • @vishalpaikrao5050
      @vishalpaikrao5050 5 лет назад +1

      Bhava mi radlo

    • @rajeshkhopade2296
      @rajeshkhopade2296 5 лет назад

      Kharch radaval yani

    • @user-lb7dc7fr8j
      @user-lb7dc7fr8j 5 лет назад +2

      भावा मी रडलो ज्यावेळेस संत्याचा बाप आमदाराच्या पाया पडला तेव्हा अचानक च डोळ्यात पाणी आले

    • @santoshmadane9778
      @santoshmadane9778 Год назад

      @@user-lb7dc7fr8j aani

    • @jayvantpagar4811
      @jayvantpagar4811 Год назад

      Mi khup radlo

  • @LovewithTwins23
    @LovewithTwins23 3 года назад +34

    शाळेत छडीचा मार, टेम्पोतून वऱ्हाड, गावाकडचा मंडप, पंगतीत बसून जेवण हे सगळं पाहून हा सिनेमा 101% ग्रामीण भागातील जीवन अन बालपणी च्या आठवणी जाग्या करतो.... बापू ची व्यक्तिरेखा मन जिंकून जाते... आवर्जून बघा नक्की आवडेल

  • @smiteshondle3508
    @smiteshondle3508 4 года назад +39

    काल पर्यत ६ वेळा हा चित्रपट बघितला होता .आणि आज सातव्यानंदा परत बघितला पण प्रत्येक वेळी हा चित्रपट बघताना अस वाटत होतं की पहिल्यांदाच चित्रपट बघतो आहे...खूप छान चित्रपट बनवला आहे नितीन पवार आणि संपूर्ण टीम👌👌👌

  • @vishalpol3012
    @vishalpol3012 5 лет назад +18

    सैराटनंतर माझ्या काळजाला भिडलेला चित्रपट दुसरा कोणता असेल तर तो म्हणजे "संतुर्की"
    अतिशय उत्तम अभिनय.
    नितीन पवार आणि संपुर्ण टीम चे मनापासुन आभार
    असेच दर्जेदार चित्रपट पाहण्याची आम्हाला संधी देत जा🙏♥

  • @vikaslavate4264
    @vikaslavate4264 5 лет назад +14

    फिल्म दाखवायला लेट केला पण थेट काळजात गेला,
    सर्वांचे खूप अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐

  • @mahadevbhosale3484
    @mahadevbhosale3484 3 года назад +21

    मलातर अस वाटतंय माझ्या जीवनावर आधारित आहे. खुप छान सर्व कलाकारांचे अभिनंदन.

  • @shailesh_pardhe
    @shailesh_pardhe 3 года назад +10

    भावनो महाराष्ट्रातल्या करोडो ग्रामीण तरुणांच्या काळजात हात घातलियास तुम्ही...
    खूप छान वाटला पिक्चर... प्रेमात पडलो यार

  • @rameshakhade6530
    @rameshakhade6530 5 лет назад +12

    खरोखरच सुरकीन मनावर दगड ठेवलाय आनी बापाची ईज्जत ठेवलीय संतया सुरकी एकदिस खुप मोठे स्टार होनार आहेत
    नितिन सर लाख लाख मुजरा आपनास

  • @adityabhosale6393
    @adityabhosale6393 5 лет назад +30

    कबीर सिंग हा फक्त एंटरटेनमेंट सिनेमा आहे पण संतुर्की ही वास्तविकता आहे ..... जर कोणाचं प्रेम खरं असेल निस्वार्थी असेल तर त्याला नक्की योग्य तो वेळ द्या मग कोणताही मुंबईवाला कोणत्याही संतुर्की च्या मध्ये येऊच शकणार नाही

  • @arayankhandabhor3030
    @arayankhandabhor3030 3 года назад +22

    नितीन सर,माझ्याकडे शब्द नाहीत आपले कौतुक करायला , आपल्या कल्पकतेला सलाम.

  • @shivanand02
    @shivanand02 4 года назад +15

    कसं हाय बापू..
    कुठल्या बी नात्यात समोरच्याला मोकळीक देता आली पाहिजे, अगदी आपल्याला जीव न लावायची सुद्धा...
    - संतुर्की ♥️

  • @amitbub5059
    @amitbub5059 4 года назад +18

    सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य "प्रेम येडयागतच करायचं असतं.. शहाण्यागत केल्यावर त्याचा व्यवहार होतो.." एक नम्बर.!

  • @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke
    @Marathi_Vyakaran_Ajay_Ghodke 5 лет назад +20

    प्रेम येड्या गतच करायचं असत शहाण्या गत केलं कि त्याचा व्यवहार होतो....
    Superb डायलॉग👌👌👌👌👌👌

  • @sonake90
    @sonake90 4 года назад +12

    खरंच खूप छान web series आहे. मी तीसऱ्यांदा पाहिल ही संत्या सुरकीची गोष्ट .. काळजाला भिडणारी गोष्ट आहे... गावाकडच्या गोष्टीचेही मी पूर्ण episod पहिलेत... तरीही ते सारखं पाहावेसे वाटतात.. रोज रात्री एक तरी episod पाहिल्याशिवाय मी झोपत नाही.. काय माहिती पन गावाकडच्या गोष्टी पाहण्याची खूप सवय झालीये.. कोरी पाटी प्रोडक्षण ला मनापासून धन्यवाद आणि पुढे ही अशीच नवनवीन गोष्टी कोरी पाटी प्रोडकशनच्या माध्यमातून सादर करावीत अशी अपेक्षा... love you all kori pati production team & my favourite carector baappu... ❤👌👌👍

  • @ganeshbhutepatil5760
    @ganeshbhutepatil5760 4 года назад +19

    यापेक्षा मोठा सिनेमा आणखी काय असते ग्रामीण भागात.........पूर्ण गावाचं चित्र तयार केले भाऊ तुम्ही........खूपच वेगळा विषय आहे आणि खूप खुप अप्रतिम चित्रपट तयार केलाय........ खूप खुप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी........आणि धन्यवाद तुम्ही केलेल्या मनोरंजनासाठी...... thanks once again....🙏🙏👏

