मिरची लागवड संपूर्ण माहिती,Mirch Lagvade smpurn mahiti,Harimirch ki Keti,byकृषीमुल्य,

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 май 2020
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीमुल्य, चॅनल वर आपले स्वागत आहे़ आपणास या विडिओ मध्य हिरवी, मिरची लागवड कशी करावी, या विषयावर संपूर्ण माहिती दिली आहे़, रोजच्या जीवनात मिरची ही गरज बनून गेली आहे. बाजारात हिरव्‍या मिरचीस बाराही महिने खूप मागणी आहे. भारतीय मिरचीला विदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड, जळगांव, धुळे, सोलापूर, कोल्‍हापूर, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, उस्‍मानाबाद या जिल्‍हयात जास्त प्रमाणात पिक घेतले जाते. मिरचीमध्‍ये ‘अ’ व ‘क’ जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्‍दा होतो.
    लागवड रोपांची :
    मिरचीची लागवड सरी वरंब्यावर करतात. उंची आणि पसरट वाढणाऱ्या जातींची लागवड ७५ बाय ६० किंवा ६० बाय ६० सें.मी. अंतरावर तर छोट्या जातीची लागवड ६० बाय ४५ सें.मी. अंतरावर करावी. काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे. रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने काढून घ्यावी. जास्त मोठी रोपे असल्यास रोपाचा शेंडा कापुन लागवड करावी.
    लागवडी पूर्वी रोपे:
    पानांचा भाग पाच मिनिटे प्रोफेनोफॉस (५० टक्के ईसी) १० ग्रॅम अधिक मॅंकोझेब २५ ग्रॅम जास्त पाण्यात विरघळणारे गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळावे. या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत आणि मिरचीची लागवड करण्यास सुरवात करावी.
    मिरचीची सुधारित वाण :
    नवनवीन सुधारित वाण व लागवड तंत्रज्ञान यामुळे मिरची पिकातील उत्पन्न जास्त प्रमाणावर वाढत आहे. मिरचीमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे मोठया प्रमाणावर आहे. फॉस्फरस व कॅल्शियमचे प्रमाण चांगले आहे. मिरचीत तिखटपणा हा कॅप्सिसीन द्रव्यामुळे, तर लाल रंग कॅप्सानथिन या रंगद्रव्यामुळे येतो.
    हवामान :
    दमट हवामानात मिरची वाढ चांगली होते. आणि उत्‍पादन ही चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्‍हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात खूप पाऊस व ढगाळ वातावरण असल्‍यास फूलांची गळ जास्‍त प्रमाणात होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्‍या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली आहे आणि उत्‍पन्न खूप येते. तापमानातील बदलामुळे फळे, फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्‍पन्‍नात कमी बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.
    लागवड कालावधी : जानेवारी / फेब्रुवारी
    आंतरमशागत :
    साधरणपणे १५ ते २० दिवसा नंतर नियमित खुरपणी करवी. फुले येण्याच्या सुमारास झाडांना आधार देऊन उभे करूनघ्यावी. म्हणजेच झाडे जमिनीवर कोलमडणार नाहीत.
    बियाणे निवड : पुसा ज्वाला, सदाबहार, लोहित, सुफल, फुले ज्योती, मुक्ता बियाणे एकरी अर्धा किलो.
    बियाणे प्रक्रिया : थायरम चोळावे, थायमेट आणि गंधक मिसळावे.
    लागवड पद्धत : गादी वाफा किंवा कोकोपीट मध्ये रोपे तयार करून घ्यावे. ६ / ७ आठवड्यांनी ६० बाय ६० किंवा ७५ बाय ६० सेमी वर लागवड. रेज्ड बेड पद्धतीने दोन ओळीत ४ फुट अंतर दोन रोपात दीड फुट अंतर. प्लास्टिक मल्चिंग पेपर वापरता येतो.
    खते : एकरी १० टन शेणखत लागवड करताना एकरी १२५ किलो सुपर फोस्फेट आणि ४० किलो पोटाश द्यावे,२५ किलो युरिया. पुढे चार टप्प्यात प्रत्येकी २५ किलो युरिया.
    पाणी व्यवस्थापन : ठिबक किंवा भुई दांडी तिसऱ्या दिवशी पाणी पाळी.
    रोग / किडी : तुडतुडे, मावा, कोळी, पांढरी माशी या किडी येतात. त्यामुळे पाने कोकडतात त्यासाठी डायथेन एम -४५, २५ ग्रॅम, गंधक ३० ग्रॅम आणि प्रोफेनोफोस १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून दर १० दिवसांनी फवारावे. कीड नियंत्रणात न आल्यास क्लोरोपायरीफोस, सायपर मेथ्रीन वापरावे. फुलकिडे साठी असिफेट, कोळीसाठी डायकोफोल फवारावे.
    काढणी : १० ते १२ तोडे, उत्पादन एकरी ५० ते ७५ क्विंटल
    धन्यवाद, #krushna-Janjal #कृषीमुल्य #krushimuly

