कळवण तालुक्यातील नांदुरी येथे आदिवासी वैचारिक महासंमेलन उत्साहात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 сен 2024
  • नांदुरी येथे आदिवासी वैचारिक महासंमेलन उत्साहात.
    प्रतिनिधी / बोरगाव
    कळवण तालुक्यातील नांदुरी येथे (दि. 23, 24 एप्रिल) दोन दिवसीय आदिवासी समाजाचा कोकणा, कोकणी, कुकणा वैचारिक महासंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी आठ ते रात्री उशिरापर्यंत मोठ्या थाटात हजारोंच्या उपस्थितीने पार पडला. या महासंमेलनात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दादरा नगर हवेली, कर्नाटक येथून आदिवासी बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अशोक बागुल होते तर संपूर्ण नियोजन कोअर कमिटीचे केंद्रीय अध्यक्ष राम चौरे, के. के. गांगुर्डे यांनी पाहिले. देवाजी राऊत विचारमंचावर अनेक अभ्यासू आदिवासी वक्त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व समाज कसा पुढे नेता येईल, यावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालघरचे आमदार सुनील भुसारा, साक्रीचे आमदार मंजुळा गावित, गुजरातचे आमदार जितूभाई पटेल व सर्वानी समाजावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली.
    ---
    मान्यवरांकडून उपस्थितांना सखोल मार्गदर्शन
    आपण सर्वांनी आता एकत्र येऊन संघटन करणे खूप गरजेचे आहे. याबाबत अनेक विषयांवर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधवांनी कलेच्या माध्यमातून, सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध कला संस्कृतीतून आपल्यातील कलागुणांचे दर्शन घडविले. यावेळी 'उठ आदिवासी जागा हो. संघर्षाचा धागा हो. असा सर्वांच्या वतीने नारा देत यापुढे सर्व आदिवासी बांधवांनी असेच एकत्र राहून विचार संघटन ठेवावे, असा संदेश देत वक्त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी उपस्थित रावण चौरे, के. के. गांगुर्डे, विलास चव्हाण, भगवान खिल्लारी योगिता पवार, नंदिनी बागुल यांसह कोअर कमिटीतील सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व आदिवासी बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे व जिथे जिथे आम्ही संसदमध्ये काम करत असताना कमी पडलो तर निवेदनाच्या माध्यमातून आपण माझ्याकडे तकार यावी. समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरुद्ध सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिकाल तरच काहीतरी घडवू शकाल. शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शिक्षणावर कोणीही दुर्लक्ष करू नये. विविध माध्यमातून योजनांचा फायदा आदिवासी बांधवांनी घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.
    ---
    ...तर आपण ५० वर्षे मागे जाऊ शकतो
    वैचारिक महासंमेलन ठेवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी बांधवांमध्ये एकोपा निर्माण व्हावा व त्यांना आपल्या समाजाचे हक्क, अधिकार काय आहेत ते समजावे. आंतरजातीय विवाह, बोगस घुसखोरी, बोगस जात प्रमाणपत्र अशा सर्व गोष्टी लक्षात घेत हे महासंमेलन ठेवण्यात आले आहे. जर आता जागृत झालो नाही तर अजूनही ५० वर्ष आपण मागे जाऊ शकतो. त्याच अनुषंगाने आम्ही अहोरात्र मेहनत घेत वर्गणी जमा करून हे महासमेलन उत्साहात पार केले. सरकार दरबारातून आपले न्याय हक्क मिळवून घेऊ हीच एक ज्ञानाची शिदोरी इथून आपण सर्वजण घेऊन जाणार आहोत, असे प्रतिपादन रावण चौरे यांनी केले.

Комментарии • 2

  • @krushnapawar9037
    @krushnapawar9037 Месяц назад

    जय आदिवासी ❤❤❤❤❤❤

  • @laxman_bagul
    @laxman_bagul  Год назад +2

    माझ्या या सुरगाणा न्युज युट्यूब चँनलला सब्रकाईप करा. जय आदिवासी.