  • @user-gs2ij8fc6k
    @user-gs2ij8fc6k 5 лет назад +10

    अायला सुरूवातीला पूर्ण लहानपण आठवुन दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद
    पण अखेर पर्यंत बघता बघता डोळ्यात कधी पाणी आल काही कळलच नाही
    खुप खुप धन्यवाद

  • @vaibhavkamble2516
    @vaibhavkamble2516 5 лет назад +5

    प्रेम वेड्यागत करायचं अस्त शहाण्या गत केलं की त्याचा वेव्हार होतो .....
    नाद खुळा डायलॉग........(नितीन सर)
    खूप म्हणजे खूपच छान 😘😘😘😘💞💞💞

  • @nikitajadhav8790
    @nikitajadhav8790 3 года назад +12

    खुपचं सुंदर चित्रपट आहे 👍तुमची टीम मेहनत दिसते प्रामाणिक केलेलं काम दिसत असे प्रयोग अजून यावेत नक्कीच आम्हा प्रेक्षकांना आवडतील

  • @ChetanSDeshmukh
    @ChetanSDeshmukh 5 лет назад +6

    खुप दिवसांपासुन वाट पहात होतो या सिनेमा ची दर्जेदार चित्रीकरण , अतिशय छान ॲक्टींग , अप्रतिम दिग्दर्शन,सुरेख व समजण्यासाठी सोपा संवाद,
    एक सुंदर मराठी सिनेमा सर्व कलाकारांचं मनपूर्वक अभिनंदन जिंकलत सर्वांनी हा सिनेमा ५ मिलियन विव्स च्या वर जाईल थोड्याच दिवसांत स्क्रीनशॉट काढून ठेवा.
    खूप टच करतो यार मनाला.
    सेल्युट नितीन सर आणि टीम .🙏

  • @akshaydanwale455
    @akshaydanwale455 5 лет назад +16

    ❤💖खरच प्रेम वेड्यासारख करायच असता शहाणपणाने केल तर त्याचा व्यवहार होतो 😪😥😥💖निशब्द सरळ काळजात घुसल राव ❤❤

  • @amolstudios
    @amolstudios 4 года назад +10

    खऱ्या मातीला हा चित्रपट आहे.. मनाला स्पर्श करुन गेला... तुमच्या सर्व टीम चा आभार मानतो..
    जुने दिवस आठवले की राव

  • @akshaythorat1819
    @akshaythorat1819 2 года назад +8

    संत्या दादा आणि सुरेखा वहिनी हा सिनेमा खूप छान आहे आणखी असंच वेब सिनेमा वाढत जावा आणि तुमच्या सिनेमाला खूप खूप प्रतिसाद मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना खूप भारी वाटल हा वेब सिनेमा पाहून 👌🤩

  • @nareshjadhav4748
    @nareshjadhav4748 5 лет назад +13

    चित्रपट मध्ये देखणी, हिरो हरोईन च पाहिजे अस काही नाही स्टोरी मध्ये दम पाहिजे आणि ते तुम्ही दाखवून दिले 1 no स्टोरी आहे नितीन सर माझ्या वास्तवात जगल्या सारखे वाटलं
    संत्या 1 नंबर साताऱ्याच्या इमरान हशमी

  • @aayushidancenashik7088
    @aayushidancenashik7088 5 лет назад +6

    1no पवार सर तुम्ही जी वेब सेरिज मूवी बनवली खूप छान सुंदर आहे
    माझी ही कहाणी अशी होती
    मनाला भावली
    माझं ही नाव संतोष आहे माझं जे प्रेम होत तिच नाव सुरेखा होत
    जे मी करू शकलो नाही ते तुम्ही करून दाखवलं मूव्ही बनवून
    ग्रेट सर
    मी तुमचा सपूर्ण भाग पाहिले गावकडचा गोष्टी ती मात्र पुढे चालु ठेवा खूप छान वाटत

  • @ravishete1784
    @ravishete1784 4 года назад +10

    संतोष भाऊ एक नंबर पिक्चर राजकारण सोडा असलो तर सुरकी नक्की भेटली असती तुला तुझ्यासारखा तूच संतोष भावा

  • @aniketbhujabl7372
    @aniketbhujabl7372 3 года назад +8

    खूप छान नितीन सर एक दिवस महाराष्ट्रातील टॉप तुम्ही संपूर्ण मोठे डायरेक्टर असाल

  • @somnathdadas7497
    @somnathdadas7497 5 лет назад +5

    खूप सुंदर आणि एकदम चित्रपट पाहताना समोरच कहानी चालू आहे असे वाटते. खूप छान काम केले आहे . टीम चे खूप खूप आभार.....खूप चांगला प्रयत्न.....

  • @hemantingale2354
    @hemantingale2354 5 лет назад +6

    खूप सुंदर चित्रपट.ग्रामीण भागातील हरवलेले जीवन पाहायला मिळाले., लग्न समारंभ ,वरात,घरे ,विहीर,पार,गुरांचा गोठा
    सारे काही अप्रतिम .मोठ्या पडद्यावर खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळेल.संत्या ,बापू, सुर्की आणि सर्वच मातीतल्या कलाकारांचा अप्रतिम अभिनय.आपल्या कोरी पाटी ला खूप खूप शुभेच्छा

  • @pramodmastud231
    @pramodmastud231 2 года назад +9

    असा पिक्चर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे एकच नंबर

  • @kailasudavant6146
    @kailasudavant6146 4 года назад +12

    खुप झोप लागली होती. ..पण संतुर्की (संतोष आणि सुरेखा ) असच काहीतरी असेल म्हणुन थोडा वेळ पाहुया वाटल ...पण ह्या चित्रपटाने पापणीसुध्दा बंद करायला परवानगी दिली नाही. ...
    ग्रेट..... कोरी पाटी प्रोडक्शन, लेखक, दिग्दर्शक आणि सर्व कलाकार. ...

