Gav Kamgar Talathi गाव नमुना 1 ते 21 नोंद वही म्हणजे काय व ते कसे मिळवावे. (1/5)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Gav kamgar talathi
    गाव नमुना 1 ते 21
    गाव नमुने
    'गाव नमुना म्हणजे काय व तो कसा मिळवावा?' या प्रश्नाच्या अनुषंगाने खालील माहिती आपणास पुरवीत आहोत-महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (महा. लॅण्ड रेव्हेन्यू कोड) अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. जमीन महसूल कायद्यान्वये जमिनीच्या तलाठी दप्तरामध्ये अनेक प्रकारच्या नोंदवह्या असतात. तलाठी दप्तर नमुना नंबर 1 ते 21 गाव नमुन्यांमध्ये असते. या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो.
    आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
    * गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
    * गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
    * गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
    * गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.
    * गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 7 - (7/12 उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 8अ - या नोंदवहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
    * गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
    * गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
    अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.
    Please like , Comment and subscribe !
    Please subscribe our youtube channel :
    / realestatetechret
    Follow us on :
    Twitter / realestatetechh
    Instagram / realestatetechh

Комментарии • 37

  • @anilmali6007
    @anilmali6007 3 года назад +1

    Best

  • @jadhavsirautomobilevehicle8610
    @jadhavsirautomobilevehicle8610 20 дней назад +1

    Good information about Talati.

  • @vijayjadhav5436
    @vijayjadhav5436 3 года назад +2

    Good information sir

  • @ranjitgajbhiye2730
    @ranjitgajbhiye2730 3 года назад +1

    Khup chan mahiti

  • @ankitkhodke6795
    @ankitkhodke6795 2 года назад +2

    खूप छान माहिती सर..
    परंतु " गाव कामगार तलाठी " ऐवजी फक्त " तलाठी " वापरण्यात यावे असा शासकीय निर्णय आहे.. आपण सुधार करावा .

  • @anuradhabhosale8507
    @anuradhabhosale8507 4 года назад +1

    Very nice mama

  • @ganpatlasunte2454
    @ganpatlasunte2454 7 месяцев назад +1

    गाव नमूना १ ते २१ कसा मीलू सकतोत्यासाठी काय करा वे

  • @nathudhangarulakadhangar153
    @nathudhangarulakadhangar153 3 года назад +1

    सुपरररररररररररररर

  • @ganpatlasunte2454
    @ganpatlasunte2454 7 месяцев назад +1

    गावामध्ये असलेली वाली कीवा खालीर असलेली जमीन चा रेकार्ड पाहण्याकरीता काय करावे

  • @RealEstateTechRET
    @RealEstateTechRET  3 года назад +1

    If you watch and comment on my 3 videos I will answer your 1 query on call 📞 😃 .You can send me whats app message on 9049092318 before calling me.

  • @sikandartamboli2253
    @sikandartamboli2253 3 года назад +2

    मला आठ ड ऊतारा कुठे व कसा मिलळेल सागा घरा ची जागा कीती आहे व कोनाचया नाव वर आहे हे दीसते

  • @ashokshinde3318
    @ashokshinde3318 2 года назад +1

    गाव रजपे ता करजत जि रायगड येथिल फेरफार नंबर ६४/४३ हे फेरफार गाव दपतरी ऊपलध नाही असे तलाटी याणी लेखी दिले आहे तरी ते फेरफार कसे मिळतील मला कूपाया सविसतर माहिती हि विनती करतो आपला विशवासु आशोक रामभाऊ शिदे

  • @nitinkale4840
    @nitinkale4840 3 года назад +1

    सर तलाठी गाव नकाशा सही शिक्का समवेत कसा काढावा

  • @swapnalikore9219
    @swapnalikore9219 7 месяцев назад +1

    इतर हकातील नवे कसे कमी करणे

  • @ramdassalve2760
    @ramdassalve2760 3 года назад +1

    Sir, जमिनीचे अनेक प्रकार आहेत. शेत जमीन, रहिवाशी जमीन, वण जमीन व सरकारी जमीन आसा उल्लेख करावा म्हणजे समजेल.

  • @ramdassalve2760
    @ramdassalve2760 2 года назад +1

    सर, जमीनीचा उल्लेख शेत जमीन किंवा रहिवासी जमीन असा करावा म्हणजे चांगल्या प्रकारे समजेल.

  • @Tech-vh5xi
    @Tech-vh5xi 2 года назад +1

    फेरफार साठी किती रुपये द्यावे लागतात

  • @laxshmanshelar6660
    @laxshmanshelar6660 3 года назад +2

    6 ड मधे काय समजते

  • @dev20256
    @dev20256 2 года назад

    vadilancha shala sudlyacha dakla nahi hai,non creamy layer sathi ,hawa hota ,aple sarkar sirane sangitale ki born dealth nondni cha 14 form geun ye mang banu shakto certificate ,vadilanche school certificate availble nahi hai,any solution for the same

  • @mandhamadhukarsangle7861
    @mandhamadhukarsangle7861 Год назад +1

    साहेब तुमचा फोन नंबर पाठवा आम्हाला तुमच्याशी जमीनी विषयी माहिती हवी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @nusratfathealikhansaab7046
    @nusratfathealikhansaab7046 2 года назад +1

    Gaon kamank 6a kese milega online

  • @dattakamthane223
    @dattakamthane223 2 года назад +1

    NA ची माहीती कुठे

  • @RealEstateTechRET
    @RealEstateTechRET  3 года назад

    सबस्क्राइब करो और काॅल करो 9049092318
    Subscribe to @Realestatetech and chance to have a call with me. Every subscriber can talk to me 9049092318