कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई 😊🙏 / दख्खन चा राजा ज्योतीबा🙏 pune to kolhapur road trip😍 ( part 3 )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई / दख्खन चा राजा ज्योतीबा🙏 pune to kolhapur road trip😍 ( part 3 )
    कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई -
    कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.
    महालक्ष्मीचे हे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले. हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूरनिवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे.
    दख्खन चा राजा ज्योतिबा -
    कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर ,ज्योतिबाचा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्‍नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडेगेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे.
    कथा/आख्यायिका
    ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्‍नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.
    नरसोबाची वाडी vlog 🙏 👇
    • नरसोबाची वाडी 🙏 pune t...
    आदमा पूर बाळू मामा vlog 🙏 👇
    • आदमापूर बाळू मामा 🙏pun...
    FOLLOW ME ON SOCIAL MEDIA 👇
    INSTAGRAM- ....
    I hope you liked the video.
    Don't forget to subscribe my channel 😇🙏👇
    / @rajjangamvlogs
    ❤️Thank You For Subscribe RAJ JANGAM VLOG ❤️

Комментарии • 1