  • @anilkumarsuryavanshi8046
    @anilkumarsuryavanshi8046 5 лет назад +7

    इतिहास घडला आम्हाला चित्रपट बघुन बरेच शिकायला मिळाले प्रयत्नला यश हे मिळतेच आणि राजकारणी लोकांच्या पाठी सामान्य माणसाने किती पळावे हो प्रेम मित्र मैत्रिणी याचीं जवळीक खुप मस्त बापूच नाँलेज हाच खरा हिरो

  • @pravinmali8591
    @pravinmali8591 5 лет назад +12

    खरच आपला आभारी आहे.कारण जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि एक विनंती आहे गावाकडच्या गोष्टी परत चालु करा.💐💐💐💐💐

  • @siddheshmane9347
    @siddheshmane9347 4 года назад +6

    अजून हि आमच्या पाटण तालुक्यात हिच आवस्ता आहे यार तुम्ही आपल्या पाटण ची आवस्टा दाखवली खुप खुप आभार

  • @nitishbhawarkar2574
    @nitishbhawarkar2574 3 года назад +5

    खासच acting भावांनो. संतोष, अव्या, आणी माझा फेव्हरेट बाप्पू. बाप्पू तूझ पात्र मनाला भारावून टाकणार. Thanks to Kori Pati Production and Thanks to Nitin Pawar Sir.
    तुम्ही दिलेली अनमोल भेट म्हणजे हे सगळे. वाटत सतत बघावं आणी यातच हरवून जावं.
    आई भवानी तुम्हाला भरपूर यश प्रदान करो.
    जय भवानी, जय महाराष्ट्र.

  • @pravinsondulkar2671
    @pravinsondulkar2671 5 лет назад +7

    मस्त झाला आहे संतुर्की. त्यांचं लहानपण ज्या कलाकारांनी सादर केलं आहे ते खूप चांगलं केलं आहे आणि त्यांचे चेहरे आणि बोलणं बघून खरंच तेच लहानपणीचे आहेत असं वाटत होतं. ह्या चित्रपटाने हसवल आणि रडवल सुद्धा. गाणं लागलं तेव्हा संपू नये असच वाटत होतं. आजही गावी खोटी माहिती सांगून लग्न होतात हे दाखवलं ते बर केलं, हे बघून असल्या फसवणुकीतून एक जरी मुलगी वाचली तरी खूप आहे. प्रेम सगळे करतात पण प्रेम निभावणारे संतुर्की कमी असतात.

  • @prasadmali3434
    @prasadmali3434 5 лет назад +6

    अप्रतिम धन्यवाद इतकी सुंदर कलाकृती आम्हाला बघायला दिल्याबद्दल

  • @anilvapilkar8551
    @anilvapilkar8551 3 года назад +8

    खरच खूप छान चित्रपट आहे...अप्रतिम कला आहे सर्व कलाकारणच्या अंगात...असेच चित्रपट बनवत जा..आवडेल आम्हाला

  • @akshayjagdale8582
    @akshayjagdale8582 4 года назад +7

    खूप दिवस झाले ही film पाहून अभिप्राय देणं राहून गेलं, पूर्ण कथेत सगळ्यात जास्त भावली ती बापूंची गोष्ट. तितकाच सुरेख k.t. पवार यांचा अभिनय. वांझ स्त्रीसाठी जी मानसिकता आपल्या गावाकडे संपत आली असली तरी जाणवतेय अजून .K.T Pawar यांचा विविधांगी अभिनय दिसून आला, लवकरच सोनेरी पडद्यावर चमकाल ही आशा.

  • @rajivkarbhal1567
    @rajivkarbhal1567 5 лет назад +8

    जोशी, कुलकर्णी, देशपांडे पेक्षा जास्त सरस आणि नैसर्गिक अभिनय केलाय या मुलांनी.... उत्तम अभिनय, उत्तम चित्रपट....

  • @surajmahajan8776
    @surajmahajan8776 5 лет назад +7

    भवांनो जिंकलसा. सत्तर टक्के भारत ग्रामीण भागात राहतो आणि तुम्ही वेबच्या दुनियेत त्यांच्या प्रेमाचं प्रतिनिधित्व केलसा. मातीतलं प्रेम मातीमध्ये उगवून सुध्दा आभाळापर्यंत पोहोचलेलं असतं. प्रेम हे यड्यासरखच करायच असतं, शाण्यासारखं केलं की त्यो ह्यवार हुतो.👌👍

  • @ramkalsaitkar8196
    @ramkalsaitkar8196 3 года назад +5

    सर नंबर 1 पिक्चर पिक्चर मे रोज रोज रोज एकदा तरी पिक्चर पिक्चर पाहिल्यानंतर आपोआप डोळ्यात पाणी आलं नितीन सर नंबर👍👍👍👍👍👍👍👍👍 काय नंबर एक कहाणी आहे सर तुम्हाला धन्यवाद म्हणावा तितक कमी आहे सर नंबर एक प्रेम कथा संतोष आणि सुरकी ची मला टाईम मिळाला की मी पिक्चर पाहतो जितका पाहू तितका बोर होत नाही नंबर एकच 🙏🙏🙏 राम राम धन्यवाद नितीन पवार सर

  • @noneyog
    @noneyog 4 года назад +6

    एक नंबर पिक्चर पवार साहेब....मोठ्या पडद्यावर रिलीज झाला असता तर धुमाकूळ घातला असता महाराष्ट्र भर👌👌

  • @pramodshintre7367
    @pramodshintre7367 5 лет назад +4

    खूप छान, अप्रतिम, जेवढे 90s kids आहेत त्यांनी तर नक्की पहिला पाहिजे खूप जुन्या आठवणी ताज्या होतात. #शक्तिमान #राजहिंदुस्तानी, न समजणारे प्रेम गावाकडच्या गोष्टी, खरच खूप छान. सिनेमा पाहिल्यानंतर खूप आठवणी ताज्या झाल्या. Thank you....👌👌👌👌😢

  • @The_business_solution_loans
    @The_business_solution_loans 5 лет назад +7

    नितीन सर तुमच्या सिनेमा ल आणि तुमच्या टॅलेंट ला कोणाची तोड नाही खूप मस्त बनवला आहे तुम्ही मराठीतला पहिला वेब सिनेमा आहे , आणि सर्व कलाकारांनी खूप मनापासून छान काम केलं आहे , संत्या , सुरखी , आव्या, माधुरी आणि रॉयल किंग आपला बापू कडक ........नितीन सर खूप मस्त वाटला सिनेमा.....👍👌👌👌👌👌👌

  • @vijaybirhade9424
    @vijaybirhade9424 4 года назад +9

    संत्या, सुरकी ,अव्या,माधुरी,बापू,सम्या खूप मस्त कलाकार आहेत...👍😊..keep it up..

