Dharmaveer - Full Album | Prasad Oak, Kshitish Date, Makarand Padhye | Pravin Tarde |Mangesh Kangane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @dilipmalap5011
    @dilipmalap5011 2 года назад +19

    पूर्ण अल्बम ची गाणी खरंच अप्रतिम आहेत.ऐकून अंगावर शहारे येतात. प्रवीण तरडे साहेबांनी काय चित्रपट बनविला आहे . खूप छान अभिमान वाटतो प्रवीण साहेब सलाम तुम्हाला असेच छान मराठी चित्रपट काढा आणि मराठी चित्रपट सृष्टीला पुन्हा अभिमानाने उभे करा.
    जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @KALP7800
    @KALP7800 2 года назад +34

    मी आज पर्यंत बरेच रिअल स्टोरीचे चित्रपट बघितले पण आनंद दिघे साहेब यांच्या चरित्रवार बनवलेला चित्रपट हा चित्रपट नसून एक असा देव होऊन गेला कि त्याला नवस करायची गरज नसायची तो देव स्वतः प्रसन्न होत होता... अक्षरशः माझा धमण्या इतक्या फास्ट होत होत्या कि मला असे वाटले कि माझा जन्म त्यांच्या वेळी झाला पाहिजे होता तर मी नक्की माझा जीव ओवाळून टाकला असता साहेबांसाठी... सर्व टीम चे खूप खूप आभार साहेब काय होते हे आम्हाला कळविण्यात आले. 🙏🏻🙏🏻🙏🏻
    मी साहेबचा फॅन होतो पण आता भक्त झालो...
    साहेब पुन्हा जन्म घ्या साहेब

  • @shilpashirwadkar3362
    @shilpashirwadkar3362 2 года назад +28

    सगळी गाणी इतकी अप्रतिम आहेत की, त्यासाठी निवडलेले शब्द, त्या व्यक्त करताना तंतोतंत लागलेला स्वर, त्यातील भावूकता आणि तितकाच भारदस्त आवाज, गाण्यातून कार्याचे महत्व आणि संगीत संयोजकाची मेहनत सगळं प्रत्येक गाण्यातून विविधतेत समोर येतंय! खूप शुभेच्छा टीम धर्मवीर🎶🙏

  • @prabhabhoir6417
    @prabhabhoir6417 2 года назад +18

    धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपट मधील सर्व गाणे खूप सुंदर आहेत.पण साहेब यांच्यावर एक पोवाडा गायला आहे.खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम.खूप सुंदर लेखन आणि गायन.त्या नंतर माझं आनंद हरपला ह्या गाण्याने तर अंगावर काटा आणला.आणि डोळ्यात अश्रू आले..मी माझे दुर्दैव समजतो की असा देव माणूस आमच्या कालखंडात असून सुध्दा आम्हाला त्यांना भेटण्याची संधी नाही भेटली.पण लांबून बघण्याचा आनंद ह्या डोळ्यांनी घेतला याचा मात्र हेवा आहे .एक असा राजकारणी ज्यांनी स्वतःसाठी काहीच केले नाही,फक्त जगले ते लोकांसाठी आणि लोकांच्या हितासाठी.असा राजकारणी देवपुरूष पुनः होणे नाही.तुम्ही हवे होते साहेब आताच्या घडीला.कारण आताचे राजकारणी हे फक्त राजकारण करतात.समाजकारण काय असतं हे त्यांना माहीतच नाही असं झालंय.आपले खिसे भरण्यात ते व्यस्त आहेत.आणि एक तुम्ही होते साहेब ज्यांचा एक साधा अकाउंट सुध्दा बँक मध्ये नव्हता,आश्चर्य वाटलं साहेब हे ऐकून.तरीपण जगातील सर्वात श्रीमंत राजकीय नेता म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब...ऐसा देवमाणूस पुनः होणे नाही या पृथ्वीतलावर..

    • @tanveerpatil4466
      @tanveerpatil4466 2 года назад

      आपण लिहलेले खूप मनाला कोरून जात खूप छान आनंद साहेब परत या…😢

    • @chavan123bipin
      @chavan123bipin 2 года назад

      दिघे साहेबांच्या मार्गाने चालण्याचा जर प्रत्येकाने थोडा तरी प्रयत्न केला तरी त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

  • @pritibhanushali8987
    @pritibhanushali8987 2 года назад +39

    प्रसादजी, खरंच तुम्हाला ह्या अभिनयासाठी अगदी मनापासून धन्यवाद .तुमच्यामुळे आम्हाला आमचे खरे आनंद दिघे साहेब भेटले आणि कळलेसुद्द्धा..तुमचे खूप खूप आभार

  • @MD-4031
    @MD-4031 2 года назад +17

    प्रत्येक जण म्हणतो आत्ता दिघे साहेबांसारखा कोणीतरी पाहिजे परंतु हीच सुरवात स्वतःपासून केली तर असंख्य दिघे साहेब या मातीत घडतील आणि साहेबांचे स्वप्न पूर्ण करू शकतील अशी ही महाराष्ट्राची माती आहे आणि हीच खरी साहेबांसाठी आदरांजली असेल.
    मी तर जमेल तशी सुरवात केली आहे आपण देखील ..............!

