मेल्यावरी जगाचे आभार मानले मी! जाऊ दिले मला हे उपकार मानले मी!! तेव्हा जरी जरासा होतो.. जिवंत होतो! सारेच श्वास खोटे उपचार मानले मी!! केव्हाच सांत्वनाची केली न मी अपेक्षा! अपुल्याच आसवांना नादार मानले मी!! होत्या सुन्या घराच्या भिंती विवंचनांच्या! बाहेरच्या बिळांना शेजार मानले मी!! माझ्याच बोलण्याशी आजन्म बोललो मी! विजनातल्या हवेला संसार मानले मी!! आयुष्य संपतना इतकीच खंत होती! काही भिकारड्याना दिलदार मानले मी!! माझ्या पराभवाची समजूत घातली मी! जे वार खोल गेले, ते यार मानले मी!! प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो! प्रत्येक तोतयाला अवतार मानले मी!! - सुरेश भट
कितनी बार भी सुनों मन नही भरता है. .
बहुत यथार्थ है इसके अंदर ....
सच्चाई से भरी हुई रचना ...🙏🙏🥀🥀
Sirji, kya baat hai.Bahut apratim.
mahanMadhur...shravaniy,,,sahaj sunder,,,uttam udatt...unnnnat
किती सुंदर,गोड,शांत रस,कानाला श्रवणीय वाटणारी गझल...
Haygane akali suresh bhat destat
👌👌👌
ही कोणती चाल अशी..2/10
माधव भागवत ऐका... शब्दाला साजेशी
Suresh bhat khol jakhma var funker ghaltat.
सुधीर मुजुमदार सर, कृपया ही गझल लीखीत स्वरुपात अपलोड करावी ही वानंती.
मेल्यावरी जगाचे आभार मानले मी!
जाऊ दिले मला हे उपकार मानले मी!!
तेव्हा जरी जरासा होतो.. जिवंत होतो!
सारेच श्वास खोटे उपचार मानले मी!!
केव्हाच सांत्वनाची केली न मी अपेक्षा!
अपुल्याच आसवांना नादार मानले मी!!
होत्या सुन्या घराच्या भिंती विवंचनांच्या!
बाहेरच्या बिळांना शेजार मानले मी!!
माझ्याच बोलण्याशी आजन्म बोललो मी!
विजनातल्या हवेला संसार मानले मी!!
आयुष्य संपतना इतकीच खंत होती!
काही भिकारड्याना दिलदार मानले मी!!
माझ्या पराभवाची समजूत घातली मी!
जे वार खोल गेले, ते यार मानले मी!!
प्रत्येक आरतीच्या तबकात मीच होतो!
प्रत्येक तोतयाला अवतार मानले मी!!
- सुरेश भट
Sir 🙏🙏 excellent👍👍
फार सुंदर गझल.
ऐकण्याचा पण कैफ चढतो.
बहोत ही बढ़िया गझल हैं, सादरीकरन भी बहोत बढ़िया हैं सरजी अप्रतिम बहोत हीं सुंदर रचना है मन को भा गयी बहोत बढ़िया 🙏🙏
वाव फारच सुंदर श्रवणीय
सुधीर मुजुमदार आपकी आवाज में गजब का आकर्षण है ।हिन्दी मराठी भाषा में प्रशंसनीय प्रस्तुति.है।अगली प्रस्तुति का स्वागत है।
गझल पूर्ण पाठवा
Excellent
Superbb
Very nice sir
अप्रतीम
Khub cchan
खूप छान
सुंदर
Amazing 👏👏👏