  • @mahadevbhosale3484
    @mahadevbhosale3484 3 года назад +10

    माझं वय वर्षे 52 आहे पण हा पिक्चर बघता.मला अस वाटतय माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी तुम्ही चोरल्या. 😥😥😥👌👌👍

  • @ganeshkhengare3037
    @ganeshkhengare3037 5 лет назад +6

    हा चित्रपट पाहत असताना खरच लहानपनी ची आठवण आली।मी जेव्हा गावी होतो तेव्हा आशा गोष्टी चा अनुभव पहिला होतो।संत्या सुरकी ही अप्रतिम जोडी आहे।मित्रासाठी जीवाला जीव ओतणारे असे मित्र असणारे अव्या आणि बापू खूप चांगले काम केले ।मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो।

  • @StoriesFromMyCamera
    @StoriesFromMyCamera 5 лет назад +6

    खूप अप्रतिम असा सिनेमा बनवलेला आहे . गावाकडील मराठी भाषेचा उपयोग एक नंबर केलेला कलाकारांनी अप्रतिम काम केलेला आहे दिग्दर्शन सुद्धा छान झालेला आहे तसंच गाणी सुद्धा छान आहेत ऐकताना खूप छान वाटतात खरंच या सिनेमाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे मी एकदा सोडून दोन वेळा सिनेमा बघितला

  • @nileshdase2203
    @nileshdase2203 4 года назад +7

    नितीन सर जेवढी मजा थिएटर मध्ये बगून येत नाही तेवढी मजा आज you tube वर बगून आली खरंच मानलं सर तुम्हाला आम्ही तुमच्या गावात आलो होतो वेखंड वाडीत तुम्हाला भेटायला तुम्ही नव्हता सर आम्हाला भेटायचं आहे तुम्हाला

  • @sonnaliShorts235
    @sonnaliShorts235 4 года назад +8

    खूप दिवस पाहिल पाहिजे म्हणत होते आज एकदाची पाहिले,, अप्रतिम गोष्ट आहे,, खरोखरची स्टोरी पाहतो असं वाटलं,, टीव्हीवर दाखवला तर हा सिनेमा सुपर-डुपर हिट होईल,,, खूप छान एडिटिंग ,लोकेशन, खूप मस्त आणि बोर ही झालं नाही,,😍😍 खूप हरवून जातोय पाहताना

  • @bhaskarpatil8801
    @bhaskarpatil8801 5 лет назад +11

    संपूर्ण महाराष्ट्रातील ज्यांची अधुरी प्रेम कहाणी राहिली त्या सर्वांना हा चित्रपट समर्पित 😊😊

  • @aniketpatil9879
    @aniketpatil9879 5 лет назад +4

    अतिशय मनाला चटका लावून देणारी संत्या सुरखी गोष्ट आहे. तुमचा पहिला प्रयत्न खूप छान आणि सफल झाला👌 सर्वांचं मनापासून अभिनंदन👏💐💐

  • @pramodshewatkar.262
    @pramodshewatkar.262 4 года назад +5

    मराठी बेवसिरीज आणि वेब सिनेमाचा नवा प्रेषक वर्ग उभा करण्यात कोरीपाटी प्रोडक्शन आणि नितीन सर तुमचा मोलाचा वाटा आहे..
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ajitdeshmukh9821
    @ajitdeshmukh9821 2 года назад +11

    नितिन सर नागराज मंजुळे ला तुमि कमी नाही. हा पिचर डायरेक् काळजावर दस्तक देतोय खुप छान ज्याने खरः प्रेम केलय ना तो रडनार नक़ी

  • @shyamkamble5597
    @shyamkamble5597 5 лет назад +6

    खूपच मस्त आहे संतूर की मोवि तुमच्या या प्रयत्नांना खूप मोठा यश प्राप्त होईल कारण तुम्ही खूप मनापासून काम करत आहात या मोवि मध्ये सर्व कलाकारांनी खूप मनापासून काम केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद थँक्यू प्रचलित समाजामधील गुणदोष दाखवून तुम्ही एक चांगला मार्ग दाखवला आहे जेणेकरून मुंबईला असणारी प्रत्येक लोक श्रीमंत नसतात व प्रत्येक मुलीच्या विवाहाबद्दल आपण पूर्ण चौकशी न करताच एखाद्या स्थळाला होकार कळवतो तेव्हा त्यानंतर ती मुलगी बसवली जाते आहे की नाही याची काळजी न घेणे हे हे तुम्ही यातून दाखवून दिले आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीने विवाहापूर्वी दोन्हीकडील बाजू खात्रीपूर्वक तपासल्या पाहिजेत असा संदेश यातून मिळतो

  • @sambhajipatil4966
    @sambhajipatil4966 5 лет назад +13

    नितीन सर खूपच छान आवडला मला असेच तुमी अजून चित्रपट घेऊन या 🙏🙏🙏

  • @arjundabhole4753
    @arjundabhole4753 3 года назад +6

    हार्ट टचिंग लव्ह स्टोरी संतोष भाऊ.👍👍👍👍
    सर्व कलाकार जीव ओतून काम करतात👌👌👌👌👌👌
    1 नंबर .