  • @amarpachpute4714
    @amarpachpute4714 2 года назад +12

    खरंच नशीबवान आहे आम्ही ज्यांच्या पाठीवर साहेबांची प्रेमाची थाप पडलेय
    ज्यांनी देव पाहिले ते संत झाले आणि ज्यांनी साहेबांना पाहिले ते भाग्यवंत झाले 😢😢😢😢

  • @deshpandecomdeyhouse1135
    @deshpandecomdeyhouse1135 2 года назад +16

    असा नेता पुन्हा होणे नाही. माननीय दिघे साहेब खरचं खुप खुप जिगर लागत, समाज सेवेचे व्रत घेऊन जीवन जगणे सोपे नाही. सगळे आयुष्य शिव सेनेला अर्पण केले. लग्न पण केलं नाही. किती मोठा त्याग आहे हा कोटी कोटी नमन दिघे साहेब तुम्हाला परत या साहेब परत या..

  • @dineshpatiljdm2784
    @dineshpatiljdm2784 2 года назад +71

    एका देवमाणसाची भूमिका एका महान कलाकाराने मनापासून निभावली.ही भूमिका प्रसाद ओक सरांच्या आयुष्याला तेजीमय बनवेल. साक्षात आनंद दिघे साहेबांचं दर्शन झालं.💐

  • @vikrantmane5553
    @vikrantmane5553 2 года назад +18

    खूप धन्यवाद @Pravin Tarade sir.. तुमच्यामुळे एवढं महान व्यक्तिमत्व आम्हाला बघायला मिळालं..कोणीतरी आपल हक्काचं माणूस गेल्यावर जेवढं दुःख होत ना तेवढं दुःख झालं दिघे साहेबांचा शेवट बघून..कोटी कोटी प्रणाम दिघे साहेब तुम्हाला...आज हवे होता तुम्ही..आज असता तर युवा वर्गा ला खूप पुढे घेऊन गेला असता तुम्ही..🙏🙏🙏🙏🚩जय महाराष्ट्र..!!!!!!

    • @neelamabhang4199
      @neelamabhang4199 2 года назад

      मी डोंबिवली ला राहते.दिघे साहेब यांना कधी पाहिले नाही.पण त्यांचा बद्दल खूप ऐकले होते .प्रवीण तरडे साहेब मुळे आणि प्रसाद ओक साहेब मुळे आम्हाला दिघे साहेब कसे होते.त्यांचे जीवन त्याने कसे अर्पण केले लोकान साठी ते समजले. धन्य ते दिघे साहेब .आता फक्त १ च विनंती त्याचा कार्य कर्त्याने साहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालावे.

    • @shreyadeore9750
      @shreyadeore9750 2 года назад

      Saheb tumi ajun have hoty

  • @swatigaikwad261
    @swatigaikwad261 2 года назад +16

    आणि हा सिनेमा काढला त्यांना मानाचा मुजरा 👏👏👏👏👌👌👌👌

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba 2 года назад +10

    अरे बाबांनो काय चित्रपट बनवलाय, आणि साखरेसारखी गाणी, संगीत,कथा, सादरीकरण सगळं भारी आहे, माझ्या आई, सासू, बायको लहान मुलीसोबत चित्रपट पाहिला, खुप रडलो सर्वांना सलाम.

  • @ranjitkambali6582
    @ranjitkambali6582 2 года назад +12

    मनाला कुठेतरी आत मधून लागेल असा चित्रपट आहे., स्वर्गीय मा. आनंद दिघे साहेब जवळून पाहता आले असत तर खरंच छान वाटलं असत., पण प्रवीण तरडेनी धर्मवीर चित्रपटातून प्रसाद ओक यांच्या रूपात रुपेरी पडद्यावर खूप छान दाखवलेत., असे साहेब राजकारणात पुन्हा होणे नाही. मोजक्या साहेबांपैकी आमचे धर्मवीर मा. आनंद दिघे साहेब यांना जय महाराष्ट्र. 🙏

  • @shashikantvichare9586
    @shashikantvichare9586 2 года назад +21

    साहेबांचा चित्रपट बघितल्या वर खरा शिवसैनिक कोण आणि कसा आसवा हे समजलं आणि खरच "आनंद हरपला"हे गीत ऐकल्यावर आपसूक डोळ्यातून पाणी येते।।जय महाराष्ट्र साहेब।।

    • @shahajisasane1190
      @shahajisasane1190 2 года назад

      Ani ajache shivsainik ahet

    • @sankalpmandlik7442
      @sankalpmandlik7442 2 года назад

      #

    • @sankalpmandlik7442
      @sankalpmandlik7442 2 года назад

      Q

    • @AshishMalthane
      @AshishMalthane 4 месяца назад

      ​@@shahajisasane1190😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @vijaybari5498
    @vijaybari5498 2 года назад +21

    खरंच आनंद दिघे साहेब आता हवे होते आणि आता खरी महाराष्ट्राला साहेबांची गरज होती,,😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

  • @ompatil577
    @ompatil577 2 года назад +14

    साहेबांना जवळून पाहण्याची संधी संधी नाही सौभाग्य आम्हाला मिळाले होते खूप आठवण येते साहेब तुमची तुम्ही परत एकदा जन्म घ्या

  • @kalyaniprakshale2790
    @kalyaniprakshale2790 2 года назад +13

    खूप छान माणूस माणुस काय देव माणूस आम्ही तर फक्त फिल्म मधुनच साहेबांना बघितले पण येवढ अभिमान वाटतो आहे की ते आपल्या महाराष्ट्राचे आणि आपण ही महाराष्ट्रात जन्म झाला च

  • @Sai_sant
    @Sai_sant 2 года назад +9

    श्री प्रसाद ओक यांनी खूपच छान भूमिका केली.... गाणे खूपच छान.... मी दररोज गाणे ऐकतो