Комментарии • 57

  • @yogeshpatilshinde5729
    @yogeshpatilshinde5729 3 месяца назад

    🙏🙏

  • @BhagwabNarote
    @BhagwabNarote 5 месяцев назад

  • @BhagwabNarote
    @BhagwabNarote 5 месяцев назад

    ❤ good

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 Год назад +1

    कोणत्या महिन्यात लागवड केली आहे

  • @bhaskardive1234
    @bhaskardive1234 2 года назад

    खुप छान 👌👌

  • @user-gb7un8xy2g
    @user-gb7un8xy2g 7 месяцев назад

    भाऊ अंतर किती ठेवावे रोप पासून दुसऱ्या रोपा चे
    बेड किती
    उंची चा आणि किती चौडीचा असावा

  • @rajududwe3954
    @rajududwe3954 3 года назад +1

    Bahut acha plant

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +8

    विडिओ शेतकऱ्यांसाठी बनवली आहे मग आम्हाला मार्गर्शन करा की

    • @dddd1806
      @dddd1806 Год назад +1

      Tumhi pn video banvata na sir

  • @dattamore3050
    @dattamore3050 3 года назад +2

    super

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +6

    साहेब मला पण मिरची लागवड करायची आहे तुमचा फोन नंबर द्या ना plz

  • @sagarpatil2828
    @sagarpatil2828 3 года назад +2

    Bhau 1 janewari la lagval keli ahe khat kont dyav v fawarni konti dyavi futwa sati plz sanga

  • @vaibhavsonawane8341
    @vaibhavsonawane8341 3 года назад +2

    Kali medium jamini madhe konti variety lavavi?