  • @user-fh4bh4bd3o
    @user-fh4bh4bd3o 4 года назад +4

    नितीन पवार यांचे ....प्रथम अभिनंदन
    विषयाच्या मुळाशी जाऊन कथेला दिलेला न्याय अगदी वाखण्याजोगा आहे...
    संपूर्ण चित्रपटाची कथा प्रसंग आणि पात्र रसिक मनाला खूपच जवळची वाटतात...प्रत्येक कलाकार फक्त अभिनयच करत नाहीत तर जे कथानकातील आयुष्य मनमुराद जगतात...
    रेकॉर्ड ब्रेक सिनेमा आहे आणि पात्राविषयी सांगायचं तर काय अगदी जिवंतपणा आणि तळमळीने केलेले काम मनपटलावर ....अधिराज्य गाजवेल....
    सुंदर कलाकृती ....लवकरच आपला दुसरा सिनेमा येवो...आणि कोरी पाटी टीमला मनोमन शुभेच्छा ....
    आपल्या सर्वाची भेट व्हावी हीच एक इच्छा ....
    बाकी काळजी घ्या....
    आपल्या गावाकडंच्या गोष्टीतून तर तुम्ही भेटतच असता.....
    @प्रमोद जगताप फलटणकर

  • @vickyumap8610
    @vickyumap8610 5 лет назад +6

    खरच प्रेम एड्यागत करायच असत शाहन्या गत केल की त्याचा व्यवहार होतो हार्ट टचिंग मूवी... नितिन सर खुप छान सिनेमा 👍👍👍👌👌👌👌👌👌👌

  • @dnyaneshwarpavar4046
    @dnyaneshwarpavar4046 5 лет назад +6

    खुपच छान सिनेमा आहे, एवढ्या चांगल्या सिनेमा साठी आम्ही उगाचच घाई करत होतो, मराठी सिनेमात एक नंबर सिनेमा आहे हा,
    सर्व मराठी सिनेमात हा सिनेमा आवडला मला.
    नितिन सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,
    आणि सर आपल्या गावाकडच्या गोष्टी चालू करा, खुप आठवण येते हो गावाकडच्या गोष्टींची तर, प्लीज,please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, please, गावाकडच्या गोष्टी चालू करा

  • @prashantaadak5864
    @prashantaadak5864 3 года назад +4

    नितीन सर गावाकडच्या गोष्टी अजून चालू ठेवा खूप प्रेरणादायी आहे सिरीज 100 च्या पुढे भाग नाही भेटले तर खूप नाराज झालो प्लिज लक्ष द्या कमेंट कडे आम्हाला रिप्लाय ची गरज नाही फक्त पुढेही आम्हाला गावाकडच्या गोष्टी पाहुद्या आपला आवडता बाप्पू भारी माणूस बरं सर्वाना धन्यवाद

  • @rushikeshbhosale2482
    @rushikeshbhosale2482 4 года назад +56

    संती आणि सुरखी सारखीच सेम माजी कहाणी आहे खूप वाईट वाटलं माज प्रेम सोडून गेले मला देवा प्रेम कहाणी कोणाची अधुरी लिहू नको खूप त्रास होतो एकट पडल्यावर

    • @aanufilmstudio8077
      @aanufilmstudio8077 2 года назад

      Seam hear bro

    • @hemantsable3791
      @hemantsable3791 2 года назад +1

      Poriwar / bai war kadhich vishwas theu naye...dewan na sudha hya bai rupana fasavla ahe..🙏

  • @nileshgarje.6563
    @nileshgarje.6563 5 лет назад +4

    खरच खुप अप्रतिम चित्रपट आहॆ...गावाकडची आठवण यामधुन जागी झाली.90% मुलांच्या जिवणात हॆच होत पहिल्या प्रॆमाविषयी....यामध्यॆ शॆवटचा क्षण हा खुप रडवणारा आणि सगऴ काही सांगुन जाणारा आहॆ. खुप जिव तोडणारा आहॆ.....
    आणि हो आम्हाला पण खुप ईच्छा आहॆ तुमच्यासोबत काम करायची कधी संधी मिळाली तर सांगा...............🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍😢😢😢

  • @nileshnanaware2682
    @nileshnanaware2682 5 лет назад +12

    माझ्या आयुष्यात आता पर्यंत पहिलेली सर्वात आवडलेली हृदयस्पर्शी लव स्टोरी संतुर्खी..
    खर प्रेम कधीच मिळत नाही. प्रत्येक खर प्रेम करणारी मुलगी मन मारून दुसऱ्या सोबत संसार करत असते..

  • @pravinkuwar6568
    @pravinkuwar6568 4 года назад +6

    अगदी छान स्टोरी .माझ्या आयूष्याच्या बर्याच गोष्टी मिळत्या जुळत्या आहेत .

  • @neelaeshninawe7122
    @neelaeshninawe7122 4 года назад +6

    कोरी पाटी प्रोडक्शन टीम चे खूप खूप अभिनंदन , खूपच सुंदर कथानक अप्रतिम पद्धतीने माडलय . थोडासा मोह आवरला असता तर " 1:11:02 ते 1:11:43" ची (...) दृश्य सांकेतिक पद्धतीने दाखवता आली असती ...... (अस फक्त मला वाटतय). .00:36:06 ते 0:39:56" चा पूर्ण सीन खूपच क्लासीस झालया .. बाकी प्रत्येक विधा , केमेरा कला , अभिनय अप्रतिम , त्यात पटकथा अन् निर्देशन हे आलच की ........कोणत्याही अंगाने हां "छोट्या परड्या वरचा "सैराट" आहे म्हणायला हरकत नक्कीच नाही ......