  • @sunilbhoer7691
    @sunilbhoer7691 2 года назад +16

    माझा आनंद हरपला, डोळे पाण्यानेभरून आणि कंठ दाटून आला हो ऐकून 🙏

  • @roastingworld3322
    @roastingworld3322 2 года назад +23

    तरडे साहेब
    या मराठी मूवी ची हिंदी प्रत पण बनवा.. तुमचे खूप उपकार होतील.. तुमच्या रूपाने एक रत्न महाराष्ट्राला लाभल आहे.. आज या देशात हे दाखवणं खूप गरजेचं आहे 😥😭😢😢😢

    • @ShobhaPadmane
      @ShobhaPadmane Месяц назад

      Dighe Dighe sahiban Sarkar

    • @ShobhaPadmane
      @ShobhaPadmane Месяц назад

      दिघे sahebansarkha Neta Punha Hone Nahi he Parmeswara Dighe sahebanna Punha Janmala Ghala tyancha Punarjanm Gadwa aatacyakalala tyanchi khup garj aahe

  • @vedmvlogs176
    @vedmvlogs176 2 года назад +17

    धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे ह्या चित्रपटातील सर्वच गाणी काळजाला स्पर्श करणारी आहेत आणि डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. अप्रतिम

  • @anandthakare_2013
    @anandthakare_2013 2 года назад +185

    सर्व अल्बम मधील गाणी अप्रतिम विशेष आनंद हरपला song - डोळ्यांच्या कडा पाणावल्या गाणी ऐकताना अंगावर शहारे आले खूप छान स्वर,आणि सर्व गाण्यांच्या ओळी अप्रतिम,छान👍 miss you saheb 🙏❤️ धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आतुरता १३ मे ची🙏

    • @revaraut1137
      @revaraut1137 2 года назад +3

      Pramesh mali song eik hota thane cha dhanya vagh amcha anand dige shaheb

    • @bhushanms8224
      @bhushanms8224 2 года назад +5

      जशी मी शेर शिवराज ची वाट पाहत होतो तसा या चित्रपटाची वाट बघतोय🙏🏻🧡🚩

    • @nishaogale4841
      @nishaogale4841 2 года назад +2

      अप्रतिम

    • @prasadkadamdigitalprojects6728
      @prasadkadamdigitalprojects6728 2 года назад +2

      Barober kharch khup chan gani lihili ahet ani music hi chan ahe

    • @sunilgambhire8813
      @sunilgambhire8813 2 года назад +2

      सुंदररर

  • @truptiwalunjpatil5443
    @truptiwalunjpatil5443 2 года назад +12

    अप्रतिम गाणे.... ❣️ निशब्द 😐🙁... आनंद हरपला... साहेबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. 🙏🏻

  • @ganeshakhade8384
    @ganeshakhade8384 2 года назад +6

    आपल्या जीवनाचे खरे सामाजिक कार्य काय असते हे माझ्या धर्मवीर आनंद दिघे साहेब न चा हा सिनेमा पाहिल्या वर अजुन सामाजिक कार्य निष्काम भूमिकेतून कसे करायची प्रेरणा मिळाली.. खूप खूप सलाम माझ्या मराठी सिनेमा सेलिब्रिटी ना आणि खास प्रसाद ओक सर ना त्यांनी हा सिनेमा जगासमोर आणला... जय महाराष्ट्र जय शिवराय..

  • @sachinbhosale2757
    @sachinbhosale2757 2 года назад +15

    मंगेश देसाई सर... साहेबांचे ऋण आम्ही नंतर जल्माला आलेली पीढी आणि महाराष्ट्र कधीच फेडू शकणार नाही.. पण आम्हाला आनंद'काय आहे. आणि साहेब कोणाला बोलावे'याची तुम्ही जाण आणि जाणीव करून दिलीत'त्या बद्दल आम्ही तुमचे सुद्धा कायम ऋणी रहाणार आहोत.प्रसाद सर तुम्ही खूप नशीबवाण आहात'तुम्हाला आनंद'जगता आणि साकारता आला...शद्ब नाहीत... खूप... खूप सलाम सर्वांना

    • @bhannat_bhatkanti
      @bhannat_bhatkanti 2 года назад

      मंगेश देसाई ह्यांना मी एकदा भेटलो होतो,
      खूप सरळ साधी व्यक्ती आहे...
      तेव्हा स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की पुढे जाऊन ते धर्मवीर सारखा अजरामर चित्रपट निर्मिती करतील...
      सलाम त्यांच्या संकल्पनेला 😊

  • @manulalpatil8279
    @manulalpatil8279 2 года назад +9

    या चित्रपटाच्या माध्यमातून दिघे साहेब व त्यांचे कार्य ज्यांना माहीत नाहीत अशा अनेकांना कळेल. प्रासाद ओक यांनी आपल्या अभिनयाने दिघे साहेब यांना आपल्या समोर साक्षात जिवंत केले आहे. आनंद दिघे साहेब यांना मानाचा मुजरा!

  • @rajkumargosavi2294
    @rajkumargosavi2294 2 года назад +12

    सच्या व एक कडवट शिवसैनिका व एक गोरगरिब जनतेचा सेवक.आजच्या राजकीय लोकानी साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे.......

