बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन शेवटचे कीर्तन ! Baba Maharaj Satarkar Latest Kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2023
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!

Комментарии • 1 тыс.

  • @user-jv7cl5uc9b

    राम कृष्ण हरी 🙏हा आवाज ऐकू आला की अंगावर काटा येतो, कडक आवाज आणि स्पष्ट शब्द,मुदेसुद दृष्टांत एकत राहाव असा कीर्तन प्रवचन भजन,माऊलीचे उपकार आहेत की असे रत्न आम्हाला मिळाले ,ही पोकळी कधीच भरून निघणार नाही.परंतु बाबाचा आवाज सदैव आपल्यात राहील.अतिशय वेदना होतात.भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @kalpanaborkar383

    भावपूर्ण श्रध्दांजली बाबानां कोटीकोटी प्रणम

  • @mangalaalawani4495

    बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन अतिशय सुंदर व श्रवणीय आहे, त्यामुळे ते अजरामर आहेत, त्याना भावपूर्ण श्रध्दांजली🙏🙏🙏🙏

  • @asmitagadave3981

    लहानपणापासून यांचे कीर्तन प्रवचन ऐकून आम्ही मोठे झालो, अत्यंत रसाळ वाणी , पुन्हा होने नाही ,😢 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज

  • @santoshmarmat7599
    @santoshmarmat7599 14 дней назад +1

    बाबा महाराजांचे कीर्तन अभ्यासू आणि अप्रतिम खूप सुंदर छान

  • @GaneshPatil-cy9tl

    गेले दिगंबर ईश्वर विभूती । राहिल्या त्या कीर्ती जगामाजी । वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी । आता ऐसे कोणी होने नाही ।।🙇🙏

  • @namdevadkhale6880

    गेले दिगंबर ईश्वर विभूति राहिल्या त्या कीर्ती जगा माझी .बाबा माऊली चरणी साष्टांग दंडवत

  • @santdarshancreation

    मधुर वाणी गोड अशी❤❤❤🚩🚩🚩

  • @gajanansudhakarraosuryawan9805

    पुन्हा बाबा महाराज यांच्या सारखा किर्तनकार होणे नाही हरिपाठ गाणारे गोड गळ्याचे गायक होणार नाहीत किर्तनात सर्वांना मंत्रमुग्ध करणारे बाबा महाराज सातारकर होणार नाहीत.भावपुर्ण श्रध्दाजंली 😢😢

  • @jitendrapol4959

    ,, ज्यांना साक्षात परमेश्वर पांडुरंग प्रसन्न आहे असे बाबा महाराज

  • @jyotikolhe4031

    जय जय राम कृष्ण हरी ऐकावे तर आदरणीय कीर्तनकार बाबा महाराजांच्या मधुर स्पष्ट अश्याच वाणीतून,कानाची तृप्ती होण्याची क्षमता खरंतर त्यांची अमृततुल्य बोलीभाषेतील कीर्तने. आम्हास रोजच त्यांची किर्तने ऐकण्याची सवयच लागून राहीली.आजही अनेक जीवनविषयक सुत्र स्वजीवनात आण्यासाठीची युट्यूबवर आलेली किर्तने वारंवार ऐकून ही मन तृप्त होत होते. आता तर मनाला स्थिर करावेच लागेल, जे त्यांनी आम्हास आपल्या वाक्चातुर्याने कळत नकळत शिकवले ते कोणत्याच शाळेत जाऊन शिकायला मिळणार नाही. ते भाग्य शिक्षणाचे वृद्धापकाळापर्यंत आम्हास भाग्य मिळाले.धन्य बाबा महाराज असे पुन्हा नवीन होणे नाही.

  • @deepakdandekar8473

    1990 बाबा महाराज सातारकर यांचे किर्ती ऐकली आहे. ते किर्तनात छोटी छोटी उदाहरणे देऊन मुद्दा पटवून देतात. अप्रतिम किर्ती सांगण्याची हातोटी असल्याने किर्ती ऐकण्याचा कंटाळा येत नाही. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @swapnilpacharne

    अनाथांचा नाथ सोडुनि पार्थिव

  • @dnyaneshvarkate8893

    बाबा माझ्या ऊभ्या आयुष्या तुमच्या सारखा अभंगाच्या ह्रदयात जाऊन सोडवणूक करणारा साधु नाही भेटला .

  • @vijaykumarsharma8700

    बाबा महाराज जी यांच्या वर मां सरस्वती ची असिम कृपा आहे व पाडूरंगाची सेवा अखेर पर्यंत करण्याचे भाग्य श्री महाराज जीना लाभले जन्मैजन्मी महाराज जी चे किर्तन श्रवण करण्याचे भाग्य मिळाले की मन तृप्त होणार च 🚩🚩🚩🙏🙏आदरपूर्वक श्रधांजलि 🚩🚩🙏🙏

  • @rajendrae.deshmukh3157

    ज्याच्या जीवनात सुख शांती समाधान नाही त्याने बाबा महाराजांची सुंदर, मधुर ,कर्णप्रिय, भक्त्तीपुर्ण,अर्थपुर्ण ,ज्ञानदायी जेवढी शक्य होईल तेवढी कीर्तन प्रवचन अधून मधून ऐकावीत आणि तुमच्या जीवनात किती सर्व समावेशक ऐहिक व परलौकीक प्रगती होते त्याचा नक्की अनुभव घ्यावा. अशा थोर ह.भ.प.बाबामहाराज सातारकर यांच्या चरणी कोटी कोटी सां.नमस्कार आणि अश्रृपुर्ण, भावपूर्ण श्रध्दांजली.🎉 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏 🎉पांडुरंग हरी-वासुदेव हरी🎉 🙏

  • @dayanandachavan8170

    बाबा महाराच्या जाण्यान मनाला खूप हुरहुर लागली आहे कारण रोज सकाळी योगा करत महाराजांंचे किर्तन ,̊ऐकण्याचा मला छंदच लागला आहे असो महाराज कुठेही गेले नाहीत किर्तन रूपात ते आपल्यापाशीच आहेत त्यांच्या‌ गोड वाणीने सर्व जगाला वेड लावले आहे

  • @dilipmore1500

    आफ्रिकेतून वंदनीय बाबामहाराज सातारकार यांना भावपुर्ण श्रद्धांजली

  • @rameshjpatil1526

    बाबा महाराज सातारकर म्हणजे मूर्तिमंत ज्ञान कर्माचा व धर्माचा सिद्धांत सांगणारे बाबा महाराज गेल्याचे दुःख अपरिमित आहे रमेश जे पाटील आडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव

  • @user-ss3re2rb2z

    खुप आवडीने तुमचे सगळे कीर्तन पाहिले त्या मधून खूप आनंद आणि शिकायला मिळाले आणि बाबांचे कीर्तन खूप आवडतं होते नवीन कीर्तन ऐकण्याची आणि पाहण्याची संधी संपली त्या मुळे खेद व्यक्त करत आहे आणि बाबांना इस्वर चरणी जागा मिळेलच अशी अपेक्षा करतो 🙏🙏🙏