  • @akashkarande1807
    @akashkarande1807 5 лет назад +6

    खरंच आहे ज्यांच्या वर खूप प्रेम करतो आपण ती आपल्याला सोडली की त्याची स्वतःला कळते पण त्या व्यक्तीला नाही???
    संत्या च्या वाट्याला आलेलं दुःख कोणाला च येऊ नये.
    आणि सुरकी सारखी प्रियेसी या काळात मिळणे दुर्मिळ..
    खरंच खूप छान!!!
    वेब series आहे

  • @adityabhosale6393
    @adityabhosale6393 5 лет назад +5

    प्रेम येड्यागतंच करायचं असतं शहाण्यागतं केलं की त्याचा व्यवहार होतो # गावाकडच्या गोष्टी 🙏😍

  • @saurabhchavan7380
    @saurabhchavan7380 4 года назад +5

    Aj 13 vela picture Pahila .. as Vatar ki picture pahtach rahav.. ajibat kantalach yet nhi.. picture pahtana as feel hot ki just real chaluy . Superb..... love you nitin sir and kori Pati team...

  • @amol.k.patil-chandile
    @amol.k.patil-chandile 4 года назад +6

    एक नंबर झकास संतुर्की पिक्चर भावांनो
    संतोष (संत्या आणि सुर्खी ) सुरेखा जोडी हिट झाली ना राव ....
    सर , कृपया संतुर्की पिक्चर चा पुढचा पर्व म्हणजे ( पुढील भाग ) पण लवकरच काढा
    संतुर्की - 2 धन्यवाद 👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💖🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    पुन्हा एकदा सांगतो 'लय भारी', राव खुपच छान स्टोरी आहे. ....

  • @romanticlovesong628
    @romanticlovesong628 5 лет назад +8

    ग्रामीण भागातील एक सत्य कथा आहे खुप छान आहे चित्रपट आवडला आपल्याला

  • @pramodnaik3916
    @pramodnaik3916 5 лет назад +10

    नितीन साहेब आम्ही तुमची वेब सिरीज आणि वेब चित्रपट फक्त बघितले नाही तर ती प्रत्यक्षात जगलो.बघताना असं वाटलं आम्ही तिथेच आहोत आपसुक डोळ्यातून पाणी आलं.

    • @MythTVMarathi
      @MythTVMarathi 5 лет назад

      Pramod Naik same here 😭😭😭😭

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 3 года назад +4

    बापू म्हणजे (के. टि. पवार सर )तुम्ही काही दिवसानंतर महाराष्ट्र चे महेश कोठरे आहे 👍नक्कीच तुम्हाला भावी कार्यस शुभेच्छा 😍😍🙏

  • @pravinkhamaytkar8844
    @pravinkhamaytkar8844 4 года назад +55

    हा चित्रपट जर टाॅकिजवर जर आला असता तर चांगल्या चांगल्या चित्रपटाला पाणी पाजले असते.

    • @rahulkokare4796
      @rahulkokare4796 3 года назад +1

      Kharach manatl bollat..❤️❤️❤️

  • @yashraj_71
    @yashraj_71 5 лет назад +4

    तुम्ही चांगले कलाकार तर आहातच परंतू मला मोठ्या भावा -बहिणी सारखे आहात म्हणून भावांनो मला संतुर्की हा वेब सिनेमा खूप आवडला .
    म्हणूनच असच नवनविन काही तरी आमच्यासाठी घेऊन येत रहा
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..

  • @samadhanmohite7424
    @samadhanmohite7424 5 лет назад +8

    संत्या कितीवेळा चित्रपट बघा हा तरी मन भरत नाही नितीन सर अप्रतिम बाप्पू संत्या अव्या अभिनय एक नंबर केला

  • @aakashmore5076
    @aakashmore5076 2 года назад +6

    आज पर्यंत चा मी पाहिलेला सगळ्यात भारी चित्रपट . .बोलण्यासाठी शब्द च नाहीत ..👌👌🙏🙏

  • @devabhai4915
    @devabhai4915 3 года назад +4

    खूप छान ,
    पाहून जुने दिवस आठवले,,,
    खरच सर्व कलाकारांचे मनापासुन कौतुक केले पाहिजे,,,👌

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 5 лет назад +9

    संतोष, अविनाश, सम्राट, बापू, सुरेखा, माधुरी आणि नितीन पवार सर तुमच्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक थोडच आहे....
    👍

    • @kalyanjoditoday9638
      @kalyanjoditoday9638 5 лет назад

      आपला बाब्या असता तर गोड दुधात अजून साखर पडली असती.....

  • @abhimhatre9462
    @abhimhatre9462 5 лет назад +9

    अतिशय उत्तम चित्रपट....
    चेहरे सुंदर नसले तरी अभिनय दमदार आहे...
    प्रत्येक कलाकार अगदी वजलेला अभिनेता वाटतोय...
    एक सुचना द्यावीशी वाटतेय ती म्हणजे....
    फिल्म शंभर टक्के गावातील प्रेक्षकांना डोळ्यासमोर धरून तसेच अश्लील चाळे वगैरे वगळून दमदार स्टोरी सह केली असताना चित्रपटात दाखवलेल्या एकमेव किंसिंग सिन मुळे विचित्र वाटला....
    जरी राजा हिंदुस्थानी पिक्चरचा परीणाम दाखवायचा होता तरीही कलाकाराच्या तोंडात वेळेत शुद्धीवर येउन एखादा छोटासा प्रसंगात सामावून जाणारा वाक्य देउन लिप लॉक टाळता आला असता...
    असो..... उत्तम चित्रपट दमदार अभिनय आणि दमदार दिग्दर्शन तसेच उत्कृष्ट डॉयलाग लेखक....
    भपकेगीरी अजिबात नाही

  • @rohitr.shinde2292
    @rohitr.shinde2292 4 года назад +3

    अप्रतिम चित्रपट......आतापर्यंतचे गावाकडच्या गोष्टींचे सर्व भाग बघितलेत.
    हा चित्रपट बघितल्यांनातर मूळ पाया समजला.
    अप्रतिम दिग्दर्शन,लेखन तसेच कलाकारांचे कार्य उल्लेखनीय.
    स्थळनिश्चिती .......!☺👌💐

  • @nageshjadhav3197
    @nageshjadhav3197 4 года назад +12

    बापु तुमच्या अभिनयाला जोड नाही भविष्या मध्ये खूप पुढे जावो अशी अपेक्षा

  • @vilassalunkhe4342
    @vilassalunkhe4342 5 лет назад +4

    अप्रतिम चित्रपट आहे सर. काळजाला भिडला. सर्वांनी अभिनय खूप चांगला केला आहे.