  • @nehachavan8478
    @nehachavan8478 2 года назад +22

    निशब्द झाले आहे साक्षात परमेश्वर पाहीला तुमच्या रूपाने चित्रपट पाहून मन नाही भरले कीती नशिबवान असतिल ते लोक जे साहेबांच्या सहवासात राहीले 🙏

  • @rohanmogre7781
    @rohanmogre7781 2 года назад +12

    आम्ही कधीच साहेबांना पाहिलं नाही पण काय होते कसे होते ते गेल्यावर त्यांची गाथा समजली, खरचं साहेब आता हवे होते🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 साहेब परत या😭

  • @aditya6012
    @aditya6012 2 года назад +13

    मस्त गाणी आहेत सर्व मी रोज हीच गाणी पुन्हा पुन्हा ऐकतो ती ऐकविशीच वाटतात 🙏

  • @sandipghogale373
    @sandipghogale373 2 года назад +8

    धर्मवीर दिघे साहेबाना मानाचा मुजरा.नाशिक शिवसेना अधिवेशनात साहेबांच्या पायाला स्पर्श करण्याचे भाग्य लाभले.आज सिनेमा बघताना श्री सत्यवान भोसले साहेबांची खुप आठवण आली.तरडे साहेब जय महाराष्ट्र।💐

  • @RameshRathod-xq7pe
    @RameshRathod-xq7pe 2 года назад +10

    आनंद साहेब तुमच्या सारख्या माणसाची आज संपूर्ण भारताला गरज आहे.. miss u saheb

  • @hemantsonar8925
    @hemantsonar8925 2 года назад +8

    अप्रतीम कलाकृती... धन्यवाद प्रसाद ओक सर...आपल्या अभिनयातून दिघे साहेब जिवंत झाले साऱ्या महाराष्ट्रात...👍👌👍👌👍

  • @kripasagarkb8315
    @kripasagarkb8315 2 года назад +7

    मला मुव्ही मधील सर्वात जास्त आवडलेला डायलॉग म्हणजे "आपला दुश्मन प्रत्येक मुसलमान नाही तर जो मनात जिहाद घेऊन जगतो फक्त तोच आहे. " काय विचार होते साहेबांचे... सर्वस्व अर्पण करून त्यांनी सामाजिक कार्य केले... जय महाराष्ट्र.... जय जिजाऊ.... जय शिवराय... जय शंभुराजे...

  • @navanathpatil4128
    @navanathpatil4128 2 года назад +15

    आमचे दैवत, श्रद्धास्थान - प्रेरणास्थान स्वर्गीय. धर्मवीर आनंद दिघे साहेब...🙏🙏

  • @nikitanaralkar693
    @nikitanaralkar693 2 года назад +17

    ज्यांनी ही गाणी लीहालेत आणि ज्यांनी गायलित त्यांना प्रणाम धर्मवीरआनंद दिघे साहेब कसे होते हे ह्या पिक्चरच्या मध्यामतून कळले त्यातील सगळ्या कलाकारांना कोटी कोटी प्रणाम माझा आनंद आनंद हरपला ह्या गाण्याने तर अश्रू थांबतच नव्हते खूप सुंदर बायोपिक ❤️❤️❤️❤️❤️

  • @bhagwantawde281
    @bhagwantawde281 2 года назад +78

    शब्दात वर्णन करता येनार नाही असे कार्य आंनद दिघे साहेब यांनी केले तसेच चित्रपट ज्यांनी बनवला प्रवीण तरडे,मंगेश देसाई आणि प्रसाद ओक ह्यांनी प्रेक्षकांच्या मनात दिघे साहेब जिवंत करून तो दाखवला त्या साठी मनपूर्वक अभिनंदन..

    • @mangeshkatke9
      @mangeshkatke9 Год назад +3

      Thane maza aahe.... Ani hya samudrachya nashibat maza thana nahi🙏👌🏻

    • @nileshamrutkar6821
      @nileshamrutkar6821 Год назад +1

      Jay Maharashtra

    • @bamit23
      @bamit23 Год назад

      ​@@mangeshkatke9 okk mm

  • @chikugani3764
    @chikugani3764 2 года назад +15

    धर्मवीर चित्रपटाचे गीत आणि संगीत हे उत्कृष्ट आहेत. मी रोज ऐकतो ह्या शिवाय दिवस चालू नाही होत.

  • @adikjadhav9687
    @adikjadhav9687 2 года назад +13

    साहेब तुमचा सारखा समाजसेवक, राजकारण असा देव आम्हाला कधी ही पाहता आला नाही, हेच आमचे दुर्दैव आहे...पण आमचा मनात आपली प्रतिमा हि गुरुचीच असणार आहे साहेब...

  • @lahupujari1614
    @lahupujari1614 2 года назад +15

    😭आनंद दिघे साहेब यांच्या सारखा वाघ पुन्हा नाय मिळणार या महाराष्ट्राला..
    पण ३३कोटी देवाचरणी एकच प्रार्थना करतो कि पुन्हाएकदा माझ्या महाराष्ट्रात साहेबांना जन्माला घालाव 🙏🙏

  • @vinayakgovilkar6143
    @vinayakgovilkar6143 2 года назад +30

    साहेबांसारखे सगळे वागले तर महाराष्ट्रातील गरीबी निघुन जाईल महाराजांचे स्वराज्य पुन्हा उदयास येईल 🙏🙏

  • @pravinshinde8696
    @pravinshinde8696 2 года назад +11

    स्वर्गीय दिघे साहेब हें साक्षत गरिबांचे व जनतेचं परमेश्वर होते आणि आहेत राहणार
    साहेब🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sagargiri8402
    @sagargiri8402 2 года назад +47

    विठ्ठल कोणाच्या स्वरूपात येईल सांगू शकत नाही... आनंद दिघे साहेब मधून जन्माला आले.

