विदर्भातील अष्टविनायक I एक नवीन माहिती मिळाली I Ashtvinayak Temples Of Vidarbha I A New Information

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025
  • नमस्कार मंडळी..
    आज श्री क्षेत्र माहूर मधून मी पुण्याला जाण्यासाठी निघालो
    माहूर मधे मला आज ऐक नवीन माहिती मिळाली जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती
    विदर्भाचे अष्टविनायक गणपती आहेत आणि त्या मंदिरांना पण खूप मोठा पौराणिक इतिहास आहे
    मी सुरवातीला थोडा अचंबित झालो होतो जेव्हा हे समजले की विदर्भाचे वेगळे अष्टविनायक असे काही आहे ..चूक माझी होती कारण मला पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातून पण आपल्या पुणे शहारा जवळ असलेले अष्टविनायक गणपती मंदिरे माहीत होते,आणि हेच एकमेव अष्टविनायक मंदिरे आहेत असाच माझा समज होता इतके दिवस,त्यामुळे जेव्हा विदर्भाचे अष्टविनायक गणपती आहेत हे ऐकले तेव्हा पहिल्यांदा मला असे वाटले की एखादे मंदिर असेल जिथे आठही गणेशांचे दर्शन घेता येते असे ठिकाण असावे..
    पण जेव्ह ही माहिती मिळाली की विदर्भात पण आठ जागृत असे गणेशाची मंदिरे आहेत जिथे आणि ही सर्व मंदिरे पुरातन काळापासून इथे आहेत आणि ह्या प्रत्येक मंदिराचा खूप अनोखा आणि समृद्ध असा इतिहास पण आहे .
    हे समजताच मी निश्चय केला की भविष्यात कधी जमेल तेव्हा एकदा तरी ह्या विदर्भाच्या अष्टविनायक दर्शन घ्यायचे..
    तेव्हा मला अशी माहिती मिळाली की माहूर पासून साधारण १२५ किलोमीटर अंतरावरील कळंब ह्या ठिकाणी ह्याच अष्टविनायक गणपती मंदिराच्या पैकी ऐक श्री चिंतामणी गणेश मंदिर आहे आणि ते माझ्या प्रवासाच्या वाटेत आहे ..
    मग मी ताबडतोब निर्णय घेतला आणि माझा प्रवास सुरू झाला तो विदर्भातील अष्टविनायक गणपती दर्शनाचा..
    मित्रांनो कळंब च्या श्री चंतमणी गणेशाचे तर दर्शन झालेच त्याच सोबत मला माझ्या वाटेत असलेल्या श्री क्षेत्र केळझर येथील श्री सिद्धिविनायक मंदिरातील गणेशाचे पण दर्शन घेता आले आणि ह्या आजच्या मालिकेत मी आपल्याला ह्या दोन्ही गणेश मंदिरांची माहिती देण्याचं प्रयत्न केला आहे तो आपण आवर्जून बघावा ही विनंती
    #अष्टविनायक #विदर्भाचेअष्टविनायक #विदर्भातीलअनोखीअष्टविनायकमंदिरे #वैविधविदर्भ #केळझरचेसिद्धिविनायकमंदिर #कळंबचेचिंतामणीमंदिर #वर्धा #बापूकुटी #सेवाग्राम #सेवाग्रामआश्रम #सेवाग्रामयात्रीनिवास #सेवाग्राममाहिती

Комментарии • 10

  • @bhushanmhatre9982
    @bhushanmhatre9982 2 месяца назад +4

    राम राम.
    तुमच्यामुळे दोन्ही मंदिरांचे देवदर्शन झाले. मन प्रसन्न झाले. खूप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 месяца назад +2

      राम राम..
      अपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार 🙏🏻

  • @dhamu1978
    @dhamu1978 2 месяца назад +1

    Faar chhan mahiti dili tumhi sir as usual. Tumhi faar molacha kaam kartay. Wish you all the very best.

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 месяца назад

      नमस्कार... आपल्या सुंदर कॉमेंट साठी आपले मनापासून आभार..आपले असेच स्नेह मिळत रहावे..
      Thank you for your best wishes..🙏🏻

  • @k.anuradha07
    @k.anuradha07 2 месяца назад +1

    महाराष्ट्रातील अष्ट विनायक माहित आहेत व पाहिलेपण आहेत.पण विदर्भातील अष्ट विनायक माहितच नव्हते. चिंतामणी गणेश मंदिर व परीसर खुप छान आहे.केळघर मधिल श्री सिद्धीविनायक मंदिर हे सर्व तुमच्या एपीसोड मधून पहायला मिळाले.पौराणीक कथा व अनोखी माहिती उपयुक्त आहे. शुभेच्छा

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 месяца назад

      नमस्कार..
      विदर्भाचे अष्टविनायक ही माझ्यासाठी पण नविन माहिती होती, त्यामुळे खूप उत्सुकता होती आणि ह्या गणेशांची दर्शन आणि माहिती घेण्याची इच्छा पण होती..
      त्यामुळेच जेव्हा मला माहूर पासून जवळच असलेल्या कळंब येथील श्री चिंतामणी गणेश मंदिराची माहिती मिळाली तेव्हा ताबडतोप तिथे जाण्याचा निर्णय घेतला..आणि पुढे मग केळझर ला ही जाण्याचा निर्णय घेतला..
      आता असे वाटते की अजून एक दोन दिवस जर हातात असते तर उर्वरित गणेश मंदिरांची पण माहिती घेता आली असती..
      पण तसे घडले नाही आणि मला लगेचच पुण्याला येण्यासाठी nighave लागले होते..
      पण आता श्री गणेशालाच प्रार्थना केली आहे की एखादी संधी मिळाल्यास मी संपूर्ण अष्टविनायक दर्शनासाठी पुन्हा विदर्भात येईन..बघुया पुढे कसे होते..🙏🏻

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 месяца назад +3

    विदर्भातील अष्टविनायक सर्व मंदिराचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रसारित करण्यात यावेत

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 месяца назад +1

      नमस्कार..
      आपण केलेली सुचना छान आहे..आणि ह्या साठी पुढील काळात प्रयत्न करीन..
      Till Then Stay Connected 👍🏻

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh 2 месяца назад +2

    कार्लेकर दादा तुम्ही केलझर नंतर मुक्काम कुठे केलात ते नाही सांगितले

    • @explorewithcarlekar
      @explorewithcarlekar  2 месяца назад +1

      नमस्कार..
      केलझर नंतर मी अजून कुठे गेलो,अजून काय काय बघितले..ही सर्व माहिती आपल्याला पुढील भागात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे ..
      Stay Connected 👍🏻