  • @kd4895
    @kd4895 4 года назад +5

    खरच यार सुपर डुपर हिट सिनेमा सुरकी संत्या लव्ह यु मित्रांनो खरच तुम्ही लयभारी लव्हर होता ...आठवणी ला ऊजाळा भेटला ..चित्रपट बघत असताना याचा शेवट होऊच नये असे वाटत होते ..आता 1वाजुन;8मि.झाले आहे ..तरिही अजुन डबल हा चित्रपट बघावा वाटतय ..आणि खरं म्हणजे खरं प्रेम कुणालाच भेटत नसतय ..मिस यु A

  • @bhausahebsonawane8544
    @bhausahebsonawane8544 4 года назад +18

    कोण कोण कॉलेज ला असतांना एकच वही घेऊन गेला आहे.👌👌

  • @singer-pratiktambe1412
    @singer-pratiktambe1412 4 года назад +5

    Yaar.... asa movie aaj paryant marathi industry madhe pan nahi jhala, bapre kay script hoti yaar tumchi, jabardast acting.... ♥️ all casting is superb.... tumhi ekda movie madhe chance ghya.... jabra hit movie asel ti... tyat tumchasarkhe artist kam kartil.... wow mast... keep it up all casting actors and actress ♥️🙏

  • @marathiguide8578
    @marathiguide8578 5 лет назад +6

    तुम्ही जो प्रयत्न केलाय ,,,,त्याला तोड नाही खूपच अप्रतिम फिल्म आहे,,,,,तुमची विचार करण्याची क्षमता खूप मोठी आहे,,, तुमच्या येणाऱ्या फिल्मसाठी तुम्हाला शुभेच्छा ,,,,,असेच फिल्म बनवलेत ना तर येणाऱ्या काही काळात तुमच्या फिल्मला राष्ट्रपती पुरस्कार मिळायला वेळ लागणार नाही,,, पुढच्या वाटचालीसाठी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा,,,,,,आणि धन्यवाद सुद्धा

  • @shubhamshende9078
    @shubhamshende9078 5 лет назад +4

    #संतुर्की_पाहताना..
    युट्युब वरती सध्या सर्वात जास्त लोकप्रिय आणि सर्वाधिक सब्सक्रायबर असणारी मराठी वेबसिरीज जिने महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि इंडस्ट्रीतल्या नावाजलेल्या कलाकार आणि दिग्दर्शक मंडळींना केळेवाडी ता. पाटण जि. सातारा ह्या डोंगराळ भागात येण्यासाठी मजबूर केलं त्याच "गावाकडच्या गोष्टी" चा म्हणजेच संत्या-सुरकी, माधुरी-अव्या आणि बापूच्या आयुष्याचा पूर्वार्ध आणि मराठी मधला पहिलाच वेबसिनेमा "संतुर्की" काल प्रदर्शित झाला आणि माझी प्रचंड उत्सुकता ताणल्याने तो मी कालच पाहिला आणि स्वतःच्या बालपणात जाऊन हींदळून येण्याचा अविस्मरणीय योग आला. संत्या जो आयुष्य जगला आहे तेच आयुष्य आपण स्वतःच जगलो आहे असं माझ्या समवयीन तरुणांना वाटणार म्हणजे आज वयवर्षं 30 ते 31 पूर्ण असलेला इसम आणि त्याच वयांच्या मुलींना, मुलींना म्हणावं की आंटींना समजेना असो बेस्ट वे गृहिणींना असं संबोधू सुरकी जे आयुष्य जगली जे दुःख त्याग भोगला सोसला तोच आपल्याही वाट्याला आला असं नक्की वाटणारच.
    कोरी पाटी प्रोडक्शनच्या भावनांनी भरलेल्या "संतुर्की" नावाच्या प्रेमाने भरलेल्या पाटीमधील सायकल आणि बापू हा सीन माझ्या मनाला विशेष चटका लावून गेला कारण आमच्याही गल्लीत एक असाच बापू होता ज्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं, 8 वर्षांपूर्वी दारू पिऊन एकाकी आयुष्य कंठत मरून गेला त्याचीच प्रकर्षाने काल आठवण झाली आणि नकळत पापण्या ओल्या झाल्या. शाळेतील बालपणीच्या संत्या-सुरकीच्या सीनमूळे पौगंड अवस्थेतील काही घटना व व्यक्ती डोळ्यासमोर तरळल्या आणि मन उगाच स्वप्नाच्या दुनियेत जाऊन गहिवरून आलं असो आज वास्तवात आहे त्या गोष्टींबद्दल जास्त लिहले तर अंगलट येऊ शकतं. दूरदर्शनच्या प्रसारणाबद्दल कोरी पाटी प्रोडक्शन टीम ने दाखवलेला सीन खूप दुर्मिळ वाटला आज हायडेफिनेशन चं पिंकू ग्राईप वॉटर पिऊन जन्म घेणारी मुलं आणि कृष्णधवल टी व्ही ला मुंग्या आल्या म्हणून तासंतास चित्र येण्याची वाट पाहणारे आम्ही एका टेलिव्हिजन आणि टेलिकॉम क्रांतीच्या नवयुगात वावरताना जुन्या स्मृती विसरता कामा नये यासाठी नितीन पवार सरांनी केलेला खटाटोप जाम आवडला.
    90 च्या दशकात घरात टी व्ही असणे म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं, बहुदा जमीनदार, व्यावसायिक आणि सरकारी नोकर ह्यांच्याच दिवाणखान्यात दूरचित्रवाणी नामक यंत्र गवसायचं. आमचे चुलते एस टी महामंडळात नोकरीला होते आणि आमच्या गल्लीत त्यांच्याच घरी एकुलता एक टी व्ही होता, काळा पांढराच होता पण आम्हाला इंद्रपुरीतील खजिना भासायचा आणि त्याला संरक्षण म्हणून लाकडी स्लाईडिंग दरवाजा होता. त्यामुळं गल्लीतील सगळं लटांबर तिथं गोळा व्हायचं, चित्र गेलं की घरावरती चढून अँटिना हलवायचं किंवा प्रक्षेपण तांत्रिक अडचणीमुळे ठप्प झाल्यास गाण्यांच्या भेंड्या वगैरे उपक्रम जोरात चालायचं. तुम्ही म्हणाल हे बावळट असलं शब्द का वापरत आहे तर तीही आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी यांनी संयुक्त विद्यमाने मला दिलेली अनमोल देणगी आहे. शक्तिमान मालिका पाहण्यासाठी जीव कासावीस असायचा, सगळ्या वारांना शिव्या घालत रविवार खूप दिवसांनी आल्या सारखं वाटायचा, शक्तिमान मालिकेचं टायटल सॉंग जणू तुकोबांचा अभंगच वाटायचं. विहिरीत पोहताना आम्हीपण शक्तिमान सारखं गोल भिंगत पाण्यात उडया मारल्या आहेत हे तब्बल 18 वर्षांनी आठवलं आणि कोरी पाटी प्रोडक्शन टीम ने आपल्यावर न फिटणारे उपकारच केले असे वाटले.
    मित्रांनो, संतुर्की मुळे काल मी माझं बालपण खूप जवळून पाहिलं, त्या विश्वात रमण्याचा दोन तासांचा पण बालपणीचा, तरुणपणीचा कालखंड उलगडता आला. दिग्दर्शक नितीन पवार सर, सर्व कलाकार मंडळी आणि निर्माते व तंत्रज्ञ सर्वांचं मनस्वी आभार तुमच्या ह्याच कलाकृतींमुळे आम्हाला जगण्याचा पुढचा मार्ग मिळून जातो.. तुम्ही असच आंतरिक सुख देणारं काहीतरी उत्तम दर्जाचं नेहमीच बनवत रहाल ही अपेक्षा आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीसाठी तुमचा एक श्रोता आणि चाहता म्हणून लक्ष लक्ष शुभेच्छा..
    मी तर पाहिला आणि माझं हरवलेलं विश्व जगलो तुम्हीही पहा.. संतुर्की.. गोष्ट तुमची माझी आणि संत्या-सुरकीची..
    ruclips.net/video/nJD0GH5-gA8/видео.html
    @ आण्णा बनसोडे
    9975433393
    वेळापूर ता. माळशिरस जि. सोलापूर

