रब्बी ज्वारी पेरणी | rabbi jwari lagwad | jawari lagwad |
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- ▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!
👉लिंक - krushidukan.bh...
====================================================================
👨🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏
🌱 भारतअॅग्री मध्ये आपले स्वागत आहे.
✅आजचा विषय - 🌱रब्बी ज्वारी पेरणी | rabbi jwari lagwad | jawari lagwad | #sorghum #farming👍
महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या ठिकाणी रब्बी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पश्चिम महाराष्ट्रात खरीप ज्वारीची लागवड होत नाही. या उलट मराठवाड्यात दोन्ही हंगामांत ज्वारीचे पीक घेतले जाते.
👉जमिनीची निवड : ज्वारी लागवडीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीमध्ये ओलावा जास्त काळ टिकून राहत नाही व वाढीच्या संवेदनशील अवस्थांमध्ये कमी ओलाव्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन उत्पादन घटते.
👉वाणांची निवड: रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारित व शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. हलक्या जमिनीसाठी सिलेक्शन-3, फुले अनुराधा, तसेच मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी 35-1, भारी जमिनीसाठी- फुले रेवती, फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. 22, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती निवडाव्यात. हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी या जातींची निवड करावी. (Show Bold Text on Screen)
👉पेरणीची वेळ : रब्बी ज्वारी लागवडीसाठी पेरणीची योग्य वेळ साधणे महत्वाचे आहे. पेरणी 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या ओलीवर पाच सें.मी. खोलीपर्यंत करावी. या काळात पेरणी केल्यास रब्बी ज्वारीचे उत्पादन चांगले मिळते.
👉पेरणी पद्धती : जमिनीची मशागत करून पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. पाभरीच्या दोन फणांत ४५ सेंमी. अंतर ठेवून बी पेरावे.
👉बियाण्याचे प्रमाण : धान्यासाठी एकरी ४ किलो संकरित बियाणे वापरावे.
👉बीज प्रक्रिया : बीज प्रक्रियेसाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्राम बाविस्टीन + २ मिली थायोमिथोक्साम ३०% हलक्या हाथाने चोळून बीज प्रक्रिया करावी. सावली मध्ये सुकवून पेरणीसाठी वापरावे.
👉रासायनिक खते : ज्वारीस १० ते १२ गाड्या शेणखतासोबत 50 किलो 10:26:26 + 10 किलो युरिया पेरतेवेळी जमिनीत खोल पेरावे. नत्राची उर्वरित अर्धी मात्रा म्हणजेच २० किलो युरिया पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी द्यावी.
👉आंतर मशागत : तण नियंत्रणासाठी कोळपणी २-३ वेळा व खुरपणी एक वेळा करावी.
👉आंतरपीक : रब्बी ज्वारी अधिक करडई यांचे ४ :४ किंवा ६ : ३ या प्रमाणाच अंतर पीक द्यावे.
👉पाणी व्यवस्थापन: संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असतांना पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी किंवा पीक पोटरीत असतांना 50 ते 55 दिवसांनी दयावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी दयावे.
👉कीड व्यवस्थापन :
1) खोडमाशी, मीजमाशी आणि खोडकिडा - क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मिली प्रति १५ लिटर पाणी फवारणी
२) मावा व तुडतुडे - डायमिथोएट ३० ईसी ३० मिलि किंवा थायामिथॉक्झाम २५ डब्ल्युजी १० ग्राम प्रति १५ लिटर पाणी फवारणी
👉रोग व्यवस्थापन - दाण्यांवरील बुरशी, पानांवरील करपा, तांबेरा, चिकटा नियंत्रणासाठी, रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्ल्यूपी) ३० ग्रॅम किंवा मॅकोझेब (७५ डब्ल्यूपी) ३० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी फवारणी करावी.
👉काढणी व उत्पादन: ज्वारी काढणीच्या वेळी कणसातील दाणे टणक होतात. दाणे खाऊन पाहिल्यास फुटताना आवाज येतो व ज्वारी पिठाळ लागते. ज्वारी काढणीनंतर 8-10 दिवस उन्हात वाळवून मळणी करावी.
तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍
✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस -
👉भारतअॅग्री ऍप - bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी - bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी - bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम - bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट - www.bharatagri.com
👉लिंक्ड इन - bit.ly/3TWtK0Z
👉भारतअॅग्री मराठी यूट्यूब चैनल - bit.ly/3Ryf3zt
👉भारतअॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल - bit.ly/3L2cRxF
#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal
खुप छान माहिती दिली
माहिती उपयुकत आहे पोसवणी खत व्य वस्तापनाची माहिती मिळावी ही विनंती 🙏🌹
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पेरणी चालेल का सर ज्वारीची
Ho
ज्वारी पोसवणी वेळची खत व्यवस्थ पण माहिती मिळावी ही विनंती 🌹🙏
Water planing with days & growth stages vidravya khat + fertiliser + spre with SheduL chart plz. Video banawat.❤
सर आपल्याला कोणत्या पिकाची माहिती हवी आहे , जर तुम्हाला शेड्युल पाहिजे असेल तर आपण अँप वरती बघू शकता , धन्यवाद सर app.bharatagri.co/chat
स्वतः च्या आवाजात महिती दिली तर बरे वाटले असते
खूप छान माहिती दिली सर
नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे, तुमचा अनुभव आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर!
खोल काळी व पाणी धारण क्षमता जास्त सामू 7.5च्यावर जमिनीसाठी कोणता वाण योग्य सर मार्गदर्शन कमेंट करा.
काळी जमीन आहे
Kurnol १८६@@RohitPatil-bu4tz
Perni kiti jastit jast kiti ushira karta yeil
पोंग्यातली आली मारण्यासाठी कोणते कीटक नाशक फवारावे ते सांगा सर
Thanks
अतिशय सुंदर माहिती दिली आहे सर
नमस्कार सर, आपण आमच्या सोबत आहेत हे ऐकून खूप छान वाटले त्याबद्दल आपले मनापासून आभार..! आपली यापुढे देखील अशीच साथ आमच्यासोबत राहू द्या. धन्यवाद...!
सर ज्वारी लागवड करुन दिड महिना झालं सर पण पाणी जास्त दिलं आणि आवकाळी पाउस पडला तर जास्त पाणी दिलं तर काय होईल का?
ज्वारी टोकण केली आहे सोयाबीन खूप उगवले आहे तर तणनाशक कोणते फवारावे
2 4 D 70ml प्रती पंप
Kmit kmi pani ki dyave lagel.
डिसेंबर महिन्यात ज्वारीची लागवड केली तर ज्वारीला मावा चिका पडणार नाही का निस वाढ
माहिती जवारी ची. खते भातशेती त टाकत आहेत.
चीटक्याचे प्रमाण जास्त झाले आहे कोणते औषध फवारावे
आपण डायनॉफोप वापरू शकता.
रब्बी हंगामातील ज्वारी साठी शेतामध्ये वाफे कसे बनवावे याबाबत एक व्हिडिओ बनवा 🙏
नक्कीच सर रब्बी हंगामात या विषयावर व्हिडिओ बनवला जाईल. धन्यवाद !
🙏👍
भाऊ आम्ही एकरी 18 क्विंटल घेतो तुम्ही तर हेक्टरी सांगता आहात
तुर्की बाजरी पिक व्हिडीओ टाका
नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat
शेती एवढी सोपी नाही
एखादी गोष्ट आपण आठ ते दहा मिनिटे मध्ये पूर्ण होईल
ऐक ऐकर मध्ये किती किलो पेरावी?
आता जवार लागवड केली चालेल का?
एकरी 28 क्विंटल घेतली मी ..तुम्ही हेक्टरी 18 क्विंटल सांगता
Kya Sarani sota City Ki raili Nahin
Batala khatmal Thana Dakota aaheit
ज्वारी मध्ये तणनाशक कोणते घ्यावे🙏
ऐक ऐकर मध्ये किती किलो पेरावी?
@@vishalkvlogs5357 4 -6 kg
@@vishalkvlogs5357 7 te 8 kg
2 फोर डी
Jwari pri imarjan harbiisaid
त न नाशक कोन्त
आपण एकरी 4 किलो प्रमाण सांगितले आहे. हे चुकीचे प्रमाण आहे.
नाही ,बरोबरच आहे एकरी चार किलो
पुरेसे आहे.
तुमच्या मते किती पाहिजे ?
ऐक ऐकर मध्ये किती किलो पेरावी?
तण नाशक कोणते वापरावे
Batala khatm Marwadi