  • @dilipghorpade8276
    @dilipghorpade8276 2 года назад +15

    खर मी स्वतः ला भाग्यवान समजतो की मला साहेबांचे चरणस्पर्श लाभले आहेत.....
    देव पाहील्याची अनुभूती होती ती
    साहेब तुम्ही अजून हवे होते हो......😭😭😭😭🙏🙏🙏🙏

  • @ajinkyapawar4763
    @ajinkyapawar4763 2 года назад +10

    आनंद हरपला गाणं ,खूप सुंदर शब्द रचना, डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही

  • @deshmukhsuresh9577
    @deshmukhsuresh9577 2 года назад +10

    🚩🙏🙏🙏🙏साहेब तर भेटणार नाहीत मात्र त्यांचे विचार मात्र आंतकरणात पोहचले आनंद दिघे साहेब फक्त तुम्हीच 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinpimpalkar115
    @nitinpimpalkar115 2 года назад +14

    तरडे साहेब असे मराठी चित्रपट काढुन इतिहासाला नवी उजळणी दिलीत आपण त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. आणि दिघे साहेबाना साष्टांग दंडवत..आपला माणूस

  • @mangeshmayekar7212
    @mangeshmayekar7212 2 года назад +11

    संपूर्ण अल्बम अप्रतिम झाला आहे आनंद हरपला हे गीत भाऊक करते तर गुरुपौर्णिमा हे गुरूंची माहिती सांगते हार्दिक शुभेच्छा 👌👌👍👍🌹🌹

  • @anjalijadhav3233
    @anjalijadhav3233 2 года назад +8

    सगळे गाने हृदयस्पर्शी आहेत, माझा आनंद हे गाने तर डोळ्यातील अश्रू थांबवतच नाही , दिघे साहेब खरंच तुमची महाराष्ट्राला आता खुप गरज आहे

  • @martinkurhade5907
    @martinkurhade5907 2 года назад +19

    साहेब आज तुम्ही असते तर शिवसेना आज कुटल्या कुटे असती 🥺 साहेब आज खरच तुमची खूप गरज आहे 😭 साहेब याना परत

  • @समीरजगन्नाथपांचाळ

    "लाल नाही भगवं होतं रक्त" साहेब तुम्ही आजही आमच्यासोबत आहात हा आत्मविश्वास आहे आम्हाला🙏🙏

    • @anandswami7766
      @anandswami7766 2 года назад +2

      Bar zale saheb nahit aata nahitar aajche rajkaran baghun tyana khup vait vatle aste

    • @prajaktamahabale7630
      @prajaktamahabale7630 2 года назад

      Vvkj in vvv hi n nth bb by h hugg 5gggggggvggvvvvvgccvxdg occgg

    • @ashishmaske8384
      @ashishmaske8384 2 года назад

      @@anandswami7766 on o

    • @ajagtap16
      @ajagtap16 2 года назад

      @@ashishmaske8384 /

  • @vaibhavmurkar1011
    @vaibhavmurkar1011 2 года назад +15

    स्फूर्ती देणारे गीत आहेत या फिल्म मध्ये पण "माझा आनंद माझा आनंद हरपला "या गाण्याने डोळ्यात पाणी आणलं 🙏

  • @truptibichu2409
    @truptibichu2409 2 года назад +9

    प्रसाद ओक यांचा उत्तम अभिनय,प्रविण तरडे अप्रतिम डायलाॅग्स आणि अप्रतिम चित्रपट, आनंद दिघे साहेबांना त्रिवार अभिवादन

  • @maithileepatole5862
    @maithileepatole5862 2 года назад +14

    खरच आनंद दिघे आज हवे होते आनंद हरपला हे गाण पूर्ण होईपर्यंत डोळ्यातून अश्रु थांबले नाही

  • @ashishmore3584
    @ashishmore3584 2 года назад +11

    साहेब तुम्हाला साष्टांग नमस्कार...साहेब तुम्ही आम्हाला खूप लवकर सोडून गेलात...आपल्या सारख्या व्यक्तीस ईश्वराने शंभर वर्षापेक्षा जास्त आयुष्य द्यायला हवे होते...साहेब आपली आज खूप आवश्यकता आहे..साहेब या पृथ्वी वर आपण पुन्हा जन्म घ्यावा...साहेब खूप आठवण येते आपली...जनतेची सेवा,गुरू,आयुष्य काय असत हे आपल्याकडून शिकायला मिळालं..

  • @bhushanms8224
    @bhushanms8224 2 года назад +10

    जशी मी शेर शिवराज ची वाट पाहत होतो तितक्याच आतुरतेने आपल्या साहेबांच्या (देवाच्या) चित्रपटाची वाट बघतोय 🧡🚩🙏🏻

  • @rajkumargosavi2294
    @rajkumargosavi2294 2 года назад +9

    ह्या कलयुगचा धर्मवीर.खरच साहेबांना देवाने आणखी 10 वर्ष आयुष्य द्यायला पाहिजे होते.

    • @roshandivekar3560
      @roshandivekar3560 2 года назад

      खूप आयुष्य होत त्यांना....... काही भामट्यांना ते बघावल नाही........ असे धर्मवीर पुन्हा होणे नाही......

  • @kunalkatwe009
    @kunalkatwe009 2 года назад +13

    आयुष्यभर लोकांच्या समस्या दूर करुन त्यांच्या चेहऱ्यावर सुखाचे हास्य आणणारा #आनंद जाताना मात्र सगळ्यांनाच रडवून गेला. "धर्मवीर" हा सिनेमा नाही तर स्व. आनंद दिघे साहेबांना अनुभवण्याची गोष्ट आहे.

