श्री सती देवी व सामत दादा यांचे दर्शन | वडांगळी ता.सिन्नर 🙏

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 дек 2024
  • श्री सती देवी व सामत दादा मंदीर,
    वडांगळी ता.सिन्नर
    ****************
    देशभरातील बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान व बोकडबळीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील हे सती माता व सामत दादा यांचे मंदिर आहे.
    येथे माघ पौर्णिमेला होणारी सतीदेवीची यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. सतीदेवी आणि सामतदादा हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत.
    बंजारा समाज बांधव येथील यात्रेला राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून एकत्र येतात.
    बंजारा समाजातील अनेक प्रथा, परंपरा,लोकगीतांचा अनुभव वडांगळीकरांना या दरम्यान घेता येतो. बोकडबळी आणि त्या विरोधात होणारी आंदोलने यामुळे येथील यात्रा दरवर्षी गाजते.
    वडांगळीकरही उत्साहाने या यात्रेत सहभागी होत पुरण पोळीचा नैवेद्य करतात.
    बंजारा समाजात यात्रा काळात देवीला जुना झेंडा वाहून नवा झेंडा घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी सतीदेवीच्या दर्शनासाठी ह्या ठिकाणी हजेरी लावली होती. तेव्हापासून हे धार्मिक स्थळ प्रकाश झोतात आले. सामतदादा हे बंजारा तांड्याचे नायक होते. त्याच्या मृत्यूनंतर त्यानंची ब्राह्मण पत्नी लिंबू झेलत तांड्यासोबत निघाली. ज्या ठिकाणी लिंबू जमिनीवर पडेल तेथे सती जाण्याचा तिचा निश्चय होता. लिंबू वडांगळी गावात पडला. त्या ठिकाणी सामतदादासोबत त्यांच्या बंजारा व ब्राह्मण अशा दोन्ही पत्नी सती गेल्या, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
    गावात सतीदेवी समोर बंजारा वेशभूषेतील अश्वारूढ सामंतदादाचे मंदिर आहे.
    दुसऱ्या एका आख्यायिका नुसार सामतदादा नावाचा गाडीवान सतीदेवी भक्त होता. त्याने सतीदेवीबरोबरच स्वत:ची पत्नी जसमा हिच्यासह वडांगळीत प्राणत्याग केल्याची दुसरी आख्यायिका आहे
    सतीदेवी मंदिरामागे सैंदर नावाचे दुर्मिळ वृक्ष आहे. मंदिर परिसरात वीरगळीही आढळतात.

Комментарии • 1

  • @Nandini-qk4ow
    @Nandini-qk4ow 4 месяца назад

    🙏🏻🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏🏻🏠🙏🏻🙇🏻‍♀️