  • @vijaykashid2724
    @vijaykashid2724 3 года назад +1

    Nice

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +1

    उत्पन्न किती निघते

    • @Vivekanad8600
      @Vivekanad8600 7 месяцев назад

      😂😂 भाऊ आपण मिरची पिकात phd केली आहे

  • @ramashwarpandit2578
    @ramashwarpandit2578 3 года назад +3

    मिरची 6दिवसाची आहे कलम पिवळी पडून वाळत आहे तर कोणती फावरानी घेऊ

    • @krushimuly
      @krushimuly  3 года назад

      रोको व super confuder

  • @shantinathsarde2519
    @shantinathsarde2519 2 года назад +1

    Bed kitti atarawar aahe ani malching sarv mahiti

    • @krushimuly
      @krushimuly  2 года назад

      4.5 फूट बेड mulching पेपर 30 mi

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +1

    कोणती मिरची लावली आहे

    • @krushimuly
      @krushimuly  4 года назад +1

      तुम्हाला काय माहिती हवी आहे ते कमेंट मधे विचारू शकतात

    • @MilindBhor
      @MilindBhor 4 года назад +2

      का नंबर दिला तर काय होईल

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 3 года назад +1

    अंतर कोण सांगणार

    • @krushimuly
      @krushimuly  3 года назад

      तुम्ही सांगा

  • @rudrakharwade1252
    @rudrakharwade1252 3 года назад +1

    सर आता लागवड केली तर चालेल का एप्रिल महिन्यात

    • @krushimuly
      @krushimuly  3 года назад

      20 एप्रिल नंतर चालेल

  • @vilaskohakade6843
    @vilaskohakade6843 3 года назад +2

    तुमचा मोबाईल नंबर द्या मला मिरची लागवड करायची आहे

  • @sagarpatil2828
    @sagarpatil2828 3 года назад +1

    Humic yashid kont gyav plz bhau sanga mi pahilyanda lavni keli ahe

    • @krushimuly
      @krushimuly  3 года назад

      Humistar campo companich

    • @sagarpatil2828
      @sagarpatil2828 3 года назад

      @@krushimuly ani khat konte

    • @yogeshmagar7737
      @yogeshmagar7737 3 года назад +1

      @@sagarpatil2828 मला तुमचा नंबर द्या भैय्या.. मला पण मिरची लागवड करायची आहे

    • @sagarpatil2828
      @sagarpatil2828 3 года назад +1

      @@yogeshmagar7737 9359771126

    • @sagarpatil2828
      @sagarpatil2828 3 года назад +1

      @@yogeshmagar7737 9359771126

  • @pavannavale8509
    @pavannavale8509 3 года назад +2

    सोनाली 930 हि जात कशी आहे उन्हाळी लागवा ड

  • @kalpeshjadhav3454
    @kalpeshjadhav3454 3 года назад

    Sir mirchi kontya jAtici lavavi

  • @yashrathod7330
    @yashrathod7330 2 года назад

    Lagvad kdhichi aahe sir

  • @somnathshitole6367
    @somnathshitole6367 3 года назад

    कोनत्या वानाची लागवड करावी

  • @somnathshitole6367
    @somnathshitole6367 3 года назад

    ऑक्टोबर मध्ये लागवड केली तर चालेलका...

  • @dnyaneshvarkalunke6866
    @dnyaneshvarkalunke6866 3 года назад

    25 मे ला लागवड करतोय पावसाळ्यात जमिन कसी पाहिजे एकरी उत्पादन किती

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +3

    तुम्ही तुमच्या वावरत लावली आहे का मिरची किती उत्पन्न निघत आहे

    • @sandipbagul5808
      @sandipbagul5808 3 года назад +1

      रोप मातीत लावली बहुतेक.

  • @prakashrikame8426
    @prakashrikame8426 3 года назад +1

    Konati mirchi ahe

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +1

    मोबाईल नंबर द्या

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav3155 3 года назад +1

    गाव कोणत से भाऊ तुमन नं द्या ना

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +2

    नंबर द्या म्हणजे मला तुमच्या बरोबर सविस्तर बोलता यईल मिरची संदर्भात

    • @MilindBhor
      @MilindBhor 4 года назад +1

      @@krushimuly नंबर तर बंद दाखवतोय

  • @sagarpatil2828
    @sagarpatil2828 3 года назад

    1400 zadachi lavni keli ahe

  • @Vivekanad8600
    @Vivekanad8600 7 месяцев назад

    खत कधी टाकायचं मिरची रोप लावल्यानंतर का 😂😂

  • @BTL--Swapnilsonawane
    @BTL--Swapnilsonawane 3 года назад +1

    Sir tumcha mobile number dea na plz sir

  • @somnathshitole6367
    @somnathshitole6367 3 года назад +1

    नंबर द्यावा आपला ...

  • @MilindBhor
    @MilindBhor 4 года назад +3

    तुमचा नंबर द्या की कंमेंट मध्ये

  • @user-em3hm3cx9f
    @user-em3hm3cx9f 4 года назад +1

    नमस्कार.सर.छान..तुमचा.पता.मो.घ्या.गोविद.देशमुख.रा.करडा.ता.रिसोड..जि.वाशिम.सेद्रिय.पद्दतिने.कसे.करताईल