  • @giteshdalvi4646
    @giteshdalvi4646 2 года назад +10

    खरच ज्याना आनंद दिघे साहेबांचा सहवास लाभला त्यांनी खरच देवाला अनुभवल आहे.
    खरच असा राजकारणी होऊ शकत नाही आणि ते शक्यच नाही आहे.
    मी खरच दुर्देवी आहे की मी त्यांना कधी पाहू शकलो नाही की भेटू शकलो नाही अगदी शक्य असताना.
    2001 ला साहेबांची अपघाताची बातमी आली, माझ त्या वेळा graduate झाल होत अणि मी sion ला राहत होतो.
    धर्मवीर आनंद दिघे साहेब miss u lot

  • @shubhamdevkar941
    @shubhamdevkar941 2 года назад +7

    आज दिघे साहेबांची गरज महाराष्टाला खुप खुप आहे
    आणि धर्मवीर चित्रपटातील गाणी शेवट आहे माझं आवडत गाण माझा आनंद आनंद आनंद हरपला 😭😭😭

  • @shubhamsalokhe9011
    @shubhamsalokhe9011 2 года назад +7

    अंगावर काटा आणणारे गाण आहे खरच आनंद दिघे साहेब खुप आठवणी ढेवुन गेलात साहेब आपण

  • @shrivansamsher1252
    @shrivansamsher1252 2 года назад +8

    गौरुपौणिमा ...."भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल" आणि
    "देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला
    माझा आनंद आनंद हरपला"...अप्रतिम गीत...अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू ह्या दोन्ही गोष्टींचा अनुभव हे गीत ऐकताना आला....सर्वाच अल्बम खूप खूप छान अप्रतिम आणि अविस्मरणीय अनुभव देऊन जातो👌👌👌👌👌👌👌

  • @aratiharmalkar
    @aratiharmalkar 2 года назад +13

    शिवाजी महाराजांचे रूप एकच,आनंद दिघे साहेब

  • @rahdk
    @rahdk 2 года назад +18

    माझा आनंद गाणं जेवढं ऐकायला सुंदर आहे, तेवढंच ताकदीचे त्याचं picturization आहे, माझी zee music ला विनंती आहे की त्यांनी हे गाणे व्हिडीओ सकट टाकावे.

  • @nikhilpujare7177
    @nikhilpujare7177 2 года назад +7

    गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
    गुरुर्देवो महेश्वरा
    गुरुर्साक्षात परब्रह्म
    तस्मै श्री गुरवे नमः
    गुरु माझं गणगोत
    गुरु हीच माउली
    गुरु स्पर्श दूर करी
    दुःखाची साउली
    गुरुभेटी साठी झाली
    जीवाची काहिली
    भक्त तुझा गुरु देवा
    पुरता अटल
    भेटला विठ्ठल माझा
    भेटला विठ्ठल
    भेटला विठ्ठल माझा
    भेटला विठ्ठल
    गुरु एक
    तूचि माझा
    विधाता
    अचल
    गुरुविण सुने
    सारे
    विश्व हे
    सकल
    भेटला विठ्ठल माझा
    भेटला विठ्ठल
    भेटला विठ्ठल माझा
    भेटला विठ्ठल
    संगतीनं ओलांडला
    अवघड घाट
    संगतीनं ओलांडला
    अवघड घाट
    चुकलो जिथं
    मी तिथं
    दाविली तू
    वाट
    तुझामुळं उमगलो
    मीच मला थेट
    सुख दुःख
    एका मेका
    वाटलं वाटलं
    भेटला विठ्ठल माझा
    भेटला विठ्ठल
    भेटला विठ्ठल माझा
    भेटला विठ्ठल

  • @ruchidere5953
    @ruchidere5953 2 года назад +10

    भेटला विठ्ठल.. ऐकून डोळ्यात पाणी आलं ..... निस्सीम गुरू भक्ती ...🙏🙏🙏🙏🙏गाणी आणि चित्रपट ....🙏🙏🙏🙏🙏..... प्रत्येकाने पहावा असा चित्रपट ..

  • @parth__edits
    @parth__edits 2 года назад +12

    देवमाणूस दिघे साहेब,खरचं गाणं ऐकताना डोळ्यातील पाणी थांबतच नाही,किती ग्रेट माणूस..🙏🙏

  • @pravinpawar6775
    @pravinpawar6775 2 года назад +24

    हया चित्रपटात दिघे साहेबांक अपुर्ण माहिती आहे
    मी बघितले आहेत खरे साहेब,लहान मुलांवर त्यांचा जिव होता ते लहान ।मुलांना क्रिकेट चे साहित्य द्यायचे, होळी खेळायचे ,मलंगगड ची यात्रा होयची आजून खूप काही आहे

    • @wstar8374
      @wstar8374 2 года назад

      These is movie
      Jay maharastra 🚩

  • @bhagwandhakane
    @bhagwandhakane 2 года назад +12

    00:00 गुरूपौर्णिमा
    07:02 ढाण्या वाघ
    12:47 अष्टमी
    19:25 आनंद हरपला
    25:20 थीम आॅफ धर्मवीर
    जय शिवसेना!!!!

