𝗕𝗛𝗔𝗧𝗦𝗔 𝗗𝗔𝗠 || 𝗦𝗛𝗔𝗛𝗔𝗣𝗨𝗥 𝗠𝗔𝗛𝗔𝗥𝗔𝗦𝗛𝗧𝗥𝗔 || भातसा धरण ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • भातसा धरण.......
    .
    . महाराष्ट्र राज्यातल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील साजवली गावाजवळ बांधलेले आणि मुंबईस पाणीपुरवठा करणारे हे एक महत्त्वाचे धरण असून केवळ पाणीपुरवठाच नव्हे तर बहुउद्देशीय असा हा भातसा प्रकल्प आहे. हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही छोटी नदी भातसा नदीची उपनदी आहे. धरण शहापूर या गावापासून २० किलोमीटरवर आहे.
    धरणाचे बांधकाम १९६९मध्ये सुरू झाले. सुरुवातीला कामाचा वेग संथ होता. जेव्हा काम सुरू झाले त्यावेळी १४ कोटी रुपये एवढाच खर्चाचा अंदाज होता. इ.स.१९७३पर्यंत कामाची गती फार कमी होती. तेव्हा पाटबंधारे खात्यामार्फत हे काम हाती घेण्यात आले. डिसेंबर १९८३पर्यंत हया प्रकल्पाचा खर्च ८० कोटी रुपयांवर तर १९९४-९५पर्यंत हा खर्च ३५८ कोटी रुपयांवर पोहचला. २००० सालापर्यंत काम पूर्णावस्थेला आले.
    मुंबई शहराचा ५० टक्के(१३५ कोटी लिटर) पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. विहार, तानसा, आणि वैतरणा या धरणांतून उरलेले ५० टक्के पाणी उचलले जाते. महाराष्ट्रातील दगडी धरणांमध्ये भातसा धरण सर्वात उंच आहे.
    बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
    उंची : ८९ मीटर (महाराष्ट्रात सर्वोच्च)
    लांबी : ९५९ मीटर
    एकूण बांधकाम : ५,१८,००० घनमीटर
    एकूण खोदकाम : ७०,५३० घनमीटर
    Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.Infraction ipic - Sky Blue
    .Music from #InAudio: inaudio.org/
    Track Name.
    .

Комментарии •