सुखी होण्याची कला,भगवान बुद्धांच्या काळातली ही एक कथा आहे!! Sukhi Honyachi Katha Bhagvan Budha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024
  • #etcnewdigit
    सुखी होण्याची कला,भगवान बुद्धांच्या काळातली ही एक कथा आहे!! Sukhi Honyachi Katha Bhagvan Budha
    सद्गुरू माझा दिलाचा राजा
    • सद्गुरू माझा दिलाचा राजा
    मराठी अवतार वाणी | Marathi Avtarvani Nirankari
    • मराठी अवतार वाणी | Mar...
    रंगइथंच हाय पण दिसत नाही याला रूप नसे ना
    • इथंच हाय पण दिसत नाही ...
    शेतू बांधूनी एकत्वाचा मानवता जोडूया
    • शेतू बांधूनी एकत्वाचा ...
    ♻️ कथा ♻️
    सुखी होण्याची कला,
    भगवान बुद्धांच्या काळातली ही एक गोष्ट आहे. एका गावात महिपाल नावाचा एक तरुण राहत होता. तो अतिशय महत्वाकांक्षी आणि ज्ञान पिपासू होता. नवनवीन विद्या -कला शिकून घेण्याची त्याला ओढ होती. त्याने प्रत्येक गोष्ट आत्मसात केली होती. अगदी बांधकामापासून ते वाद्य वाजवणे असो किंवा चित्रकला - शिल्पकला अशा विविध कला असो, सर्वात तो पारंगत झाला होता. त्याच्यासारखा हुशार, बुद्धिमान सर्व कलासंपन्न पंचक्रोशीत कोणीही नव्हता. त्यामुळे साहजिकच त्याला या गोष्टीचा खूप अभिमान वाटे. त्यामुळे त्याचा अहंकार वाढला एकदा त्या गावात भगवान बुद्धांचे आगमन झाले. भगवान बुद्धांची कीर्ती आणि लोकप्रियता पाहून तो बेचैन झाला. तो विचार करु लागला, की यांच्याकडे अशी कोणती कला आहे, ज्यामुळे हे एवढे लोकप्रिय आहेत? भगवान बुद्धांकडे जाऊन त्याने प्रत्यक्ष विचारणा केली, भगवन! तुमच्याकडे अशी कोणती कला आहे, ज्यामुळे सर्वत्र तुमची कीर्ती गायली जाते? आणखी अशा किती कला तुम्ही शिकला आहात? भगवान बुद्ध म्हणाले, तू जसा विविध कलेत पारंगत आहेस तशा माझ्याकडे कुठल्याही कला नाहीत. माझ्याकडे फक्त सुखी होण्याची कला आहे. युवक म्हणाला, मला शिकवाल ती कला? बुद्ध म्हणाले, होय, अवश्य शिकविन; पण त्यासाठी तुला मनावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. स्थितप्रज्ञ होता आलं पाहिजे. तरुण म्हणाला. एवढंच ना, त्यात काय एवढं! हे मी सहज करु शकतो. भगवान बुद्ध मंद स्मित करत म्हणाले, कोणी स्तुती केली तरी हुरळून जायचं नाही आणि निंदा केली तरी दुःखी व्हायचं नाही. प्राप्तीची लालसा नको आणि काही हरवण्याचं भय नको. अशा स्थिर अवस्थेत राहण्याची कला येणं आवश्यक आहे. त्यासाठी आठ दिवस प्रयत्न कर मग मला येऊन भेट.युवकाने आठ दिवस कसोशीने प्रयत्न केला; पण त्याला काही मन नियंत्रणात ठेवता आलं नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी तो कधी अस्वस्थ होई तर कधी चिंतीत होई. तेव्हा त्याला कळून चुकलं की आपल्याला एवढ्या कला येत आहेत, पण त्याच्याने फक्त आपला अहंकार वाढला. चिंता आणि लालसा वाढल्या. जीवन सुखी होण्याऐवजी दुःखी झाले.खरी कला तर मनाला नियंत्रण ठेवणे हीच आहे. तेव्हाच जीवन सुखी होईल.
    🙏सर्वांचं अभिनंदन मित्रो जी 🙏

Комментарии •