koyna dam update : कोयना धरण अपडेट । कोयना धरणात १५ हजार ६५० क्युसेकने आवक सुरू | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 авг 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #koynadamupdate #koynadam #कोयना #koyna_water_level #koyna #monsoon #damupdate
    koyna dam update : कोयना धरण अपडेट । कोयना धरणात १५ हजार ६५० क्युसेकने आवक सुरू | Hello Baliraja
    सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळं कोयनानगर येथे मागील चोवीस तासात १४६,नवजा १११ व महाबळेश्वर येथे १४३ मिलीमीटर पावसाची नोंद झालीये. सध्या शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. मंगळवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठ्यात १.३७ टीएमसीने वाढ झालीये. ही आनंदाची बाब आहे.
    संपूर्ण जून महिन्यात विस्कळीतपणे पाऊस पडला होता. मात्र जुलै महिना सुरू झाला आणि पहिल्याच दिवसापासून जिल्ह्याच्या पश्चिमेकडील पाटणसह कराड, सातारा, जावळी, महाबळेश्वर तालुक्यात व कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने सुरूवात झालीये. मंगळवारी पाटणसह कोयना धरण परिसरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. यामुळे परिसरातील ओढ्या, नाल्यांना पाणी वाढलं. यामुळं पाटण तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, काजळी, काफना, उत्तरमांड या नद्यांच्या तर कराड तालुक्यातील मुख्य असलेल्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाल्याने या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
    कोयना जलाशयातील पाणीपातळी ६२७. ८३७ मीटर इतकी झाली आहे. सध्या शिवसागर जलाशयात १५ हजार ६५० क्युसेक्सने पाणी जमा होत आहे. १०५.२५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणात सध्या २१.९३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 3