  • @sushilbhimjiyani2807
    @sushilbhimjiyani2807 2 года назад +17

    सर्व गाणी, चित्रपट, अभिनय, अभिनेते, दिग्दर्शक निर्माता सर्वच गोष्टी अप्रतिम 👌👌👌👌👌
    प्रवीण तरडे, मंगेश देसाई, आणि प्रसाद ओक सर्वांना सॅल्युट 👍👌💐
    मी सर्व गाणी वारंवार ऐकत आहे

  • @Avinash2413.
    @Avinash2413. 2 года назад +9

    🚩मी 🚩पाहिला 🚩खूप🚩 छान🚩 चित्रपट🚩 आहे,🚩 आणि 🚩साहेबांनी 🚩घेतलेले 🚩मेहनत🚩 आणि🚩 लोकांबद्दल🚩 असलेली🚩 आपुलकी🚩 ही 🚩चित्रपटातून 🚩दिसून🚩 आली 🚩🙇🏻‍♂️🚩💐 🙏🏼साहेबांना कोटी कोटी नमन🙏🏼 💐🚩

  • @sanjanapatil422
    @sanjanapatil422 2 года назад +11

    धर्मवीर हा चित्रपट पाहिला आणि आनंद दिघे साहेबांचे कार्य पाहून खूप छान वाटलं जय महाराष्ट्र .............

  • @vaidehikulkarni1694
    @vaidehikulkarni1694 2 года назад +111

    मी कधी आनंद दिघे साहेबांना पाहिल नाही, माझ्या जन्माआधि ते गेले, पण माझ्या वडिलांनकडुन खुप ऐकलंय मी ... त्यांच कामगारांसाठीच प्रेम आणि न्याय माझ्या वडिलांनी डोळ्या देखत पाहिलाय. ही सर्व गाणी मनाला भिडणारी आहेत. साहेब गेले नाही त्यांच्या कारकिर्दीमुळे अनेक पिढ्या अमर आहेत. "आनंद हरपला " गाण ऐकताना डोळे पाणावले हया गाण्यातून साहेबांना अनुभवल्या सारखं वाटलं. चित्रपटाची आतुरता वाढली.🚩🚩🚩🚩

    • @manishpatil3918
      @manishpatil3918 2 года назад

      Nice.. Vaidehi.. 13 may la bagh mg.. Jodila kon nasel tar msg kar mala.. Aatach 🥰🤗

    • @vaidehikulkarni1694
      @vaidehikulkarni1694 2 года назад +1

      @@manishpatil3918 thanks bro pn mi mazya vadilan brobr bghnar ahe ...

    • @manishpatil3918
      @manishpatil3918 2 года назад +1

      @@vaidehikulkarni1694 ho Sister.. Brobr aahe.. Father Is best.. Always 🔱💥💯💞🥰🤗

    • @ushabalkasbe5560
      @ushabalkasbe5560 2 года назад +1

      Llĺ

    • @Kunbi_girl__
      @Kunbi_girl__ 2 года назад +1

      Woww♥️🥺khup chhan boli

  • @amazingmayur3903
    @amazingmayur3903 2 года назад +6

    अप्रतिम चित्रपट खरच डोळे भरून आलेत प्रसाद ओक नि अप्रतिम काम केले आहे मी प्रत्यक्ष दिघे साहेबाना जवळून बघितलं आहे हुबे हब भूमिका केली ओक साहेबानी

  • @sagarsurwade177
    @sagarsurwade177 2 года назад +13

    आनंद साहेब तुमच्या कर्तुत्वाला मी मनापासून नमस्कार करतो.. तुमच्यासारखा माणूस म्हणजे महाराष्ट्राचा अभिमान हाय साहेब.. 🙏🙏

  • @raghunathgonge8202
    @raghunathgonge8202 2 года назад +14

    आनंद दिघे साहेब महाराष्ट्रालाच काय अख्या हिन्दुस्थानला तुमच्या सारख्या ढाण्या वाघाची आवश्यकता होती.
    !!जय महाराष्ट्र जय आनंद!!
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @udaypatekar
    @udaypatekar 2 года назад +7

    खुप खुप खुप सुंदर सिनेमा, मन भरून आलं. आज पर्यंत ऐकून होतो आज पाहिलं.

  • @rajendrashimpi8830
    @rajendrashimpi8830 2 года назад +5

    खूपच अप्रतिम चित्रपट खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब,मंगेश देसाई,प्रवी तर्डे,आणि अर्थात प्रसाद ओक आणि अजय अतुल ,आणि चित्रपटाची संपूर्ण टीम सर्व कलाकार ग्रेट भेट!!!!!

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 2 года назад

      Ajay Atul yanche Sangeet nahi ahe hya movie la

  • @gauravshinde5861
    @gauravshinde5861 2 года назад +12

    असा धर्मवीर पुन्हा होणे नाही🙏🚩

  • @Nikitapawar56
    @Nikitapawar56 2 года назад +9

    साहेब भावपूर्ण श्रद्धांजलि 💐💐 ....असे धर्मवीर पुन्हा होने नाही ,साहेब तुमि पुन्हा या.💐💐💐💐

  • @omkarpatil1309
    @omkarpatil1309 2 года назад +11

    साहेब आज तुमची आणि बाळासाहेबांची महाराष्ट्राला गरज आहे परत या साहेब 😥🙏😭😭आज आपल्या महाराष्ट्राला वाचवायचा आहे🙏🙏

  • @मिलनशाॅर्ट्स
    @मिलनशाॅर्ट्स 2 года назад +11

    महाराष्ट्राच्या देवा आनंद दिघे साहेब तुम्ही परत या ह्या महाराष्ट्राला वाचवायला परत या, परत या...... परत या 😭😭😭

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 2 года назад +12

    साहेब तुमची कमी शिवसेनेला आणि आमच्या सारख्या शिवसैनिकांना खूप भासत आहे तुम्ही असतात कोणाची हिम्मत झाली आपल्याला बोलायला

  • @VinodTare-mc8cc
    @VinodTare-mc8cc 2 года назад +9

    स्व.धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे...
    खुप छान व हद्यस्पर्शी संगीत गाणी..

