जनार्दन स्वामी कोण होते ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • @SwamiShantigiriMaharajOfficial
    #ॐ_निष्काम_कर्मयोगी_शिवयोगी_जगद्गुरु_जनार्दन_स्वामी_मौनगिरिजी_महाराज
    #निष्काम_कर्मयोगी_धर्म_समारोह
    #वार्षिक_तीर्थयात्रा
    #निष्काम_कर्मयोगी_धर्म_सोहळा
    🕉️!ॐ जनार्दनाय नमः!🕉️
    कठोर तपस्वी, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरिजी) महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी दिले. भले पहाटे ब्रह्ममुहूर्ता पासूनच परमपूज्य बाबाजींच्या निष्काम कार्यांचे शंख वाजत असत, अगदी त्याच पद्धतीने त्यांचे उत्तराधिकारी तसेच देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्म शिरोमणी अनंत विभूषित श्रीसंत सद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज देखील कठोर नियमातून आणि अविश्रांत कार्यातून यशस्वीरित्या आपली गुरुपरंपरा जोपासत आहेत. निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरिजी) महाराज यांनी लोकउद्धारासाठी सोळा वर्षे खडतर तपस्या केली. ईश्वर प्राप्ती नंतर देखील त्यांनी आयुष्यभर जनकल्याणाचे अखंड कार्य केले. कलियुगात नामजप हाच एक आधार असल्याचे लक्षात घेऊन ऋषी-मुनींसाठी असलेली जपानुष्ठान परंपरा जनसामान्यांसाठी खुली केली, आणि नामजप केल्यानेच आपले मनुष्य जीवन सार्थकी होऊ शकते हे भाविकांना समजावुन दिले. अध्यात्मातून समृद्धीकडे या विचारातून त्यांनी श्रमदानाला दैवत मानून भूमातेची अखंड सेवा केली. खडकाळ, नापीक जमिनीत बाबाजींनी श्रमदानातून नंदनवन फुलविले. समाजाच्या सर्वांगीण उद्धारासाठी ईश्वरभक्ती, कृषी सेवा, गोसेवा, ऋषी सेवा, गुरुकुल शिक्षण, श्रमदानाचे, आणि अन्नदानाचे महत्व भाविकांना समजावून सांगितले. जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराज यांनी निराधारांना आधार मिळावा म्हणून ठिकठिकाणी आश्रमे उभारली.ही आश्रमे म्हणजे भाविकांसाठी धार्मिक आश्रयाची तीर्थक्षेत्र बनली आहेत.बाबाजींनी अनेक शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला.संस्कारश्रम पिढी निर्माण व्हावी यासाठी गुरुकुलांची स्थापना केली.गुरुपरंपरेत शिष्य 'एकनिष्ठ गुरुभक्ती' करून भविष्यात 'गुरू' पदाला जाऊन पोहचतात अगदी त्याचप्रमाणे जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर यांचे एकनिष्ठ आणि कृपापात्र शिष्य श्रीसंत स्वामी शांतीगिरीजी महाराज यांची लाखों भाविकांच्या साक्षीने उत्तराधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराजांनी लावलेली सेवा रुपी ज्योत अखंड ठेवत ठेवण्यात श्रीसंत सद्गुरू शांतीगिरीजी महाराज यशस्वी झाले आहेत.जगद्गुरू बाबाजींनी अखेरच्या क्षणी दिलेला "उठा कामाला लागा" यासंदेशाचे तंतोतंत पालन करत सदैव कार्यमग्र राहून संयम,सदाचार,वेळा-वेळी मौन,शांतीदृढता,ब्रम्हचर्य,आजन्म व्रतस्थ,आयुष्यभर फलाहार,वैराग्य,रोज पहाटे ब्रम्हमुहूर्तावर उठणे यांसह असे कितीतरी नियम श्री संत सद्गुरू शांतीगिरीजी महाराज यांचा आजही काटेकोरपणे अखंडीतरित्या पाळत आहेत. बाबाजींच्या महानिर्वाणानंतर गुरुपरंपरा यशस्वीरीत्या जोपासताना त्यांनी स्वतः अविश्रांत सद्गुरू कार्य करतांना भाविकांकडूनही धर्मकार्य करून घेतले आणि आजही करून घेत आहेत.जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी केलेले विविध संकल्प अहोरात्र परिश्रम घेऊन पूर्ण केले आहेत.जगद्गुरू बाबाजींनी सुरू केलेल्या विविध परंपरा आजही यशस्वीरीत्या सुरू आहेत,गेल्या तेहतीस वर्षांत यशस्वी गुरू परंपरा जोपासताना श्रीसंत स्वामी शांतीगिरीजी महाराजांनी संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा श्री क्षेत्र वेरूळ ते त्र्यंबकेश्वर,नाथषष्टी दिंडी सोहळा श्री क्षेत्र ओझर ते पैठण, गुढीपाडवा, हनुमान जन्मोत्सव, अक्षय्यतृतीया, गुरुपौर्णिमा बालगोपाल जपानुष्ठान सोहळा व संस्कार शिबीर, नागपंचमी, म्हाळसामाता महिला,श्री बाबाजी जन्मोत्सव सोहळा, तीर्थक्षेत्र, श्री बाबाजींचे पुण्यस्मरण जपानुष्ठान सोहळा,यांसह वर्षभरात ठिकठिकाणी लोककल्याण हेतूने अनेक जपानुष्ठान,यज्ञ,अभिषेक,व्यसनमुक्ती,ग्रंथपारायण,प्रवचन,अखंड नंदादीप,अन्नदान,श्रमदान आजही संपूर्ण उत्साहात सुरू आहेत.समाजांसाठी वरदानकारी असणाऱ्या या परंपरेमुळे आजतागावात हजारो व्यसनाधीन लोकं निर्व्यसनी होत आहेत,त्यांना योग्य संस्कार लाभल्याने त्यांच्या जीवनाची "दशा" बदलून योग्य "दिशा" मिळाली आहे."माझ्या परंपरेत श्रद्धेने येऊन तर बघ,तुझ्या जीवनाची दशा बदलून योग्य दिशा नाही दिली तर मग सांग" असा संदेश देत गावोगावी जाऊन जगद्गुरू बाबाजींनी सुरू केलेल्या जपानुष्ठान,श्रमदान,अन्नदान,गो-सेवा,कृषी व ऋषी सेवा,आदी परंपरेची महती भाविकांना समजावून सांगत आहेत.बाबाजींनी सांगितलेले नित्य नियम पाळा! बाबाजी निश्चित तुमचे कल्याण करतील.परंपरेत सहभागी होतांना सर्वात पहिले आपले व्यसन सद्गुरूंना अर्पण करण्याची प्रथा आहे.आणि व्यसनमुक्ती नंतर स्वतः व्यसनमुक्ती कार्यात हे तरुण सहभागी होत आहेत,अध्यात्मिक उन्नती ते राष्ट्रकल्याण असे ब्रीद असलेला जय बाबाजी भक्त परिवार चांगला समाज घडवण्या बरोबरच राष्ट्रहितासाठी नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे.देशाचा आणि देशातील नागरिकांच्या,शेतकऱ्यांच्या संकट समयी भक्कम साथ देण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार नेहमीच अग्रणी राहिला आहे.देशात आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातही भक्त परिवाराने देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेता एका दिवसात ऑनलाईन पद्धतीने निधी उभारून केंद्र आणि राज्य सरकारला तात्काळ भरीव मदत पाठवली."बहुजन हिताय बहुजन सुखाय" यासाठी तसेच केवळ लोककल्याणासाठीच आपले संपूर्ण आयुष्य देणाऱ्या कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरिजी महाराज यांना तसेच त्यांच्या पश्चात त्यांचे धर्मकार्य अहोरात्र परिश्रम घेऊन अखंडितपणे पुढे घेऊन जाणाऱ्या आणि सद्गुरू भक्तीचे एव्हरेस्ट गाठणाऱ्या श्री संत स्वामी शांतीगिरीजी महाराज या दोन्ही आदर्श आणि महान गुरू-शिष्यांच्या धर्मकार्यांचा महिमा वर्णावा तितका थोडाच वाटतो. या महान गुरू-शिष्यांच्या चरणी आज कोटी कोटी प्रणाम.
    ठिकाण: श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रम, श्री क्षेत्र ओझर@ojhar, नाशिक, महाराष्ट्र.

Комментарии • 4