Ladghar beach Dapoli | Sagar Sawali Resort |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 сен 2024
  • आपण आज आलोय कोकणातील (Konkan) दापोली (Dapoli) जवळच्या लाडघर (Ladghar) बीचवर.
    पुण्यापासून (Pune) 200 किलोमीटर आणि मुंबईपासून (Mumbai) 250 किलोमीटर असलेला लाडघर बीच.
    पुण्यापासून (Pune) सकाळी साधारण नऊ वाजता सुरू झालेला आमचा प्रवास दुपारी दोनच्या सुमारास येऊन थांबला लाडघरबीच वरील एका मस्त रिसॉर्ट वर.
    रमणीय वातावरण आणि आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा सागरसावली बीच रिसॉर्ट वर आपण थांबलो आहोत.
    रिसॉर्टवर पोहोचल्यानंतर सर्वप्रथम थोडी न्याहारी केली.
    समोरच शांत समुद्रकिनारा, आणि दूरवर असलेल्या टेकड्या, आम्हाला खुणावत होत्या.
    आरामदायी लँडस्केप, अप्रतिम स्वतंत्र कॉटेजेस आणि मनाला भुरळ घालणारी सुंदर हिरवळ यामुळे सागरसावली हे पर्यटकांचे आवडते रिसॉर्ट बनले आहे.
    एलईडी टीव्ही, एसी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, शॉवर, इंटरकॉम, दैनंदिन हाउसकीपिंग, आणि अतिशय काळजीपूर्वक ठेवले जाणारे स्वच्छता यामुळे पर्यटक या रिसॉर्टच्या प्रेमात पडतात.
    डेस्टिनेशन वेडिंग सोशल आणि कार्पोरेट इव्हेंट्स यांसाठी हे रिसॉर्ट अतिशय परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
    रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल ची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या वेळी फिरायला बाहेर पडणे ऐवजी पर्यटक तसेच लहान मुले स्विमिंग पूल चाहि आनंद घेऊ शकतात.
    दुपारच्या विश्रांतीनंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला समोरच्या अथांग पसरलेल्या समुद्राकडे.
    दापोलीपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर लाडघर अतिशय प्रशस्त, शांत असा समुद्रकिनारा.
    कोकणातील या समुद्रकिनाऱ्यावर आयोजित केलेल्या थरारक साहसी खेळांचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येक हंगामात जलक्रीडाप्रेमी समुद्रकिनाऱ्यावर गर्दी करतात.
    बनाना राईड, वॉटर स्कूटर आणि पॉवरबोटसह डॉल्फिन सफारी, पॅरासेलिंग यांचा आनंद घेऊ शकता.
    थांग समुद्र किनार्‍यावर केलेली भटकंती मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते.
    समुद्रावरून फिरून परत आल्यानंतर आता मात्र पोटात कावळे ओरडू लागलेत. अतिशय उत्तम चविष्ट कोकणी पद्धतीच्या जेवणाची सोय सागर सावली करते. खवय्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीची मासे, उकडीचे मोदक सोलकडी इत्यादी कोकणी पदार्थांचा आम्ही या तीन दिवसात मनसोक्त आनंद घेतला.
    दुपारच्या वेळेला उन्हाची तीव्रता काहीशी जास्त आहे. यावेळी पर्यटक विश्रांती घेणे पसंत करतात
    संध्याकाळच्या वेळेला संध्यारंगांमध्ये नाऊन गेलेले सागराचे एक वेगळेच, सुंदर स्वरूप पाहायला मिळते. यावेळी समुद्रकिनाऱ्यावर मारलेले रपेट, जिवलगा बरोबर केलेला संवाद, ट्रिपचा आनंदामध्ये आणखीन भर घालेल यात शंकाच नाही.
    लक्ष दिव्यांच्या प्रकाशात नवीन निघालेले रिसॉर्टचे एक वेगळेच रूप संध्याकाळी पाहायला मिळते.
    अशा सुंदर वातावरणामध्ये तीन दिवस कसे पटकन निघुन गेले समजलेच नाही.
    या सुंदर तीन दिवसांचा आनंद घेऊन आम्ही पुढे निघालो भटकंतीच्या एका नवीन सफरीवर.
    चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन एडवेंचर वर. एडवेंचर सुरू करण्यापूर्वी अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर.
    #konkan #ladghar #dapoli

Комментарии • 24

  • @pmshenoy3500
    @pmshenoy3500 Месяц назад

    Very good scenery.

  • @Mahesh-lg7cy
    @Mahesh-lg7cy 2 месяца назад

    यांचे दर फार जास्त आहेत

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  2 месяца назад

      हो आहेत. सीजननुसार बदलतात. पण जास्त आहेत.

  • @neelakukade4609
    @neelakukade4609 5 месяцев назад +3

    खुपच महाग आहे. परत फक्त नाश्ता इनकलूयड. जेवणाचे चार्जेस वेगळे

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  5 месяцев назад

      हो जवळपास सर्वच ठिकाणी फक्त नाश्ताच बिलामध्ये असतो. इतर सर्व सुविधांसाठी जास्त चार्जेस द्यावे लागतात.

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  5 месяцев назад

      पण सागर सावली कसे वाटले तुम्हाला?

  • @KokaniManus-tl8yo
    @KokaniManus-tl8yo Год назад +4

    Mahag ahe

  • @sushantkaduskar8758
    @sushantkaduskar8758 11 месяцев назад +3

    2 divs stay che per person ky price ahe

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  11 месяцев назад

      It will cost around 7k. Better check the site.

  • @sagarombase3468
    @sagarombase3468 8 месяцев назад

    4adult aani 4 children aahe below 14
    2 divas stay kay cost hoil

  • @mahendidesigns___artist
    @mahendidesigns___artist Год назад

    2 din ka kitna price hai , or khane ke sath ya only room milega , please sirf fast bolo na .......

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  Год назад

      It's around 3800/day for stay excluding Food. You need pay for food separately.

    • @pawardeepak2
      @pawardeepak2 4 месяца назад

      @@MarathiMatter24 खूपच महाग आहे

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  4 месяца назад

      काही बदल झाले असतील तर माहीत नाही. एकदा चेक करा

  • @santoshmusale792
    @santoshmusale792 Год назад +1

    सागर सावली रिसॉर्ट चा नंबर मिळेल का

  • @riddhiigadaa
    @riddhiigadaa Год назад

    Average Price for one night per person

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  Год назад

      Depends on what time you visit. We visited during holiday season. It cost around 6k for 2. Visit their website once.😊

    • @BhaveshBhagat-bf9ye
      @BhaveshBhagat-bf9ye Год назад +1

      Weekdays la pn mahag khup

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  Год назад

      Oh i see. We went during holiday season. Not sure about normal days

    • @MarathiMatter24
      @MarathiMatter24  Год назад

      Good to know that