Sati Mata Samat Dada Vadangali, Sinnar | सती देवी व सामत दादा मंदिर वडांगळी, सिन्नर | Samat Dada
HTML-код
- Опубликовано: 4 дек 2024
- श्री सती देवी व सामत दादा मंदीर,
वडांगळी ता.सिन्नर
******************************
नमस्कार मित्रानो,
आम्ही भटकंती सह्याद्री समूहाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्या परिसरातील प्रेक्षणीय,धार्मिक,ऐतीहासिक,नैसर्गिक पर्यटन स्थळांची माहिती सर्वांना सहज प्राप्त व्हावी व त्यासोबतच ह्या ठिकाणचे महत्व देखील सर्वांना सहज माहिती व्हावे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्यासमोर सादर करीत आहोत. आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे त्यासोबतच आपण आम्हाला आपल्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती सुद्धा नक्की द्यावी.
🙏🙏🙏___________________________________
देशभरातील बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान व बोकडबळीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथील हे सती माता व सामत दादा यांचे मंदिर आहे.
येथे माघ पौर्णिमेला होणारी सतीदेवीची यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. सतीदेवी आणि सामतदादा हे बंजारा समाजाचे आराध्यदैवत.
बंजारा समाज बांधव येथील यात्रेला राज्यातील विविध भागातून तसेच परराज्यातून एकत्र येतात.
बंजारा समाजातील अनेक प्रथा, परंपरा,लोकगीतांचा अनुभव वडांगळीकरांना या दरम्यान घेता येतो. बोकडबळी आणि त्या विरोधात होणारी आंदोलने यामुळे येथील यात्रा दरवर्षी गाजते.
वडांगळीकरही उत्साहाने या यात्रेत सहभागी होत पुरण पोळीचा नैवेद्य करतात.
बंजारा समाजात यात्रा काळात देवीला जुना झेंडा वाहून नवा झेंडा घरी घेऊन जाण्याची प्रथा आहे. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी सतीदेवीच्या दर्शनासाठी ह्या ठिकाणी हजेरी लावली होती. तेव्हापासून हे धार्मिक स्थळ प्रकाश झोतात आले. सामतदादा हे बंजारा तांड्याचे नायक होते. त्याच्या मृत्यूनंतर त्यानंची ब्राह्मण पत्नी लिंबू झेलत तांड्यासोबत निघाली. ज्या ठिकाणी लिंबू जमिनीवर पडेल तेथे सती जाण्याचा तिचा निश्चय होता. लिंबू वडांगळी गावात पडला. त्या ठिकाणी सामतदादासोबत त्यांच्या बंजारा व ब्राह्मण अशा दोन्ही पत्नी सती गेल्या, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात.
गावात सतीदेवी समोर बंजारा वेशभूषेतील अश्वारूढ सामंतदादाचे मंदिर आहे.
दुसऱ्या एका आख्यायिका नुसार सामतदादा नावाचा गाडीवान सतीदेवी भक्त होता. त्याने सतीदेवीबरोबरच स्वत:ची पत्नी जसमा हिच्यासह वडांगळीत प्राणत्याग केल्याची दुसरी आख्यायिका आहे
सतीदेवी मंदिरामागे सैंदर नावाचे दुर्मिळ वृक्ष आहे. मंदिर परिसरात वीरगळीही आढळतात.
___________________________________________
आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या नातेवाईक व मित्र परिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला सांगा.
माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा.
!!धन्यवाद!!
/ @bhatkanti_sahyadri_samuh
#भटकंतीसह्याद्रीसमूह
____________________________________________
आमच्या फेसबुक समूहात सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
www.facebook.c...
__________________________________________
Music by video:-
AudioLibrary:-
/ audiolibrary-channel
___________________________________________
Please Like Share and Subscribe Channel
-------------------------------------------------------------------
#सतीदेवी #सामतदादा #वडांगळी #sinnar #नाशिक #nashik #बंजारा #banjara #Wadangali #nashiktourism
जय सेवालाल महाराज 💥 जय सामत दादा,🚩 जय सती माता
श्री सतीमाता सामत दादा प्रसन्न 🚩🚩
जय सती सामत दादा❤
🙏
Jay Jay sati Mata
🚩🌹❤️जय सती माता सामत दादा❤️🌹🚩🙏🙏 🙏
Jai Shree SatiSamat Dada Parhsan
🚩🙏🌹❣️Jay Sati Samat Dada ❣️🌹 🙏🚩
Jay sree sati samatdada
Jay sati samat dada
🙏🌹जय सामंत दादा 🌹🙏
जय सामत दादा जय सती माता
Charran sparch
Sari samtdada parasan
🙏🏻🌺🌺🙏🏻🙇🏻♀️
👍
Ajun details mahiti pahije hoti jas ki baherun aalelya lokanchi rahnyachi ani khanyachi soy kashi aahe ? Tithe Stay karu shktat ka vgere vgere
नक्कीच पुढच्या वेळेस ती सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करू.
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल.
Ho my village
Dusari tisari akhyakika kahi nahi. Pahili ahe tich barobar ahe.
Bram naka pasarau dada.
Chuki cha ahe te. Please currect it.
तुमची प्रतिक्रिया वाचली आपल्या म्हणण्यानुसार फक्त एकच अख्यायिका आहे आणि दे कदाचित योग्यही असेल आमच्या सारखे भटके एखाद्या नवीन ठिकाणी भेट देतात तेव्हा त्यांना त्या ठिकाणची माहिती प्राप्त करण्यासाठी मोजकेच पर्याय असतात तेव्हा आम्हाला कोणाकडून योग्य माहिती न मिळाल्यास आम्ही सर्च इंजिनच्या माध्यमातून माहिती जमा करतो व्हिडिओत दिलेली माहिती ही सर्च इंजिन च्या माध्यमातून प्राप्त आहे आपण त्याची खातरजमा करू शकता चुकीची माहिती देण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नसतो आपण आपली अनमोल प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचून आम्हाला योग्य ती माहिती दिली धन्यवाद🙏
jay samata dada