  • @suchitaghadage9670
    @suchitaghadage9670 Год назад +7

    खुप खुप छान वाटले हे सुंदर गाणे ऐकून आणि डोळ्यातून पाणी याव असचं काम साहेबांनी केलेले आहे😭❤💐

  • @ashish5897.
    @ashish5897. 2 года назад +8

    आनंद हरपला.....खुप अप्रतिम song आहे..

  • @anilkamlajkar9049
    @anilkamlajkar9049 2 года назад +7

    दिघे साहेब सारखे प्रत्येक जिल्ह्यात एक आनंद दिघे पाहिजे जिगरबाज लढवय्ये समाजासाठी सर्वस्वी अर्पण करणारा पाहिजे. दिघे साहेबांना मनाचा मुजरा....

    • @rajnirmale1378
      @rajnirmale1378 2 года назад

      As ks hoaeil ashi manse khup bhagyvana la miltat

  • @jopadeviflour1499
    @jopadeviflour1499 2 года назад +11

    ही गाणी मी दिवसातून शंभर वेळा ऐकतो आणि ऐकत राहणार

  • @ssunil1310
    @ssunil1310 2 года назад +8

    ढाण्या वाग आंगावर काटा आणणारा गाणं आहे ! दिघे साहेब अमर असो

  • @sweettooth3895
    @sweettooth3895 2 года назад +5

    असे दिघेसाहेब पुन्हा होणे नाही...🚩🚩🙏 अप्रतिम गाणी... आनंद दिघे साहेब अमर रहे

  • @nitishkad8316
    @nitishkad8316 2 года назад +14

    आनंद दिगे साहेब गेले तेंव्हा मी 11 वर्षाचा होतो... ह्या सिनेमाच्या माध्यमातून असं वाटतय सारखं सारखं किं त्यावेळी मी थोडा मोठा असतो तर नक्की मला त्यांना पाहता आलं असत भेटता आल असत... खरच राहून राहून खंत वाटते किं एकदा त्यांना भेटता आलं असत तर त्यासारखा दुसरा आनंद तो काय..... पण त्त्यांच्या समाधीला भेट देऊन नक्कीच नतमस्तक होणार आहे 🚩🚩🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 года назад +5

    आज प्रसाद ओक खुप मोठे झाले ही दिघे साहेबांची कृपा आज पर्यंत ईतीहासातील खरी भुमीका. शिंदे साहेब यांनी महाराष्ट्र भुषण देऊन गौरव करावा यातच शिंदे साहेबाची खरी गुरू स्थानी असलेली भक्ती.प्रेम व्यतीत होईल संपूर्ण महाराष्ट्रात येणारे सर्व स्वाभिमानी पुरस्कार या सिनेमाला मिळाला पाहीजे मनस्वी शुभेच्छा या ढाण्या वाघाला व असे गुरू दिघे व शिंदे साहेबाना.मनस्वी धन्यवाद शिंदे

  • @Aamhi_belgavkar
    @Aamhi_belgavkar 2 года назад +23

    हा सिनेमा पहिल्या क्षणापासून माझं जीवनच बदलून गेलं 💯 आता खरा जीवनाचा अर्थ समजला🙂🌺🌸⛳🙏🏻

  • @rakeshmandavkar787
    @rakeshmandavkar787 2 года назад +9

    प्रसादओक सरांनी चागली भुमिका साखारली...
    त्यांचेअभिनंदन....

  • @mansidhalewadikar7551
    @mansidhalewadikar7551 2 года назад +8

    सिनेमा पाहिल्यानंतर गाण्याचा प्रभाव अप्रतिम वाटला, अभिनय तर लाजवाब👍👍

  • @saraswatituitions6879
    @saraswatituitions6879 2 года назад +6

    खरं आहे प्रसाद ओक मी तुम्हाला २००० या वर्षी घरकुल या मालिकेतून पाहत आहे पण तुम्हाला कलाकार म्हणून या भूमिकेतून मिळाला अप्रतिम साक्षात दिघे साहेब अवतरले असं वाटलं 🙏🙏🙏🙏

  • @lokeshbawankar2543
    @lokeshbawankar2543 2 года назад +13

    साहेब आजन्म हा भगवा सोडणार नाही शिवसैनिक म्हणूनच शेवटच्या श्वास घेईन

    • @vitthalrane9318
      @vitthalrane9318 2 года назад

      साहेब शेवट पर्यंत हाता मधला भगवा खाली कधीच ठेवणार नाही......जय महाराष्ट्र.....🚩

  • @noonesperfect
    @noonesperfect 2 года назад +4

    सर्वच गाणी सुंदर झाली आहे. आनंद हरपला आनी ट्रेलरची थीम एकदम अप्रतिम आहे, संगीत एकदम सूट करते ट्रेलर ला.... प्रसाद ओक एक उत्कृष्ट कलाकार म्हनून सादर होता आहे यात वाद नाही. चित्रपटला शुभेछा.

  • @kishormanohardalvi_yt697
    @kishormanohardalvi_yt697 2 года назад +12

    गाणी खूप छान आहेत,
    साहेब तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा, हीच इच्छा.

  • @bhagwantelang2860
    @bhagwantelang2860 2 года назад +11

    Ardhya Maharashtrala la sahebanch kary mahit navhat kadachit , koti koti aabhar nirmate , tarde ani oak sirla jyanni jyanni sahebanchya karyala ujaagar karnyacha alpasa prayant kela sarvanche aabhar