  • @ravindraawate4149
    @ravindraawate4149 3 года назад +7

    लय जोरात लव्ह स्टोरी संतोस भाऊ सलाम तुमच्या कामाला

  • @vijaysankpal2799
    @vijaysankpal2799 2 года назад +7

    खरे प्रेम करणाऱ्याला त्याच्या पहिल्या प्रेमाची आठवण आल्या शिवाय राहणार नाही.. माझ्या आयुष्यात ही अशीचं सुरखी आली आणि आर्धावर साथ सोडुन गेली.. 😔😔

  • @MayurShelar93
    @MayurShelar93 5 лет назад +4

    तुमच्या कष्टासाठी तुमचं कौतुक करावं तेवढ कमीच...!! मिळणाऱ्या यशासाठी शुभेच्छा.! खूपच सुंदर 👌

  • @JotiramSapkal
    @JotiramSapkal 5 лет назад +5

    खूप छान स्टोरी, अभिनय, एडिटिंग .... खूपच छान काम केले आहे सर्वांनी... तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा...

  • @sachinlonde2812
    @sachinlonde2812 3 года назад +6

    या धावपळीच्या जीवनात.पुन्हा एकदा जुन्या अतवणीला उजाळा मिळाला.कोरी पाटी प्रोडक्शन ला धन्यवाद

  • @user-ue1jj8fy9q
    @user-ue1jj8fy9q 4 года назад +3

    मी भाग पाहून खूप भावूक झालो आहे या पिक्चर पेक्षा कोणता पिक्चर भारी बननार नाही एक नंबर कोरी पाटी प्रोडक्शन संत्या भाऊंनी एक नंबर एक्टिंग केलेली आहे गावाकडच्या सर्व गोष्टी पाहतो मी

  • @ashwiniyadav106
    @ashwiniyadav106 5 лет назад +4

    शानदार ......जबरदस्त ...... झिंदाबाद......कडक हाय राव सिनेमा .नितिन सर, बापु,आव्या ,सुरखी सरपंच ,माधुरी आव्या ... अन् आपला सत्या तुझा नाद नाय भावा ..कोरी पाटी आता कोरी नाही राहीली...

  • @avisagar-7
    @avisagar-7 5 лет назад +4

    सगळ्यात उत्तम अभिनय मला,अव्या चा,आणि बापू चा आवडला ,👌👌

  • @user-gp3ft9lf6i
    @user-gp3ft9lf6i 3 года назад +4

    खुप हृदयस्पर्शी कथानक आहे, मला माझीच स्टोरी वाटली

  • @sureshparit1964
    @sureshparit1964 4 года назад +3

    अतिशय सुरेख संतोष सुरेखाचे काम
    अॉल टिम जबरदस्त
    आभारी आहे तुमच्या सर्वाचा इतका सुंदर हा चिञपट

  • @biganna99
    @biganna99 4 года назад +5

    अप्रतिम..केवल अप्रतिम.
    अकृत्रिम कुदरती अभिनय
    वास्तववादी पात्र
    असली लोकेशन्स
    आम जिंदगी से जुडे प्रसंग
    सीधे सरल संवाद...
    सभी कलाकारोंका सहज सुंदर अभिनय और लाजवाब तर्कसंगत निर्देशन.
    ये असफल दर्दभरी प्रेमकहानी प्रदीर्घ समयतक दर्द देती रहेगी..
    रेशमा और अमोल 👌
    अगली मूवी का इंतजार रहेगा....
    अभिनंदन..🌹🌹🌹